Total Pageviews

Friday 12 September 2014

KASHMIR GOVT FAILS-MODI GOVT TAKES OVER

काश्मिरात अब्दुल्ला सरकार फेल गृहसचिव अनिल गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तातडीने काश्मीरला रवाना झाले. त्यात एनआयएचे अधिकारी साजिद शापू, जम्मू-काश्मीर कॅडरचे एनआयएचे अधिकारी मुकेश सिंह व सीआरपीएफचे महासंचालक दिलीप त्रिवेदी यांचा समावेश असून हे सर्व जम्मू-काश्मीरशी परिचित आहेत. भारतीय लष्कराचे सरकार हवे -मटा ऑनलाइन जम्मू-काश्मिरावर आलेल्या पुराच्या भयंकर संकटावर मात करण्यासाठी जिवाची बाजी लावून काम करणाऱ्या भारतीय लष्कराने काश्मिरी जनतेची मने जिंकली आहेत. कालपर्यंत भारतीय जवानांबद्दल मनात अढी ठेवून असलेले काश्मिरी तरुण 'जय जवान'चे नारे देऊ लागले आहेत. 'काश्मिरात आम्हाला राजकीय नेत्यांचे नको, तर भारतीय लष्कराचे सरकार हवे,' अशी मागणी काश्मिरी तरुणाई करू लागली आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी बुधवारी श्रीनगरमधील पूरग्रस्त भागातील नागरिकांची सुटका केली आणि एअरफोर्सच्या विमानाने गुरुवारी सकाळी सर्वांना जम्मूतील टेक्निकल विमानतळावर सुखरुप पोहोचवले. इतक्या भयानक संकटातून सुटका झाल्यामुळे आनंदित आनंदीत झालेल्या लोकांनी विमानतळावरच भारतीय लष्कराचा जयजयकार करण्यास सुरुवात केली. कश्मीरमधील स्थानिक तरुण यात आघाडीवर होते. 'आमच्या घराच्या छतांवर उपाशीपोटी अवस्थेत आम्ही मदतीची याचना करत असताना एकही नेता आमच्याकडे फिरकला नाही. या संकटातून आम्हाला वाचविण्यासाठी फक्त भारतीय जवान धावून आले. त्यांनी आम्हाला नवे आयुष्य दिले. त्यामुळे काश्मीरमध्ये त्यांचेच सरकार हवे, नेत्यांचे नको, असे काश्मिरी तरुणांनी व्यक्त केले. जम्मू-काश्मीरमधील मदत व बचावकार्यात लष्कराचे तब्बल ३० हजार जवान सहभागी झाले आहेत. या जवानांनी आतापर्यंत एक लाख १० हजार लोकांची सुखरुप सुटका केली आहे. भूस्खलन जम्मू-कश्मीरमध्ये पूरामुळे भूस्सखलनही झाले आहे. कश्मीरमधील रामवन येथील डोंगराळ परिसरामध्ये जमिनीची पडझड होत आहे. जमीन सरकल्याने उधमपूरमधील पंजर सद्दाल गाव पूर्णपणे नामशेष झाले आहे. या ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्याखाली ५०हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखालून १० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जागोजागी झालेल्या छोट्यामोठ्या भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी हायवेवर मातीचे ढिग साचले आहेत. त्यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. भारतीय लष्कराने मातीचे ढिगारे बाजूला करायला सुरुवात केली आहे. मदतीचा ओघ सुरू लष्कराशिवाय इतर अनेक संस्थांनी ग्राऊण्ड झिरोवर जाऊन पूरग्रस्तांना मदत करत आहेत. रेड क्रॉस आणि इतर अनेक स्वयंसेवी संस्थांनी लहान-लहान गावांमध्ये अन्न पाण्याबरोबरच औषधांसारख्या गरजेच्या वस्तू पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. पूरग्रस्तांना मदत म्हणून पंतप्रधान कार्यालयातील सर्व कर्माचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार देऊ केला आहे. ही रक्कम पंतप्रधान मदत निधीमध्ये जमा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वेनेही जम्मू-कश्मीरमध्ये अन्न पाण्याबरोबरच गरजेच्या वस्तू पाठवण्यास सुरुवात केली आहे. देशातील कोणत्याही रेल्वे स्थानकावरून जम्मू आणि उधमपूरला मदतीची सामुग्री घेऊन जाणाऱ्या वस्तूंवर कोणत्याही प्रकारचे भाडे आकारले जाणार नसल्याची घोषणा रेल्वेने केली आहे. अनेक राज्यांच्या सरकारांनी जम्मू कश्मीरमधील पूरग्रस्तांसाठी विशेष मदत निधी जाहीर केला आहे. भारतीय लश्कराचे कार्य हे स्तुतीतुल्य आहे, पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहीजे ती म्हणजे जेव्हा अश्या नैसर्गिक आपत्ती येतात तेव्हा राज्यसरकार आणि केंद्रसरकार लश्कराचीच मदत घेते. याचा प्रत्यय आपण गुजरात मधल्या भुकंपात, हिमाचल आपत्ती, मालीन दुर्घटने वेली घेतला आहेच. आपल्या देशातच काय तर अमेरिकेत ही संकटात शेवटचा आणि खात्रीलायक पर्याय म्हणुन लश्कराकडेच पाहीले जाते. आणि आपल्या देशात तशी पर्यायी आपद्कालीन यंत्रणा कोणत्याही राज्यसरकार किंवा केंद्रसरकार कडेही नाही. तेव्हा जनतेने त्यांच्या लोकप्रतिनिधींना दोष देण्याचे सोडुन सर्व सरकारी यंत्रणेला सहकार्यकरुन पुनर्निर्माण करायची गरज आहे. भारतीय जनता जाणून आहे की काश्मीर भारताचे आहे आणि काश्मीरिही भारतीयाच आहेत. संकट काळी याची जाणीव काश्मिरींना झाली की भारतीय नागरिक आणि लष्करही त्यांना आपलेच मानते. हे त्यांनी पुरते जाणून घेतले तर काश्मीर पुन्हा पूर्ववत स्वर्ग होण्यास वेळ लागणार नाही. शेवटी आम्हीच तुमचे सुख-दुखचे वॅटेकरी आहोत हे भारतीया सैन्याने दाखवून दिला....सुखात सगळेच असतात पण दुखत जो मदतीला धावतो तोच खरा आपला हे या लोकांना कलाला असेल...जे लोक यांचा पूलका आल्यासारखी वागत असत ते आता कुठे पळाले आहेत त्याचा आता शोध घ्यावा लागेल...ती लोक फक्त तुम्हाला चढवतात आणि तुम्ही चढता..आता समजला आहे तर सुधरा नाहीतर पुन्हा जाल त्या फुतिरातावादी लोकांच्या नदी लागायला. जम्मू-कश्मीरमध्ये आज मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून लष्कराचे बचाव कार्यही तितक्याच जोमाने सुरु आहे. आज लष्कराच्या बचाव कार्याचा अकरावा दिवस असून स्थानिक लोकांना लष्कराच्या मदतीचा एकमेव आधार दिसत आहे. त्यामुळेच सध्या कश्मीरमध्ये 'आम्हाला नेत्यांचे नको भारतीय लष्कराचे सरकार हवे' असल्याच्या घोषणा कानी पडत आहेत. लष्काराच्या कार्याला मिळालेली ही पोचपावतीच आहे. पुराच्या संकटाशी सामना करणाऱ्या जम्मू-काश्मीरला सावरण्यात राज्यातील ओमर अब्दुल्ला सरकार अपयशी ठरल्याने मदत व बचावकार्याची सर्व सूत्रे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने हाती घेतली आहेत. काश्मिरातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने गृह सचिवांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र टीम बनविली असून अवघी यंत्रणा कामाला लावली आहे. जम्मू-काश्मिरातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बैठक घेतली. पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी काय-काय करता येईल, याबाबत यावेळी चर्चा झाली. या बैठकीनंतर गृहसचिव अनिल गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तातडीने काश्मीरला रवाना झाले. त्यात एनआयएचे अधिकारी साजिद शापू, जम्मू-काश्मीर कॅडरचे एनआयएचे अधिकारी मुकेश सिंह व सीआरपीएफचे महासंचालक दिलीप त्रिवेदी यांचा समावेश असून हे सर्व जम्मू-काश्मीरशी परिचित आहेत. गोस्वामी हे स्वत:ही जम्मू-काश्मीरचे असून त्यांच्या नेतृत्वाखालील टीम मदतकार्याला वेग देण्यात यशस्वी होईल, असा विश्वास केंद्र सरकारला आहे. श्रीनगरमध्ये अजूनही अडकलेत ५ लाख लोक आतापर्यंत पुरात फसलेल्या एक लाखांहून अधिक लोकांना वाचविण्यात आले आहे. तरीही श्रीनगरमध्ये अद्याप सुमारे ५ लाख लोक अडकले आहेत. पंतप्रधानांच्या सूचनेनंतर काश्मीरला मोठ्या प्रमाणात पाणी, दूध आणि तयार जेवणाचे पॅकेट्स पाठविण्यात आले आहेत. पाच टन दूध भुकटी पाठविण्यात आली असून आणखी ५ टन पाठविण्यात येणार आहे. संसर्गजन्य आजार आटोक्यात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर क्लोरिनच्या गोळ्या पाठविण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारकडून येणारे पाणी, औषधे व अन्य सामुग्री साठविण्याची खबरदारी घेण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment