Total Pageviews

Wednesday 24 September 2014

अतिरेक्यांच्या धमक्या व ‘बे्रकिंग इंडिया’चे भाकीत

अतिरेक्यांच्या धमक्या व ‘बे्रकिंग इंडिया’चे भाकीत अल् कायदा भारतात दहशतवादी कारवायांच्या मदतीने इस्लामिक राज्य उभे करण्याच्या तयारीत आहे, याची कल्पना ‘ब्रेकिंग इंडिया’ या पुस्तकाचे लेखक राजीव मल्होत्रा यांनी शेकडो पुराव्यानिशी ४ वर्षांपूर्वीच दिली होती. देशात जेहादी दहशतवादी, माओवादी यांनी परस्परांना मदत करून आपल्याला योग्य अशी भूमी वाटून घेतली आहे,असे त्यांनी पुस्तकात नमूद केले होते. सर्वांत चिंतनीय बाब म्हणजे या देशातील अनेक राज्यकिय पक्ष जेहादी, माओवादी ,संघटनांनाच आपले समर्थक मानतात. भारतात २१/०९/२०१४ पर्यंत २५३ सामान्य नागरिक,११० सैनिक,३०३ दहशतवादी/ माओवादी,मारले गेले. काश्मीरमधिल वाढती घुसखोरी सीमेपलीकडून काश्मीर खोर्या त अतिरेक्यांच्या घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न उधळून लावताना भारतीय लष्करी जवानांनी १८/०९/२०१४ला जम्मू-काश्मीरच्या तंगधार सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर लष्कर-ए-तोयबाच्या चार अतिरेक्यांना कंठस्नान घातले. जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या पुरात लष्कराच्या अनेक छावण्यांचे प्रचंड नुकसान झाले. लष्कराचा मोठा शस्त्रसाठा पुरात वाहून गेला. पुराचे पाणी आणि चिखल यात अडकून पडल्यामुळे लष्कराच्या अनेक रायफली बिघडल्या.घरात पाणी शिरल्यामुळे शेकडोजणांना लष्कराने पूर आल्यानंतर उभारलेल्या छावण्यांमध्ये आश्रय घेण्याची वेळ आली आहे. असंख्य सैनिक मदतकार्यात गुंतले आहेत. या सगळ्याचा सीमावर्ती भागातील बंदोबस्तावर परिणाम होईल असा विचार करुनच दहशतवाद्यांनी घुसखोरीची तयारी सुरू केली आहे.एकाचवेळी संरक्षण यंत्रणा सीमावर्ती भागातील आपल्या चौक्या, बंकर, छावण्यांची डागडुजी करणे आणि नागरी वस्तीत मदतकार्य सुरू ठेवणे अशी कसरत करत आहे.पाकिस्तान दहशतवाद्यांमार्फत भारतात मोठ्या प्रमाणावर हिंसा करण्यासाठी नव्याने प्रयत्न करत आहे. नियंत्रण रेषेच्या वेगवेगळ्या भागातून दोनशे दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी सज्ज आहेत. जिहादी संघटनांच्या रडारवर भारत अल् कायदाद्वारा इतक्यात जारी करण्यात आलेल्या व्हिडीओत ‘कायदात अल् जिहाद’ला भारत, बांगलादेश आणि म्यानमारमध्ये रक्तपात घडविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जवाहिरीने भारताच्या जम्मू-काश्मीर, गुजरात आणि आसाममध्ये जिहाद प्रारंभ करण्याची धमकी दिली आहे. भारताच्या आसाम, गुजरात आणि काश्मीरची निवड आपल्या जिहादी अजेंड्यात करण्यामागे अल् कायदाची विचारपूर्वक आखलेली व्यूहरचना आहे. येथील युवकांना धर्माच्या नावाखाली भडकविणे सोपे आहे. याशिवाय अल् कायदाने केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूतील युवकांना संघटनेत सहभागी करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यांना रोजगार देण्याचे आमिष दाखवून कुवैतला पाठविण्यात येत आहे. भारतात काश्मीरमध्ये अल कायदाचे नेटवर्क पूर्वीपासून आहेच. सिमी, इंडियन मुजाहिद्दीन या संघटनांच्या माध्यमातून त्यांनी कारवाया सुरूच ठेवलेल्या आहेत. बांगलादेशातून आपल्याकडे विविध कुरापती सुरू आहेतच. भारतातील युवकांच्या मनात विष कालवण्याचे काम मुजाहिदीन करते . त्यांना पाकव्याप्त काश्मीरमधील शिबिरात दहशतवादाचे धडे अल् कायदा देते. पाकिस्तानात बसून भारतात दहशतवादी कारवायांचे कटकारस्थान रचणार्याच हाफीज सईदसारख्यानेही भारतातील मुस्लिमांवर होणार्याक अन्यायाचा बदला घेण्यात येईल, अशी धमकी दिली आहे. शिवाय भारतात आपली पाळेमुळे पसरलेल्या सिमी या संघटनेकडून सतत धोका होत आला आहे. इराकमध्ये आयएसआयएस या संघटनेचा स्वयंभू खलिफा अबु बकर अल् बगदादी याने इराकमध्ये नरसंहार केल्यानंतर यापुढे आपले लक्ष्य भारत असल्याचे म्हटले आहे. आयएसआयएसजवळ सध्या ३०,००० लढवय्यांची फौज आहे.या सगळ्या संघटना अचानक भारताला धमक्या का देत सुटल्या आहेत, यामागे एखादे संघटित कटकारस्थान तर नाही ना? बगदादचे मुख्य शियापंथी अल मलिकी बगदाद यांनी जगातील सर्व शियाना शिया पंथाच्या रक्षणासाठी आमंत्रित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आयएसआयएस/अल कायदापासून आमचे रक्षण करा. त्यांला मान देऊन अलिगड येथून सहा हजार शिया पंथी युवकांनी बगदादला जाण्याची तयारी केली आहे. सर्व देशातून एकूण २५००० शिया नौजवान इराकला जाण्यासाठी तयार आहेत.या सर्व प्रकारात शिया व सुन्नी कोण कोणाला भारी पडेल हे काळ ठरवेल. यांच्या फंदात भारतियांनी न पडलेलेच बरे. असुरक्षित ईशान्य भारत आसाममधील उल्फाशी अल कायदाने संधान साधले असल्याची भीती त्या राज्याचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानमधील भारतविरोधी दहशतवादी शक्ती नक्षलवाद्यांशी आणि ईशान्येकडील फुटीर गटांशी हातमिळवणी करण्यासाठी धडपडत असल्याच्या वार्ता गुप्तचर यंत्रणांना मिळत आल्या आहेत. त्यामुळे उल्फाशी खरोखरच अल कायदाने संपर्क प्रस्थापित केलेला असेल, तर ती चिंतेची बाब म्हणायला हवी.आसाममध्ये बांगलादेशी घुसखोर आणि स्थानिक नागरिकांमध्ये संघर्ष सारखा चालु आहे. आसाममध्ये स्थानिक बोडो आदिवासींना हिंसेच्या बळावर हाकलून देणारे अवैध बांगलादेशी घुसखोर आहेत, ज्यांच्यामुळे केवळ असामच्याच लोकसंख्येचा समतोल बिघडला असे नसून, देशातील अन्य भागात ठाण मांडून बसलेल्या बांगलादेशी घुसखोरांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हुजीसारख्या दहशतवादी संघटनांच्या कारवाया बांगलादेशी घुसखोरांच्या मदतीने सुरू आहेत माओवाद्यांचा सह्याद्री डोंगररांगांत प्रवेश मध्य भारतात आपले जाळे पसरवणाऱ्या माओवाद्यांनी आता पश्चिम घाटाच्या परिसराला आपले कार्यक्षेत्र बनवण्याचा निर्णय घेतला आहे. भाकप माओवादी या पक्षाच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने सहकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात कोकण, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या भागांतील पश्चिम घाटांतून सरकारविरोधी कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. माओवाद्यानी पुण्या-मुंबईपर्यंत जाळे विणल्याचे अलीकडे दिसून आले आहे.विभिन्न अतिरेकी संघटनांकडून गेल्या महिनाभरात आलेल्या धमक्या, आमच्या सरहद्दींसह अंतर्गत सुरक्षा सांभाळणार्याग सबंध यंत्रणांसाठी सतर्कतेचा इशारा देणार्याह आहेत. पाकिस्तानच्या नापाक कारवाया आणि माओवाद्यांच्या हिंसाचाराचा मुकाबला आमचे जवान करीत असतानाच, या धमक्या एकामागून एक आल्या आहेत. दहशतवादी कारवायांसाठी संयुक्त प्रयत्न प्रत्येकाच्या लपून बसण्याच्या जागा आहेत. काही संघटना लपून बसण्याच्या जागांमुळे प्रभावी झाल्या आहेत. प्रत्येकाजवळ दहशतवादी कारवायांसाठी लागणारी शस्त्रास्त्रे आहेत. खेळता पैसा , दळणवळण साधनेही आहेत.ती साधने एकमेकांसाठी उपलब्ध करून, भूमिगत स्वरूपाची अनेक प्रशिक्षणे एकत्र चालवणे फ़ायद्याचे असते.आजारी दहशतवाद्यांची काळजी एकत्र घेता येते. या प्रकारांची सुरुवात प्रथम ईशान्येकडील राज्यात झाली व नंतर आसाम, बिहार, बंगाल, झारखंड ओरिसामध्ये सुरू झाली. गेल्या दहा वर्षांत देशभर अनेक ठिकाणी जे स्फोट झाले त्याला यांचा संयुक्त प्रयत्न कारणीभूत होता. या संघटनानी आपापसात या देशाची वाटणी करून टाकली आहे. उत्तरेतील अनेक प्रदेश जिहादासाठी आहेत. रेड कॉरिडार हे क्षेत्र माओवाद्यांसाठी आहे.येणार्या काळात भारतीय उपखंडांमध्ये दहशतवादी कारवाया वाढवणार आहे. सामना हवा दहशतवादी मानसिकतेशी ठाणे, हैदराबाद, केरळ, तमिळनाडू या भागांतील तरुणांना जिहादच्या नावाखाली दहशतवादासाठी बळी पाडले जात आहे. दहशतवादी संघटना आहेतच. पण, त्यांना मदत करणार्याख यंत्रणा आहेत तरी कुठल्या?, या भारतीय तरुणांना व्हीसा देतो तरी कोण?, त्यांना इराकमध्ये न्यायला कोण गेले होते? या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नाहीत.दहशतवादी कारवायांचे काम अतिशय गुप्तपणे सुरू आहे .ते आपल्या जवळ येऊन ठेपले आहे.दिल्ली, बिहार, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र येथील जवळजवळ ३०० भारतीय इराक आणि सीरियात आयएसआयएसबरोबर खांद्याला खांदा लावून रक्तपात घडविण्याला गेले आहेत. या गेलेल्या तरुणांमधील काही दहशतवादी बनले, तरी तो देशासाठी मोठा धोका ठरेल. यासाठीच भारताने तरुण पिढीकडे फार बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. दहशतवादी संघटनांना कधीही कमी लेखण्याची चूक करू नये. काही दहशतवादी संपले म्हणून दहशतवाद संपत नसतो. दहशतवादी मानसिकतेवर प्रहार गरजेचा असतो. तो आपण करायला हवा. दहशतवादाकडे वळलेल्या तरुणाचे सरासरी आयुष्य ५-७ वर्षांचे असते. तेव्हा या मार्गाकडे वळणार्या. तरुणांचे प्रबोधन गरजेचे आहे. दहशतवादाचा सामना हवा, तो दहशतवादी मानसिकतेशी. समाज एकसंध व्हायला हवा भारतावर काही महिन्यापासुन दहशतवादी हल्ला झाला नाही, याचा अर्थ दहशतवाद संपला असा नाही. समाजात एकी असेल, तर अल कायदासारख्या कितीही दहशतवादी संघटना उभ्या राहिल्या, तरी काहीही वाईट करू शकत नाहीत; पण अल कायदाचे हे भूत उतरवायचे असेल, तर डोळे उघडून सगळीकडे सजगतेने पाहायला हवे आणि समाज म्हणून एकसंध व्हायला हवे.दहशतवादाला पाकिस्तानचे प्रोत्साहन लाभत आले आहे.आगामी नरेन्द्र मोदी यांच्या अमेरिका दौर्यात पाकिस्तानी दहशतवादाचा मुद्दा ऊठवुन पाकिस्तानवर पुर्ण जगाकडुन दड्पण आणले पाहीजे .

No comments:

Post a Comment