Total Pageviews

Monday, 15 September 2014

KASHMIR STONE PELTING DELAYING RELIEF OPERATIONS

फुटीरतावाद्यांचा डाव जम्मू-काश्मीरमध्ये पुरात अडकलेल्या लोकांना सोडवण्यासाठी आलेल्या लष्कराच्या विमानांवर तेथील चिडलेल्या लोकांनी दगडफेक केली. मात्र, ही दगडफेक हुरियत फॉन्फरन्स या फुटीरतावादी गट नेत्यांच्या सांगण्यावरून करण्यात आली. गेल्या आठवडय़ापासून सुरू असलेल्या पावसामुळे काश्मीरमध्ये न भुतो न भविष्यती असो महाभीषण असा पूर आला होता. मदतकार्य आणि बचावकार्यासाठी भारतीय लष्कराने बाजी लावून दीड लाख लोकांचे प्राण वाचवले, त्यांना सुरक्षित स्थळी हलवले. अजूनही ब-याच ठिकाणी लोक अडकून पडले आहेत. त्यांची संख्या सुमारे दोन लाखांपर्यंत असावी. मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे खोटेनाटे आरोप हे फुटीरतावादी नेते भारतीय लष्कराच्या माथी मारत आले आहेत. पुराच्या निमित्ताने त्यांना आयती संधी चालून आले आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांना परिस्थिती नीट हाताळता आली नाही. त्यातच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून फुटीरतावादी नेत्यांवर सडकून टीका झाली. लोकांच्या मनात भारतद्वेष भरवण्यासाठी सतत प्रयत्नरत असलेले हे नेते महापुरावेळी मात्र गायब झाले होते. त्यामुळे या चिडलेल्या या नेत्यांनी अडकून पडलेल्या लोकांना चिथवून त्या आडून लष्करावर दगडफेक केली. त्यामुळे लोक संतापले आहेत, अशा बातम्या प्रसारित होऊ?लागल्या आहेत. मात्र, यात तथ्य नाही. लष्कर २४ तास बचाव आणि मदतकार्य करत आहेत. कुठेच न थांबता अन्नपाण्यासह सर्वतोपरी मदत करत असून त्यामुळे लोकांना महापुरात मोठा दिलासा मिळाला आहे. जम्मू-काश्मीरच्या पाठी संपूर्ण देश उभा राहिला. या सगळय़ा मदतीच्या ओघाने जम्मू-काश्मीरवासी भारावले. पण या सगळय़ामुळे फुटीरतावाद्यांच्या पोटात दुखू लागले आहे आणि त्यातूनच हे दगडफेकीचे प्रकार घडवून आणले जात आहेत. लष्कराच्या मदतकार्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण झाले आहे. त्यामुळे लष्करावर लोक चिडल्याचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न फुटीरतावादी करत आहे. म्हणून लष्करासह सगळा देश जम्मू-काश्मीरवरील संकट आपले मानून त्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले असताना लष्कराबाबत राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर मन कलुषित करण्यासाठी हुरियतने हे कारस्थान रचले आहे. अडकून पडलेल्यांपैकी शेकडो लोकांपर्यंत लष्कर अद्याप पोहोचू शकलेले नाही, ही बाब खरी असली तरी लष्कर दहा हातांनी चोख कामगिरी पार पाडत आहे. त्यामुळे त्यांच्या कामाबद्दल कोणाच्याही मनात किंतु नाही. लष्कराच्या नावाने जम्मू-काश्मीरच्या राजकीय पक्षांनी लष्कर हटवण्याची मागणी सातत्याने केली आहे. गेली कित्येक वर्षे पाकिस्तान, आयएसआय आणि दहशतवादी संघटनांच्या मदतीने या फुटीरतावादी नेत्यांचे राजकारण सुरू आहे. जम्मू-काश्मीरला भारतापासून तोडण्यासाठी पाकिस्तान नेहमीच फुटीरतावाद्यांना ‘स्वतंत्र काश्मीर’चे गाजर दाखवत आला आहे. पण त्या मागे काश्मीर गिळंकृत करण्याचा डाव पाकिस्तानचा आहे, हे जगाला माहीत झाले आहे. महापुरात लोकांना दिलासा देण्याऐवजी दगडफेकीच्या माध्यमातून विद्वेषाचे, फुटीरतेचा कुटील डाव आखला आहे. लष्कराने पुराच्या दहशतीला चोख प्रत्युत्तर देत आहे आणि फुटीरतावाद्यांच्या या कारस्थानाला चोख प्रत्युत्तर काश्मिरी लोकच देतील

No comments:

Post a Comment