काश्मिरी जनतेचे शत्रू
महापुराच्या भीषण विळख्यात सापडल्याने, काश्मीर खोऱ्यातली वीस लाखांच्यावर लोक गेले दहा दिवस कणभर अन्न आणि घोटभर पाण्यासाठी तळमळत आहेत. राजधानी श्रीनगरसह काश्मीर खोऱ्यातल्या पूर्णपणे जलमय झालेल्या शेकडो खेड्यातल्या भुकेल्यांना अन्न आणि पाणी पोहोचवायसाठी लष्कर, हवाईदल, नौदलाचे लाखो जवान रात्रीचा दिवस करून, प्रसंगी आपले प्राण धोक्यात घालून मदत कार्यात मग्न आहेत.संकटात सापडलेल्या दीड लाखाच्यावर लोकांना लष्कराने सुरक्षित स्थळी हलवले आहे. ज्या भागापर्यंत कुणीही पोहोचलेले नाही आणि पोहोचायची शक्यता नाही, अशा दुर्गम भागातही हेलिकॉप्टर्स आणि नावांद्वारे अन्न, पाण्याचा पुरवठा लष्कराने सुरू केला आहे. सध्याच्या महाभीषण स्थितीत काश्मीरचे सरकार आणि प्रशासन बेपत्ताच असल्याने, या लाखो निराधारांना लष्करा शिवाय अन्य कुणाचाही आधार नाही. अशा स्थितीत भुकेने व्याकूळ झालेल्या बालकांना, महिलांना, वृद्धांना आणि लोकांना अन्न धान्याचा, भोजनाच्या पाकिटांचा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करायसाठी बोटीने जाणाऱ्या लष्करी जवानांवर काही नादान फुटिरतावाद्यांच्या टोळक्यांनी दगडफेक केल्याच्या, जवानांवर हल्ले चढवल्याच्या अत्यंत निंद्य घटना श्रीनगर परिसरात घडल्या आहेत.
उठसूट बंदचा आदेश देणारे अली शाह गिलानी, यासीम मलिक, शब्बीर शेख याच्यासह बहुतांश फुटिरतावादी नेते घुबडासारखे तोंड लपवून सुरक्षित ठिकाणी पळून गेले आहेत. काश्मिरी जनतेच्या जीवन मरणाशी त्यांचे काहीही देणे-घेणे नाही. काश्मीरचे मंत्रीही बेपत्ता झालेत. अशा स्थितीत महाभीषण पुराच्या संकटात सापडलेल्या वीस लाखांच्यावर लोकांना लष्कर हेच देवदूतासारखे वाटते आहे. लष्कर नसते तर काश्मीर खोऱ्यात हजारोंचे बळी आणि त्यानंतर भूकबळीही गेले असते. काश्मिरी जनतेने लष्कराने केलेल्या या सहाय्याबद्दल जाहीरपणे कृतज्ञताही व्यक्त केल्यानेच, फुटिरतावाद्यांचा पोटशूळ उठला आहे.
भुकेल्यांना मदत करायची नाही, त्यांना सहाय्य करायचे नाही, त्यांच्या मदतीसाठी पुढे यायचे नाही. पण पुरात अडकलेले लोक उपाशीपोटी टाचा घासून मरावेत, त्यांना अन्नपाणी मिळू नये, यासाठीच लष्कराच्या हेलिकॉप्टर्सवर आणि नावांवर दहशतवाद्यांच्या पिलावळीने दगडफेकीचे हे सत्र सुरू केले आहे. घरांच्या छतावर आश्रय घेतलेल्या हजारो काश्मिरींना हेलिकॉप्टर्सद्वारे अन्न आणि पाण्याची पाकिटे कमी उंचीवरून टाकावे लागतात. नेमक्या त्याच संधीचा फायदा घेत, फुटिरतावाद्यांनी हेलिकॉप्टर्सवर दगडफेक सुरू केली आहे. अशा घटना घडल्या, तरीही लष्कर आपले मदतकार्य बंद करणार नाही. शेटवच्या माणसापर्यंत मदत पोहोचवली जाईल, अशी ग्वाही हवाईदल प्रमुखांनी दिली आहेच! मानवतेच्या या शत्रूंना काश्मिरी जनताच आता धडा शिकवेल. फुटिरतावाद्यांचे राक्षसी स्वरूप काश्मिरी जनतेसमोर या निमित्ताने आले, ते बरे झाले!
टीरतावादी कश्मिरी नेते काय किंवा हाफिज सईदसारखे पाकडे दहशतवादी काय, त्यांचे जिहादी फणे आमच्या राज्यकर्त्यांनी वेळीच ठेचले नाहीत, म्हणूनच त्यांचे हिंदुस्थानविरोधी फूत्कार सुरूच आहेत.
जिहादी फणे!
जम्मू-कश्मीरमधील पूरस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गदेखील तब्बल तेरा दिवसांनी वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या संपूर्ण आणीबाणीच्या काळात हिंदुस्थानी लष्कराने केलेल्या अभूतपूर्व बचावकार्याचे कश्मिरी जनताच नव्हे, तर देश-विदेशातूनही कौतुक होत आहे. अर्थात कश्मीरमध्ये फुटीरतावादी आणि पाकिस्तानात हाफिज सईद यांच्या मात्र हे पचनी पडलेले नाही. त्यामुळे त्यांचे हिंदुस्थानविरोधी गरळ ओकणे सुरूच आहे. जम्मू-कश्मीरमध्ये महाप्रलय झाला त्याच वेळी पाकिस्तानातही महापूर आला होता. त्याचे खापर हिंदुस्थानवर फोडण्याचे उद्योग हाफिजमियां गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करीत आहे. हिंदुस्थानने पूर्वसूचना न देता अचानक पाणी सोडल्याने पाकिस्तानातील स्वात खोरे आणि अन्य भागांत महापूरसदृश स्थिती उद्भवली. हिंदुस्थानचा हा ‘जलदहशतवाद’ आहे, असे गरळ हाफिज याने पुन्हा ओकले आहे. एवढ्यावरच हा
‘२६/११’च्या मुंबईहल्ल्याचा म्होरक्या थांबलेला नाही. हिंदुस्थानचा ‘जलदहशतवाद’ थांबला नाही तर हिंदुस्थानविरुद्ध पुन्हा जिहाद पुकारला जाईल असे फूत्कार त्याने सोडले आहेत. गेल्याच आठवड्यात ‘अल कायदा’ने हिंदुस्थानविरोधात जिहाद पुकारल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता हाफिज सईदने जिहादची वल्गना केली आहे. इकडे कश्मीरमधील फुटीरतावाद्यांचे हिंदुस्थानी लष्कराच्या बचावकार्यात खोडा घालण्याचे उपद्व्याप सुरूच आहेत. जम्मू-कश्मीरमधील मुस्लिम बांधवांमध्ये हिंदुस्थानी लष्कराबद्दल जे चांगले वातावरण बचावकार्यामुळे निर्माण झाले आहे ते दूषित व्हावे आणि पाकिस्तानी जनतेच्या मनातही हिंदुस्थानविरोधात चीड उत्पन्न व्हावी याच हेतूने फुटीरतावादी आणि हाफिज सईदसारखी मंडळी जिहादची बांग देत आहेत. फुटीरतावादी कश्मिरी नेते काय किंवा हाफिज सईदसारखे पाकडे दहशतवादी काय, त्यांचे जिहादी फणे आमच्या राज्यकर्त्यांनी वेळीच ठेचले नाहीत, म्हणूनच त्यांचे हिंदुस्थानविरोधी फूत्कार सुरूच आहेत
जम्मू-काश्मीरमधील पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या भारतीय लष्कराच्या व स्वयंसेवी संस्थांच्या कामात खोडा घालण्याचे काम फुटिरतावाद्यांकडून सुरू आहे. जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) म्होरक्या यासिन मलिकने मंगळवारी कहरच केला. पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या महाराष्ट्रातील एका पथकाची बोट हिसकावून घेऊन मलिक व त्याच्या साथीदारांनी त्यातील खाद्यपदार्थ लोकांना वाटले. हे दृश्य टीव्ही कॅमेऱ्यांत बंदिस्त झाल्याने त्याची नौटंकी उघड झाली.
भारतीय लष्कर जिवाची पर्वा न करता काश्मिरातील पूरग्रस्तांना मदत करत आहे. लष्कराने आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक लोकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढले आहे. त्यामुळे भारतीय लष्कराबाबत काश्मिरी जनतेमध्ये आपलेपणा वाढत आहे. काश्मिरी जनतेच्या या मतपरिवर्तनामुळे फुटिरतावाद्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच मदतकार्यात अडथळे आणून व उलटा प्रचार करून लष्कराबद्दल काश्मिरींचे मन कलुषित करण्याचे उद्योग फुटिरांनी सुरू केले आहेत. पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईद यांच्या व्यासपीठावर जाणारा यासिन मलिक आणि त्याची टोळी यात आघाडीवर आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे एक पथक मंगळवारी काश्मीरमधील बचाव कार्यात सहभागी झाले होते. हे पथक श्रीनगरमधील लाल चौक व बडशाह चौक येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेले होते. त्याचवेळी मलिक आणि त्याच्या टोळक्याने त्यांना गाठले आणि त्यांची बोट हिसकावून घेतली. इतकेच नव्हे तर, या महाशयांनी या बोटीवर बसून एका हॉटेलातील पूरग्रस्तांना त्या बोटीवरील वस्तू वाटण्याची नौटंकी केली.
याच मलिकने आणि इतर फुटिर संघटनांनी भारतीय जवानांकडून मिळणारी मदत नाकारण्याचे आवाहन करणारी पोस्टर्स काश्मिरात ठिकठिकाणी लावली आहेत.
No comments:
Post a Comment