Total Pageviews

Friday, 27 May 2011

IPL INDIAN PAISA LEAGUE

सचिन, गंभीर, युवीची माघार.. रैना कर्णधारगल्लाभरु आयपीएलसाठी दुखापतींकडे काणाडोळा करुन खेळलेल्या टीम इंडियाच्या शिलेदारांनी भारतासाठी खेळायची वेळ आल्यावर दुखापतीच्या कारणांच्या सबबी पुढे देत आराम करणंच पसंत केलं आहे. यामुळे संपूर्णतः नव्या दमाची अनुनभवी टीम इंडिया कॅरेबियन वारी करणार आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, दुखापतग्रस्त गौतम गंभीर आणिअनफिटयुवराज सिंग या टीम इंडियाच्या त्रिकुटानं संपूर्ण वेस्ट इंडिज दौ-यातून माघार घेतली आहे. त्यामुळे आता २०-२० आणि वनडे टीमच्या कर्णधारपदाची धुरा सुरेश रैना सांभाळणार असल्याचं निवड समितीनं आज जाहीर केलं. त्याशिवाय, कॅप्टन कुल महेंद्रसिंग ढोणीच्या नेतृत्त्वाखालील १६ जणांच्या कसोटी संघाचीही घोषणा त्यांनी केली.
गौतम गंभीरच्या खांद्याची दुखापत गाजत असतानाच, युवराजनंही आजारपणाचं कारण देत विंडिज दौ-यासाठी आपण उपलब्ध नसल्याचं पत्र आज बीसीसीआयला दिलं होतं. त्यावर, चेन्नईत झालेल्या निवड समितीच्या मॅरेथॉन बैठकीत सविस्तर चर्चा झाली आणि या जोडगोळीला संपूर्ण विंडिज दौ-यातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच, सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबाला वेळ देऊ इच्छित असल्यानं कसोटी संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.
जूनला होणा-या २०-२० सामन्यानं टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा सुरू होतोय. त्यानंतर ते यजमानांसोबत पाच वनडे खेळणार आहेत. या सहा सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा १३ मे रोजी करण्यात आली होती. वर्ल्ड आणि आयपीएल खेळून दमलेल्या सीनिअर खेळाडूंना त्यात विश्रांती देण्यात आली होती आणि यंग ब्रिगेडचं नेतृत्त्व गौतम गंभीरकडे सोपवण्यात आलं होतं. परंतु, ऐनवेळी गंभीरच्या खांद्याच्या दुखापतीनं डोकं वर काढलं. त्यापाठोपाठ युवराजनंही इन्फेक्शनचं कारण पुढे केलं. त्यामुळे आज कसोटी संघाच्या निवडीसाठी जमलेल्या निवड समितीला हा विषय आधी निकाली काढावा लागला.
त्यानुसार, गंभीर आणि युवराजला पूर्ण दौ-यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. टी-२० आणि वनडे मालिकेत त्यांची जागा शिखर धवन आणि मनोज तिवारी घेतील. तर, नव्या दमाच्या तरूण-तडफदार टीम इंडियाचं नेतृत्त्व सुरेश रैना करणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव एन. श्रीनिवासन् यांनी बैठकीनंतर दिली. या संघाचा उपकर्णधार हरभजनसिंग असेल.
कसोटी संघात अभिनव मुकुंद
विंडिज दौ-यावर जाणा-या कसोटी संघात स्थान मिळालेला एकमेव नवा भिडू आहे, अभिनव मुकुंद... तामिळनाडूचा हा सलामीवीर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खो-याने धावा करतोय. त्याचा हा खेळ पाहूनच महेंद्रसिंग ढोणीच्या नेतृत्त्वाखालील संघात त्याची निवड झालेय.
परंतु, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या दौ-यातून घेतलेली माघार हा क्रिकेटप्रेमींसाठी धक्का ठरू शकतो. कुटुंबाला वेळ देण्याची इच्छा सचिननं व्यक्त केली होती. त्यामुळे त्याचा कसोटी संघासाठी विचार झाला नसल्याचं श्रीनिवासन् यांनी स्पष्ट केलं. परंतु, विंडिज दौ-यानंतर होणा-या इंग्लंड दौ-यासाठी सचिन उपलब्ध असल्याचं त्यांनी नमूद केलं.
वेस्ट इंडिज आणि इंग्लंड असे दौरे असतानाही गंभीरने लीगमध्ये खेळायचे ठरवून मोठीच जोखीम पत्करली होती. कदाचित 10 कोटी 80 लाखांच्या तनख्याचा मोह त्याच्याच्याने सोडवला नसणार! कोलकाता नाइट रायडर्ससाठी त्याचे दुहेरी महत्त्व होते.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी गौतम गंभीरची निवड झाली, त्यावेळी तो इंडियन प्रिमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे नेतृत्व झकासपणे करत होता. या मालिकेसाठी महेंद्रसिंग ढोणीला विश्रांती देण्यात आली होती आणि गंभीरला राष्ट्रीय पातळीवरही स्वत:ला कर्णधार म्हणून सिद्ध करण्याची उत्तम संधी होती. आयपीएल-4साठी सर्वाधिक महागडी बोली लागलेल्या खेळाडूंमध्ये गंभीरचा समावेश होतो.
 कोलकाता नाइट रायडर्सनी गंभीरसाठी 10 कोटी 80 लाख रुपये मोजले होते. त्यामुळे त्याच्या खांद्याच्या किरकोळदुखापतींना महत्त्व द्यायची गरज नाइट रायडर्सना वाटली नसेलच! या फ्रँचायझीचे फिजियो अँड्रय़ू लीपस यांनी आयपीएल सुरू होण्यापूर्वीच पाठवलेल्या अहवालात गंभीरच्या दुखापतीविषयी स्पष्ट इशारा दिलेला होता.
 ही दुखापत वर्ल्डकपच्याही आधीपासूनची होती आणि तीन महिने क्रिकेट खेळून चिघळली. त्यामुळे गंभीर आता एकदिवसीय मालिकेबरोबरच कसोटी मालिकेसाठीही उपलब्ध होणार नाही. एकीकडे क्लब आणि दुसरीकडे राष्ट्रीय कर्तव्य यांच्यात डावेउजवे करताना, गडगंज पैसा मिळवून देणा-या क्लब क्रिकेटला पसंती दिली गेली, असे वरकरणी तरी दिसते. याबद्दल खुद्द गंभीर, कोलकाता नाइट रायडर्स आणि बीसीसीआय हे चढत्या भाजणीने दोषी ठरतात. आयपीएलमध्ये खेळायचे की नाही, याचा निर्णय संबंधित क्रिकेटपटूचा असतो. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड असे दौरे असतानाही गंभीरने लीगमध्ये खेळायचे ठरवून मोठीच जोखीम पत्करली होती. कदाचित 10 कोटी 80 लाखांच्या तनख्याचा मोह त्याच्याच्याने सोडवला नसणार! कोलकाता नाइट रायडर्ससाठी त्याचे दुहेरी महत्त्व होते.
 महागडा क्रिकेटपटू आणि डॅशिंगकर्णधार. ढोणी, सचिन, सेहवाग, युवराज, संगकारा, जयवर्धने अशा अनुभवी कर्णधारांसमोर गंभीरसारखा खमक्या कर्णधारच हवा या भावनेतून नाइट रायडर्स व्यवस्थापनाने लीपस अहवाल बासनात गुंडाळला.
 या दोघांनाही शिस्त लावण्याची जबाबदारी बीसीसीआयवर होती. आजवर त्यांनी इतर देशांचे क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळवून त्या देशांच्या क्रिकेट बोर्डाना देशोधडीला लावण्याचा चंग बांधला आहे. आता मात्र आयपीएलच्या वेदीवर भारतीय क्रिकेटपटूंचा बळी द्यायलाही ते मागेपुढे पाहात नाहीत, हे स्पष्ट झाले. गंभीर, सेहवाग आणि युवराज सिंग या तिघांच्याही दुखापती आयपीएलमध्येच चिघळल्या. तिघांनाही केवळ आयपीएलमुळे वेस्ट इंडिज दौऱ्याला मुकावे लागत आहे. पुढील वर्षी ही संख्या कदाचित पाचवर जाईल. गंभीरला ही विश्रांती म्हणजे तात्पुरता दिलासा वाटत असल्यास ती त्याची चूक ठरेल. कारण अशी संधी त्याला पुन्हा कधीही मिळणार नाही

No comments:

Post a Comment