Total Pageviews

Tuesday, 7 March 2017

शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा गौरवशाली इतिहास गनिमी कावा आजपण अभ्यास योग्य- TALK IN MARATHI BY BRIG HEMANT MAHAJAN AT SHIVRAJYA MITRA MANDAL NEAR TELEPHONE EXCHANGE,TAPOWAN ROAD,PIMPRI GAON,PUNE DISTRICT 08PM-0930 PM ,08 MAR 2017


मध्यप्रदेशमध्ये पॅसेंजर ट्रेनमधील स्फोट हा दहशतवादी हल्ला, पोलीस महानिरीक्षकांची माहिती स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट शाजापूर | March 7, 2017 6:39 PM मध्य प्रदेशात भोपाळ-उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचे मध्य प्रदेशचे पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मकरंद देवासकर यांनी सांगितले. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. भोपाळ- उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या स्फोटात नऊ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार मध्यप्रदेशमधील शाजापूरमध्ये भोपाळवरुन उज्जैनला जाणा-या पॅसेंजर ट्रेनमध्ये मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास स्फोट झाला. ‘घटनास्थळी वैद्यकीय पथक रवाना झाले असून जखमींना कलापिपलमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे’ अशी माहिती भोपाळमधील रेल्वेचे प्रवक्ते आय ए सिद्दीकी यांनी दिली आहे. ट्रेनच्या डब्यात गनपावडर सापडली असून त्यादिशेनेही तपास सुरु आहे असे मध्य प्रदेशमधील गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. भोपाळ – उज्जैन एक्सप्रेसच्या सर्वसाधारण डब्यात हा स्फोट झाला. सुरुवातीला शॉर्टसर्किट झाल्याची चर्चा होती. मात्र प्राथमिक तपासात स्फोट झाल्याचे समोर आले आहे. या स्फोटानंतर ट्रेन थांबवण्यात आली. स्फोटात ट्रेनमधील खिडक्यांच्या काचाही फुटल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच दहशतवादविरोधी पथक, गुप्तचर यंत्रणा आणि फॉरेन्सिक अधिका-यांचे पथकही घटनास्थळी रवाना झाले आहे. या भागात सिमी या दहशतवादी संघटनेचे जाळे आहे. सिमीचा सक्रीय सदस्य सफदर नागौरी हा देखील याच भागातला होता याकडे अधिका-यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे या स्फोटामागे घातपाताचा हेतू होता का असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, पॅसेंजरमधील स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचे पोलीस महानिरीक्षक मकरंद देवासकर यांनी सांगितले साईबाबासह ५ जणांना जन्मठेपMaharashtra Times | Updated: Mar 7, 2017, 04:38PM IST 17 गडचिरोलीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी आज दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक जी. एन. साईबाबा याच्यासह महेश तिरकी, पांडू नरोटे, हेम मिश्रा, प्रशांत राही अशा पाच जणांना बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर विजय तिरकी याला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. जी. एन. साईबाबा याच्यावरील नक्षलवादी हिंसक कारवायांसाठी दिल्ली विद्यापाठीतील युवा कार्यकर्त्यांना तयार करणे, त्यांना गडचिरोलीतील जंगलांमध्ये कारवायांसाठी पाठवणे, माओवादी कट्टर विचारांचा प्रसार करणे, थिंक टँक म्हणून काम करणे, असे आरोप न्यायायालयात सिद्ध झाले. त्यामुळे बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३, १८, २०, ३८ आणि ३९ अंतर्गत दोषी धरून साईबाबा याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जी. एन. साईबाबा याला झालेली शिक्षा ही माओवादी नागरी फ्रंटल ऑर्गनायझेशनसाठी एक जबर धक्का मानला जात आहे. यामुळे साईबाबा याच्याप्रमाणे जे इतर माओवादाचा प्रसार करणारे आहेत त्यांचे धाबे दणाणले आहेत. शिक्षण क्षेत्रात राहून माओवादाचा प्रसार करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला अशाप्रकारे शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. साईबाबा याच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अभिनवकुमार यांनी तपासात विशेष मेहनत घेतली. ९ मे २०१४ रोजी दिल्ली विद्यापीठाच्या आवारात असलेल्या निवासस्थानातून साईबाबा याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी कॉम्प्युटरचे हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह, सीडी, कागदपत्रे, व्हिडिओ टेप, माओवादाचं प्रसार साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं होतं. हे सर्व पुरावे कोर्टाने ग्राह धरले आहेत. २०१२ मध्ये दिल्ली विद्यापाठीत फ्रंटल ऑर्गनायझेशन कमिटीचा सहसचिव म्हणून साईबाबाची नियुक्ती झाल्याचाही एक व्हिडिओ आहे. या व्हिडिओत प्रशांत राही हासुद्धा व्यासपीठावर होता. सरकारी वकील अॅड. प्रशांतकुमार सत्यनाथन यांनी साईबाबा हे अपंग असल्याचा दावा करत असले तरी ते माओवाद्यांसाठी थिंक टँक म्हणून काम करतात हे कोर्टात पटवून दिले. साईबाबा याने हेम मिश्रा या आरोपीचं ब्रेन वॉश करून त्याला गडचिरोलीच्या जंगलात कारवायांसाठी पाठवलं होतं, असंही कोर्टात सिद्ध झालं. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशानुसार सर्व आरोपींना लगेचच निकालपत्रं देण्यात आली आहेत. जामीन रद्द करून सर्वांना अटकही करण्यात आली आहे. साईबाबा यांनी वैद्यकीय कारणांच्या अनुशंगाने अर्ज दिला असून त्यावर विचार होणार आहे मध्य प्रदेशमधील शाजापूर जिल्ह्यातील जबडी येथे भोपाळ-उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये आज झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याची माहिती राज्याचे पोलीस महानिरीक्षक मकरंद देवासकर यांनी दिली असून याप्रकरणी आतापर्यंत तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. भोपाळ-उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये आज सकाळी १० च्या सुमारास झालेल्या स्फोटात ९ प्रवासी जखमी झाले आहेत. हा स्फोट मोबाइल चार्जिंग सुरू असताना झाल्याचे आधी सांगितले जात होते मात्र पोलिसांच्या तपासात हा स्फोट दहशतवाद्यांनी घडवून आणल्याचे पुढे येत आहे. मध्य प्रदेशचे पोलीस महानिरीक्षक मकरंद देवासकर यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याची माहिती माध्यमांना दिली. या पॅसेंजर ट्रेनमध्ये आयईडी स्फोट घडवण्यात आला. याप्रकरणी पिपरिया येथून तीन जणांना अटक करण्यात आली आहे, असे देवासकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, लखनऊमध्ये घरात लपून बसलेला संशयित दहशतवादी आणि कानपूरमधून अटक करण्यात आलेल्या फैजलकडे भोपाळ-उज्जैन पॅसेंजर ट्रेनमधील स्फोटाबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे. कानपूरमधील रेल्वे घातपात, आजचा बॉम्बस्फोट याबरोबरच दहशतवाद्यांचे आणखी कोणते मनसुबे आहेत, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment