SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Sunday, 12 March 2017
छत्तीसगडच्या नक्षली हल्ल्यात शहीद झालेले वर्ध्याचे जवान प्रेमदास मेंढे अनंतात विलीन
+5 छत्तीसगडच्या नक्षली हल्ल्यात शहीद झालेले वर्ध्याचे जवान प्रेमदास मेंढे अनंतात विलीन
वर्धा - छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 11 जवान शहीद झाले आहेत. भेज्जी परिसरात सकाळी सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात यामध्ये वर्धा जिल्ह्यातील सोनोरा (ढोक) येथील प्रेमदास मेंढे हा जवान शहीद झाला. त्यांच्या पार्थिवावर नाचणगावात अंत्यसंस्कार करण्यात आले.
नक्षली हल्ल्यात शहीद झालेले सर्व जवान सीआरपीएफच्या 219 व्या बटालियनचे होते. ही घटना सकाळी 9 च्या सुमारास घडली. अत्यंत गरीब परिस्थितीतून प्रेमदास मेंढे यांनी आपले जीवन घालवले होते. त्यांचे वडील नाचणगाव येथे आजही मोलमजुरीचे काम करतात. प्रेमदास मेंढे हे तीन भावांपैकी सर्वात धाकटे होते. मनमिळावू आणि हसतमुख स्वभावाचे प्रेमदास हे सुमारे 15 वर्षापासून केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वीच त्यांची छत्तीसगढ येथे बदली झाली होती.
मागच्या प्रेमदास कुटुंबीयांच्या भेटीसाठी घरी आले होते. 19 फेब्रुवारी रोजी ते पुन्हा देशसेवेच्या कार्यात रुजू झाले. आज झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात देशासाठी ते शहीद झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी, मुलगा, मुलगी दोन भाऊ आहेत.
आज आणले पार्थिव
प्रेमदास मेंढे यांचे पार्थिव रायपूर येथून विमानाने वर्ध्याला आणले. वर्ध्याहून ते गाडीने नाचणगाव येथे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. नाचाणगाव येथेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले
नक्षली म्होरक्यांना शिक्षा
vasudeo kulkarni
Friday, March 10, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: ag1
नक्षलवादी चळवळ आणि हिंसाचारी कारवाया करणार्याा नक्षलवाद्यांना सक्रिय मदत करणार्याप प्रा. जी. एन. साईबाबा याच्यासह त्याच्या पाच साथीदारांना देशविघातक कृत्ये केल्याच्या आरोपात दोषी ठरवून गडचिरोली सत्र न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेमुळे नक्षलवाद्यांविरोधात लढणार्याय पोलिसांना मनोधैर्यही मिळाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम भागात निरपराध आदिवासींच्या कत्तली करायला सोकावलेल्या नक्षलवाद्यांच्या क्रूर कारवायांचे समर्थन करणारी आणि त्यांना सक्रिय मदत करणारी ही सुशिक्षितांची टोळी होती. प्रा. साईबाबा हा राजधानी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्राध्यापक होता. तो अपंग असला, तरी त्याची बुद्धी प्रखरच असल्याने तो आणि त्याचे सहकारी गडचिरोली जिल्ह्यातल्या माओ-नक्षलवादी चळवळीचे बौद्धिक विचार देणारे प्रेरणास्थान होते. 1982 मध्ये स्वतंत्र गडचिरोली जिल्ह्याची स्थापना झाल्यावरही या जिल्ह्याचा औद्योगिक आणि शैक्षणिक, कृषी क्षेत्रात विकास होऊ शकला नाही, त्याचे मुख्य कारण नक्षलवाद्यांचा हिंसाचार आणि कारवाया, हेच आहे. सरकारने या जिल्ह्यातल्या आदिवासी भागात पक्के रस्ते, पूल, शाळांची बांधकामे यासह विविध विकासासाठी शेकडो कोटी रुपयांच्या योजना मंजूर केल्या, तरी नक्षलवाद्यांच्या टोळ्यांनी मजूर, कंत्राटदारांवर हिंसक हल्ले चढवून विकासाची कामे सातत्याने बंद पाडायचे सत्र सुरूच ठेवले. आदिवासींना विकास हवा असला, तरी नक्षलवाद्यांना मात्र तो नको आहे. निवडणुकीच्या मार्गाने सत्तेवर आलेले सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी हे भांडवलदारांचे हस्तक आहेत, ते शोषक आहेत, गरीब आदिवासींवर अन्याय करत. पोलीस आणि प्रशासन त्यांची लूट करते, असा अपप्रचार नक्षलवाद्यांच्या टोळ्या सातत्याने करीत राहिल्या. दुर्गम आदिवासी भागात त्यांनी बंदुकाच्या जोरावर आपली दहशत कायम ठेवायचा प्रयत्न केला. हे सरकार आणि व्यवस्था उलथून टाकल्याशिवाय शोषणमुक्त समाज म्हणजेच साम्यवादी जनतेचे राज्य स्थापन होणार नाही, असे नक्षलवाद्यांच्या टोळ्या भोळ्याभाबड्या आदिवासींना चिथावण्या देत राहिल्या. याच नक्षलवाद्यांनी गेल्या 35 वर्षात या भागातल्या शेकडो निरपराध आदिवासींच्या सामूहिक कत्तलीही घडवलेल्या आहेत. पोलीस नक्षलवाद्यांच्या कारवाया मोडून काढायसाठी आपले प्राण पणाला लावून झुंजत असले, तरी नक्षलवाद्यांनी पोलिसांवरही हिंसक हल्ले चढवून अनेक पोलिसांचेही बळी घेतले आहेत. नक्षलवाद्यांना सरकारच्या विरोधात भडकवणार्याा सुशिक्षितांच्या या टोळीचा शोध घेत, पोलिसांनी सरकारने बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओइस्ट) आणि या संघटनेची आघाडी असलेल्या रेव्होल्युशनरी डेमोक्रेटिक फ्रंटच्या सदस्यांना गडचिरोली पोलिसांनी 22 ऑगस्ट 2013 रोजी बल्लारच्या रेल्वे स्थानकावर अटक केली. त्या टोळीकडे नक्षलवादी प्रचाराचे साहित्य तर सापडलेच पण त्यातल्या दोघांवर साईबाबाला पाच लाख रुपये पोहोचवायची जबाबदारीही नक्षलवाद्यांनी सोपवल्याचे निष्पन्न झाले. या अटक सत्रामुळेच पोलिसांना नक्षलवाद्यांचा वैचारिक म्होरक्या प्रा. साईबाबापर्यंत पोहोचता आले. त्याला 2014 मध्ये अटक करून पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करतानाच, साईबाबा आणि त्याच्या सार्याब कारवायांचे पक्के पुरावेही जमवण्यात यश मिळवले होते.
हिंसाचाराला चिथावणी
साईबाबाच्या घरातून पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यात त्याच्या हार्ड डिस्कमधून तो क्रांतिकारी संघटनेच्या फलकाखाली भाषण देताना, क्रांतीची भाषा वापरत हिंसाचार करण्यासाठी शस्त्र उचला, नक्षलबारी हा एक मार्ग आहे. सरकार उलथून टाकण्यासाठी हिंसक कृत्य करणे गैर नाही, असे आवाहन करत असल्याची ध्वनिचित्रफितही सापडली. याशिवाय पोलिसांनी अटक केलेल्या त्याच्या हेम केशवदत्त मिश्रा, प्रशांत राही, नारायण सांगलीकर, महेश किरीमन तिर्की, पांडू नोटा नरोटे आणि विजय नान तिर्की यांच्याकडून नक्षलवादी चळवळीचे समर्थन करणारे, हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे साहित्य जप्त केले होते. या सार्यांिनी मिळून देशविघातक कृत्य केल्याच्या विविध कलमान्वये पोलिसांनी त्यांच्यावर खटला दाखल केला. सरकारतर्फे 23 साक्षीदारांनी न्यायालयात साक्ष दिली. न्यायालयाने विजय नान तिर्की याचा हा पहिलाच गुन्हा असल्याने, त्याला दहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तर साईबाबासह अन्य चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 2008 पासून गडचिरोली जिल्ह्यात अनेक निष्पाप लोकांचा बळी घेणार्याह बंदी घातलेल्या राष्ट्रविघातक संघटनेचा नेता असल्याने, साईबाबा हा केवळ जन्मठेपच नव्हे तर त्यापेक्षाही अधिक शिक्षेस पात्र असल्याचे मत न्यायाधीशांनी 887 पानांच्या विस्तृत निकालपत्रात नोंदवले आहे. या प्रकरणात आवश्यक ते इलेक्ट्रॉनिक्स पुरावे आणि लिखित साहित्य पुराव्यादाखल मिळवून, या आरोपींनी केलेल्या कारवायांवर प्रकाशझोत टाकला होता. नक्षलवाद्यांच्या म्होरक्यालाच शिक्षा झाल्याने, सरकारी यंत्रणेद्वारे आदिवासींवर होणार्याा अन्यायाच्या प्रतिकारार्थ नक्षलवाद्यांनी सशस्त्र बंड पुकारल्याचे समर्थन करणार्याद तथाकथित पुरोगामी विचारवंतांच्या बेलगाम जीभांवरही बंधन येईल. अटक झाल्यावर याच साईबाबाने आपण अपंग असल्याचे कारण देत, उच्च न्यायालयातून जामीनकीचा अर्जही मंजूर करून घेतला होता. पण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेच तो जामीन रद्द केल्याने, डिसेंबर 2015 मध्ये त्याला पोलिसांना शरण जावे लागले. राजधानी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या उपटसुंभ पुरोगामी विचारांच्या काही टोळक्यांच्या राष्ट्रद्रोही कारवायांच्यामुळे हे विद्यापीठ सध्या गाजते आहे. संसदेवर हल्ला चढवल्याच्या कारस्थानाचा सूत्रधार असलेल्या प्रा. अफजल गुरूला फाशी दिल्याच्या घटनेचा स्मृतिदिन साजरा करणारे पुरोगाम्यांचे टोळके याच विद्यापीठात होते आणि विद्यापीठाच्या आवारातच हे कृत्य घडणार होते. अशा देशविघातक कार्यक्रमांना विरोध झाल्यानेच, लोकशाही स्वातंत्र्याचा गळा आवळला जात असल्याचा टाहो डाव्या विचारांच्या संघटनांनी फोडला होता. कन्हैय्याकुमारचे गाजलेले प्रकरण याच विद्यापीठातले! नक्षलवाद्यांना सहाय्य करणारा साईबाबा याच विद्यापीठात होता. केंद्र सरकारने या विद्यापीठातल्या तथाकथित देशविघातक विचारांचे समर्थन करणारे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा कठोरपणे बंदोबस्त करायला हवा, हेही या निकालाने समोर आले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment