Total Pageviews

Friday, 31 March 2017

दहशतवाद्यांच्या तालावर नाचणारे - सुनील कुहीकर,- देशाची केवळ एक टक्कालोकसंख्या असलेल्या त्या प्रदेशावर केंद्र सरकारचा तब्बल दहा टक्के निधी खर्च होतो. त्याशिवाय विशेष दर्जा प्राप्त असलेले राज्य म्हणून पुरविले जाणारे त्याचे लाड वेगळे आहेत ते आहेतच.


भारतीय भूप्रदेशावरील स्वर्गाची उपमा आम्ही त्याला केव्हाच बहाल केली आहे. देशाची केवळ एक टक्कालोकसंख्या असलेल्या त्या प्रदेशावर केंद्र सरकारचा तब्बल दहा टक्के निधी खर्च होतो. त्याशिवाय विशेष दर्जा प्राप्त असलेले राज्य म्हणून पुरविले जाणारे त्याचे लाड वेगळे आहेत ते आहेतच. गेल्या दीड दशकात केंद्र सरकारने थोड्याथोडक्या नव्हे, तब्बल १.१४ लक्ष कोटी रुपयांची उधळण या लाडक्या प्रांतावर केली आहे. देशाची सर्वाधिक, तेरा टक्के लोकसंख्या जिथे राहाते, त्या उत्तर प्रदेशच्या वाट्यालाही हे भाग्य आलेले नाही, ज्याचा उपभोग काश्मीर नावाच्या एका छोट्याशा परिसरातील लोक बिनदिक्कतपणे घेताहेत. उत्तर प्रदेशचे जाऊ द्या, पूर्वांचलातल्या छोट्या राज्यांनाही हेवा वाटावा अशी वागणूक कश्मीरला वर्षानुवर्षे मिळते आहे. हो! हा तोच काश्मीर आहे. राज हरिसिंहांचा. पंडित नेहरूंचा. श्यामाप्रसाद मुखर्जींचा… शेख अब्दुल्लांचा, मुफ्ती मोहम्मद सईदांचा, ओमर अब्दुल्लांचा… आणि हो! इर्शाद शेख, इरफान शेख आणि बुरहान वानीचाही… हिजबुल मुजाहिदीन पासून तर लष्कर-ए-तोयबापर्यंत आणि जमियत -उल- मुजाहिदीन पासून तर जैश-ए- मोहम्मदपर्यंत निदान चाळीस वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचा घरोबा असलेला भूप्रदेश तो हाच! ज्याच्या रक्षणासाठी शेजारच्या पाकिस्तानशी तीन तीन युद्धांना आम्ही सामोरे गेलो तो प्रांतही हाच आहे. आणि भारतात राहून हातावरचे घड्याळ पाकिस्तानच्या वेळेनुसार सेट करणारी कित्येक माणसंही इथलीच आहेत. गेल्या वर्षीच्या पावसाच्या संकटात सारा देश ज्याच्या मदतीला धावून गेला ते खोरेही काश्मीरचेच आहे अन् दरवेळी भारताच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करणारी फुटीरतावादी चळवळही इथेच निपजली आहे. ती याच प्रांतातली तरुणाई आहे, जी दहशतवादी बुरहान वानीच्या अंत्ययात्रेत अलोट गर्दी करते आणि दहशतवादी हल्ल्याविरुद्ध भारतीय सैनिक उभे ठाकले की मात्र त्यांच्याविरुद्ध दगडफेक करायला रस्त्यावर उतरते. आपल्या देशाच्या पोलिसांवर दगडफेक केल्याबद्दल दहशतवाद्यांकडून मिळणारे बक्षीस सहर्ष स्वीकारते. त्यांना हुर्रियत कॉन्फरन्स आणि भारतीय सैनिक दलाच्या सदस्यांमधला फरक ओळखावासा वाटत नाही. लष्कर-ए-ओमर आणि पोलिस दलातील माणसं समोर उभी राहिली की त्यांचा कौल नेमका, दहशतवादाकडे झुकणार्यां लष्कर-ए-ओमर च्या सदस्यांच्या पारड्यात पडतो… या परिसरात राहणारा एखादा मुलगा दहशतवादी संघटनेत सहभागी झाला तरी त्यांच्या कुटुंबीयांना कुणी चार प्रश्नटही विचारायचे नाहीत. कारण तसे झाले, सैनिकी अधिकार्यांयनी बोलावणे धाडले की त्यांचा म्हणे पारा चढतो. दहशतवादाच्या वाटेला गेलेल्या पोराबाबत जाब विचारला की लागलीच सैनिकी अत्याचाराचे तुणतुणे वाजवायला सुरुवात होते त्यांची. या देशातल्या माध्यम जगतातही अशा देशविरोधी बरळण्याला विशेष महत्त्व आणि स्थान प्राप्त होते. त्या बेताल बडबडीची मग ‘ब्रेकिंग न्यूज’ होते. दहशतवाद्यांच्या पैशाच्या बळावर जोपासली जाणारी, त्यांच्या तालावर नाचणारी तरुणाई आणि त्यांच्या इशार्याोवर होणारी दगडफेक, हा कुणाच्याच चिंतेचा विषय नसतो इथे. त्यांच्या खेम्यात जमा झालेल्या पोराच्या बापाने मांडलेल्या कथित कैफियतीवर मात्र भावनिक होत जीवन ओवाळून टाकतात लोक. आपल्या घरातली तरणीताठी पोरं मेहनत करून चार पैसे कमवायचे सोडून, त्यासाठी प्रयत्न करायचे सोडून खुशाल दहशतवाद्यांच्या गर्दीत सहभागी होतात, त्यांनी रचलेल्या देशविरोधी षडयंत्रात सामील होतात, धर्माच्या नावाखाली आपल्याच व्यवस्थेविरुद्ध दंड थोपटून उभे राहतात, पोलिसांच्या बंदुकीने कुण्या दहशतवाद्याचा मुडदा पडला तरी जीव कासावीस होतो यांचा. त्यांच्यासाठी मनात कणव दाटून येते यांच्या. अन् मग आपल्याच यंत्रणेविरुद्धचा रोष व्यक्त करण्याच्या नादात रस्त्यावर उतरून ते आपल्याच सैनिकांवर, पोलिसांवर दगडफेक करतात… आणि नंतर एक बाब उघड होते ती ही की, ही दगडफेक दहशतवाद्यांनीच प्रयोजित केलेली असते. असे छातीठोकपणे समोर येऊन दगडफेकीच्या स्वरूपात विद्रोह करणार्यां ना नंतर वाटली जाणारी खिरापत आणि ती मिळवण्यासाठी स्वकीयांच्या पाठीत खंजीर खुपसताना जराशीही लाज न वाटणारी ही प्रवृत्ती… साराच प्रकार अजब अन् दुर्दैवी असतो. सामान्य माणसं तशीच फार भित्री असतात. स्वत:च्या विवंचनेत हरवलेली. एरवी खाकी वर्दीतला साधा शिपाई समोर दिसला तरी स्वत:ची वाट बदलणारी. कायद्याच्या कचाट्यात गुरफटण्याला त्याची पसंती तशी नसतेच कधी. ‘मी बरा आणि माझे काम बरे’, अशा धाटणीतली माणसं देशात सर्वदूर आहेत. पैसे मोजल्याशिवाय तर राजकीय पक्षांच्या जाहीर सभांनाही जात नाहीत लोक अलीकडे. अशात घराबाहेर पडून प्रशासनाशी, तेही सुरक्षा यंत्रणेशी, दोन हात करण्याची तर गोष्टच दूर. अगदीच अपवादात्मक स्थिती वगळता लोक आपल्याच प्रशासनाविरुद्ध पेटून उठल्याची उदाहरणे वानगीदाखल देता येतील एवढी मोजकीच असतील. याच्या नेमके उलट चित्र असते काश्मिरात. इथे तर दर चार दोन दिवसांनी लोक संतापतात. बाहेर पडतात अन् चाल करून जातात पोलिसांवर. त्यांची ठाणी ध्वस्त करतात. संपत्तीची नासधूस करतात. हा लोकांच्या मनातल्या संतापाच्या तीव्रतेचा परिणाम नसून, यामागील गमक काही वेगळेच असल्याचा संशय गेली काही वर्षे सातत्याने व्यक्त होतोय्. परवा त्यावर शिक्कामोर्तब झाले एवढेच. एका वृत्तपत्राच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये या दगडफेकीमागील षडयंत्र आणि त्यासाठी होणारी पैशाची दहशतवादी उधळण उघड झाली आहे. असले कृत्य करायला दिवसाकाठी पाच पाचशे रुपयांची खिरापत वाटली जात असल्याची, प्रसंग बघून कित्येकदा खिरापतीचा हा आकडा पाच हजारांच्या घरातही जात असल्याची माहिती या ‘आंदोलनकर्त्या’ तरुणांनीच जाहीर केली आहे. या तरुणांचे हे कृत्य जनआक्रोशाच्या परिघात बसविण्याची काही लोकांच्या धडपडीचे पितळही यानिमित्ताने उघडे पडले आहे. अर्थात हेही खरेच आहे की, असे करायला अनेकदा पलीकडून मिळणार्याप जीवघेण्या धमक्याही कारणीभूत असतात. पण २२ जिल्ह्यांच्या या राज्यातील लद्दाखला जे जमले, जे जम्मूला जमले, ते काश्मीरला का जमू नये? तिथल्या एका समूहालाच का म्हणून दोन ध्वज, दोन संविधान आणि दोन मोहरींची गरज पडावी? ‘धर्म’ नेहमी इथेच का आडवा यावा? अन् यांना कायमच देशापेक्षा धर्म श्रेष्ठ वाटत असेल, त्यासाठी कशाचीही तमा न बाळगता ते आपल्याच देशाविरुद्ध, आपल्याच लोकांविरुद्ध लढायला सिद्ध होणार असतील तर मग या प्रदेशावर कोट्यवधी रुपयांची उधळण भारत सरकारने का करावी, या इतर राज्यातील लोकांच्या मनातल्या प्रश्नाभचे काय उत्तर आहे कुणाकडे? इतर राज्यांच्या तुलनेत काश्मीरवर होणार्याा पैशाच्या मुक्त उधळणीच्या जाहीर होऊ लागलेल्या आकडेवारीमागील भावनाही याच प्रश्नाकशी निगडीत आहे. लद्दाख अन् जम्मूही याच प्रांताचा भाग आहे. पण बेईमानीची भाषा अन् कारवाया तिथनं कधी घडत नाहीत. त्या घडतात काश्मीरच्या खोर्या्त. जे खोरे भारताचा अविभाज्य भाग असल्याचे सिद्ध करण्यासाठी सार्याच जगाशी भांडतोय् आम्ही, नेमके त्याच परिसरातले काही बेईमान लोक राष्ट्रभक्ती वेशीवर टांगून, चार पैशासाठी परकीयांच्या तालावर नाचत स्वकीयांच्या पाठीत खंजीर खुपसायला सरसावत असतील, तर याहून दुर्दैव दुसरे ते कोणते असणार?

No comments:

Post a Comment