MARCH 9, 2017 9:25 PM0 COMMENTSVIEWS:
Pulwama Terror Attack209 मार्च : जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात साताऱ्याच्या जवानाला वीरमरण आलंय. दीपक जगन्नाथ घाडगे असं या जवानाचं नाव आहे. ते साताऱ्यातील फत्यापूर गावचे रहिवासी होते.
जम्मू काश्मीरातील पुलवामा जिल्ह्यातील पडगमपुरा भागात आज (गुरूवारी) सकाळपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. या ठिकाणी 4-5 दहशतवादी घरात लपून बसल्याचा संशय होता. त्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घालून कारवाई केली. या कारवाईत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झालाय.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील फत्यापूर गावचे सुपुत्र दीपक जगन्नाश घाडगे यांना वीरमरण आल्यामुळे गावावर शोककळा पसरलीये. दीपक यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. शहीद दीपक यांचे पार्थिव उद्या संध्याका पर्यंत साताऱ्यात पोहचणार आहे. दिपक घाडगे यांच्यावर फत्यापूर गावात शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहे.सातारा : प्रतिनिधी
फत्यापूर (ता. सातारा) येथील जवान दीपक जगन्नाथ घाडगे हे जम्मू काश्मीर येथे गोळीबारीत शहीद झाले असून ही घटना गुरुवारी घडली आहे. देशाचे रक्षण करताना सातारच्या सुपुत्राला वीरमरण आल्याने गावासह परिसर शोकाकूल बनला आहे.
याबाबतची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामधून देण्यात आली आहे. दीपक घाडगे फत्यापूरचे असून सध्या जम्मू काश्मीर भागात मराठा इन्फंट्रीमध्ये जवान म्हणून कार्यरत होते. गुरुवारी दहशतवाद्यांकडून पुंच्छ भागात कार्यरत असताना त्या ठिकाणी फायरिंग झाले. यावेळी भारतीय सैनिकांनीही त्याला प्रत्युत्तर दिले.
या दुर्घटनेत मात्र दीपक घाडगे यांना वीरमरण आले आहे. गुरुवारी सायंकाळी याबाबतची माहिती समोर आल्यानंतर फत्यापूर येथे शोककळा पसरली. रात्री उशीरापर्यंत त्याबाबतची अधिक माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु होती.
जवान दीपक घाडगे यांचे प्राथमिक शिक्षण फत्यापूर येथे झालेले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुले, बहीण असा परिवार आहे. बहीण माया घाडगे या सातारा जिल्हा पोलिस दलात सध्या कार्यरत आहेत. दरम्यान, गावामध्ये या घटनेची माहिती पसरल्यानंतर ग्रामस्थ एकत्र आले होते. बोरगाव पोलिसांनाही घटनेची माहिती मिळाल्यानंतर सपोनि मयुर वैरागकर यांनी गावाला भेट दिली.
कोल्हापूर: चंदगड तालुक्यातील जवान शहीद
By pudhari | Publish Date: Mar 9 2017 6:28PM | Updated Date: Mar 9 2017 6:28PM
चंदगड : प्रतिनिधी
महिपाळगड येथील जवान महादेव पांडूरंग तुपारे (वय 34) हे बुधवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास लेह येथे सेवा बजावत असताना बर्फात अडकून शहीद झाले.
2005 मध्ये ते 16 कुमाव रेजिमेंट उत्तराखंड येथे सैन्यात भरती झाले होते. गेल्या चार दिवसापासून लेह येथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. अजूनही त्यांचे पार्थिव भारतीय लष्काराला मिळाले नाही. हवामान स्वच्छ झाल्यानंतर पार्थिवाचा शोध घेतला जाणार आहे. त्यानंतरच लेह नंतर दिल्ली आणि दिल्लीहून विमानाने पुणे किंवा बेळगाव येथील सांबरे विमानतळावर पार्थिव आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या महिपाळगड या गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.
चंदगडच्या जवानाला वीरमरण-Maharashtra Times |
महिपाळगड (ता.चंदगड) येथील जवान महादेव पांडुरंग तुपारे (वय ३४) यांना बुधवारी वीरमरण आले. बुधवारी रात्री लेह-लडाख येथील दराज येथे सेवा बजावताना बर्फात अडकून शहीद झाले. ८ मार्चला ड्युटीवर असलेल्या ठिकाणी अतिबर्फवृष्टी झाली.
या बर्फवृष्टीमध्ये जवान तुपारे सापडल्याने त्यांचा बर्फामध्ये गुदमरुन मृत्यू झाला. तुपारे हे २००५ मध्ये १६ कुमाऊं रेजिमेंट उत्तराखंड येथे सैन्यात भरती झाले होते. गेली बारा वर्षे ते सैन्यात सेवा बजावत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण महिपाळगड तर महाविद्यालयीन शिक्षण कार्वे येथील महात्मा फुले विद्यालयात झाले. मोठ्या कष्टाने ते सैन्यात भरती झाले होते. आठ मार्चला रात्री एक वाजण्याच्या सुमारास ते हिमवृष्टीत बेपत्ता झाले होते.
बर्फवृष्टीत जवान शहीद
महिपाळगड (ता.चंदगड) येथील जवान महादेव पांडूरंग तुपारे (वय ३४) हे बुधवारी रात्री लेह-लडाख येथील दराज येथे सेवा बजावत असताना बर्फात अडकून शहीद झाले. ८ मार्च रोजी ड्युटीवर असलेल्या ठिकाणी अतिबर्फवृष्टी झाली. या बर्फवृष्टीमध्ये जवान तुपारे सापडल्याने त्यांचा बर्फामध्ये गुदमरुन मृत्यू झाला.
महादेव तुपारे हे २००५ मध्ये १६ कुमाऊं रेजिमेंट उत्तराखंड येथे सैन्यात भरती झाले होते. गेली बारा वर्षे ते सैन्यात सेवा बजावत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण महिपाळगड तर महाविद्यालयीन शिक्षण कार्वे येथील महात्मा फुले विद्यालयात झाले. मोठ्या कष्टाने ते सैन्यात भरती झाले होते. आठ मार्चला रात्री एक वाजण्याच्या सुमारास ते हिमवृष्टीत बेपत्ता झाले. गेल्या चार दिवसांपासून लेह-लडाख परिसरात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत असल्यामुळे त्यांचे पार्थिक आणण्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत.
गुरूवारी सकाळी नेहमीप्रमाणे महादेव तुपारे यांचे वडील पांडुरंग व आई सुमन शेताकडे गेले होते. सकाळी आठ वाजता महादेव यांच्या युनिटमधून या घटनेची माहीती देण्यासाठी फोन आला. ही बातमी समजताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले.
महादेव तुपारे हे सैन्यात क्लार्क पदावर कार्यरत होते. गेल्या चार दिवसांपासून लेह येथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने अजूनही त्यांचे पार्थिव लष्काराला मिळालेले नाही. हवामान स्वच्छ झाल्यानंतर पार्थिव १० मार्चला आणले जाणार असल्याचे समजते. लेह नंतर दिल्ली आणि दिल्लीहून विमानाने पुणे व बेळगाव येथील सांबरे विमानतळावर पार्थिव आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या महिपाळगड या गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
महादेव तुपारे यांच्या पश्चात आई ,वडील, पत्नी रुपा, सात वर्षाचा प्रितम व पाच वर्षाचा अंश असे दोन मुलगे आहेत. मोठा भाऊ पुंडलिक हा गावातच पॉवरलूमचा व्यवसाय करत आहे. दोन महिन्यांपूर्वीच मजरे कार्वे येथील जवान राजेंद्र तुपारे हे शहीद झाले होते. लागोपाठ या दुसऱ्या घटनेने महिपाळगडसह चंदगड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
No comments:
Post a Comment