याचा अर्थ आहे त्या चिरडलेल्या स्वप्नांचे पुनरागमन जी शतकानुशतकांच्या आक्रमणांमुळे आणि स्वातंत्र्यानंतर वैचारिक शत्रूंच्या आघातांनी जखमी करण्यात येत होती. गावागावात वीज पोहोचली, पाणी, शाळा, रस्ते झाले की मग सारे संपले अशी ही गोष्ट नाही. देश केवळ भौतिक संसाधनांच्या विपुलतेने बनत नाही. या गोष्टी भौतिक गोष्टी शरीराचे रूप घेऊ शकतात. मात्र, प्राण तर संस्कृती आणि शौर्याने मिळतो. त्या संस्कृतीचा आणि शौर्याचा प्रवाहच गेल्या काही दशकांत खंडित झाला होता.
आसामची कन्या नाहिद आफरीनविरुद्ध डरपोक, घाबरट आणि अरबी-इस्लामी संस्कृतीचे गोडवे गाणार्यात ४२ मुल्ला-मौलवींनी जो फतवा जारी केला तो आमच्या परंपरा आणि श्रद्धेवर तोच अरबी हल्ला आहे जो काश्मीरच्या हिंदूंवर जिहादींनी केला होता. छत्तीसगडमध्ये सुकमा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या १२ जवानांना बेसावध क्षणी गाठून त्यांची हत्या करणारे कम्युनिस्ट विचारसरणीचे दहशतवादीही त्याच हल्ल्यांचा एक भाग आहेत. तर केरळमध्ये रा. स्व. संघ व भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्यादेखील त्याच क्रूर हिंदूविरोधी आक्रमणाचा एक भाग आहे.
हे हल्ले आर्थिक अथवा राजकीय कारस्थानाचा एक भाग आहेत. या वैचारिक पाखंडापासून, खोट्या व दांभिक प्रचारापासून आम्हाला सावध राहावे लागेल. स्पष्ट सांगायचे झाल्यास काश्मीरपासून केरळपर्यंत इस्लामी-कम्युनिस्ट-दहशतवाद हिंदू समाज आणि धर्माविरुद्ध आक्रमणच आहे. जोपर्यंत या वस्तुस्थितीचा आपण स्वीकार करीत नाही, तोपर्यंत कॉंग्रेस-ब्रिटिश मानसिकतेतूनच देशाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलणार नाही. हिंदू समाज, संस्कृती आणि त्याचे औदार्यच या विदेशी पैशावर पोसलेल्या हल्लेखोरांचे लक्ष्य ठरत आहे.
काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय सहयोग परिषदने तामिळनाडूचे विद्वान डॉ. सूर्यनारायण यांच्या विश्वाव्यापी तामिळ समाजावर लिहिलेल्या पुस्तकावर आधारित परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीलंकेपासून मलेशियापर्यंत तामिळ नागरिकांवर जे भयानक अत्याचार झाले आणि आजही होत आहेत, त्याचे चित्रण या पुस्तकात करण्यात आले आहे. अतिशय वेदनादायक व हृदय विदीर्ण करणारे वर्णन या पुस्तकात आहे. ३० हजार तामिळी हिंदू आजही शरणार्थी आहेत, त्यांच्यासाठी कुणी धावून आलेत काय? मलेशियात एक लाखाहून अधिक तामिळ हिंदू राज्यविहीन आहेत. तेथे फळविक्रेत्या हिंदूलाही ‘हलाल’चे प्रमाणपत्र घ्यावे लागते. या चर्चासत्राच्या वेळी ‘एव्हरेस्ट मूर्ती’ची अतिशय करुण कहाणी ख्यातनाम मानवाधिकार कार्यकर्ते राजेश गोगना यांनी सांगितली. एका तामिळ हिंदू नागरिकाला मृत्यूनंतर मुस्लिम घोषित करून त्याच्या शोकग्रस्त व रडणार्याि नातेवाईकांजवळून त्याचा मृतदेह शरीयतवाल्या मुल्लांनी हिसकावून घेतला आणि त्याचे दफनसुद्धा करून टाकले. एवढेच नव्हे, तर त्याची संपत्तीही त्याच्या कुटुंबीयांना मिळू दिली नाही. वस्तुस्थिती ही आहे की अपार यश मिळवून आणि सामंजस्याने राहूनही आज केरळ, कर्नाटक, काश्मीरपासून पाकिस्तान, बांगलादेश आणि मलेशियासारख्या अनेक मुस्लिम देशात राहणार्याह हिंदूंवर, ते केवळ हिंदू आहेत या एकमेव कारणासाठी हल्ले होतच आहेत.
कोण रोखणार हे हल्ले? शांती, सद्भाव, मर्यादा, सहिष्णुता, वैचारिक मतभेद असूनही हजार विचारांचे बनून राहाणे- या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. चांगल्या यासाठी आहेत की आम्ही या मूल्यांवर विश्वा स ठेवणारे आहोत. मात्र, जे यावर विश्वाूस ठेवत नाहीत त्यांच्यापासून आम्ही आमच्या त्या लोकांना कसे वाचवायचे ज्यांच्याशी आमचा धर्म व रक्ताचा संबंध आहे.
आसेतू हिमाचल अथवा आसिंधु-सिंधु पर्यंत भाजपाला जो व्यापक पाठिंबा मिळाला आहे त्याच्यामागे आमची प्रखर देशभक्ती आणि हिंदू संस्कृतीविषयी नि:संदिग्ध निष्ठा आहे, यासंदर्भात किंचितही संशय घेण्याचे कारण नाही. ती जर नसली तर केवळ (राष्ट्ररूपी शरीर) निस्तेज, निष्प्राण आहे. जनतेला हा विश्वा,स आहे की आमची राज्यभक्ती आणि राष्ट्रभक्ती एकरूप आहे. आम्ही वहाबी सेक्युलर जमात नाही, आम्ही व्होट बँकेसाठी, मतांच्या राजकारणासाठी देशाचा सौदा करीत नाही. आमच्यासाठी गंगा नदी नाही तर माता आहे. आणि भारतीय असणे ही आमची पहिली ओळख आणि प्राथमिकता आहे, अंतिम नाही.
पंजाब आणि गोव्यात ‘आप’चा पराभव झाला. राष्ट्रनिष्ठ नागरिकांचे यासाठी आभारच मानायला हवेत. उत्तर प्रदेशात ज्यांनी घराणेशाहीचे राजकारण केले, एकाच कुटुंबाच्या हाती सत्तासूत्रे ठेवली, लोकांना लुबाडण्याचे तंत्र अवलंबले, मतदारांनी त्यांचाही सडकून पराभव केला. यासाठी उत्तरप्रदेशच्या जनतेचे मनापासून आभार. अयोध्या, काशी व मथुरा जेथे आहे त्या प्रदेशाला भारताचा आत्मा म्हणून संबोधले तर काय चुकीचे ठरेल? याच संदर्भात, ‘भारताचे तीन स्वप्न आहेत, राम, कृष्ण आणि शिव’ असे समाजवादी नेते राममनोहर लोहिया नेेहमी सांगत असत. ही लोहिया वाणी आणि त्यांचा तो प्रदीर्घ निबंध सैफईछाप समाजवादी विसरून गेले आहेत. ते स्वप्न सगळ्यांचे, आम्हा सर्व भारतीयांचे स्वप्न आहे. आस्था, श्रद्धा, उपासना पद्धती बदलल्याने ना आमचे पूर्वज बदलतात ना स्वप्नं; आणि पुन्हा उत्तरप्रदेशच्या मतदारांनी हे सिद्ध केले आहे की भारतनिष्ठ भाजपाचा कुठलाही प्रामाणिक चेहरा त्यांच्यासाठी ढोंगी, अप्रामाणिक व दांभिक सेक्युलॅरिस्टांपेक्षा अधिक स्वीकारार्ह आहे. उत्तरप्रदेश राम, कृष्ण व शिवाचा प्रदेश आहे. पुण्यतीर्थ आणि त्रिवेणीचा प्रवाह या प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे, याची ही विशिष्ट ओळख व महत्त्व जपणे हा आता भाजपाचा धर्म आहे. हा त्रिवेणी संगमाचा प्रदेश व्होट बँकेचे राजकारण करणारे क्षुद्र नेते व हिंदू-मुस्लिम दंगलींचे राजकारण करणार्याआ सेक्युलर व वहाबींमुळे संकटात सापडला. आता याला गांधी-दीनदयाल व लोहियांची ‘वैचारिक त्रिवेणी’च वाचविणार आहे.
मणिपूर येथे भाजपाची सत्ता येणे वस्तुत: राष्ट्रीयतेचा यज्ञ सफल होणेच आहे. येथे गत दोन दशकांपासून दहशतवादी व बंडखोर संघटनांचेच प्राबल्य होते. मात्र, आता तेथे भारताचा आत्मा नवोन्मेष धारण करून प्रकटला आहे. पंजाबमधील कॉंग्रेसच्या विजयाचे मी स्वागत करतो. त्रासदायक आपपासून पंजाबला वाचविल्याबद्दल धन्यवाद. पंजाब मधील रा. स्व. संघाचे समर्पित संघचालक गगनेजा यांची दहशतवाद्यांनी केलेली हत्या आम्ही विसरूच शकत नाही. पंजाबचे रक्षण करण्यासाठी त्यांनी नेहमीच आवाज उठविला. भारताच्या विजयाचे हे उदय पर्व शुभ राहो. भगवी होळी यंदा उत्तरेत झाली, भगवे पोंगल आणि ओणमही आता दूर नाही
No comments:
Post a Comment