First Published :11-March-2017 :
सुकमा, दि. 11 - छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी शनिवारी सकाळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर (सीआरपीएफ) भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले आहेत. सुकमा जिल्ह्यातील भेज्जी परिसरातील ही घटना आहे.
शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ तुकडीवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय राखीव पोलीस दलाची तुकडी सराव करत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्याच्या बातमीला मुख्यमंत्री रमन सिंग यांनी देखील दुजोरा दिला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून घेतली आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली. आज सकाळी ९ वाजता सुकमा जिल्ह्यातील भेज्जी परिसरात हा हल्ला झाला. या परिसरात माओवादी लपून बसल्याची खबर मिळताच सीआरपीएफच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. त्यावेळी माओवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ११ जवान शहीद झाले. हे सर्व जवान सीआरपीएफच्या २१९ व्या बटालियनचे होते, असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी सांगितले. या हल्ल्यानंतर माओवाद्यांनी जवानांकडील शस्त्रे आणि रेडियो सेटस पळवून नेले आहेत. दरम्यान या हल्यात जखमी झालेल्या जवानांना भेज्जी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे
दरवर्षी शंभरहून अधिक जवानांच्या आत्महत्या
आतापर्यंत देशात शेतकऱ्यांच्याच आत्महत्या होत असल्याचे आपण ऐकत आलो आहोत, पण दरवर्षी आपल्या लष्करातील १०० हून अधिक जवान आत्महत्या करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०१६ मध्ये विविध कारणांमुळे १२५ जवानांनी आत्महत्या केल्या असल्याचं उघड झालं आहे.
जवानांच्या आत्महत्येसंदर्भात शुक्रवारी लोकसभेत एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, देशात १०१ जवान, १९ हवाई दलातील कर्मचारी आणि नौदलातील ५ जवानांनी गेल्या वर्षी आत्महत्या केली आहे. त्याशिवाय लष्करातील ३ जवानांची हत्या केल्याचेही उघड झाले आहे.
यावर्षी लष्करातील १३ जवानांनी आत्महत्या केली आहे. हवाई दलातील २ जवानांनीही आत्महत्या केल्याचेही आढळून आले आहे. ताणतणावामुळे जवानांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. जवानांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने बरीच पावले उचलली आहेत. त्यात जवानांचे राहणीमान, राहण्याची जागा आणि त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा समावेश आहे. त्याशिवाय त्यांना तणावमुक्त करण्यासाठी रोज योगा आणि मेडिटेशनचाही समावेश करण्यात आल्याचे भामरे यांनी सांगितले.
जवान आणि त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करण्यासाठी लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना कामाला लावण्यात आले आहे. त्याशिवाय काही मानसोपचार तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येणार असल्याचे भामरे म्हणाले. आजकाल मोबाइलमुळे घरच्यांशी संपर्क साधता येत असल्यानेही जवानांना तणावाचा सामना करावा लागत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले
No comments:
Post a Comment