Total Pageviews

Monday, 5 January 2015

Pakistan boat expolsion

पोरबंदरपासून ३६५ किमी. दूर अंतरापर्यंत या बोटी सापडल्यामुळे सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले आहेत.भारतीय तटरक्षक दलाला ३१ डिसेंबर रोजी सकाळी ८.३0 वाजता दोन बोटी भारतीय सीमेत संशयास्पदरीत्या फिरताना दिसल्या. त्या वेळी त्यांना अडवण्याचा प्रय▪केला असता एका बोटीतील चार लोकांनी बोटीतील स्फोटके पेटवून दिली आणि ती बोट पाण्यात बुडाली. त्याच वेळी त्यावरील लोक पाकिस्तानी सेना आणि पाकिस्तानी तटरक्षक दलाशी सलग संभाषण करत असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार घातपाताचाच होता, हे आता समोर येऊ लागले आहे. गुजरातमध्ये अप्रवासी भारतीय आणि व्हायब्रंट गुजरातसारख्या मोठय़ा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच २६ जानेवारी रोजी होणार्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना पुन्हा आपल्या कारवाया करू शकतात, त्याबाबत या अगोदरच सूचना मिळालेल्या आहेत. मात्र, २६/११ प्रमाणेच पुन्हा एकदा १/१चा दहशतवादी हल्ला करण्याचा मनसुबा तर नव्हता ना? असा प्रश्न या घुसखोरी करणार्या बोटींना पाहून निर्माण होतो. तटरक्षक दलाच्या सावधगिरीमुळेच या बोटींतील लोकांनी स्फोटकांना आग लावली. जर त्यांनी नजर चुकून भारतात हे दहशतवादी घुसले असते तर कदाचित २६/११ सारखी अप्रिय घटना घडली असती. पाकिस्तानने मात्र आपली 'तो मी नव्हेच'ची भूमिका कायम ठेवली आहे. भारत आपल्याला बदनाम करण्यासाठीच हे सारे करत आहे, अशा चोराच्या उलट्या बोंबा मारत आहे. मात्र, तटरक्षक दलाला ठोस असे पुरावे मिळाले आहेत. त्या बोटीवरील लोक नेहमीचे मच्छीमार वाटत नव्हते. जर ते मच्छीमार होते, तर स्फोटके घेऊन कुठे चालले होते? असा प्रश्नही त्यामुळे उभा राहत आहे. खरे तर आज वेगवेगळी तस्करी समुद्रमार्गे होत असते. कदाचित त्याचाही हा एक भाग असू शकेल, असा अंदाज होता. मात्र, आता तटरक्षक दलाने त्याबाबत अधिक माहिती देताना आता दहशतवादी संघटनांचेच हे काम असू शकते, अशी शंका बळावली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना त्यासाठी तत्पर आहेत, असे त्यांच्या नेत्यांकडून झालेल्या वेळोवेळी वक्तव्यामुळे भारतात काही तरी अघटित घडू शकेल, अशी भीती अगोदरच होती. भारतात घुसण्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांना समुद्र मार्ग सोपा पडतो. गुजरातच्या पोरबंदरपासून ३६५ किमी. दूर अंतरापर्यंत या बोटी सापडल्यामुळे सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. खरे तर २६/११ नंतर आपल्याला समुद्रकिनार्यावरची गस्त वाढवणे गरजेचे होती. आता सहा वर्षांनंतरही जर पाकिस्तानी दहशतवादी तसा प्रय▪जरी करत असतील तर आपल्याला विचार करण्याची वेळ आली आहे. सुरक्षेच्या बाबतीत थोडीही चूक उपयोगाची नाही. पाकिस्तान सीमेवर दररोजच गोळीबार करत आहेत. त्यात नाहक सर्वसामान्य नागरिकांचाही बळी जात आहे. आपल्याला आता गुप्तचर संघटना अधिक बळकट करायला हवी आहे. आपल्या गुप्तचर संघटनांनी यापूर्वीच समुद्रमार्गे दहशतवादी भारतात घुसखोरी करू शकतात, असा इशारा दिला आहे. जर खरेच हा दहशतवाद्यांचा हल्ल्यासाठीच प्रय▪होता.. तर भारताला आता सदैव सावध राहायला हवे. पाकच्या मनसुब्याबाबत आपल्याला कधीही संशय वाटणार नाही, असे कधीच होणार नाही आणि विसंबूनही राहू नये. कारण त्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे, हे काही सांगायला नको. आपल्याला मात्र प्रत्येकातला पोलीस जागा ठेवावा लागणार आहे.

No comments:

Post a Comment