Total Pageviews

Monday, 2 May 2011

OSAMA BIN LADEN IS DEAD EDITORIAL SAMANA

अमेरिकेने लादेनची भुताटकी संपविली. हिंदुस्थानी राज्यकर्ते काही शिकणार आहेत का ?

लादेनची भुताटकी संपली! जगातील सर्वात खतरनाक अतिरेकी आणि-११चा सूत्रधार ओसामा बिन लादेन याला अमेरिकन फौजांनी पाकिस्तानात घुसून ठार केले. सोमवारी सकाळी हेमिशन ओसामा फत्ते झाल्याची अधिकृत घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली. रविवारी ही मोहीम यशस्वी झाली आणि ओसामाच्या डीएनए चाचणीनंतर त्याविषयी अधिकृत घोषणा केली गेली. लादेनला यमसदनी धाडणार्‍या महासत्ता अमेरिकेच्या कमांडोजचे या कारवाईबद्दल खास अभिनंदन करायला हवे. दहशतवाद्यांना पोसणार्‍या पाकिस्ताननेच लादेनला लपवून ठेवल्याचा संशय अमेेरिकेला होता. त्यामुळेच पाकड्यांना कानोकान खबरबात लागू देता अमेरिकेने धडाकेबाज पद्धतीने कारवाई केली. लादेनचा खेळ खल्लास केला. इस्लामच्या नावाखाली हजारो जिहादी तयार करून असंख्य निरपराधांचे बळी घेणार्‍या लादेनच्या डोक्यात गोळी घुसली तेव्हा साक्षात मृत्यूही हसला असेल. देशाच्या दुश्मनांना कुठेही आणि कसेही ठेचून, चिरडून टाकण्याची एक तडफ राज्यकर्त्यांकडे असावी लागते. ही तडफच अमेरिकेने दाखवून दिली. लादेनच्या मृत्यूने दोन गोष्टी चांगल्या झाल्या. इस्लामी दहशतवाद्यांच्या नावाखाली सार्‍या जगाला भयभीत करणार्‍या लादेनचे नामोनिशाण मिटले आणि दुसरे म्हणजेलादेन आमच्याकडे नाहीच असा दावा करणार्‍या पाकिस्तानचा बुरखाही टराटरा फाटला. लादेन डोंगरदर्‍यांत राहतो, पर्वतांच्या गुहांमध्ये राहतो, भुयारात लपतो म्हणून तो सापडत नाही अशा अफवा पाकिस्तानातून पसरविण्यात येत होत्या, पण तसे काहीच नव्हते. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून जेमतेम १२५ किलोमीटर अंतरावर एबोटाबाद या शहरातील एका अलिशान हवेलीमध्ये लादेन राहत होता. एबोटाबाद शहर म्हणजे पाकिस्तानी लष्कराची छावणीच आहे. ज्या तीन मजली इमारतीमध्ये लादेन राहत होता त्याच्या आजूबाजूला लष्करातील आजी-माजी अधिकार्‍यांचे बंगले आहेत. जवळच पाकिस्तानी सैन्याचे प्रशिक्षण केंद्र आहे. किडनीच्या आजाराने बेजार असलेल्या लादेनला दर तीन दिवसांनी तिथेच डायलिसीस देण्यात येत होते. याचा अर्थ स्पष्ट आहे, पाकिस्तान सरकार आणि आयएसआय लादेनला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत होते. गद्दारी, बेइमानी, विश्‍वासघात पाकिस्तानच्या रक्तातच आहे. लादेनला पकडण्याच्या नावाखाली पाकिस्तानने अमेरिकेकडून कोट्यवधी डॉलर्सची मदत उकळली. भिकेला लागलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्थाच गेली काही वर्षे अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून आहे. लादेन म्हणजे जणू पाकिस्तानसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडीच ठरली होती. लादेन जिवंत असेपर्यंत अमेरिकेकडून पैसे उपटता येतील म्हणूनच पाकिस्तान सरकार आणि आयएसआय लादेनची खास काळजी घेत होते. अमेरिकेने लादेनविरुद्ध पाकिस्तानी सैन्यासोबत केलेले प्रत्येक ऑपरेशनफेल गेले ते यामुळेच. पाकिस्तानची ही नौटंकी उशिरा का होईना अमेरिकेच्या लक्षात आली. म्हणूनच पाकिस्तानला खबर लागू देता अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संस्थेने लादेनची माहिती गोळा केली. या गोपनीय माहितीवर नऊ महिने कठोर मेहनत घेऊन अमेरिकेनेऑपरेशन लादेन हाती घेतले आणि त्याला खतमही केले. त्याविषयीची घोषणा झाल्यानंतर अमेरिकेत जल्लोष सुरू आहे. तो स्वाभाविक आहे. ‘/११च्या हल्ल्यात सुमारे तीन हजारांवर निरपराध नागरिकांचा बळी गेला होता. अमेरिकेच्या सुरक्षायंत्रणेच्या नाकावर टिच्चून लादेनच्याअल कायदाने हे हल्ले घडवून आणले होते. लादेन केवळ हल्ला करूनच थांबला नाही. ‘अमेरिकेवरील हल्ल्याचा नजारा खूपच सुंदर होता. यापुढे यापेक्षाही भयंकर हल्ले अमेरिकेवर होतील अशी व्हिडीओ टेप जारी करून लादेनने अमेरिकेच्या जखमेवर आणखी मीठ चोळले होते. तेव्हापासून अमेरिकेने लादेनला पकडण्यासाठी दिवस-रात्र एक केली. लादेनला आश्रय देणारा अफगाणिस्तान बेचिराख केला. तेथील धर्मवेड्या तालिबान्यांची राजवट उलथवून टाकली. त्यानंतर लादेन पाकिस्तानात पळाला आणि तेथेच अमेरिकेने आता त्याचा खात्मा केला. अर्थात, त्यासाठी या महासत्तेला दहा वर्षे जंग जंग पछाडावे लागले, अब्जावधी रुपये खर्च करावे लागले. जागतिक दहशतवादाच्या इतिहासातील ओसामा बिन लादेन नावाचे एक काळेकुट्ट पान फाडले गेले. ‘/११च्या हल्ल्याचा हिशेब अमेरिकेने चुकता केला. लादेन ठार झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना बराक ओबामा यांनी दहशतवादाविरुद्धची मोठी लढाई आपण जिंकलो अशा भावना व्यक्त केल्या. लादेनचा खात्मा हा अमेरिकेसाठी, त्यातही व्यक्तिश: ओबामांसाठी निश्‍चितच मोठी उपलब्धी आहे. अमेरिका आज स्वत:ची पाठ थोपटून घेत असली तरी लादेनचे, तालिबानी दहशतवादाचे भूत कुणी उभे केले? अमेरिकेनेच ना! अफगाणिस्तानातून सोव्हिएत रशियाच्या फौजांना प्रतिशह देण्यासाठी तालिबान्यांना अमेरिकेनेच मोठे केले. लादेनही त्याचवेळीमोठा झाला. पुढे हे लादेनचे भूत अमेरिकेच्या मानगुटीवर बसल्याने तोजगाचा क्रमांक एकचा शत्रू ठरला. जोपर्यंत हे भूत इतर देशांमध्ये, हिंदुस्थानात निरपराध्यांचा बळी घेत होते तेव्हा अमेरिकेला तो दहशतवाद वाटत नव्हता. ‘/११चा हल्ला झाला नसता तर आज लादेनचा खात्मा अमेरिकेने केला असता का? दहशतवादाविरुद्धची लढाई वगैरे सुरू केली असती का? लादेनचा खात्मा हा इस्लामी दहशतवादाला जरूर मोठा धक्का आहे, पण अमेरिकेचे दहशतवादविरोधातील मतलबी आणि सोयिस्कर धोरण यापुढे तरी बदलणार आहे का? लादेनला सुरक्षित लपवून ठेवणारा पाकिस्तान हे जगभरातील इस्लामी दहशतवाद्यांसाठीस्वर्ग असल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले. मात्र अमेरिकेचा पाकड्यांविषयीचा पुळका थांबणार आहे का? एक लादेन खलास केला म्हणजे जागतिक दहशतवाद संपला असे नाही. ओबामांना दहशतवादाविरुद्ध खर्‍याअर्थाने लढा द्यायचा असेल तर त्यांनी पाकिस्तानातील अतिरेकी बनविणारे कारखाने उद्ध्वस्त केले पाहिजेत. स्वत: पाकिस्तानात बेमालूमपणे तेथील सरकारला अंधारात ठेवून लष्करी कारवाई करायची आणि हिंदुस्थानला मात्र पाक मैत्रीची कबुतरे आकाशात उडवायला सांगायची. अर्थात, दोष आमच्या पुचाट, बिनकण्याच्या आणि राष्ट्रधर्म विसरलेल्या राज्यकर्त्यांचाही आहे. पाकिस्तानसारख्या परक्या भूमीत जाऊन अमेरिकेने लपून बसलेल्या लादेनला बरोबर शोधून काढले. आमच्याकडे मात्र सगळा आनंदीआनंद आहे. हेलिकॉप्टरने जाणारा मुख्यमंत्री हरवतो आणि चार दिवस होऊनही तो सापडत नाही. अमेरिकेने देशहितासाठी लादेनला पाकिस्तानात जाऊन मारले. फालतू भावनांचा विचार करता समुद्राच्या तळाशी नेऊन त्याला गाडले; याला म्हणतात राष्ट्र! आमच्याकडे मात्र अफझल गुरू, अजमल कसाबसारखे देशाचे दुश्मन वर्षानुवर्षे तुरुंगात सरकारी पाहुणचार झोडत आहेत. अमेरिकेने लादेनची भुताटकी संपविली. हिंदुस्थानी राज्यकर्ते काही शिकणार आहेत का

No comments:

Post a Comment