Total Pageviews

Monday, 17 April 2017

WATCH ME LIVE ON TV 9 MARATHI 0930-1000 PMकाश्मीरमध्ये समाजकंटकांकडून होणाऱ्या दगडफेकीतून वाचण्यासाठी एका काश्मिरी तरुणाचा 'ढाल' म्हणून वापर करण्याच्या लष्कराच्या कृतीवर टीकेची झोड उठली असताना केंद्र सरकार लष्कराच्या मदतीला धावून आलं आहे. तो निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठिशी ठामपणं उभं राहण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. इतकंच नव्हे, या निर्णयाचं कौतुकही केलं आहे.-


काश्मीरमध्ये समाजकंटकांकडून होणाऱ्या दगडफेकीतून वाचण्यासाठी एका काश्मिरी तरुणाचा 'ढाल' म्हणून वापर करण्याच्या लष्कराच्या कृतीवर टीकेची झोड उठली असताना केंद्र सरकार लष्कराच्या मदतीला धावून आलं आहे. तो निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठिशी ठामपणं उभं राहण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. इतकंच नव्हे, या निर्णयाचं कौतुकही केलं आहे. सैन्याच्या ताफ्याचं दगडफेक व गोळीबारापासून संरक्षण करण्यासाठी एका अधिकाऱ्यानं काही दिवसांपूर्वी काश्मिरी तरुणाला जीपपुढं बांधण्याचा निर्णय घेतला होता. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी याबाबतचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर गदारोळ माजला. केंद्र सरकारनं लष्कराकडून या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल मागवला होता. तो अहवाल लष्करानं सादर केला आहे. 'परिस्थित हाताबाहेर गेल्यानं नाइलाजानं आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं, असं लष्करानं अहवालात म्हटलं आहे. 'राज्य सरकारचे एक डझन कर्मचारी, आयटीबीपीचे दहा जवान, जम्मू-काश्मीर पोलीस दलातील दोन जवान व एका चालकाच्या सुरक्षेचा हा प्रश्न होता. हा ताफा ज्या रस्त्यावरून जाणार होता, तिथं संतप्त जमाव दगडफेक करत होता. काही लोक छपरावर चढून उभे होते. अशावेळी त्यांच्यातीलच एखाद्याला पुढं करण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. लष्कराच्या या खुलाशामुळं सरकारचं समाधान झालं आहे. लष्कराला राजकीय हेतूनं लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी केला आहे. 'काश्मीरमधील नेतेच दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत. या लोकांनी नैतिकतेचा बळी दिला आहे. दहशतवादाला विरोध करण्याऐवजी हे नेते लष्कराच्या जवानांना दोष देत आहेत,' असा संतापही सिंह यांनी केला आहे अतुलनिय शौर्य दाखवल्याबद्दल त्या जवानांना शौर्यचक्र द्यायला हवे. एका असहाय काश्मीरी युवकाची ढाल बनवुन पळ काढायला जीगरच असायला हवा. सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहीले नसते तर त्यांच्या पाठीशी असलेल्या जनतेचा पाठिंबा सरकारने गमावला असता. लष्कराने दगड मारणार्यावर शस्र वापरले नाही.ते भारताचे नागरिक असल्याचे तारतम्य बाळगले आहे.त्यांनी केलेला स्वरक्षणाचा उपाय वाखानन्या जोगा आहे. आपल्या जवानांचं मनोबल कधीही कमी होता कामा नये त्यांनी केलं ते बरोबरच होतं. लष्करानं आपल्या जीपच्या बोनेटवर एका काश्मिरी तरुणाला बांधून नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, या कृतीवर विशिष्ट वर्गाकडून टीकेची झोड उठली असताना, भारताची कुस्तीपटू बबिता फोगाटनं या प्रकरणी बेधडकपणे लष्कराची बाजू घेऊन सगळ्यांना 'धोबीपछाड' दिला आहे. 'जीपवर बसवलेल्या तरुणाला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न होतोय. पण कधीतरी त्या जवानाबाबतही चर्चा करा, ज्याला थप्पड आणि लाथा मारल्या गेल्या', असं ट्विट बबितानं केलं आहे. ह्यूमन शिल्ड...! 'ह्यूमन शिल्ड' बनलेल्या 26 वर्षाच्या काश्मिंरी तरुणाचं नाव आहे फारूख अहमद दार. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रथम त्यावर भाष्य केलं अन्‌ काही तासांत तो व्हिडिओ सोशल मीडियावर 'व्हायरल' झाला. दगडफेक करणाऱ्या आंदोलकांनी एका मतदान केंद्रावर बारा निवडणूक कर्मचारी, इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांचे 9 जवान तसेच जम्मू-काश्मी र पोलिसांच्या दोन जवानांना घेरले होते. त्या सर्वांची सुटका करण्यासाठी त्याला हे पाऊल उचलावं लागलं. फारूख अहमद दार हा दगडफेक करणाऱ्यांपैकीच एक होता आणि फुटीरवादी आंदोलकांच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला समोर करावं लागलं. 'बरं झालं अद्दल घडवली' म्हणत लष्कराच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. जवानांची संतापजनक विटंबना 'ह्यूमन शिल्ड'च्या मुद्द्यावर लष्कराला घेरण्याचे प्रयत्न होत असताना गेल्या रविवारीच बडगाम जिल्ह्यात मतदानावर बहिष्काराचं आवाहन करीत दगडफेक करणाऱ्या आंदोलक तरुणांनी हैदोस घातला. मतदान केंद्रांवरून परत निघालेल्या निमलष्करी जवानांना मारहाण केली, टपल्या मारल्या, नारेबाजी केली, 'इंडिया गो बॅक'चे नारे लावले. जवानांची ही विटंबना, अवहेलना व्हिडिओच्या रूपाने संपूर्ण देशाने सोशल मीडियावर पाहिली. लोकांची तळपायाची आग ते पाहून मस्तकात पोहोचली. गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग यांसारखे क्रिकेटपटू किंवा काश्मीनरचा विषय आला की आक्रमकपणे व्यक्तो होणारा अभिनेता अनुपम खेर हे सेलेब्रिटी ज्याप्रमाणे या विटंबनेच्या मुद्द्यावर काश्मी‍रमधील फुटीरवाद्यांवर तुटून पडलेत, त्याप्रमाणे सोशल मीडियावर सामान्य देशवासीयांचा संताप व्यक्ती झाला. हातात रायफली घेतलेल्या जवानांनी दाखवलेला संयम कौतुकास्पद असला तरी आता तो आणखी दाखविण्याची गरज नाही, सारं काही सहन करण्याच्या क्षमतेबाहेर गेल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर काही संशयिताना अटक झाली काश्मीरमध्ये जवानांना मारहाण करणाऱ्यांवर काय कारवाई करावी असे वाटते? मृत्युदंड 41% (153 votes) देशद्रोहाचा खटला 28% (103 votes) कठोर शिक्षा 27% (100 votes) समज द्यावी 4% (15 votes) Total votes: 371

No comments:

Post a Comment