Total Pageviews

Wednesday, 5 April 2017

गरज तरुणांच्या प्रबोधनाची- आजचा तरुण रामासारखा तर दूरच, पण माणसासारखा पण व्यक्त होत नाही याची खंत आहे. समाजातील वाढते अपराध, तरुणांमधील नशेची वृत्ती, स्त्रियांवरील अत्याचारच नव्हे, तर लहान मुलींवर लैंगिक आक्रमण, अपहरण, चोरी, दरोडे, खून, मारामार्या् यांचे वाढते प्रमाण, नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमाने वाढलेले सायबर अपराध, त्यातून घडणार्याी उथळ प्रेमकहाण्या व नंतर स्वार्थापोटी केलेल्या वर्तनाचा परिणाम हत्या, आत्महत्या यात दिसून येतो.


April 6, 2017 0 हिंदू नववर्षाचा जल्लोष विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अजूनही काही ठिकाणी सुरूच आहे. जागोजागी गुढ्या, तोरणे, रामाच्या व देवीच्या देवळांची सजावट, देखावे, कीर्तन, भजन, प्रवचन, रामायणपाठ, रामरक्षा प्रत्येकजण आपापल्या परीने आपली श्रद्धा प्रभू रामचंद्रांच्या ठायी आणि सीता म्हणजेच देवी, म्हणजेच शक्तिरूपिणीच. हा जागर अजूनही देवी मंदिरांमधून होताना दिसत आहे. याच अनुषंगाने यवतमाळ येथील अवधूत आखाड्यात सलग तीन दिवस, रोज ९ ते १० तास १५० कलावंतांनी झटून संस्कार भारतीच्या ११ हजार चौरसफूट रांगोळीचा विक्रम गाठला. अरुण लोणारकरांनी १९ तास अथक परिश्रम घेऊन कोदंडधारी रामाचे चित्र अप्रतिम रेखाटले. त्याच रांगोळीत आणखी काही देखावेही चित्रांकित केले. पाणी वाचवा, बळीराजा चेतना, रक्तदान महादान यासारख्या ज्वलंत सामाजिक समस्यांवरील बोलके देखावे बघून कलाकारांच्या कलेबरोबरच यांचं सामाजिक भान व संवेदनशील वृत्ती यांचा आविष्कार होत होता. देखाव्यांमधले हे संदेश खरंच वास्तवात उतरले तर? इथेच रांगोळीतल्या रंगांची जीवनातील रंगांशी रंगसंगत कशी करावी, ते मात्र कळत नाही. समाजाचे प्रबोधन करणारा अतिशय उत्तम असा हा उपक्रम राबविला गेला. दर्शनासाठी अलोट गर्दी, देवळादेवळातून चाललेली संस्कृती टिकवण्याची धडपड, वक्त्यांच्या माध्यमातून झरणारं ज्ञानामृत, मात्र ऐकणारा श्रोतावर्ग कमीअधिक प्रमाणात सुजाण, पापभिरू, प्रामाणिक व जागरूक. या सगळ्या कार्यक्रमातून एक गोष्ट नेहमीच जाणवते ती म्हणजे समाजाची दशा आणि दिशा ठरवणारे तरुण कुठेच आढळत नाहीत. फार तर मिरवणुकीपुरते, बाईक रॅलीपुरते, ढोल-ताशा वाजवण्यापुरते काहीसे दिसतातही, पण संख्या फारच थोडी असते. तरुण पिढीला संस्कार व संस्कृतीचं महत्त्व पटवून देण्यात मागील पिढी असफल झाली, असेच चित्र दिसते. पर्यावरणाचेच प्रदूषण झाले आहे असे नाही; वैचारिक प्रदूषण झपाट्याने झाले असल्याचे समाजातील घडणार्या् घटनांवरून दिसून येते. आजचा तरुण रामासारखा तर दूरच, पण माणसासारखा पण व्यक्त होत नाही याची खंत आहे. समाजातील वाढते अपराध, तरुणांमधील नशेची वृत्ती, स्त्रियांवरील अत्याचारच नव्हे, तर लहान मुलींवर लैंगिक आक्रमण, अपहरण, चोरी, दरोडे, खून, मारामार्यां यांचे वाढते प्रमाण, नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमाने वाढलेले सायबर अपराध, त्यातून घडणार्याप उथळ प्रेमकहाण्या व नंतर स्वार्थापोटी केलेल्या वर्तनाचा परिणाम हत्या, आत्महत्या यात दिसून येतो. एका सर्वेक्षणात गेल्या १५ वर्षांत ७९,१८९ तरुण-तरुणींनी प्रेमाच्या विफलतेतून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक ७ मिनिटाला होणार्याे हत्या, सडकेवर वाहनांच्या अफाट व अचाट उपयोगाने होणार्यार घटना, दुर्घटना या एकप्रकारे हत्याच आहेत. गेल्या एका वर्षात देशात दीड लाख लोक विविध अपघातात मृत्युमुखी पडले. हजारो कायमचे अपंग झाले. कुणावर कुठलंच, कोणाचंच नियंत्रण नसल्याचेच निदर्शनास येत आहे. आज गरज आहे तरुणांच्या प्रबोधनाची, गरज आहे त्यांना सन्मार्गावर नेण्याची, गरज आहे त्यांना स्वत:च्या शक्तीची जाणीव करून देण्याची, गरज आहे समाजातील मुख्य धारेत त्यांना जोडण्याची आणि हे प्रबोधन कृतिशील हवं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. हे काम पालक उत्तम रीत्या करू शकतात. गरज आहे, आपल्या युवा मुलांंना सुसंस्कारित करण्याची. आधीच्या काळी शिक्षक हे विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करायचे. पण, तो काळ आज राहिलेला नाही. आपण रेखाटलेलं सुंदर चित्र प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर, रामराज्याची कल्पनाच असून चालणार नाही; वानरांना, रामाच्या सेनेला त्यांच्यातील हनुमंताच्या शक्तीची जाणीव करून देणे आवश्यक आहे. जीवनाच्या, समाजातील समस्यांच्या खार्याा पाण्यातून, या भवसागरातून सुखरूप निघायचं असेल तर प्रत्येक वानराने राम नावाचा दगड सागरात स्वकष्टाने उचलून श्रद्धेने टाकायला हवा आहे. तेव्हाच हा सागर पार करण्याचे सामर्थ्य या समाजाला प्राप्त होईल. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ या उक्तीनुसार प्रयत्न योग्य दिशेने झाले तरच आणि फक्त तरच वाल्याचा वाल्मीकी होऊ शकतो.

No comments:

Post a Comment