माजी गुप्तवार्ता अधिकाऱ्यांकडून निषेध
कोणताही अधिकारी हेरगिरी करायची असल्यास स्वतःची ओळख असणारा पासपोर्ट जवळ कशाला बाळगेल, असा प्रश्न विचारतानाच, कुलभूषण जाधव याला पाकिस्तानच्या फील्ड जनरल कोर्ट मार्शलमध्ये सुनावण्यात आलेल्या मृत्यूदंडाचा मुंबई पोलिस दलातील माजी गुप्तवार्ता अधिकाऱ्यांनी निषेध केला आहे. आता हा प्रश्न भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरच न्यावा लागेल व पाकच्या दंडेलीविरोधात आवाज उठवावा लागेल, असा होराही त्यांनी व्यक्त केला.
माजी पोलिस महासंचालक ज्युलिओ रिबेरो यांनी सांगितले की, पाकिस्तानची ही शिक्षा सुनावण्याची पध्दत अत्यंत अन्याय्य आहे. कुलभूषण इराणमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने गेला होता. त्याला पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे व त्यांच्या लष्करी न्यायालयात त्यांच्या मर्जीनुसार त्याच्यावर खटला चालविला आहे. मात्र ज्या प्रकारे त्याला शिक्षा सुनावण्यात आली, ते अन्याय्य आहे. परराष्ट्र व्यवहार स्तरावरच भारताला हा प्रश्न उठवावा लागेल व परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज त्यावर योग्य प्रकारे आवाज उठतील, असा विश्वास मला आहे.
माजी पोलिस महासंचालक डी. शिवानंदन म्हणाले की, हा प्रश्न आता आंतरराष्ट्रीय व परराष्ट्र खात्याच्या पातळीवरच सोडवावा लागेल. पाकिस्तानने कोणतेही माथेफिरू पाऊल उचलण्याआधी जलद कारवाई करावी लागेल. झुल्फिकार अली भुत्तोंनाही ते जिथे फासावर चढविले गेले, अशा अनाकलनीय देशाला आता आंतरराष्ट्रीय दबावच लगाम घालू शकतो. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ते करू शकतात. आपले सरकारही सध्या ट्रम्प यांच्या अधिक जवळ आहे. या एका घटनेमुळे दोन देशांमध्ये युध्द उफाळून येण्याची शक्यता कुणी सांगत असले, तरी तसे दिसत नाही. तो परत येईल, याबाबत मी आशावादी आहे.
ताजी प्रतिक्रिया
नाक दाबले तरच तोंड उघडते. प्रश्न आहे कोण कोणाचे नाक दाबत आहे.
गुप्तवार्ता विभागाचे माजी आयुक्त व्ही. एन. देशमुख यांनी सांगितले की, गुप्तहेर म्हणून त्याला कामच करायचे असते, तर त्याने पासपोर्ट जवळच बाळगला नसता. मोदी सरकारचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंध चांगले आहेत व पाकला जशास तसे असे सूत्र ठेवले, तरच या प्रकरणात लवकर निकाल लागेल.
जेवढे पुरावे तेवढी अधिक जोखीम
नाव न देण्याच्या अटीवर एका गुप्तावार्ता क्षेत्रातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, घडलेला प्रकार दुःखदच आहे. परंतु कोणताच देश आपल्या हेरांचे उत्तरदायित्त्व शिरावर घेत नाही व त्यामुळेच या प्रकरणात जेवढे पुरावे आपण देऊ तेवढी आपली जोखीम वाढेल. यात परराष्ट्र खात्याला अधिकृतरीत्या काय करता येईल, याबद्दल साशंकता आहे. सामान्य प्रकरणांमध्ये कुणा परदेशी व्यक्तीला अटक केली, तरी कळवावे लागते. हेरगिरीसाठी परदेशात आपापल्या अधिकाऱ्यांना सर्वच देश पाठवत असतात, परंतु ते पकडले गेल्यास कोणत्याच देशाला ते उघडपणे मान्य करता येत नाही. नियमानुसार कुलभूषणला बचावाचा वकिल देण्यात आला होता, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. या प्रकरणात आव्हान जरूर देता येईल. सर्वसाधारणपणे या खेळात ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असे असते. त्यामुळे आता काही युक्तिवाद करणे म्हणजे आणखी तपशील उघड केल्यासारखे होईल
रिसर्च अॅण्ड अॅनलिसिस विंगचे (रॉ) एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेले भारताचे कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याने जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पाकिस्तानातील न्यायालयाच्या या निर्णयानंतर पवई पोलिसांनी जाधव यांच्या इमारतीबाहेर कडक बंदोबस्त ठेवला आहे.
पवईच्या हिरानंदांनी येथील सिल्वर ओक या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कूलभूषण हे त्यांच्या कुटुंबियासोबत रहात होते. कुलभूषण यांचे वडील, निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तसुधीर जाधव यांच्या नावावर हे घर आहे. सध्या पवई पोलिसांनी जाधव यांच्या इमारतीबाहेर कडक बंदोबस्त ठेवला आहे. या घटनेनंतर जाधव यांच्या नातेवाईकांची पवई येथील घरी रीघ सुरू झाली आहे. कुलभूषण जाधव यांच्या नातेवाईकांना अथवा आई-वडिलांना भेटण्यास पोलिस मनाई करत आहेत.
पंतप्रधानांना साकडे
A horror movie fan? Catch up with Annabelle online
Ad: amazon prime video
Make Accu-Chek a part of every travel plan.
Ad: accu-chek active
Recommended By Colombia
कुलभूषण यांची सुटका करण्यासाठी कुटुंबियांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी जाधव कुटुंबीय लवकरच दिल्लीला जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
मित्रपरिवाराकडून निदर्शने
मूळचे सांगलीचे असलेले कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत. त्यामुळेच कूलभूषण यांचे बालपण ना. म. जोशी मार्गावरील पोलिस वसाहतीत गेले. फाशीच्या निर्णयानंतर जाधव यांचे शेजारी आणि मित्रपरिवाराने सोमवारी सायंकाळी रस्त्यावर उतरून निदर्शने केली.
सुटकेसाठी मित्रांची मोहीम
‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेले भारताचे कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानाच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याने जाधव यांचे मित्र चिंतेत पडले आहेत. जाधव यांना देशासाठी काही तरी करण्याची जिद्द असल्याचे त्यांच्या मित्रमंडळींनी सांगितले. जाधव यांच्या सुटकेसाठी त्यांच्या मित्रांनी सह्यांची मोहीम सुरू करण्याचे ठरवले आहे.
कुलभूषण हे काही वर्षांपूर्वी लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्ग वसाहतीत राहात होते. त्यानंतर त्यांनी पवई येथे स्थलांतर केले. यांचे बालपणीचे मित्र तुळशीदास पवार यांनी लहानपणापासून कुलभूषण यांच्याशी घरगुती संबध असल्याचे सांगितले. इमारतीत कुणाच्याही घरी काही कार्यक्रम अथवा कुणाला मदतीची गरज असायची तेव्हा कूलभूषण पहिल्यांदा धावायचा. त्याचे कुटुंबीयही तितकेच खंबीरपणे उभे रहायचे. सर्व मित्रांमध्ये तो हुशार होता. देशासाठी काही तरी करायचे यासाठीच त्याने नौदलात जाण्याचा निर्णय घेतला. पवईला रहायला गेल्यानंतरही कुलभूषण आठवणीने इमारतीतील प्रत्येक कार्यक्रमाला यायचा, पाकिस्तान न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत भारताने तातडीने पाऊले उचलून फाशीची शिक्षा थांबवून त्याला परत आणायला हवे, असे
गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये कुलभूषण जाधव या भारतीय कथित गुप्तहेराला पाकिस्तानने अटक केली आणि तब्बल तीन आठवडे ही बातमी गोपनीय ठेवली. 3 मार्च 2016 च्या अटकेनंतर 26 मार्च 2016 रोजी पहिल्यांदा पाकिस्तानी माध्यमात या अटकेला वाचा फुटली, ती पाकिस्तानी चौकशी अधिकाऱयांनी जाहीर केलेल्या एका व्हिडिओमुळे. भारताची रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (RAW - रॉ) आणि पाकिस्तानची इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI - आयएसआय) यांच्यामार्फत परस्परांच्या देशामध्ये सुरू असलेल्या गोपनिय कारवायांची चर्चा जाधव यांच्या अटकेनंतर आणि व्हिडिओमुळे जगभर झाली.
'आयएसआय'च्या प्रसिद्धी विभागाच्या दाव्यानुसार, बलुचिस्तानातील मश्केल येथे जाधव यांना अटक करण्यात आली. 'पाकिस्तानात गोपनिय कारवाया करणे आणि घातपात घडवून आणणे,' या आरोपांखाली जाधव यांच्यावर अटकेची कारवाई झाली. 26 मार्च 2016 रोजी पाकिस्तानच्या गुप्तचर खात्याने जाधव यांचा पासपोर्टही प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहोचवला. त्या पासपोर्टवर हुसेन मुबारक पटेल असे नाव आहे. पासपोर्टवरील फोटो कुलभूषण जाधव यांचा होता. ठाणे विभागीय पासपोर्ट कार्यालयाने 12 मे 2014 रोजी हा पासपोर्ट जारी केल्याचा उल्लेख आहे. पासपोर्टवरील माहितीनुसार, पटेल यांचे मुळ गाव सांगली होते.
पाकिस्तानने 'रॉ' एजंट पकडल्याची माहिती टीव्ही चॅनेल्सवर सुरू झाल्यावर जाधव यांचे काका सुभाष जाधव यांनी पासपोर्टवरील फोटो ओळखला आणि हा फोटो कुलभूषण जाधव यांचा असल्याची माहिती भारतीय प्रसार माध्यमांना दिली. सुभाष जाधव मुंबईचे निवृत्त पोलीस उपायुक्त आहेत. कुलभूषण जाधव यांच्या वडिलांचे नाव सुधीर आहे आणि जाधव कुटुंब मुंबईत पोवईजवळील सिल्व्हर ओक सोसायटीत राहते, अशी माहितीही वर्षभरापूर्वी समोर आली. कुलभूषण जाधव भारतीय नौदलात कमांडर होते आणि त्यांनी सेवानिवृत्ती घेतली असल्याचेही याच काळात प्रसिद्ध झाले. भारतीय गुप्तचर खात्यातील ज्येष्ठ अधिकाऱयांच्या माहितीनुसार, जाधव 2003 पासून पाकिस्तानात काम करत होते. अधिकाऱयांच्या मते, जाधव कुटुंबियांशी फोनवर मराठीत बोलत असत आणि त्यामुळेच त्यांच्याकडे पाकिस्तानी गुप्तचर खात्याचे लक्ष वेधले गेले असावे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2015 मध्ये अफगाणिस्तानच्या दौऱयावरून परतताना अचानक लाहोरमध्ये उतरून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. त्या नंतर भारत-पाकिस्तान संबंधातील तणाव निवळण्याची शक्यता निर्माण होत असतानाच पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने कुलभूषण जाधव यांच्या अटकेची कारवाई केली होती.
जाधव यांना इराणमधून पळवून नेले होते, असा दावा भारताने सातत्याने केला. जुलै 2016 मधील पत्रकार परिषदेत भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले, की जाधव यांना इराणमधून कोणत्या परिस्थितीत पळवून नेले, याबद्दल संभ्रम आहे. भारताने जाधव यांच्याशी संपर्क साधू देण्याची विनंती पाकिस्तानला केली होती. तथापि, ती विनंती मान्य झाली नाही. लोकसभेत डिसेंबर 2016 रोजी जाधव यांच्या अटकेचा विषय उपस्थित झाला, तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाने जाधव यांच्यावर पाकिस्तानने केलेले सर्व आरोप फेटाळले होते. जानेवारी 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तानने परस्परांच्या देशातील काही कैद्यांना मुक्त करण्याच्यादृष्टीने पावले उचलली. त्यासाठी कैद्यांच्या याद्यांची देवाण-घेवाणही झाली. मात्र, त्या यादीमध्ये कुलभूषण जाधव यांचे नाव नव्हते.
'रॉ'च्या कठोर नियमांनुसार, कुलभूषण जाधव नेमके कोण, कुठले, पाकिस्तानमध्ये ते कसे पोहोचले ही माहिती कदाचित कधीच उघड होणार नाही. मात्र, त्यांची फाशीची शिक्षा रोखली जावी, यासाठी भारत सरकारला मोठा दबाव पाकिस्तानवर आणावा लागणार आहे, हे निश्चित.
टॅग्स
No comments:
Post a Comment