Total Pageviews

Thursday, 27 April 2017


J &K मध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; आर्मी कॅम्पला केले टार्गेट, कॅप्टनसह 3 जवान शहीद श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये आर्मी कॅम्पवर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला आहे. कुपवाड्यातील पंजगाम येथील आर्मी कॅम्पला दहशतवाद्यांनी टार्गेट केले आहे. या हल्ल्यात लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एक कॅप्टन, एक जेसीओ आणि एका जवानाचा समावेश आहे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. मात्र, लष्कराकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. पहाटे 4 वाजता घुसले दहशतवादी... कुपवाड्यामधील पंजगाम येथील आर्मी कॅम्पवर आज (गुरुवारी) पहाटे 4 वाजेच्या सुमारास 4 दहशतवाद्यांनी हल्ला केला. लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून दोन दहशतवादी कॅम्पमध्ये लपून बसले आहे. जवानांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली असून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. पंजगाम हे श्रीनगरपासून 87 किलोमीटर अंतरावर आहे. तर पाकव्याप्त काश्मीरची (पीओके) राजधानीपासून 74 किलोमीटर अंतरावर आहे. पोटनिवडणुकीच्या नंतर काश्मीर खोर्यातत वाढला तणाव... - श्रीनगरमध्ये 9 एप्रिलला झालेल्या पोटनिवडणुकीनंतर काश्मीर खोर्यायत तणाव वाढला आहे. निवडणुकीच्यादरम्यान झालेल्या दंगलीत जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर 32 मतदान केंद्रावर रीपोलिंग घेण्यात आले होते. - 24 एप्रिलला पुलवामा जिल्ह्यांत सोमवारी पीडीपीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल गनी डार यांच्यावर दहशतवाद्यांनी फायरिंग केली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. - 17 एप्रिलला दहशतवाद्यांनी नॅशनल कॉन्फरन्सशी संबंधित एका वकीलाची शोपियां जिल्ह्यात हत्या केली होती. - 26 मार्चला कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. सीआरपीएफ कॅम्पला दहशतवाद्यांनी टार्गेट केले होते. - 23 फेब्रुवारीला शोपियामध्ये आर्मीच्या पेट्रोलिंग पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात 3 जवान शहीद झाले होते. - फेब्रुवारीमध्ये हंदवाडा येथे झालेल्या एन्काउंटरमध्ये एक मेजर सतीश दहिया आणि 3 जवान शहीद झाले होते कुपवाडा : पुलवामा येथील लष्करी छावणीत पहाटे घुसून दहशतवाद्यांनी सैन्यावर अंदाधुंद गोळीबार करीत हल्ला केला. त्यांना लष्कराने तत्परतेने सडेतोड प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र, यामध्ये 3 भारतीय जवान हुतात्मा झाले, तर दोन जखमी झाले. काश्मीर खोऱ्यातील कुपवाडा जिल्ह्यातील या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी आज (गुरुवार) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक हल्ला केला. यामध्ये भारतीय लष्कराची जीवितहानी झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्याबाबतची माहिती स्पष्ट झाली आहे. या हल्ल्यात 5 भारतीय जवान जखमी झाले होते. त्यापैकी तीनजणांचा प्राण गमवावे लागले. हा लष्करी तळ भारत-पाक सीमेपासून जवळ आहे. येथे हिवाळा कमी होत असून, उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. थंडीचा कडाका कमी झाल्याने पाकिस्तानातून या दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असण्याची शक्यता आहे. जखमी झालेल्या भारतीय जवानांना गंभीर इजा झाली असून, त्यांना श्रीनगर येथील रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले असल्याचे वृत्त आहे. चकमक संपत आल्यावर भारतीय सैन्याने लष्करी छावणीच्या परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. नेमके किती दहशतवादी घुसले होते याचा तपास करण्यात येत आहे. एकूण चारजण असण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर सरकारने काश्मिरात फेसबुक, ट्विटरसह तब्बल २२ सोशल मीडिया संकेतस्थळांवर महिनाभरासाठी बंदी घातली आहे. महिनाभर किंवा पुढील आदेश मिळेपर्यंत काश्मीर खोऱ्यात ही संकेतस्थळे बंद करण्याचे आदेश काश्मीरच्या गृहमंत्रालयाने इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना दिले आहेत. दरम्यान, आदेश निघताच खोऱ्यात ही संकेतस्थळे तत्काळ बंद करण्यात आली. बंदी घालण्यात आलेल्या संकेतस्थळात फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, व्हीचॅट, स्काइप, व्हायबर, स्नॅपचॅट, यूट्यूब, फ्लिकर हे प्रमुख आहेत. या संकेतस्थळांचा उपद्रव पसरवण्यासाठी वापर केला जात होता, असा सरकारचा दावा आहे. फुटीरवाद्यांकडून सुरू असलेल्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर काश्मिरात १७ एप्रिलपासूनच इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. आता सरकारने यात महिनाभराची वाढ केली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत इंटरनेट सेवा लागू करू नये, असे सरकारने कंपन्यांना बजावले आहे. विविध संकेतस्थळ तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत उद्रेकाची माहिती पसरवणे तसेच त्यांना आंदोलनासाठी प्रवृत्त करण्याचे काम काही जणांकडून सुरू आहे. दरम्यान, अनेक सोशल मीडिया ग्रुपमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. शहीद पतीच्या शौर्याला पत्नीचा अनोखा सलाम! Apr 27, 2017, सीआरपीएफच्या जवानांनी सुकमा इथं जीवाची बाजी लावत नक्षलवाद्यांचा प्रतिकार केला. या हल्ल्यात शहीद झालेल्या अमृतसरच्या रघबीर सिंग यांच्या पत्नी, बलजीत यांनी आपल्या पतीइतकंच शौर्य दाखवत पतीच्या पार्थिवाला खांदा दिला. इतकंच नव्हे तर बलजीतनं अत्यंत दु:खाच्या क्षणीही आपल्या वीर पतीला अखेरची सलामी देत त्याच्या साहसाचा सन्मान केला. रघबीर सिंग यांच्यावरच कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी होती; ती जणू आपल्या खांद्यावर घेत असल्याचं बलजीतनं आपल्या कृत्यातून दाखवून दिलं. अमृतसरच्या सठियाला गावात रघबीर राहात होते. महिला रुढ परंपरेनुसार स्मशानापर्यंत जात नाहीत, पण बलजीत यांनी ही परंपरा मोडत आपल्या पतीच्या पार्थिवाला स्मशानापर्यंत खांदा दिला. रघबीर सिंग यांच्या अंतिम संस्कारांसाठी संपूर्ण गाव जमले होते. बहुतांश लोकांनी पतीला खांदा देण्याच्या बलजीतच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. सीआरपीएफच्या जवानांची एक तुकडीही यावेळी उपस्थित होती. शाब्बास झाशी की राणी, चेन्नमा,ताराबाई, कैकयी, अहिल्याबाई, चांदबीबी, कॅप्टन लक्ष्मी सर्वाधिक हळवा क्षण तो होता, जेव्हा रडता रडताही बलजीतनं आपलं हृदय कठोर करत आपला पती रघबीरच्या शौर्याला सलाम केला. रघबीर सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल पदावर होते. त्यांना एक २४ वर्षांचा मुलगा अमृतपाल आणि १६ वर्षांची मुलगी सिमरनदीप कौर अशी दोन मुले आहेत. पंजाब सरकारनं रघबीरच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. गृहमंत्र्यांनी बोलावली विशेष बैठक : काश्मिरातील या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. पाकिस्तानी संघटनांकडून आंदोलन आणि हिंसाचाराच्या माध्यमातून काश्मिरातील परिस्थिती बिघडवण्याचा डाव असल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिल्यानंतर गृहमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. ऑनलाइन अपप्रचार रोखण्यासाठी बैठकीत रणनीती आखली जाणार आहे. ब्ल्यू प्रिंटची तयारी करा नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी प्रतिबंधात्मक मोहिमेतील बदलाचा आराखडा तयार करावा, असे आदेश राजनाथ यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. ८ मे रोजी यासंबंधीची महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यासंबंधीचे सादरीकरण बैठकीत केले जाणार आहे. बैठकीला मुख्यमंत्र्यांसह,पोलिस उच्चाधिकारीदेखील उपस्थित राहणार आहेत. तुटवडा दूर करा सीआरपीएफच्या तुकडीवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काही सुरक्षा दलाच्या काही अडचणींवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. जवानांना शस्त्रांचा तुटवडा जाणवू लागला आहे. ही समस्या वेळीच दूर करणे गरजेचे आहे. त्यांना अत्याधुनिक शस्त्रे देण्याचे आदेशही त्यांनी दिले. गुप्तचर यंत्रणेवर भर छत्तीसगड हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामागे गुप्तचर यंत्रणेतील काही त्रुटी कारणीभूत ठरल्या. त्यामधील दोष दूर करण्याची सूचना गृहमंत्र्यांनी दिली. बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, गृहसचिव राजीव महर्षी यांचीही उपस्थिती होती. गुप्तचर यंत्रणेकडे योग्य वेळी माहिती मिळाली असती तर हा हल्ला टाळता आला असता. घटनेत केंद्रीय राखीव दलाचे २५ जवान शहीद झाले. नक्षलविरोधी मोहिमेत कुचराई होता कामा नये, असे आदेशही राजनाथ यांनी दिले. राज्यात ६८ जिल्हे नक्षल प्रभावी आहे.

No comments:

Post a Comment