Total Pageviews

Monday, 13 August 2012

MUMBAI VIOLENCE SAMNA EDITORIAL

कसाबच्या मुंबईतील अवलादीसमोर सरकार फुसके ठरले. शेपूट घातले. अशा सरकारचीही राखरांगोळी होवो! महाराष्ट्रा, तुला पेटून उठावेच लागेल.
षंढांच्या महाराष्ट्रातील शांतता!देशद्रोह्यांचा हैदोस!! -सामना

महाराष्ट्राचे संपूर्ण सरकाररोझे-इफ्तार पार्टीत मशगूल असताना धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत भडका उडवला. पन्नास हजार मुस्लिम तरुणांचा हिंसक जमावअल्ला हो अकबरच्या घोषणा देत आझाद मैदानात उतरला. मुंबईपासून हजारो मैल दूर असलेल्या म्यानमारमध्ये मुसलमानांवर अन्याय झाला म्हणून भेंडीबाजारछाप मुसलमानांनी हा मोर्चा काढला. बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध आसामातील भूमिपुत्र बोडोंनी आवाज उठविला म्हणून मुंबईतील मुसलमान भडकला. म्यानमारचा मुसलमान आणि आसामात घुसलेला बांगलादेशी तुमचा कोण लागतो की ज्याच्यासाठी तुम्ही भारतमातेच्या छाताडावर नाचत आहात? ही भूमी अराजकाने अस्थिर आणि रक्तबंबाळ का करीत आहात? मुंबईच्या आझाद मैदान परिसरात जे घडले तो प्रकार फक्त देशद्रोहाचाच फूत्कार आहे. महाराष्ट्राच्या पृथ्वीराज सरकारच्या मानेवर सुरी ठेवून धर्मांधांनी हवा तसा हैदोस घालण्याचाच हा प्रकार. परदेशातील मुसलमानांसाठी येथील जातभाईंचा जीव तीळ तीळ तुटतो त्यांच्यावरील अत्याचाराविरुद्ध जिहाद पुकारला जातो, हे देशभक्त नागरिकांचे लक्षण नाही. या देशातील मुसलमान बदनाम झाला तो याचमुळे. नजरेतून उतरला तो याचमुळे. संशयाच्या भोवर्‍यात सापडला तो याचमुळे. आसाम हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे. भौगोलिक परिस्थिती अशी आहे की, आसामच्या सीमा बांगलादेशला लागून आहेत. या सीमांना भगदाडे ठेवल्याने गेल्या चोवीस वर्षांत कोट्यवधी बांगलादेशी घुसखोरांनी आसामच्या १४ जिल्ह्यांचा जणू ताबाच घेतला. त्यांनी तेथील मूळच्या बोडो हिंदू आदिवासींना पळवून लावले. त्यांची घरे जमिनीचा ताबा घेतला. कश्मीरातपंडितांच्या बाबतीत जे कृत्य पाकिस्तानी अतिरेक्यांनी केले तेच कृत्य आसामात बांगलादेशी घुसखोर करीत आहेत. आसाम म्हणजेगेट वे ऑफ बांगलादेश झाले आहे त्यामुळे हिंदुस्थानचा भूगोल बिघडला आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरूसारख्या शहरांची सुरक्षा धोक्यात आली आहे ती अशा बांगलादेशी घुसखोरांमुळेच. अशा बांगलादेशींना ते असतील तेथून हाकलून दिले पाहिजे. त्यांना कोणतीही दया-माया नाही, मानवता नाही. अशा बांगलादेशींबद्दल ज्यांना प्रेमाचा पाझर फुटतोय ते मातृभूमीशी गद्दारीच करीत नाहीत काय? पण येथील धर्मांध मुसलमान हिंदुस्थानला मातृभूमीच मानायला तयार नाहीत. ‘वंदे मातरम्चा गजर करून ते मातृभूमीपुढे झुकायला तयार नाहीत. जे या मातृभूमीचे दुश्मन आहेत असे पन्नास हजार लोक आझाद मैदानावर जमले. त्यांनीजिहादच्या घोषणा दिल्या काही क्षणात कायदा-सुव्यवस्थेची राखरांगोळी
पोलिसांच्या डोळ्यांदेखत केली. मुंबईचे पोलीस आयुक्तालय तेथून शंभर पावलांवर आहे. मुंबईतीलबारमधीलडान्स नंगानाच एका हॉकीच्या स्टीकने थांबवणारे पोलीस आयुक्त अरुप पटनायक तेथेच बसतात; पण धर्मांधांचा हा नंगानाच हैदोस ते थांबवू शकले नाहीत. दंगेखोर, धर्मांधांवर गोळीबार केला, पण हवेत! मात्र मावळच्या शेतकर्‍यांवर मराठवाड्यातील वारकर्‍यांवर मरेपर्यंत गोळीबार करणारे सरकार हेच आहे. पण आझाद मैदानात त्यांच्या बंदुकांच्या शेपट्या झाल्या काडतुसांच्या लिमलेटच्या गोळ्या झाल्या. दंगलखोरांनी तयारी आधीच केली होती. हा भडका अचानक उडालेला नाही. त्यांनी दुकाने जाळली. निरपराध लोकांची रस्त्यांवरील वाहने फोडली. इमारतीच्या काचा फोडल्या. इलेक्ट्रॉनिक मीडियाची वाहने जाळली. काही दांडेकरांना चोप बसला. हे सर्व शिवसेनेच्या मोर्चात झाले असते तर हाच मीडिया आमचे लचके तोडायला एक झाला असता. आता तुमच्या त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला म्हणून मीडियावाले हज हाऊसच्या आवारात उपोषणास बसणार आहेत की भेंडीबाजारात साखळी धरणे धरून न्याय मागणार आहेत? ‘मीडियातील अनेक पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरेवाले यांना जीवघेणा मार बसला आहे त्याबद्दल फक्त धिक्कार करून चालणार नाही. धर्मांधांच्या बाबतीत निदान यापुढे तरीनिधर्मीपणाचा फालतू सूर आळवू नये. मुस्लिमांची ही मस्ती देशाला महाग पडणार आहे; पण सरकारच व्होट बँकेच्या मस्तीत असल्याने आपले कोण काय वाकडे करणार, या बेबंद मोगलाईत ते वावरत आहेत. मालेगावातील एका स्फोटानंतर शरद पवारांपासून चिदंबरमपर्यंत सगळ्यांना हिंदू दहशतवादाचा साक्षात्कार झाला. या देशातील बॉम्बस्फोट दंगली फक्त नेभळट हिंदूच घडवत असल्याचे या मंडळींनी जाहीर केले. हिंदू दहशतवादामुळे देशाचे तुकडे पडतील अशी बोंबही मारून झाली; पण हिंदूंचा दहशतवाद निर्माण होईल एवढे या देशाचे भाग्य कसले? हिंदूंचा न्याय्य आवाज दाबायचा. हिंदूंचे हक्क पायदळी तुडवायचे हेच येथील निधर्मी बेगड्यांचे धंदे. ‘२६/११च्या हल्ल्यात पाकड्या कसाबने २० पोलीस अधिकार्‍यांना सगळ्यांच्या डोळ्यांदेखत मारले; पण करकरेसारख्या अधिकार्‍याला मारण्यामागे हिंदू दहशतवाद्यांचा हात असल्याचे बेफाम वक्तव्य करणारे कॉंग्रेसवालेच होते. कसाबला पोसणारी अफझल गुरूसमोर झुकणारी अवलाद राज्यकर्त्यांत असल्यामुळेच आसामात घुसलेल्या बांगलादेशींच्या समर्थनार्थ हिंसाचार करण्याचे धाडस येथील मुसलमान दाखवतात. या देशाला आता एक सक्षम राष्ट्रपती लाभले आहेत. आझाद मैदान परिसरात दंगेखोरांनी जो हैदोस घातला त्यावरही ते लक्ष ठेवून असतीलच. राज्यातील सरकारने या दंगेखोरांसमोर कसे गुडघे टेकले हेदेखील त्यांनी पाहिलेच असणार. कुठलाही विलंब लावता असे हतबल आणि फुसके सरकार बरखास्तच करायला हवे
असे त्यांनाही वाटले असेल! महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकविणारे शिवरायांनीही स्वर्गात कपाळावर हात मारावा असे नादान राज्यकर्ते मराठी राज्याला लाभले आहेत. स्वराज्यावर चाल करून आलेल्या शाहिस्तेखानाची बोटे छाटणारा, अफझलखानाचा कोथळा काढणारा, महाराष्ट्राची मोगलाई करू पाहणार्‍या औरंगजेबाला गाडणारा महाराष्ट्र आजच्या कॉंग्रेसवाल्यांनी साफ नपुंसक करून टाकला आहे. याच नपुंसकांच्या राजवटीत मोगलांच्या हातून हिंदू जनता पोलीस मारले जात आहेत. भिवंडीत दोन पोलिसांना साफ चेंदामेंदा करून मारले. डेन्मार्कमध्ये कुणीतरी महम्मद पैगंबराचे व्यंगचित्र काढले म्हणून मुंबईतील मुसलमानांनी हा असाच हिंसाचार केला होता. लंडनमध्ये राहणार्‍या सलमान रश्दीविरुद्ध असाच नंगानाच केला. जगाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात कुणी माथेफिरू कुराणाचा अपमान करतो म्हणून मुंबईत हजारो मुसलमान भडकून आझाद मैदानात जमतात कायद्याचा कोथळा काढतात. मुस्लिम संघटना फतवे काढतात त्या फतव्याबरहुकूम मुसलमान जिहादचे नारे देत रस्त्यावर उतरतात. मुंबईसह राज्याला वेठीस धरतात. ही अराजकाचीच सुरुवात आहे. आझाद मैदानावरचा दंगा शमवताना शंभराच्या आसपास पोलीस जखमी झाले. पोलिसांच्या हातातील शस्त्रं खेचून घेण्यापर्यंत दंगेखोरांची मजल गेली. हे दंगेखोर सामान्य नव्हते तर त्यांच्या डोक्यात हिंदुस्थानद्वेषाची आग भडकली होती. ही अफझल गुरू कसाबचीच अवलाद होती आणि या अवलादीने मुंबईच्या रस्त्यावर२६/११ची रंगीत तालीम केली. फरक इतकाच की, ‘२६/११चा हल्ला अचानक झाला आणि कालचा हल्ला पोलिसांच्या डोळ्यांदेखत झाला. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, शांतता राखा- अफवांवर विश्‍वास ठेवू नका. सरकारने या शांततेच्या बाता भेंडीबाजारात जाऊन माराव्यात. भेंडीबाजारवाल्यांनी दंगा उसळवला. निरपराध्यांचे रक्त सांडले. जीवन अत्यवस्थ केले. ही अफवा आहे काय? आझाद मैदानात ज्यांनी हैदोस घातला ते पाकिस्तानी रक्ताचेच गद्दार होते. तसे नसते तर२६/११च्या युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांच्या स्मृतिस्तंभांची त्यांनी मोडतोड केली नसती. पुन्हा हे एवढे घडत असताना हिंदूंनीच फक्त शांतता पाळायची पाकिस्तानी खाटकांकडून स्वत:चा कोथळा काढून घ्यायचा. सरकारची हीच अपेक्षा असेल तर षंढांची शांतता तुम्हालाच लखलाभ ठरो. सत्य हेच आहे की, कसाबच्या मुंबईतील अवलादीसमोर सरकार फुसके ठरले. शेपूट घातले. अशा सरकारचीही राखरांगोळी होवो! महाराष्ट्रा, तुला पेटून उठावेच लागेल. शिवरायांचे नाव सार्थ ठरवावे लागेल

No comments:

Post a Comment