पोलिसांना संपवू नका!- प्रभाकर पवार
आसाम व म्यानमारमध्ये मुस्लिमांचे मुडदे पाडले जात आहेत, त्यांच्यावर भयंकर अत्याचार होत आहेत असे एसएमएस व व्हिडीओ क्लिपिंग बहुसंख्य मुसलमान तरुणांना पाठविण्यात आले. त्या व्हिडीओ ‘क्लिपिंग व एसएमएस’ पाहून अनेकांची डोकी भडकली. ११ ऑगस्ट रोजी मुंबईत या सार्या खोट्या प्रकाराविरुद्ध मुसलमानांनी मोर्चा काढला आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी हिंसाचार सुरू केला. आपला एक नंंबरचा कट्टर दुश्मन समजणार्या पोलिसांवरच माथेफिरूंनी हल्ला सुरू केला. पोलीस व दूरचित्रवाणीच्या व्हॅन जाळल्या. दिसेल त्या पोलिसांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली.आपल्या आया-बहिणींसारख्या असणार्या पंधरा ते वीस महिला शिपायांचे कपडे फाडून त्यांचा विनयभंग केला. तरीही पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी आपल्या सहकार्यांना शांत राहण्याचे आदेश दिले. त्यामुळे चरस-गांजा पिऊन दंगा करणार्या माथेफिरूंनी पोलिसांना अगदी रक्तबंबाळ होईपर्यंत मारले. पोलीस आयुक्तांचा कोणताच आदेश नसल्याने पोलीस हतबल झाले. अशी नामुष्की १९९२-९३ च्या जातीय दंगल व २६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील हल्ल्याच्या वेळीही पोलिसांवर आली नव्हती. मुंबई पोलिसांची ११ ऑगस्टच्या शनिवारी होती नव्हती ती सारी अब्रू निघून गेली.
विनयभंग झालेल्या महिला पोलीस शिपाई व मार खाल्लेल्या बहुसंख्य पोलिसांनी या सार्या प्रकाराचा प्रचंड धसका घेतला असून त्यातील बहुसंख्य पोलिसांनी ‘सिक’ रिपोर्ट केला आहे. माथेफिरूंच्या विळख्यात सापडलेल्या शिपाई महिलांनी तर पोलीस खात्याला रामराम ठोकायचे ठरविले आहे. आम्ही स्वत:चे संरक्षण करू शकत नाही, तर मग सामान्य माणसाला आम्ही काय न्याय देणार? त्या महिला पुढे असेही म्हणतात, ‘‘इस्लामसाठी, मुसलमानांवरील कथित अत्याचारासाठी आझाद मैदान येथे मोर्चा काढणार्या नराधमांनी आमच्यावर अत्याचार केले नाहीत तर त्यांनी स्वत:च्याच आई-बहिणींना त्या दिवशी वेठीस धरले. त्यांचेच त्यांनी कपडे काढले आहेत, आमचे नाहीत. त्याची शिक्षा त्यांना आज ना उद्या भोगावी लागेल. उद्या त्यांच्याही घरात कुणीतरी घुसून त्यांच्या आया-बहिणींची अब्रू लुटेल एवढे लक्षात ठेवा. नियती कुणालाच सोडत नाही. मग तो कोणत्याही धर्माचा किंवा पंथाचा असो. आपल्या धर्माची दहशत निर्माण करण्यासाठी कुणी आया-बहिणींवर हात टाकत नाही. बेसावध पोलीस व लोकांवर हल्ले करीत नाही, असेेही या संतप्त महिला आजही बोलत आहेत. सार्या पोलीस दलात पोलिसांवरील हल्ल्याचीच आज चर्चा आहे. आझाद मैदान येथील हल्ला हे भ्याड व षंढपणाचे लक्षण होते. नामर्दांचे काम होते. लढण्याची, रक्तपात करण्याची जर एवढीच खुमखुमी असेल तर या माथेफिरूंनी समोर येऊन शुरासारखे लढले पाहिजे. परंतु ज्यांना गद्दारी व फितुरीचा शाप आहे, पाठीमागून वार करायचा ज्यांचा इतिहास आहे अशा माथेफिरूंकडून काय कुणी अपेक्षा करायची, असा सवालही एका जखमी पोलीस अधिकार्याने केला आहे. तो पुढे म्हणाला, आम्हीही लढणारे आहोत म्हणूनच पोलीस दलात भरती झालो. आम्ही विचार केला असता तर हजारो शस्त्रधारी माथेफिरूंना पाहून आम्हाला पळून जाता आले असते परंतु ण्दै्, भेकड असा शिक्का ज्येष्ठ पोलीस अधिकार्यांनी आमच्यावर मारला असता. असो, आमचा जीव वाचला हेच आमचे नशीब, असेही या अधिकार्याने शेवटी सांगितले.जखमी पोलिसांचा संताप कुणाच्याही धमन्या तापविणारा तर महिला शिपायांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे. पोलिसांच्या जखमा एक वेळ भरून येतील, परंतु महिला पोलिसांची नराधमांनी लुटलेली अब्रू कशी काय भरून येणार?
तेव्हा स्कॉटलंड यार्डइतकाच सार्या जगात दबदबा असणार्या मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकार्यांनी महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकणार्या नराधमांचा शोध घेऊन त्यांची भरचौकात ‘लिंग’ छाटायला हवीत. पवित्र इस्लाम धर्मातच तशी कठोर शिक्षा आहे. महिला पोलिसांवर हात टाकण्याचे धाडस यापूर्वी कुणाही माथेफिरूंनी कधीही केले नव्हते. परंतु पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्या कारकीर्दीत मात्र रझा अकादमीच्या गुंडांनी ते धाडस दाखविले. सर्व मुंबई पोलिसांनी शरमेने मान खाली घालावे असेच हे कृत्य आहे. या प्रकारानंतर तर पोलिसांवरील हल्ल्यात वाढ झाली आहे. रोज रस्त्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या व वाहतुकीची कोंडी सोडविणार्या पोलिसांना टपल्या मारण्यात येत आहेत. पोलिसांची इतकी अधोगती कधीच झाली नव्हती. राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढल्यामुळेच हे सारे मुंबई पोलिसांना भोगावे लागत आहे. परंतु पोलिसांचा असा र्हास समाजाच्या हिताचा नाही. त्यासाठी सामान्य जनतेने आता पोलिसांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, त्यांना बळ दिले पाहिजे, त्यांचे मनोबल वाढविले पाहिजे तरच या समाजाचे भले आहे. पोलीस संपले तर समाज संपेल. नाउमेद होऊन पोलिसांना संपवू नका.पाकिस्तानने मुबंईसह सारा देश पोखरला आहे. त्या देश पोखरणार्या रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत आमचे पोलीस आयुक्त रंगतात. रोज बारवर धाडी घालत मर्दुमकी गाजवितात याला काय म्हणावे!
सार्या जगाचे इस्लामीकरण करावयास निघालेल्या माथेफिरूंना आता रोखणे कठीण आहे. इतकी ती पिलावळ खोलवर रुजली आहे तेव्हा आपले संंरक्षण आपणच करायची तयारी आता प्रत्येक नागरिकाने ठेवली पाहिजे. पोलिसांवर, राज्यकर्त्यांवर विश्वास ठेवून चालणार नाही. वांद्य्राचा बेहरामपाडा तर जात्यंधाचा अड्डाच झाला आहे. दंगल झाल्यास कोणत्याही हिंदूने तेथून प्रवास करायचे धाडस करू नये. ‘कुत्ते की मौत मराल’ असे तेथील देशप्रेमी मुस्लिम आम्हाला आवर्जून सांगत आहेत. बेहरामपाड्यासह सार्या देशाचाच बांगलादेशींनी ताबा घेतला असेल तर भूमिपुत्र मुस्लिम तरी काय करणार?
No comments:
Post a Comment