http://online2.esakal.com/esakal/20120822/4791804341115950977.htm
बांगलादेशी घुसखोरांचे लाड आणि मत पेटिचे राजकरण
आसामातीलबांगलादेशी घुसखोरांचे लाड आणि मत पेटिचे राजकरण
हिंसाचाराचे पडसाद देशाच्या अन्य भागात उमटल्यानंतर, ईशान्य भारतीयांचे जीवाच्या भीतीने पलायन सुरू असतानाच, १९ ऑगस्ट ला बंगलोरहून गुवाहाटी एक्सप्रेसने आसामकडे निघालेल्या नऊ आसामी नागरिकांना अज्ञात समाजकंटकांनी बेदम मारहाण करून त्यांना लुटले आणि नंतर धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या देशाला गृहमंत्री आहे हीच एक अफवा ठरल्याने लोकांनी जीव वाचविण्यासाठी पलायन सुरू केले होते. ईशान्येकडच्या जनतेची वेदना ही आता फक्त वेदना राहिलेली नाही, तर ती किंकाळी झाली आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीतीन
कोटी लोकसंख्या असलेल्या आसाममध्ये बांगला देशी मुसलमान घुसखोरांची संख्या एक कोटीवर आहे, तर 28 ते 30 लाख लोकसंख्या असलेल्या त्रिपुरामध्ये 10 ते 12 लाख मुस्लीम घुसखोर घुसलेले आहेत. आसाममधील आणी त्रिपुरामधील सामान्य माणसांना ज्या सोयीसवलती आणी ओळखपत्र मिळत नाही, ते या घुसखोरांना सहजतेने उपलब्ध आहे. त्यांच्याजवळ रेशनकार्ड आहे. मतदानपत्र आहे. त्यामुळे आता घुसखोर नेमका कोण आणी मूळ रहिवासी कोण, हे ओळखणे अतिशय कठीण झाले आहे. मुस्लीम बहुसंख्याक बनवण्याची 'दार-उल्-इस्लाम'ची योजना
मुस्लीम बहुसंख्याक बनवण्याची 'दार-उल्-इस्लाम'ची योजना गेली 93 वर्षे मुस्लीम पुढाऱ्यांद्वारे राबविली जात आहे. 1906 साली ढाक्याचा नबाब सलिम उल्ला खान याने भारतातील प्रमुख मुसलमान नेत्यांची बैठक बोलावून मुसलमानांनी मोठया प्रमाणावर आसाममध्ये जाऊन स्थायिक होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. आसामला पूर्व पाकिस्तानात समाविष्ट करून घेण्याची महंमद अली जीनांचीदेखील तीव्र इच्छा होती, पण तीर् पूण न झाल्याने त्यांनी आपला स्वीय सचिव मोईन उल हक चौधरी यांस म्हटले होते, ''अजून दहाच वर्षे थांब. मी माझ्या स्वत:च्या हाताने चांदीच्या तबकातून तुला आसामची भेट देऊ करीन.'' त्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी 1968मध्ये लिहिलेल्या 'मिथ ऑफ इंडिपेंडन्स' या पुस्तकात ते म्हणतात, ''काश्मीर हे भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव निर्माण करणारे एकच कारण नसून पूर्व पाकिस्तानला (आताच्या बांगला देशाला) लागून असलेल्या भारतीय जिल्ह्यांचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे.''
शेख मुजीबुर रेहमान म्हणतात, ''पूर्व पाकिस्तानची वाढती लोकसंख्या पाहता व आसामची जंगल व खनिज संपत्ती पाहता आसामचा अंतर्भाव पूर्व पाकिस्तानात करणे हे आपल्याला स्वयर्ंपूण व आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.''1945मध्ये तर 'कॅबिनेट मिशन प्लॅन' बनवून आसामला पूर्व बंगालशी कायमचे जोडून मुस्लीमबहुल करण्याची योजना झाली, पण सुदैवाने आसाममधील नेते गोपीनाथ बारदोलोई यांनी ती योजना यशस्वी होऊ दिली नाही.
घुसखोरीची कारणे
बांगला देशाची लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे. या शतकाच्या अखेरीस ती 20 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. इतक्या लोकांना तेथे राहणेच शक्य नाही. याशीवाय बांगला देश जेव्हा पूर्व पाकिस्तान होता, तेव्हा पश्चिम पाकिस्तानने त्याचे शोषण करून त्याची आर्थिक अवस्था बिकट केली होती. भारत-बांगला देशामध्ये असलेली मैदानी सीमा पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्ये मिळून 4096 किलोमीटरची आहे. यातील 2८00 पेक्षा जास्त किलोमीटरच्या सीमेवर भारताने काटेरी तारांचे कुंपण घातले आहे. तरी पण बांगलादेशामधून ४ कोटी लोकांनी भारतात घुसखोरी केली ही वस्तुस्थिती सीमा सुरक्षा दलाची ‘कार्यक्षमता’ सिद्ध करण्यास पुरेशी आहे. आपल्या देशातील विचित्र कायदेदेखील घुसखोरीला उत्तेजन देतात. उदाहरणार्थ, घुसखोरी सिध्द झाल्यास त्यास कायद्याने फार कमी आहे. कधीकधी तर ते साध्या जामीनावरही सुटतात. घुसखोरी नर्िदशनास आणून देणाऱ्या व्यक्तीलाच अनेक वेळा हा कायदा अडचणीत आणतो. तसेच विदेशातून येणारा वारेमाप पैसा वापरून, आसाममधील जमिनी बळकावून तेथे घुसखोरांना वसविले जाते.
घुसखोरीचे र्माग व प्रकार
दररोज चालणारी घुसखोरी ही गटागटाने होत असते. कधी हे गट 50 ते 60 इतक्या छोटया संख्येत असतात, तर मोठयात मोठा गट 200पर्यंतही असतो. बांगला देशात व भारतात दोन्ही ठिकाणी यांची दलाली करणारे 'एजंट्स' असतात. घुसखोरांना भारतात शिरण्यापूर्वी 'उडिया', 'बंगाली' (शुध्द), 'असमिया', 'हिंदी' भाषा शिकवण्याची केंद्रेही बांगला देशाच्या सीमेवर या दलालांनी निर्माण केली आहेत. घुसून आलेले हे तांडे प्रथम पडीक सरकारी जमिनींवर तळ ठोकतात व स्वस्त मजूर म्हणून त्या शहरात लोकप्रिय बनतात. या घुसखोरांमुळे होणारा लाभ पाहता, शासकीय यंत्रणेला लाच देऊन त्यांना तेथे स्थायिक होण्यास कंत्राटदार व व्यापारी साहाय्यभूत ठरतात.
घुसखोरीचे परिणाम
आज आसामच्या व त्रिपुराच्या एकूण 13 जिल्ह्यांमध्ये बांगला देशींची लोकसंख्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक झालेली आहे. हिंदू महिलांवर बलात्कार करणे, त्यांना पळवून नेणे व अवैध व्यापार करणे इत्यादी घटना या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक गावात दर आठवडयाला घडत आहेत. तिरंगा जाळणे, राष्ट्रीय सणांना दहशतीचे वातावरण पसरवणे हेही तेथे घडते. घरफोडया, चोऱ्या आदींचे तर पेव फुटलेले दिसते. कायदा व सुव्यवस्था धोक्यात येते हा पहिला परिणाम, तर देशातील कामगारांच्या पोटावर पडणारा पाय हा दुसरा परिणाम. त्यांच्यापेक्षा स्वस्त दरात काम करणाऱ्या बांगला देशींना जेव्हा येथील व्यापारी व कंत्राटदार जवळ करतात, तेव्हा भारतीय मजूर मात्र बेकारीच्या आणी उपासमारीच्या संकटात सापडतो.
सर्व भारतात घुसून बसलेल्या सुमारे४ कोटींच्या आसपास असलेल्या बांगला देशींचा आपल्या देशावर पडणारा आर्थिक बोजा हा आणखी एक स्वतंत्र परिणाम आहे. त्याची गंभीर दखल घेणे निकडीचे आहे. 'उल्फा' या आसाममधील अतिरेकी संघटनेमध्येही बांगला देशी मुसलमान बहुसंख्येने आहेत, असे आता दिसून येत आहे.
घुसखोरीची ही समस्या मैदानी भागात अधिक आहे. कारण डोंगराळ पूर्वांचलामध्ये राहणाऱ्या जनजातींनी सशस्त्र संघर्ष करून त्यांच्या प्रदेशात होणारे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले आहेत; पण तेथेही बांगला देशींनी सीमेवर व्यापारासाठी येणाऱ्या जनजातीय महिलांशी संबंध जोडून, विवाह करून व पत्नीच्या नावाने जमिनी घेऊन श्ािरकाव करण्याचा एक यशस्वी प्रयोग चालू केलेला दिसतो.
या वेळच्या घुसखोरीचे वैश्िष्टय हे आहे की, घुसखोरी ही नदीच्या र्मागाने झालेली आहे. ब्रह्मपुत्रेमधून नौकांच्या र्मागाने हे सर्व घुसखोर काठावर उतरले आणी काठापासून 4-5 मैल खोलवर त्यांनी आक्रमण केले आहे. दररोज सरासरी सहा हजार बांगला देशी भारतात घुसखोरी करतात, तर सरकार रोज फक्त तीन जणांना बाहेर काढते. यातून एकूणच आक्रमणाचा वेग किती जास्ती आहे, हे लक्षात येऊ शकते.सामान्य माणसांत एक प्रकारची हतबलता
आसाममध्ये या घुसखोरीमुळे फार मोठया प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली आहे. सामान्य माणसांत एक प्रकारची हतबलता निर्माण झाली आहे. अशा वेळी आसामने या घुसखोरीविरुध्द संयुक्तपणे उभे राहण्याची गरज आहे. मात्र जे कोणी सत्ताधारी राहतात, त्यांना या घुसखोरीची कधीच काळजी वाटत नाही. कारण त्यांच्या लेखी एक कायमस्वरूपी व्होटबँक तयार होऊन त्यांनी सत्तेवर राहण्याचा र्माग मोकळा होत असतो. आज आसाममध्ये अशाच घुसखोरीमुळे बहुमतात आलेल्या मुस्लीम आमदारांची संख्या 36 झाली आहे.
बोडो हे ईशान्य भारतातील, विशेषत: आसाममधील रहिवासी आहेत. प.बंगाल आणी नेपाळ या भागातही त्यान्चे अस्तित्व आहे. ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात ते विखुरले आहेत. पण आसाम करार झाल्यानंतरही आणि 25 मार्च 71 नंतर आलेल्या बांगला देशी मुस्लीम घुसखोरांना देशाबाहेर काढण्याचे ठरले असूनही कुणाचीही हकालपट्टी झाली नाही. उलट या प्रदेशात बोडो अल्पसंख्याक . नुकत्याच झालेल्या उद्रेकात बोडो विभागातील 100च्या वर खेडी जाळण्यात आली आहेत. मोठया संख्येने बोडोंची हत्या झाली आहे. आमच्याच गावात, आमच्याच देशात आम्ही बेघर झालो आहोत. जीवनाची सुरक्षा आण्ाि मालमत्तेचे रक्षण यासाठी आम्हाला मोठया प्रमाणात मदत पुरविण्याची गरज आहे. विस्थापित झालेल्या बोडो अतिरेक्यांच्या पुनर्वसनाची आण्ाि मदतीची व्यवस्था व्हायला पाहिजे. आदिवासी विभाग आणि खंडविकास पंचायत समित्या यामध्ये भूमिसुधार कायदे लागू झाले पाहिजेत. भारत-बांगला देश सीमा 'सील' करून बांगला देशी घुसखोर भारतात येणार नाहीत अशी व्यवस्था केली पाहिजे आणि 25 मार्च 71 पूर्वी जे बांगला देशी मुसलमान घुसखोर आसामात आले आहेत, त्यांना बाहेर काढले पाहिजे.'
बांगलादेशी घुसखोरांचे लाड आसाममध्ये सध्या काँग्रेस पक्ष सत्तेवर आहे. हा पक्ष तेथील बांगलादेशी घुसखोरांचे लाड करतो. केंद्रातही काँग्रेस आघाडीचेच सरकार असल्याने चौफेर टीका होऊ लागली होती. आयएसआयसारख्या संघटनांच्या नेटवर्ककडे व त्यांच्या विखारी प्रचाराला येथील मुस्लीम समाजातील काही तरुण बळी पडतात; पण त्यामुळे संपूर्ण मुस्लीम समाज बदनाम होतो. आसाम दंगलीनंतर देश धार्मिक विद्वेषाच्या ज्वालामुखीवर उभा होता. त्याचे काही पुरावे आता समोर येत आहेत. याबाबत केंद्रीय गृह विभागाने एक अहवाल तयार केला आहे. त्यात समोर आलेले चित्र अत्यंत भयावह असेच आहे. आसाम दंगल झाल्यानंतर पाकिस्तानातल्या कट्टरपंथीयांनी यू ट्युब, फेसबुक, ट्विटर आदी सोशल नेटवर्किंग साइटवर मोठ्या प्रमाणात खोटी खाती उघडली. भारतातही अशी काही ‘फेक अकाऊंट’ उघडण्यात आली. त्यावर तिबेट, थायलंड येथील भूकंपाची छायाचित्रे ही आसाम दंगलीतीलच असल्याचे भासवून टाकण्यात आली. त्यासाठी मोबाइलचाही आधार घेण्यात आला.
जर 13 जुलैपासून हे प्रकार सुरू असतील, तर त्यावेळी भारतीय गुप्तचर यंत्रणा काय करीत होत्या, त्यांनी त्याची दखल का घेतली नाही, हे गंभीर प्रश्न अनुत्तरित राहतातच. आमचे केंद्रीय गृहमंत्री पत्रके काढण्यापलीकडे व हताशतेने आवाहन करण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हते. हे एसएमएस आले कुठून. ते पाठवले कुणी? याचा थांगपत्ताही आमच्या सरकारला लागत नव्हता. नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सीनेदेखील हात टेकले. केंद्रीय गृहखात्याच्या सायबर क्राईम कंट्रोलिंग सेलने मान टाकली, अशी ही दीनवाणी अवस्था होती. खासगी इंटरनेट तज्ज्ञांची मदत घेतली. तेव्हा हे एसएमएस पाकिस्तानातून पाठवले गेल्याचे निष्पन्न झाले. म्हणजे शंभर बॉम्बस्फोट जो अनर्थ घडवू शकले नसते त्यापेक्षा मोठा अनर्थ या एसएमएस बॉम्बने घडवून आणला. सीबीआयतर एवढी हताश झाली की, हा एसएमएस कुणी पाठवला याची माहिती देणार्याला तिने लाखोचे बक्षीस घोषित करून टाकले. जर बक्षीस घोषित करूनच गुन्ह्याचा तपास लावायचा असेल तर रॉ, आय बी, सीबीआय, एन.आय.ए. या महागड्या आणि पांढरा हत्ती ठरणार्या यंत्रणा हव्यात कशाला? अब्जावधीचा निधी आणि कोट्यवधीचा सिक्रेट फंड हाताशी असतांना यांना जर एखाद्या एसएमएसचे मूळ शोधून काढता येत नसेल तर त्या बंद केलेल्या बर्या. आपल्या देशात होणा-या जातीय दंगली, बाँबस्फोट जनतेने अंगवळणी पाडून घेतले आहेत. परंतु यातून आपल्या संरक्षण यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा कधी शहाणपणा घेणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अशा घटना घडतात तेव्हा त्याची प्रत्यक्ष किंमत ही सामान्य जनतेला मोजावी लागते. सुरक्षा यंत्रणांचे तसे नाही. घटना घडून गेल्यानंतर त्यामध्ये विदेशी हात होता, असे पालुपद लावून ते मोकळे होतात. नजीकच्या भविष्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाकिस्तान भारतात धार्मिक विद्वेष पसरवत असेल तर आपण सजग राहणे गरजेचे आहे. आपल्या देशाची एकात्मता, राष्ट्रीय ऐक्य अबाधित राखायचे असेल, तर त्याला सजग दृष्टीकोनाशिवाय पर्याय नाही.
No comments:
Post a Comment