Total Pageviews

Thursday 16 August 2012

VOTE BANK POLITICS IN NORTHEAST

पुण्यात सारे आलबेल असल्याच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह

आसाममध्ये झालेला हिंसाचार... मुंबईमध्ये झालेली दंगल... ईशान्य भारतातून पुण्यामध्ये शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला... आणि शेवटी आता बेंगळुरूमध्ये आसामी नागरिकांवर झालेला हल्ला पाहून पुणे आणि परिसरामध्ये राहणाऱ्या ईशान्य भारतातील नागरिकांच्या धीराचा अंत झाला. त्या धीराची जागा असुरक्षितता आणि धार्मिक दंगलीच्या भीतीने घेतल्याने जवळपास दोन हजारांवर ईशान्य भारतीय नागरिकांनी गुरुवारी सायंकाळी पुण्याला रामराम ठोकत आपल्या राज्यांची वाट धरली. त्यामुळे आता पुण्यात सारे काही अलबेल असल्याच्या आश्वासनांवरही शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. पुणे स्टेशनवरून गुरुवारी सायंकाळी सुटणाऱ्या पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेसने हे नागरिक कोलकत्याकडे निघाले आहेत. तेथून मिळेल त्या गाडीने ते आपापल्या गावांकडे रवाना होणार आहेत. या नागरिकांमध्ये पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात नोकरी आणि रोजगाराच्या निमित्ताने आलेल्यांचे प्रमाण जास्त होते. त्यातही महिलांपेक्षा पुरूष आणि तरुण मुलांची संख्या जास्त होती. पुण्यामध्ये असुरक्षितता वाटते यापेक्षाही ' गावाकडून आम्हाला परत बोलावले आहे ,' किंवा ' आमचे इतर सर्व सहकारी गावाकडे परतत आहेत , त्यामुळे आम्ही परत जात आहोत. परिस्थिती शांत झाली , की पुन्हा पुण्यात येणार आहोत ,' असे सांगणाऱ्यांची संख्या जास्त होती. गुरुवारी दुपारनंतर पुणे स्टेशन परिसरामध्ये या नागरिकांची एकच गर्दी झाली होती. चाकण एमआयडीसी , रांजणगाव एमआयडीसी , पिंपरी-चिंचवड एमआयडीसी आदी ठिकाणी कंपन्यामध्ये मजूरी करणारे लोक , पुण्यामध्ये विविध सिक्युरिटी एजन्सींमध्ये सिक्युरिटी गार्ड , पुण्यामध्ये विविध स्टॉल्सवर काम करणारे आचारी आदींचा समावेश होता. या लोकांची गर्दी वाढू लागताच रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे पोलिसांनाही पाचारण केले होते. गर्दी वाढल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये , म्हणून पोलिसांनी या गर्दीला शिस्त लावून गाडी येण्यापूर्वी प्लॅटफॉर्मच्या कडेने एका रांगेने बसवून ठेवले होते. ईशान्येकडे परतणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढल्याने रेल्वे प्रशासनाने आझाद हिंद एक्स्प्रेसला दोन अतिरिक्त बोग्या जोडून या नागरिकांच्या सोयीचा मोडका-तोडका प्रयत्न केला. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे डीआरएम विशाल अगरवाल यांच्याकडून मिळालेल्या आदेशानुसार , ही व्यवस्था केली असल्याची माहिती पुणे स्टेशन मॅनेजर सुनील कमठान यांनी पत्रकारांना दिली. त्यासोबतच या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे पोलिसांकडून नागपूरपर्यंत चार सशस्त्र जवान पुरविण्यात येणार असल्याचे जीआरपी इन्स्पेक्टर महेंद्र रोकडे यांनी सांगितले. परंतु रेल्वेचा हा प्रयत्न प्रत्यक्षात किती अपुरा होता , हे गाडी आल्यानंतर समोर आले. दोन बोग्यांमध्ये सामावणाऱ्या या गर्दीने नंतर दिसेल त्या दरवाज्यातून गाडीमध्ये प्रवेश मिळविला. या नागरिकांनी आपला परतीची सोय केली असली , तरी अन्य रेल्वे प्रवाशांना मात्र त्याचा प्रचंड त्रास जाणवत असल्याचे चित्र या गाडीमध्ये अनुभवायला मिळत होते. दरम्यान , या नागरिकांनी पुणे सोडून जाऊ नये म्हणून शिवसेना , भारतीय जनता पार्टी , बजरंग दल , वंदे मातरम् , सरहद आदी संस्थांकडून स्टेशनवर आवाहन करण्यात येत होते. या संघटनांचे स्थानिक पदाधिकारी या वेळी स्टेशनवर उपस्थित होते. मात्र या नेतेमंडळींकडून करण्यात येणाऱ्या भावनिक आवाहनालाही ईशान्येकडे परतणाऱ्या नागरिकांनी दाद दिली नाही. आझाद हिंद एक्स्प्रेस मार्गस्थ झाल्यानंतर सायंकाळी पुणे-पाटणा एक्स्प्रेसने गावाकडे परतण्यासाठी अनेक ईशान्य भारतीय नागरिकांनी स्टेशनवर गर्दी केली होती.
...
काही अनुत्तरित प्रश्न...
या सर्व नागरिकांना ' रमजान ईदपूर्वी तुमच्या गावी परत जा ; अन्यथा ईदनंतर बघून घेऊ ,' अशा आशयाचे एसएमएस आल्याचे दावे आले आहे. मात्र , स्टेशनवरून परतणाऱ्या एकाही नागरिकाने असा एसएमएस दाखविला नाही. असे एसएमएस खरेच प्रसारित झाले आहेत का ? ते झाल्यास ते कोणी केले , याचा शोध पोलिस घेणार आहेत का ? असे एसएमएस प्रसारित झाले असल्यास त्याविषयी पोलिसांपर्यंत कोणतीही माहिती कशी पोहोचली नाही ? गुप्तचर यंत्रणा याविषयी एवढी सुस्त कशी ? एवढ्या मोठ्या संख्येने हे नागरिक पुणे स्टेशनवर गोळा होत असताना त्याविषयी कोणत्याही सरकारी यंत्रणांना पूर्वकल्पना नव्हती. हे कसे ? एवढ्या मोठ्या संख्येने हे नागरिक एकाचवेळी एकत्र आले कसे ?
000
नागरिकांच्या प्रतिक्रिया टिपू पालमै (विद्यार्थी) मी पुण्यात बहीण आणि तिच्या कुटुंबीयासमवेत राहतो. आमच्या कुटुंबीयांना असा कोणताही त्रास झाला नाही , परंतु आता माध्यमांमधून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्याने गावाकडून पालकांनी परत बोलावले आहे. त्यामुळेच परत जात आहे. एक-दोन आठवड्यांनी परिस्थिती शांत झाली की पुन्हा परत येणार आहे. सूरज डोवारस (सिक्युरिटी गार्ड) मी गेल्या वर्षभरापासून चाकणमध्ये काम करीत आहे. आईसोबत तिथेच राहत होतो ; पण आता परिस्थिती बिघडल्याचे कळाल्याने गावाकडून परत बोलाबले आहे. आमच्याकडच्या सर्व लोकांसोबतच तिकडे निघालो आहे. आमच्याकडील एवढे लोक पुण्यात आहेत , हे मात्र आत्ता स्टेशनवर आल्यावर समजले. एवढे लोक सणासुदीलाही अचानक परत जात नाहीत. आता परत निघालो आहे. पुण्यात परत येणार की नाही माहिती नाही. गावी जाऊन शेती करण्याशिवाय पर्याय नाही. श्याम देशपांडे (माजी नगरसेवक) स्वतंत्र भारतात भीतीपोटी नागरिकांवर शहर सोडून जाण्याची वेळ येत आहे. ही घटना अत्यंत क्लेषदायक आहे. ही परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत प्रत्येकाला कठोर शासन होण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे पुण्यात ज्या कॉलेजमध्ये ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण झाली , त्या कॉलेजलाही जाब विचारण्याची गरज आहे. ही घटना शहराच्या प्रतिमेला धक्का पोचविणारी आहे. पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी शिवसेना काळजी घेणारच आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आम्ही या प्रकरणी कुजकामी प्रशासकांवर आणि संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे निवेदन देणार आहोत. यापुढे पुण्यातील विद्यार्थ्यांनी शहर सोडून जाऊ नये , यासाठी त्यांना आवाहन करणार आहे. शिवसेना त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार आहे. रणजित नातू (बजरंग दल) जे चालले आहे , ते खूप वाईट आहे. या नागरिकांना धमक्यांचे एसएमएस आले आहेत. आम्ही त्यांच्याकडे त्या एसएमएसची मागणी करीत आहोत , परंतु भीतीपोटी हे नागरिक तो एसएमएस देत नाहीत. तो एसएमएस मिळाल्यास या प्रकरणाच्या मागे असणाऱ्यांचा सुगावा लागू शकतो. सर्व आसामी हिंदू पुणे सोडून जात आहेत. हे ठरवून घडत आहे. त्यामागे मोठे षड्यंत्र आहे. या नागरिकांसाठी आम्ही आमच्या चोवीस तास हेल्पलाइनच्या माध्यमातून मदत करणार आहोतबेंगळुरू , नाशिक , पुण्यातून हजारोंची रीघ



ईशान्येकडील नागरिकांवर हल्ला केला जाणार असल्याची अफवा ' एसएमएस ' द्वारे पसरल्याने बेंगळुरू , नाशिक , पुणे या शहरांत राहणाऱ्या आसामी लोकांमध्ये घबराटचे वातावरण निर्माण झाले आहे . धमक्यांच्या भीतीने बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांत कर्नाटकातून सुमारे हजार ईशान्य भारतीयांनी आसामाकडे धाव घेतली .
बेंगळुरू रेल्वे स्टेशनवरील लोंढा पाहून रेल्वे प्रशासनाला आसामला जाणाऱ्या नियमित रेल्वेगाड्यांशिवाय दोन विशेष गाड्या सोडाव्या लागल्या . कर्नाटक सरकारने सुरक्षेची हमी दिल्यानंतरही आसामींचा लोंढा कमी झालेला नाही . पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी काही आसामींना मारहाण झाली असली तरी , कर्नाटकात आतापर्यंत एकही अनुचित प्रकार घडलेला नाही . म्हैसूरमध्ये १४ ऑगस्ट रोजी दोघा तरुणांनी एका तिबेटी विद्यार्थ्यावर हल्ला केला . त्यानंतर ईशान्य भारतीयांना जिवे मारण्याच्या धमक्या देणारे ' ग्रूप एसएमएस ' पाठवले गेल्यामुळे कर्नाटकांतील आसामींमध्ये भीती पसरली . ' मुंबई आणि इतर ठिकाणी आमच्यावर हल्ले झाले आहेत , तसेच कर्नाटकातही होणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे . त्यामुळे आम्हाला आमच्या कुटुंबीयांकडे परतायचे आहे . आम्हाला कोणतीही जोखीम पत्करायची नाही ,' असे परत जाणारे आसामी सांगत आहेत . बुधवारी ईशान्येकडील सुमारे सहा हजार ८०० जण आपल्या बेंगळुरूतून परतल्याची माहिती खुद्द कर्नाटकचे उपमुख्यमंत्री अशोका यांनीच दिली . या घबराटीची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली असून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याशी फोनवरून चर्चाही केली . ईशान्य भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती पावले उचलली जातील , असे आश्वासन शेट्टर यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही दिले . केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे शेट्टर यांच्याशी फोनवरून चर्चा केली . नाशिकमध्ये ' गुवाहाटी एक्स्प्रेस ' फुल मुंबईच्या सीएसटी भागातील हिंसाचारानंतर आसामींना जिवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्याने दादरहून निघणाऱ्या गुवाहाटी एक्स्प्रेसने हजारो नागरीक आसामकडे प्रयाण करत असून , बुधवारी नाशिकहून जवळपास १०० नागरीक आसामला घराकडे रवाना झाले . शहराच्या सातपूर , अंबड , सिन्नरच्या एमआयडीसी परिसरात अनेक आसामी वास्तव्यास असून त्यांना मुंबईतील ईशान्य भारतीयांचे फोन आल्याने त्यांनीही आपल्या कुटुंबांशी परत जाण्याचा निर्णय घेतला . त्यामुळे इतर वेळी रिकामी जाणारी ' गुवाहाटी एक्स्प्रेस ' गेले दोन दिवस खचाखच भरलेली होती . नाशिकमधील अनेक कॉलेजांमध्ये आसाममधून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत . त्यांच्यातही भीतीचे वातावरण पसरले आहे . रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात आसामी नागरीक मिळेल त्या गाडीने आपल्या गावी जाण्याची धडपड करत आहे . काही नागरीकांनी पुढील दिवसांच्या गाडीचेही बुकिंग केले आहे . पुण्याहून परतणाऱ्यांची रीघ काही दिवसांपर्वी पुण्यात राहणाऱ्या ईशान्य भारतीयांवर झालेल्या हल्ल्यानंतर या जनसमुदायात असुरक्षितता आणि धार्मिक दंगलीची भीती निर्माण झाली असून दोन हजारहून अधिक ईशान्य भारतीयांनी गुरुवारी सायंकाळी पुण्याला रामराम ठोकत गावाची वाट धरली . पुणे - हावडा आझाद हिंद एक्सप्रेसने हे नागरिक कोलकात्याकडे रवाना झाले . विद्यार्थ्यांपेक्षा पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये नोकरी आणि रोजगाराच्या निमित्ताने आलेल्यांचे प्रमाण जास्त होते . त्यातही महिलांपेक्षा पुरुष आणि तरुणांची संख्या जास्त होतीमुस्लिमांच्या मोर्चांना सहा महिने परवानगी नको, धोका आहेआयबीच्या इशार्‍याला केराची टोपली
मुस्लिमांच्या कोणत्याही सभा मोर्चांना मुंबईत किमान सहा महिने तरी परवानगी देऊ नका असे स्पष्टपणे लेखी स्वरूपात केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक विशेष शाखेचे अतिरिक्त आयुक्त नवल बजाज यांना १५ दिवसांपूर्वी कळविले होते, परंतु आयबीच्या या पत्राकडे मुंबई पोलिसांनी दुर्लक्ष केले अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.आसाम म्यानमारच्या पार्श्‍वभूमीवर मुस्लिमांच्या कोणत्याही संघटनेस मोर्चा अथवा निदर्शने करण्यास परवानगी देऊ नये, दिल्यास मुंबईत मोठा हिंसाचार होण्याची शक्यता आहे असा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला असतानाही मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक त्यांचे संबंधित अधिकारी मुस्लिमांच्या इफ्तार पार्टीत मशगूल झाले. त्यांनी मुस्लिम संघटनांवर विश्‍वास ठेवून मुस्लिमांच्या ११ ऑगस्टच्या मोर्चाला परवानगी देऊन टाकली अशीही माहिती सूत्रांनी दिली.मोर्चाची परवानगी कुर्ल्याच्या मदी-नतूर-इलम संघटनेने घेतली होती, परंतु आयोजन रझा अकादमी या वादग्रस्त संघटनेने केले होते. आपणास परवानगी मिळणार नाही म्हणूनच रझा अकादमीने हागेम खेळला होता, अशी माहिती देताना एक अधिकारी म्हणाला, ‘शनिवारच्या जात्यंध मुस्लिमांच्या हल्ल्यात पन्नासच्या वर पोलीस गंभीर जखमी झाले. त्या पोलिसांची दयनीय अवस्था आहे. त्यांचे मनोधैर्य पूर्णपणे खचले आहे. मोर्चाला परवानगी दिली नसती तर अशी नामुष्कीची वेळ मुंबई पोलिसांवर आली नसती.
१९९२-९३ च्या जातीय दंगलीतही मुुंबई पोलिसांवर असा अमानुष हल्ला झाला नव्हता असे सांगताना हा अधिकारी पुढे म्हणाला, ‘ज्येष्ठ पोलीस अधिकार्‍यांमध्येच एकोपा वा ताळमेळ नाही. त्यांच्यातील मतभेद भांडणामुळेच पोलिसांना ११ ऑगस्ट रोजी मार खाण्याची वेळ आली, असेही या अधिकार्‍याने शेवटी सांगितले.
जास्त हुशारी करू नका!
दंगल वेळीच आटोक्यात आणली नसती तर आझाद मैदान येथे जालियनवालाबाग हत्याकांड घडले असते असा दावा करून स्वत:ची पाठ थोपटून घेणार्‍या एका अतिवरिष्ठ अधिकार्‍याने तर एका उपायुक्ताला सर्वांसमक्ष डाफरले. त्याने शनिवारी एका दंगलखोरास रंगेहाथ पकडले असता त्याला सोडून देण्यास भाग पाडले. हा अतिवरिष्ठ अधिकारी त्या उपायुक्तास म्हणाला, ‘हे मुंबई शहर आहे. ग्रामीण भाग नाही. येथे सांभाळून कारवाई करावी लागते. तुम्ही जास्त हुशारी करू नका. मी सांगेन तेच करा. हे शहर माझ्या आदेशावर चालते.’ आपल्या ज्येष्ठ अधिकार्‍याने असे खडसावल्यानंतर तो उपायुक्त चक्रावूनच गेला. त्यामुळे दंगलखोरांना पकडण्याबाबत मुंबई पोलिसांचे धोरण कमालीचे संशयास्पद वाटते, असेही बोलले जात आहे

No comments:

Post a Comment