सीएसटी परिसरातील हिंसाचारात तणाव; दोन ठार
सीएसटी परिसरात काही संघटनांकडून आसाममधील हिंसेविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला शनिवारी हिंसक वळण लागून दोन जण ठार झाले.
आसाममध्ये वास्तव्य करीत असलेल्या बांगलादेशी घुसखोर मुस्लिमांना तसेच म्यानमारमधील मुस्लिमांना भारत सरकारने संरक्षण द्यावे, अशी राष्ट्रद्रोही मागणी करीत, मुंबईतील गजबजलेल्या आझाद मैदानावर एकत्र आलेला मुस्लिम संघटनांच्या मोर्चाला आज हिंसक वळण लागले.मोर्चात सहभागी झालेल्या समाजकंटकांनी जाळपोळ आणि दगडफेक करीत बेस्टच्या अनेक बसेस, पोलिसांची वाहने आणि मीडियाच्या वाहनांचीही होळी केली. या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला असून, पोलिसांसह ५० जण जखमी झाले. भाजपा आणि विहिंपने मुस्लिमांच्या या हिंसाचाराचा आणि राज्य सरकारच्या मवाळ भूमिकेचा तीव्र निषेध केला आहे.सीएसटी परिसरात काही संघटनांकडून आसाममधील हिंसेविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला शनिवारी हिंसक वळण लागून दोन जण ठार झाले.
भारतात राहणार्या बांगलादेशी मुस्लिमांचे तसेच म्यानमारमधील मुस्लिमांचे रक्षण करण्यात यावे, अशी मागणी करीत या मुस्लिम संघटना रजा अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आल्या. भारतविरोधी घोषणा देत, या मोर्चातील काही समाजकंटकांनी आझाद मैदानाजवळ उभ्या असलेल्या पोलिसांच्या आणि प्रसारमाध्यमांच्या वाहनांना आगी लावून त्या पेटवून दिल्या. यामुळे सीएसटी परिसरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी अश्रुधुराचा वापर आणि हवेत गोळीबार करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
आसाम आणि म्यानमारमधील दंगलीच्या निषेधार्थ इस्लाम संस्कृतीचा प्रचार करणार्या रजा अकादमीने आझाद मैदानात मोर्चाचे आयोजन केले होते. या संघटनेला जमैतुल उलेमा आणि जमाते रझा-इ-मुस्तफा यासारख्या मुस्लिम संघटनांनी पाठिंबा दिला होता. दुपारी दोन वाजता सुरू झालेल्या या मोर्चात ३५ ते ४० हजारांहून अधिक मुस्लिम कार्यकर्ते सहभागी झाले होते. आझाद मैदानाजवळ येताच मोर्चात सामील झालेल्या काही समाजकंटकांनी अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता त्यांनी येथील वाहनेसुध्दा पेटवून दिली. टीव्ही ७, पी ७ आणि एबीपी माझा या वृत्तवाहिन्यांच्या ओबी व्हॅनसह पोलिसांच्या गाड्या आणि काही खाजगी गाड्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.
पोलिसांनी संतप्त जमावाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असता जमावाने त्यांच्यावरच दगडफेक केली. पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करून आग लावण्यात आली. मोठ्या संख्येने असलेल्या जमावापुढे पोलिसांची ताकद कमी पडल्याने अधिक कुमक मागविण्यात आली. तोपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर जमावाने धडक देत ते तोडण्याचा प्रयत्न केला. बेस्टच्या ८ बसेसनाही आगी लावण्यात आल्या. हिंसक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी प्रथम अश्रुधुराच्या सहा नळकांड्या फोडल्या. तरीही जमाव हटत नसल्याने हवेत गोळीबार करण्यात आला.
मुंबई- आसाम आणि म्यानमार येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ रझा अकादमीने सीएसटी परिसरात काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. संतप्त आंदोलकांनी प्रसारमाध्यमांच्या वाहनांवर आणि परिसरातील वाहनांवर दगडफेकीस सुरुवात केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला पण त्यानंतरही आंदोलक आटोक्यात येत नसल्याने हवेत गोळीबार करावा लागला. या सर्व हिंसाचाराच्या घटनेमध्ये दोन डण ठार झाले असून 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये बहुतांश पोलिस कर्मचारी आहेत.
आसाम आणि म्यानमार येथे दंगलीमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार केले जात असल्याच्या निषेधार्थ रझा अकादमीने हा शनिवारी मोर्चा काढला होता. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमाराला आझाद मैदानात आंदोलन सुरू केले होते. दुपारी 2.30 च्या सुमाराला चेह-यावर पट्टी लावलेल्या काही जणांनी महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक केली. रझा अकादमीचा मोर्चा आक्रमक होता. परिसरात दगडफेक, जाळपोळ आणि मोडतोड करण्यास सुरुवात केली. अर्ध्या तासाच्या आत या ठिकाणी दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने हिंसक जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच हवेत गोळीबारही केला. आझाद मैदानापासून जवळच असलेल्या पत्रकार संघातही आंदोलनकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. फाटक तोडून आत शिरण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलनकर्त्यांना रोखणा-या पत्रकार आणि कॅमेरामनलाही मारहाण करण्यात आली. एबीपी माझा, न्यूज 24 आणि पी 7 या वृत्तवाहिन्यांच्या ओबी व्हॅनचेही नुकसान करण्यात आले. घटनास्थळी पोलिसांसोबत दंगलविरोधी पथक तैनात करण्यात आले असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. सांगली दौरा अर्धवट टाकून गृहमंत्री मुंबईत सीएसटी परिसरात उसळलेल्या दौ-यामुळे गृहमंत्री आर आर पाटील सांगलीचा दौरा अर्धवट टाकून मुंबईतला परत येण्यास निघाले आहे. नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून, आवश्यक असेल तर घराबाहेर पडा असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच या काळात पसरवण्यात येणा-या अफवांवर विश्वास ठेवू नका असेही आवाहनही त्यांना नागरिकांना केले आहे.आंदोलनाचा परिणाम रेल्वेसेवेवरहीसीएसटी परिसरात उसळलेल्या हिंसाचाराचा परिणाम रेल्वेसेवेवरही झाला. दुपारी साडेतीनच्या सुमाराला सुरक्षेच्या कारणास्तव हार्बर लोकलसेवा अर्धा तासासाठी थांबवण्यात आली होती. चारच्या सुमाराला ही सेवा पुन्हा सुरु करण्यात आली. शनिवार असल्याने, अर्धा दिवसांचे काम आटोपून घरी परतणा-या चाकरमान्यांना या आंदोलनचा फटका बसला. सीएसटीहून चारच्या सुमाराला सुटणा-या लांब पल्ल्याच्या गाड्या 15 मिनिटे उशिराने सुटल्या. संध्याकाळी सहानंतर ही सेवा सुरळीत झाली.सीएसटी परिसरात अघोषित संचारबंदीआझाद मैदान परिसरात उसळलेल्या आंदोलनानंतर डी एन रोड ते जेजे उड्डाण पुलापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तसेच महापालिका मार्ग ते मेट्रो जंक्शनपर्यंत चपलांचा खच पडलेला दिसत होता. पोलिस गणवेशाच्या टोप्या आणि सुरक्षा पॅडचे तुकडेही या रस्त्यावर उशिरापर्यंत दिसत होते. सुरक्षेच्या कारणास्तव मध्य रेल्वेच्या सीएसटी रेल्वेस्थानकावरील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. या परिसरात ये-जा करण्यास पोलिसांनी काही काळ मज्जाव केला होता. संध्याकाळी पाचनंतर परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आली. त्यानंतर परिसरात पुन्हा वावर सुरू झाला. अफवांचे पीकआझाद मैदानात उसळलेल्या हिंसाचारानंतर या परिसरात शहरात अफवांना ऊत आला होता. सीएसटी रेल्वे स्थानकात लोकलसाठी निघालेल्या कर्मचारी एकमेकांना फोनाफोनी करत वाटेल त्या बातम्या देत होते. तोडफोडीत झालेले नुकसान
दंगलखोरांनी बांबू-काठी, दगडांचा वापर करून पोलिसांवर आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींवर केलेल्या भीषण हल्ल्यात तब्बल ४४ पोलिस जखमी झाले आहेत. अनेक पोलिसांची डोकी फुटली तर काहींना फ्रॅक्चर झाले. अनेक पोलीस रक्तबंबाळही झाले. सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारांसाठी जखमी झालेल्या २० पोलिसांना दाखल करण्यात आले. अन्य पाच जखमींवर जेजे रुग्णालयात तर २५ जणांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.चार छायाचित्रकारही जखमी
या हिंसाचारात चार छायाचित्रकार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दंगलखोरांच्या हिंसाचारात ‘सकाळ टाईम्स’चे प्रशांत सावंत, ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे श्रीराम वेर्णेकर, ‘द हिंदू’चे विवेक बेंद्रे, आणि ‘मिड-डे’चे अतुल कांबळे हे चार छायाचित्रकार जखमी झाले. दंगलखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या कॅमेऱ्यांची नासधूस केली. छायाचित्रकारांवरील या हल्ल्याचा मुंबई मराठी पत्रकार संघाने तीव्र निषेध केला आहे. अशा प्रकारची निदर्शने आहेत हे माहिती असतानाही पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला नाही. अशा संवेदनशील प्रसंगी चोख खबरदारी घ्यायला हवी होती, पण पोलिसांनी उदासीनता दाखवल्यानेच हिंसाचाराला वाव मिळाला, अशी टीका ‘मुंबई प्रेस क्लब’ने केली आहे आसाममधील हिंसाचाराच्या निषेधार्थ आझाद मैदानावर ‘रझा अकादमी’कडून करण्यात आलेल्या आंदोलनात पोलिसांच्या गाडय़ा फोडल्या गेल्या, पोलिसांवरही हल्ला करण्यात आला आणि प्रसारमाध्यमांच्या गाडय़ा जाळण्यात आल्या. या साऱ्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले असून, मुंबईची शांतता बिघडविणाऱ्या दंगलखोरांची पाळेमुळे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील खणून काढणार की त्यांच्यासमोर शेपूट घालणार, तेच मला पाहायचे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरात काल झालेल्या धुमश्चक्रीदरम्यान हिंसक जमावाकडून महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. काही पोलिसांची शस्त्रंही या दंगलीत गहाळ झाली आहेत.
आसाम आणि म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी रझा अकादमीनं शनिवारी दुपारी आझाद मैदानावर सभा बोलावली होती. पण, या सभेतील जमाव अचानक हिंसक झाल्यानं सीएसटी परिसरात अक्षरशः धुमश्चक्री झडली होती. पोलिसांच्या गाड्या, खासगी वाहनं, वृत्त्वाहिन्यांच्या ओबी व्हॅन पेटवण्यापर्यंत या जमावाची मजल गेली. मुंबई महापालिका, टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंगवर, तसंच बेस्ट बसेसवर दगडफेक करण्यात आली. अनेक पोलीस या हिंसाचारात जखमी झाले. लाठीचार्ज आणि अश्रूधुरालाही जमाव जुमानत नसल्यानं पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला होता.
या धुमश्चक्रीत २३ दंगलखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. आज त्यांना किला कोर्टात हजर करण्यात येईल. दंगल घडवणं, सरकारी मालमत्तेचं नुकसान, पोलिसांवर हल्ला आदी गुन्हे त्यांच्यावर नोंदवण्यात आलेत. हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला असून ५५ जण जखमी आहेत. त्यापैकी ४० हून अधिक पोलीस कर्मचारी असल्याचं समजतं. हा जमाव इतका बेभान, बेधुंद झाला होता, की त्यांनी महिला पोलिसांशी असभ्य वर्तन केलं. या प्रकाराची गंभीर दखल पोलीस खात्यानं घेतलेय. पोलिसांच्या दोन एसएलआर रायफल आणि एक पिस्तुल गायब असल्यानं त्याचाही तपास सुरू आहे.
दरम्यान, या हिंसाचारप्रकरणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. ही धुमश्चक्री घडवून आणल्याचा त्यांचा संशय आहे आणि पडद्यामागच्या सूत्रधारांना अटक व्हावी, अशी मागणी ते करत आहेत. पुणे स्फोटांपाठोपाठ झालेल्या या हिंसाचारामुळे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर विरोधकांच्या रडारवर आहेत.
No comments:
Post a Comment