Total Pageviews

Monday 13 August 2012

MUMBAI VIOLENCE TARUN BHARAT EDITORIAL

 
इस्रायलसोबत मैत्रीचा करार केला तेव्हा याच संघटनेने तीव्र विरोध केला होता. मोर्चे काढले होते. मुंबईत ताज हॉटेलसोबतच ज्यू लोकांचे केंद्र असलेल्या छाबाद हाऊसवर कसाब आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्यानंतर, याच अकादमीच्या काही लोकांनी सध्या पकडला गेलेला अबु जुंदाल याला मुंबईची माहिती पुरविली होती, असा संशय त्यावेळी मुंबई पोलिसांनी व्यक्त केला होता. अशा संघटनेला मोर्चासाठी परवानगी देताना शासनाने जुना इतिहास नजरेखालून का घातला नाही?मुंबईमध्ये वर्षानुवर्षांपासून जावई बनून असलेले हजारो बांगलादेशी घुसखोर आणि त्यांच्या राष्ट्रद्रोही समर्थकांनी शनिवारी मुंबईतील आझाद मैदान आणि नंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या आत-बाहेर जी जाळपोळ आणि हिंसाचार माजविला तो पूर्वनियोजित कट असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने मुंबई पेटविण्याचेच मनसुबे आखण्यात आले होते, हे आता स्पष्ट झाले आहे. हिंसाचार माजविणार्‍यांपैकी ज्या २३ लोकांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यांनीच काही लोक मुंबईबाहेरून मागविण्यात आले होते, अशी कबुली दिली आहे. आज या २३ जणांना न्यायालयात उपस्थित करताना, पोलिसांनी जी कागदपत्रे सादर केली, त्यात या मुद्याचा आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे. ही बाब पोलिसांनीच उघड केल्यामुळे शनिवारच्या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. आता मुंबईला पेटविण्याच्या या कटात कोणकोण सहभागी होते, याचा शोध प्रामाणिकपणे पोलिसांनी केला पाहिजे आणि सत्य जनतेसमोर मांडले पाहिजे. या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिसांचा गुप्तवार्ता विभाग पूर्णपणे अपयशी ठरला, हेही लपून राहिलेले नाही. पोलिसांनी न्यायालयात जे सांगितले आहे, ते भयंकर आहे. आरोपींनी पोलिसांच्या दोन सेल्फ लोडिंग रायफल्स (एसएलआर) आणि एक पिस्तूल हिसकावून नेले. जाळपोळ करण्यासाठी सोबत ज्वालाग्राही पदार्थ आणले होते. या जाळपोळीसाठी आरोपींनी पेट्रोल बॉम्बचा वापर केला. काही जणांनी आपल्यासोबत पिशव्यांमधून दगड आणले होते. अनेकांजवळ लाठ्याकाठ्या होत्या. या सर्व माहितीचे अवलोकन केल्यास हे राष्ट्रद्रोही लोक किती तयारीने आले होते, याचा अदमास यावा. पण, या तयारीची माहिती स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी तुलना होणार्‍या मुंबई पोलिसांना का कळली नाही, हे एक गूढच आहे. तपासात असेही आढळून आले आहे की, या मोर्चाला परवानगी द्यावी, आझाद मैदानावर जमण्याची अनुमती द्यावी, अशी शिफारस कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी केली होती. हे नेते कोण, याचाही शोध घेऊन त्यांची नावे आणि त्यांच्या गेल्या १५ दिवसांच्या कारवाया याचीही माहिती पोलिसांनी जनतेला दिली पाहिजे. कारण, या मोर्चाच्या तयारीसाठी ज्या बैठका झाल्या, त्या बैठकांना हे नेते उपस्थित होते. यात समाजवादी पक्षाचेही काही नेते होते. एसएमएस संपूर्ण मुंंबईभर वाजत होते. पोलिसांना या सर्व बाबी आता एवढी मोठी घटना झाल्यानंतर कळली, असेही नाही. या सर्व बाबींची कल्पना पोलिसांना होती अशी कबुली मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांनी स्वत: दिली आहे. मग, ही सर्व माहिती कुणाच्या आदेशाने दडवून ठेवण्यात आली होती? आपले गुणवान गृहमंत्री आर. आर. पाटील याबाबत बोलायला तयार नाहीत. त्यांनी फक्त शांतता राखा, एवढे एका ओळीचे आवाहन तेवढे केले आहे. बाकी सारी माहिती देण्याची जबाबदारी त्यांनी पोलिसांवर ढकलून दिली आहे. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. स्वातंत्र्यदिन अवघ्या चार दिवसांवर आहे. अतिरेकी संघटना पुन्हा डोके वर काढू शकतात, असे संकेत दिल्लीहून गुप्तवार्ता विभागांनी दिले होते. असे असताना, या मोर्चाला परवानगी दिलीच कशी गेली, हा प्रश्‍न आता येथे उपस्थित झाला आहे. अण्णा हजारेंनी आझाद मैदान काही दिवसांसाठी उपोषणासाठी मागितले असता, त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली परवानगी नाकारण्यात आली होती. मग या कुणा रझा अकादमीला आझाद मैदान आणि मोर्चा काढण्याची परवानगी कुणाच्या सांगण्यावरून देण्यात आली? परवानगी दिली नाही तर आपल्याला विशिष्ट समुदाय (बांगलादेशी घुसखोरांसह) मते देणार नाही, या भीतिपोटी ती देण्यात आली होती काय, असा प्रश्‍न येथे उपस्थित होतो. म्हणूनच या संपूर्ण हिंसाचाराची न्यायालयीन चौकशीच झाली पाहिजे. तेव्हाच या प्रकरणातील सारी तथ्ये बाहेर येतील.ज्या रझा अकादमीला मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात आली, ती संघटना १९७८ साली स्थापन झाली आहे. सुन्नी पंथीयांचे हे संघटन आहे. सुफी साहित्याचा प्रचार-प्रसार करण्याच्या नावाखाली एक सांस्कृतिक संघटना म्हणून तिचे स्वरूप असल्याचे सांगितले गेले. पण, या घटनेनंतर मात्र या संघटनेच्या आडून काही देशद्रोही लोक आपल्या नापाक कारवाया करीत असल्याची शंका पोलिसांनीच उपस्थित केली आहे. एका बाबीचा उल्लेख येथे करावा लागेल. भारताने इस्रायलसोबत मैत्रीचा करार केला तेव्हा याच संघटनेने तीव्र विरोध केला होता. मोर्चे काढले होते. मुंबईत ताज हॉटेलसोबतच ज्यू लोकांचे केंद्र असलेल्या छाबाद हाऊसवर कसाब आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्यानंतर हीच याच अकादमीच्या काही लोकांनी सध्या पकडला गेलेला अबु जुंदाल याला मुंबईची माहिती पुरविली होती, असा संशय त्यावेळी मुंबई पोलिसांनी व्यक्त केला होता. अशा संघटनेला मोर्चासाठी परवानगी देताना शासनाने जुना इतिहास नजरेखालून का घातला नाही? असे एक ना अनेक प्रश्‍न या हिंसाचाराच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. आता रझा अकादमी म्हणते, हल्लेखोरांमध्ये आमचे लोक नव्हते. हे तर ते कालही सांगू शकले असते. पण, आज पोलिसांनी जेव्हा सांगितले की, हिंसाचारात झालेल्या नुकसानीची भरपाई आयोजक संघटनेकडून करण्यात येईल, तेव्हा अकादमीचे तोंड उघडेल. पण, शासनाने या अकादमीला कोणतीही दयामाया दाखविता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन केले पाहिजे.मुंबईत बांगलादेशी घुसखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पण, या लोकांना शोधून काढण्यासाठी सरकारने कोणताही प्रयत्न केलेला नाही. केवळ या राष्ट्रद्रोही लोकांंच्या गठ्ठा मतांसाठी ही लाचारी सुरू आहे. त्यात भरडले जात आहेत ते मुंबईकर. या हल्लेखोरांना दुपारपासून रात्रीपर्यंत दक्षिण मुंबईला अक्षरश: वेठीस धरले होते. लोकल गाड्यांवर दगडफेक केल्यामुळे सुमारे १०० फेर्‍या रद्द कराव्या लागल्या. बेस्टच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली. ४० बसेसचे नुकसान झाले. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यात ४५ पोलिस जखमी झाले. एवढेच नव्हे, तर पोलिस उपायुक्त (वायरलेस) यांच्या कारच्याही काचा फोडण्यात आल्या. वृत्तवाहिन्यांच्या वाहनांना आगी लावण्यात आल्या. पत्रकार, छायाचित्रकारांना आपला जीव वाचवून पळून जावे लागले. पोलिसांची वाहने आडवी पाडून ती पेटवण्यात आली. एवढे सर्व होऊनही पोलिसांनी गोळीबार मात्र केला नाही. सर्वात संतापजनक बाब म्हणजे, ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसांना ४०-५० जणांच्या घोळक्याने वेढा घालून त्यांचा विनयभंग केला. कुठे आहेत स्त्रीवादी खा. सुप्रियाताई सुळे? कुठे आहेत ते बोलघेवडे गृहमंत्री? तुमच्या खात्यातील महिलांच्या इज्जतीवर देशद्रोही लोक घाला घालत असताना, हे मंत्री, खासदार चूप बसतातच कसे? की राज्यात सर्वत्र नाटक सुरू आहे? आता पोलिस आयुक्त अरूप पटनायक यांनी एक काम केले पाहिजे. पटनायक नागपुरात पो. उपायुक्त असताना केवळ एका आरोपीला पकडण्यासाठी पटनायक यांनी २००-३०० पोलिसांकरवी नागपुरातील संपूर्ण नई बस्तीवर रात्री हल्ला केला होता. आता या हिंसाचारात सहभागी असलेल्या लोकांना पकडण्यासाठी त्यांनी प्रत्येक संशयित मोहोल्ला हुडकून काढावा आणि आपल्या मर्दुमकीची चुणूक दाखवून द्यावी. गृहमंत्री यांना थोडी जरी लाजलज्जा असेल, तर त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा देऊन पापक्षालन केले पाहिजे

No comments:

Post a Comment