Total Pageviews

Thursday, 30 August 2012

दारूचा राजकीय धिंगाणा -हजार रुपये भरा आणि हवी तेवढी दारू प्या
पुणे शहरातल्या एका रिसॉर्टमध्ये नववी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या शेकडो मुलांची दारू पार्टी झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चुलत भावाच्या मालकीच्या या रिसॉर्टमध्ये असे काही घडणे हा काही योगायोग असू शकत नाही. गेल्या काही दिवसांत शालेय मुलांच्या दारू पाटर्य़ाबद्दल जी माहिती बाहेर येत आहे, ती कुणाचाही मेंदू सुन्न करणारी आहे. दुपारी एक ते सायंकाळी सात ही वेळ पंचतारांकित हॉटेलांसाठी कमी गर्दीची असते. अशा वेळांत विद्यार्थ्यांना आकृष्ट करणाऱ्या कल्पना जाहीर केल्याजातात आणि त्यांना दारू पिण्याची सवय लावली जाते.

हजार रुपये भरा आणि हवी तेवढी दारू प्या अशी या कल्पनेची जाहिरात केली जाते. कितीही दारू पिण्यावर बंधन नसले, तरी दारू प्यायल्यानंतर स्वच्छतागृहात जाण्यास मात्र बंदी असते. ‘ब्लॅडर फुल अशी या पार्टीची जाहिरात असते आणि पुण्यातल्या नामांकित पंचतारांकित हॉटेलांमध्ये किंवा रिसॉर्टमध्ये त्यांचे आयोजन केले जाते. पोलिसांना अशा घटनांची माहिती नसेल, तर ते नेमके कोणते काम करतात, असा प्रश्न विचारावा लागेल. पुण्याप्रमाणेच राज्यातील अनेक शहरांमध्ये अशा पाटर्य़ा सुखेनैव सुरू असण्याची शक्यता आहे. त्यांच्या आयोजकांवर आणि जागेच्या मालकांवर आजवर कोणतीही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. याचा अर्थ पोलिसांच्या मदतीने असला धिंगाणा सुरू आहे, असाच होतो. रेव्ह पाटर्य़ाचे जे पेव फुटले आहे, त्याला आळा घालण्याचे दिखाऊ काम करणाऱ्या पोलिसांना दिवसाढवळय़ा मोठमोठय़ा हॉटेलांमध्ये दारूचे पाट वाहत असलेले कसे दिसत नाहीत? शाळेतल्या मुलांच्या खिशात असे हजार रुपये देणारे पालक याला जबाबदार आहेत, असे म्हणून संयोजकांची जबाबदारी संपत नाही. कायद्याने विशिष्ट वयापर्यंत दारूचे सेवन करण्यास बंदी आहे. परंतु ही बंदी झुगारण्याएवढे संयोजकांचे हात लांब आहेत. कुणाचे आडनावच पवार आहे, तर कुणाचे थेट पोलिसांशीच लागेबांधे आहेत. त्यामुळे आपल्याला कोण हात लावणार, अशा विश्वासपूर्ण माजात ही मंडळी वावरत असतात. आपण समाजात काय पेरतो आहोत, याचे भान ठेवणाऱ्या या पाटर्य़ाच्या आयोजकांबरोबरच या शाळकरी मुलांवर जराही नजर ठेवणाऱ्या त्यांच्या पालकांनी या गोष्टीचे गांभीर्य समजून घेण्याची खरोखरच गरज आहे. मुलांना खूश ठेवण्यासाठी त्यांचे खिसे पैशांनी भरायचे, ही कल्पना त्यांचे बालपण करपवणारी आहे. आपली शाळकरी मुले दारू पितात, याचे जराही वैषम्य वाटणारी मंडळी संख्येने थोडी आहेत. परंतु आपल्या नकळत दारू ढोसणाऱ्या मुलांकडे लक्ष द्यायलाच वेळ नसणारी पालक मंडळी अधिक संख्येने आहेत. अशा सामाजिक परिस्थितीत अन्य घटकांनी आपली जबाबदारी ओळखणे अधिक आवश्यक असते. व्यवसायातील किमान मूल्ये पायदळी तुडवून आपण पिढीच्या पिढी बरबाद करीत आहोत, याची जाणीव नसलेले हॉटेल मालक आणि त्यांच्यावर कोणताही धाक ठेवणारी पोलीस यंत्रणा यामुळे हैराण झालेल्या पालकांवर आता सैरभैर होण्याची वेळ आली आहे. शाळांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवायला हवे, पालकांनी त्यांच्यावर नजर ठेवायला हवी, हे खरेच आहे; परंतु स्वार्थासाठी हॉटेल मालकांनी शहरांमध्ये सुरू असलेला हा धिंगाणा तातडीने थांबवण्याची आवश्यकता आहे.Comments   
क्लींक the ग्लास चिअर्स & कीप वाकिंग बट विसरू नोक्का घड्याळQuote
 
बातमी वाचून दूरदर्शन वरील दृश्ये पाहून डोके सुन्न झाले. या प्रकरणात अनेक जन दोषी असतील .अगदी हॉटेल मालक ,हॉटेल चालवायला देणारे ,पोलीस वगैरे पण सगळ्यात मोठा दोष कोणाचा असेल तर तो त्या कोवळ्या मुलांच्या पालकाचा .तो त्यांच्या पदरात घालायलाच हवा. एव्हढी मोठी रक्कम मुले कोठून आणतात .याचा शोध पालकाच घेऊ शकतात. या सर्व मुलांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी .त्यांना कमीतकमी आठवड्य्तून एकदा तरी पोलीस स्टेशनवर हजेरी लावायला भाग पडता येईल.श्रीनिवास जोशीQuote

+2 #4 बंसीधर कुलकर्णी 2012-08-30 03:01 ह्या टग्यांच्या राज्यात दुसरी कसली अपेक्षा करणार. ह्या असल्या अल्प वयीन मुलांच्या धीन्गाण्यातून राष्ट्रवादी आपल्यासाठी भावी टगे कार्यकर्तेच जमा करत आहे. पुढे गुंडगिरी करायला असले टगे उपयोगी पडतात. हि असली लोकशाही भारतात अस्तित्वात आहे. ह्यातून सुटका पाहिजे तर ह्या हिंदुस्तानचे असंख्य तुकडे होणे जरूरीचे आहे. ह्या गोंधळात सामील होणारी पोरे कोणाची असतील हे काही सागायला नको. राष्ट्रवादीचेच टगे कार्यकर्त्यांची हि मुले असणार ह्यात शंका नाही. त्याशिवाय पोरांना फुकटचा पैसा एवढ्या सुलभतेने कसा उपलब्ध होतो उघड रित्या मदिरा-मदिराक्षी कसे सामील होतात. ह्या पुढील प्रकार सुद्धा झाले असणार पण पोलिसांच्या मेहेरबानीने सर्व सत्तेच्या गादीखाली सरकवून लपवले आहे. धन्य ते राज्य राज्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते.Quote

+1 #3 Pranav 2012-08-30 02:39 यांच्यावर काही कारवाई होणार नाही. राजकीय पक्ष असल्याने बातमी दाबली जाणार. पोलीस काही करू शकत नाहीत. त्या पालकांना लाज वाटत नाही का ते त्यांच्या मुलामुलींना समजवू शकत नाहीत. दोन थप्पड द्यायला शिका पालकहो. कडक कारवाई तुम्ही करा .. प्रत्येकवेळी पोलीस तरी काय करणार ?Quote

+1 #2 madhavtembe 2012-08-30 01:33 Hey Ram!
Quote
+2 #1 उमेश बोरकर 2012-08-29 22:03 जेव्हा ठाकरे यांच्या मुलाच्या बारमध्ये हे घडले तेव्हा पवारांच्या वृत्तपत्रात बातमी नावानिशी छापून आली होती. या प्रकरणात ही बातमी त्यांच्या वृत्तपत्रात अक्षरश: ढोबळपणे छापून आली होती. ७००-८०० मुलांची पार्टी आपल्या हॉटेलात काय बटाटेवडे खाण्यासाठी जमली असा पवारांचा गैरसमज आहे काय?

No comments:

Post a Comment