Total Pageviews

Monday, 13 August 2012

MUMBAI VIOLENCE - TARUN BHARAT

 
या हैदोसाबाबत दातखीळ का?-
दिलीप धारुरकर मुंबईत आझाद मैदानावर शनिवारी जे घडले तो बेशरमपणा होता. देशद्रोह्यांचा उर्मट हैदोस होता. या देशाचा कायदा, सुव्यवस्था, प्रशासन, प्रसार माध्यमे यांना धाब्यावर बसवून हैदोस घालत दहशत निर्माण करण्याचा हिंसक मुस्लिम गुंडांचा तो एक निर्लज्ज आणि उद्दाम प्रयत्न होता. या देशद्रोही गुंडांनी लावलेल्या आगीत ज्यांना चटके बसले त्या माध्यमांनी आणि तथाकथित सेक्युलॅरिस्टांनी मिठाची गुळणी धरली असली, तरी हा अनिर्बंध हैदोस घालणारे कोण हे सगळ्या भारतीयांना ताबडतोब समजले. अन्य कोणी हा प्रकार केला असता, तर त्याच्याशी नाही नाही त्या संघटनांची नावे जोडून बंदी घालण्याची मागणी करणार्‍या उपटसुंभांची अगदी अहमहमिकेने गर्दी झाली असती. काही संबंध नसला तरी देशभक्त संघटनांना लगेच दहशतवादी ठरवून किंचाळण्यासाठी युवराजापासून ते शागीर्दापर्यंत अगदी शर्यत लागली असती. पण मुंबईत जो अनिर्बंध गोंधळ घातला गेला, तो रजा अकादमीच्या मोर्चात जमलेल्या मुस्लिम गुंडांनी घातला. त्यामुळे सगळ्यांचीच दातखीळ बसली. सरकारतर्फे, प्रशासनातर्फे कोणीही बराच वेळहाताची घडी तोंडावर बोट ठेवून’नो कॉमेंट्‌सअसे म्हणत होते. ज्यांच्या ओबी व्हॅन जळाल्या त्या दूरचित्रवाणीवरच्या वृत्तवाहिन्या हा प्रकार कोणी केला, ते स्पष्ट सांगायला तयार नव्हते. फक्त आसाममधल्या दंगलींचा निषेध करण्यासाठी निघालेल्या मोर्चातील काही जमाव अचानक हिंसक झाला आणि त्यांनी वाहनांची प्रचंड तोडफोड केली. माध्यमांच्या ओबी व्हॅनला आग लावली, असे सांगितले जात होते. पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, हवेत गोळीबार केला असे सांगितले जात होते. मात्र, हा प्रकार करणारे नेमके कोण होते हे सांगितले जात नव्हते. दोन तासांनी एका मराठी वृत्तवाहिनीचा मुखभंग झाला आणि त्यांनी रजा अकादमीने हा मोर्चा काढला होता, हे सांगितले.
पार्श्‍वभागाला चटके बसले तरी पार्श्‍वभाग झाकून गप्पगार बसण्याचा हा भेकडभेकडपणा कशाकरिता? अज्ञात लोकांनी गोंधळ केला, त्यात आमच्या ओेबी व्हॅन जाळल्या असे मोघम भाषेत बातम्या सांगण्याची दांभिकता कशाकरिता? कायदा हातात घेऊन उर्मटपणे विनाकारण मुंबईची शांतता वेठीस धरून हैदोस घालणार्‍यांचा निःसंधिग्ध शब्दात निषेध करण्यास सरकार, कॉंग्रेस, प्रशासन आणि चटके बसलेली प्रसारमाध्यमे यापैकी कोणीच पुढे का झाले नाही? यांच्या तोंडाला कसले कुलूप बसले? एरवी अभिव्यक्ती, लोकशाही, धर्मनिरपेक्षता असे शब्द किंचाळत ऊर बडविणारे तथाकथित सेक्युलॅरिस्ट कोठे वाळूत चोच खुपसून बसले होते? गुजरातमधील दंगली होऊन दोन निवडणुका झाल्यानंतरही अजून विनाकारण नरेंद्र मोदींना आणि हिंदूंना बदनाम करत मातम करणारे आता आसाममध्ये बोडोंवर घुसखोर देशद्रोह्यांनी केलेल्या अनन्वित अत्याचाराबाबत, मुंबईत कायदा, सभ्यता, देशभक्ती पायाखाली तुडवीत घातलेल्या उर्मट नंग्या नाचाबाबत वाचा हरवल्यासारखे का गप्प बसले आहेत? अल्पसंख्यक या नावाखाली कोणी नंगा नाच घातला अगदी यांच्या पार्श्‍वभागाला चटके बसले तरी तोंडातून एक अवाक्षरही काढायचे नाही, असे व्रत या लोकांनी घेतले आहे की काय?
आसाममध्ये बांगला घुसखोरांनी प्रत्येक मतदारसंघात आपली संख्या इतकी वाढविली आहे की त्यांच्या मतांचा गठ्ठा राजकीय लोकांची तोंडे गप्प करतो आहे. या घुसखोरांनी कोकराझार आणि तीन जिल्ह्यांत आधी बोडोंवर प्रचंड हल्ले केले. जिवानिशी मारण्यापर्यंत आणि ओळखू येण्याइतके बोडो तरुणांचे हाल करून मारण्याइतपत यांची मजल गेली. त्यांची प्रतिक्रिया बोडो जमातीतून उमटताच आणि त्या क्रोधमय प्रतिकारात काही घुसखोर, देशद्रोही, मुस्लिम गुंड मारले जाताच आता त्यांच्या नावाने उर बडविणे मात्र सुरू झाले आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, सोनिया गांधी अशा सर्वांना आता अचानक आसाममधल्या हिंसाचाराबाबत चिंता वाटू लागली आहे. त्यांना वाटणारी ही चिंता आसाममधील हिंसाचाराबाबत नाही, आधी तेथे हिंसाचारात बळी पडलेल्या बिचार्‍या बोडो जमातीतील नागरिकांबद्दल तर मुळीच नाही. ही चिंता आसाममध्ये बेकायदेशीररीत्या घुसून मतदार याद्यांमध्ये स्थान मिळवून जमलेल्या गठ्ठा मतांची आहे. ही मते मिळाली नाहीत तर आसाममधील सत्ता आणि तेथून निवडून येणार्‍या लोकसभेच्या जागा हिरावून जाण्याच्या भीतीने ही चिंता जास्त आहे. त्यामुळेच या बड्या धेंडांना आता आसामची वाट दिसू लागली आहे.
बांगला देशातून घुसलेले आणि आसाममध्ये मतदार याद्यांमध्ये नाव घुसवून ऐसपैस स्थान मिळविणारे किती आहेत? मतदानाइतके ज्यांचे वय आहे आणि ज्यांनी नाना लटपटी करून मतदानाचा हक्क मिळविला आहे अशा संशयास्पद घुसखोरांची न्यायालयात सांगितली गेलेली संख्या आहे चाळीस लाख! जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात जायला पासपोर्ट लागतो, व्हिसा लागतो. त्याची मुदत संपल्यानंतर तिथे राहिल्यास तेथील सरकार बखोट धरून त्यांच्या सीमेबाहेर हाकलून देते किंवा तेथील तुरुंगात खितपत पडावे लागते. भारत हा एकमेव देश असेल की जेथेबेकायदेशीररीत्या घुसलेल्या लोकांना हाकला’ अशी मागणी करत विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागते. तरीही सरकार त्यांना बाहेर काढत नाही. आसाममधील या चाळीस लाख संशयास्पद घुसखोर मतदारांना मतदारयादीतून वगळावे यासाठीआसाम पब्लिक वर्क्स’ या संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत जाब विचारला आणिया घुसखोरांची नावे वगळता येतील काय?’ असे सरकारला विचारले. न्यायालयाच्या या प्रश्‍नाला सरकारतर्फे दिलेले उत्तर या देशातील बहुसंख्य लोकांनी विचार करावे असे आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, ‘या चाळीस लाख लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्याची मागणी हिंदुस्थानच्या धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी बंधांना छेद देणारी आहे, त्यामुळे ही नावे वगळता येणार नाहीत.’ आता यामुळे जगात एक डंकाच पिटला जाणार आहे की, ‘अल्पसंख्यकांनो या हिंदुस्थानात केव्हाही या कसेही घुसा येथे काहीही करा आणि मतदार यादीत नाव घाला. तुमचे नाव वगळले जाणार नाही कारण हा धर्मनिरपेक्ष देश आहे.’सरकारच स्वतः जेव्हा अशा देशद्रोही, चुकीच्या गोष्टींना पाठबळ देते तेव्हा देशद्रोही गुंडांचे धाडस वाढत असते. नंगानाच घालण्याची प्रवृत्ती मगरूर होऊन आणखी बेबंद वागू लागते. तिकडे आसाममध्ये बेकायदेशीर, गुन्हेगारी, देशद्रोही घुसखोरांना सरकारने न्यायालयात शपथपत्र देऊन अभय देणारी भूमिका मांडताच मुंबईतील त्याचे पाठीराखे रान मोकळे असल्यासारखे मदमस्त झाले. आसाममध्ये या उद्दाम घुसखोरांनी बोडोंवर जे अनन्वित अत्याचार केले त्याबाबत अवाक्षरही बोलता, त्याची जबरदस्त प्रतिक्रिया उमटून या घुसखोरांना जो सपाटून मार बसला तेवढाच विषय घेऊन त्यांच्या सहानुभूतीकरता मुंबईत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला परवानगी कोणी दिली? या मोर्चात किती लोक येणार याचा सुगावा पोलिसांना कसा काय लागला नाही? मोर्चा निघाला तेव्हा या मोर्चातील गुंडांना मोकळीक कशी काय दिली गेली? या प्रश्‍नांची उत्तरे कोणी विचारणार नाही आणि कोणी देणारही नाही. ढोंगी, पराभूत, गुडघे टेकणार्‍या दांभिक धर्मनिरपेक्षतेमध्ये या प्रश्‍नांची उत्तरे दडलेली आहेत. आझाद मैदानावर या जमलेल्या पन्नास हजार लोकांच्या गर्दीने गुंड, देशद्रोही, बेकायदेशीर, गुन्हेगारी उपटसुंभांना एक धाडस प्राप्त झाले. ते लगेच हातात येईल त्या वस्तू घेऊन समोर दिसेल त्या वाहनांवर हल्ले करू लागले. दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या ओबी व्हॅनही या राक्षसांच्या तावडीतून सुटल्या नाहीत. मुंबईत मोक्याच्या ठिकाणी ही दंगलच जणू सुरू झाली. शेवटी पोलिसांना लाठीमार, अश्रुधूर आणि हवेत गोळीबार असे उपाय करावे लागले. हिंसाचारात ४०-४५ पोलिसही जखमी झाले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
इतके घडल्यावरही सरकारी मंत्री, तथाकथित ढोंगी सेक्युलर लोक आणि सेक्युलॅरिझमचा प्रभाव असलेली प्रसारमाध्यमे जे घडले ते स्पष्ट शब्दात लोकांसमोर आणावयास तयार नव्हती. जे वाईट, बेकायदेशीर, विध्वंसक त्याचा निःसंदिग्ध शब्दात निषेध करावयास तयार नव्हती. आसामच्या घटनाक्रमात बोडोंवर झालेल्या हल्ल्यांबाबत असेच सर्वजण मूग गिळून गप्प आहेत. गुजरातमधील दंगलींच्या घटनाक्रमातील मूळ घटना गोध्रा येथे रामसेवकांना जिवंत जाळण्याची जी घटना घडली त्याबाबत तेव्हाही आणि आताही निषेधाचे एक अक्षरही काढण्यास कोणी तयार नव्हते. आता मुंबईतील घटनेबाबतहीअज्ञात जमावाने दंगल केली’, ‘एक मोर्चा निघाला होता’, ‘काही लोक हिंसक झाले’ असे मोघम शब्दप्रयोग वापरले जात आहेत. सरकार, प्रशासन हे या प्रकाराबाबतनो कॉमेंट्‌स’ असे म्हणत आहे, महाराष्ट्राचे गृहमंत्री लोकांनाअफवांवर विश्‍वास ठेवण्याचे, शांत राहण्याचे’ आवाहन करत आहेत. हिंसेचा, हिंसा करणार्‍या उद्दाम देशद्रोह्यांचा निषेध करण्याची कोणाची हिंमत नाही, त्यांना अटक करून कठोर शासन करण्याची तर यांची शामतच नाही. तमाम ढोंगी सेक्युलॅरिस्ट, तमाम अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, तमाम तथाकथित पुरोगामी आता सेक्युलॅरिझमच्या दाभणाने तोंडे शिवून गप्प!
पण आता लोक शहाणे झाले आहेत. मोघम भाषा वापरल्या तरी त्यांना घटना कोणी आणि का घडविली याचा अंदाज येतो. राजकारणी गुडघे टेकवत आहेत याचा अर्थ काय हे त्यांना कळते. पंतप्रधान, सोनिया गांधी, गृहमंत्री यांना कधी काश्मीरमधून जीव मुठीत घेऊन पळत निर्वासित झालेल्या पंडितांना भेटायला वेळ नसतो, गोध्रात जळालेल्या रामसेवकांच्या घटनास्थळाला भेट देण्याची हिंमत नसते. मात्र, आसाममध्ये तातडीने जावे असे वाटते, जाणार अशा बातम्या वारंवार प्रसिद्ध होऊ लागतात, मुंबईतील दंगेखोरांबाबत निषेधाच्या शब्दाऐवजी शांततेचे पोकळ आवाहन केले जाते तेव्हाच लोकांच्या लक्षात येेते की घटनेचे मर्म काय आहे! फक्त आता लोकांनी हे समजून गप्प बसता आपली मते परखडपणे मांडण्यास सुरुवात केली पाहिजे. मतदानाच्या वेळी तरी या सगळ्याचा हिशोब करून मतदान करण्यास ज्या क्षणी लोक सुरुवात करतील त्या क्षणी या लोकांची धर्मनिरपेक्षतेची धुंदी खाडकन् उतरेल आणि यांना देशभक्तीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. फक्त लोकांनी ती स्थिती लवकर आणली पाहिजे! ती स्थिती आणण्याची वेळ आता आली आहे!
 
 
 

No comments:

Post a Comment