Total Pageviews

Tuesday, 21 August 2012

हे अतिवरिष्ठ ‘मियॉं’ कोण? सामना अग्रलेख

आझाद मैदानातील दंगलखोर राष्ट्रद्रोह्यांना वाचविण्यासाठी दिल्लीतील कोणत्या अतिवरिष्ठमियॉं’चा दबाव आहे तेवढे जाहीर करा.
हे अतिवरिष्ठमियॉं’ कोण? सामना अग्रलेख
आमच्या देशात कायदा आहे काय आणि असलाच तर तो कोणासाठी? असा प्रश्‍न नेहमीच पडतो. आझाद मैदानात मुस्लिम दंगलखोरांकडून पोलिसांनी मार खाल्ला. त्यांच्या जखमा इतक्यात भरल्या जाणार नाहीत. हिंदू तसा नेहमीच मार खात असतो, पण वर्दीतला पोलीसही मार खाऊ लागला तर देशाचे कसे व्हायचे ही चिंता आज आम्हाला सतावत आहे. अर्थात या देशातील राज्यकर्त्या जमातीस त्याची फिकीर आहे काय ही शंकाच आहे. आता अशी बातमी आली आहे की, आझाद मैदान दंगलखोरांबाबत पोलिसांनी कठोर कारवाई करायचे ठरवले आहे, पण त्याबाबत त्यांचा तपास अभ्यास सुरू आहे. हा अभ्यास संपल्यावर म्हणे पोलीस राष्ट्रद्रोही आरोपींवर हात टाकणार आहेत. पोलिसांचे असे म्हणणे आहे की, पाच मौलवींची भाषणे जहाल झाली, त्यांचे जबाब वगैरे नोंदवून घेण्याचे काम सुरू आहे. या
पाचही मौलवींविरुद्ध अतिवरिष्ठांकडून मंजुरी मिळाल्यानंतरच कारवाई केली जाईल. वास्तविक, या दंगलखोर मोर्चासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी सढळहस्ते आर्थिक मदत केल्याचे उघड झाले आहे. ‘सातारी’ पृथ्वीराज चव्हाणांना आमचा असा सवाल आहे की, आता तुमची दातखिळी का बसली आहे? राजकारणात राष्ट्रवादीच्या भ्रष्ट मंत्र्यांना पिळून त्यांचे चिपाड करण्याची मोहीम चांगली आहे, पण हा झाला तुमच्या राजकीय मतलबाचा, खुर्ची टिकवण्याचा भाग. प्रश्‍न इतकाच आहे की, देशाच्या मुळावर येणारी हिरवी अवलाद तुमच्याच मांडीवर बसून फूत्कार सोडीत असताना तुमचा तो ताठरपणा गेला कुठे? डोक्यावर मुसलमानी टोप्या घालून कृपाशंकरच्या मांडीस मांडी लावून बसता. दावते रोजे, इफ्तारच्या पार्ट्यांत गुडगे मोडून बसता. जणू काही या राज्यात दुसरा कोणता सण साजरा होत नाही, धार्मिक उत्सव होत नाही. मुख्यमंत्री व गृहमंत्री किती ‘दहीहंडी’ उत्सवांना सलामी देतात आणि किती गुढीपाडवा किंवा दसर्‍याच्या हिंदू शोभायात्रेत सहभागी होतात? एकाही नाही. कारण तेथे गेल्याने
त्यांच्या निधर्मीपणाची सुंता होते
व मुसलमानी व्होट बँकेस धक्का बसतो ना! सांगलीत हिंदुत्ववादी संभाजी भिडे व त्यांच्या सहकार्‍यांना गुरासारखे बडवून काढणारे कृष्णप्रकाशसारखे पोलीस अधिकारी सध्या मुंबईत आहेत परंतु मुस्लिम दंगलखोरांच्या बाबतीत त्यांच्यातला हा लढाऊ बाणा मोडून पडला होता. अर्थात हा कोळसा उगाळायचा तरी किती वेळा? केंद्रातला लाखो कोटींचा कोळसा घोटाळाही मागे पडेल असा हा कोळसा महाराष्ट्र सरकारने व त्यांच्या पोलिसांनी स्वत:च्या थोबाडास फासून घेतला आहे. हिंदूंवर कारवाई करताना पोलिसांना अभ्यास करावा लागत नाही, अतिवरिष्ठांची परवानगी घ्यावी लागत नाही. उदरांच्या पिलांना पकडावे तसे पकडून आत टाकले जाते. ‘माय नेम इज खान’च्या आंदोलनाच्या वेळी काय घडले होते? पाकप्रेमाची पोपटपंची करणार्‍या खानाविरुद्ध शिवसैनिकांनी राष्ट्रप्रेमाचा एल्गार पेटवताच या पोलिसांनी त्यांना निर्घृणपणे मारहाण करून तासाभरात गुन्हे दाखल केले होते. तेव्हाचे त्यांचे अतिवरिष्ठ मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे म्हणे तसे आदेश होते. मग सध्याचे अतिवरिष्ठ पृथ्वीराजबाबा मुस्लिम धर्मांधांच्या बाबतीत शक्तिपात झाल्यासारखे का बसलेत? की त्यांना दिल्लीच्या अतिवरिष्ठांकडून ‘शिलाजीत’ मिळाले नाही? कारणे काहीही असू द्या, पण महाराष्ट्रातला हिंदू इतका निष्प्रभ व पोलीस इतके असहाय्य कधीच झाले नव्हते. परवानग्यांची मांजरे फक्त मुसलमानांच्या बाबतीत का आडवी येतात व या मांजरांना दूध कोण पाजीत आहे? बरे, तुमच्या त्या परवानग्या मिळूनही अतिरेक्यांना वाचविण्याचे उद्योग सुरूच आहेत ना?
अफझल गुरूस फासावर लटकवा असा आदेश देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने देऊनही परवानगीचे मांजर राष्ट्रपती भवनात उंदीर खाण्याचे काम करीतच आहे. म्हणजे कारवाईसाठी परवानग्या फक्त धर्मांध मुस्लिमांच्या बाबतीत आणि हिंदूंच्या बाबतीत मात्र कायद्याची केव्हाच धर्मशाळा झाली आहे. कधीही कुणाला कसेही आत टाका, आत टाकले म्हणून तो पोलिसांवर हल्ले करीत नाही की मंत्रालयात घुसून मुख्यमंत्र्यांच्या छाताडावर बसत नाही. जामा मशिदीच्या इमामाने पाकिस्तानकडे तोंड करून इतक्या वेळा धर्मांध फूत्कार सोडले, त्याचे कोणी काय वाकडे केले? तुरुंगातील अतिरेक्यांना बिर्याणीची ताटे लष्करी जवानांना न्यायला लावणारे, ‘२६/११’ सारखा दहशतवादी हल्ला करणार्‍या अजमल कसाबला मटण बिर्याणी खिलवून त्याच्या जिभेचे चोचले पुरविणारे आणि साध्वी प्रज्ञासारख्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या मागण्याही धुडकावून लावणारे राज्यकर्ते सध्या सत्तेत बसले आहेत. म्हणूनचमुस्लिमांना साथ आणि हिंदूंना लाथ’ अशा पद्धतीने राज्यकारभार सुरू आहे. मुस्लिमांच्या लांगूलचालनामुळे येथील राज्यकर्ते आंधळे झाले आहेत तर अतिसहिष्णूपणाचा ओव्हरडोस झाल्याने या देशातील हिंदूही डोळ्यांवर झापडं येऊन गलितगात्र बनले आहेत. त्यामुळेच मुसलमान कसेही वागले तरी त्यांना सर्व मुभा दिली जात आहे. ‘अमर जवान’ शिल्प तोडणार्‍यांच्या घरावर पोलीस फक्तछापे’च टाकत आहेत. एवढीदयाबुद्धी’ सनदशीर मार्गाने आंदोलन करणार्‍या शिवसैनिकांबाबत मात्र कधीच दाखवली जात नाही. एखादा आंदोलक शिवसैनिकफरार’ आहे म्हणून त्याच्या वृद्ध आई-बापास, नोकरदार भावास पोलीस ठाण्यात नेऊनओलीस’ ठेवण्यापर्यंत यांची मजल जाते. मग इकडे फक्त छापा-काट्याचा खेळ का चालला आहे? धर्मांध मुसलमानांनी पृथ्वीराजबाबा आर.आर. आबांचे पाणी जोखले आहे. कृपाशंकरला वाचविण्यासाठी दिल्लीच्या अहमदमियॉंचा दबाव आहे हे जगजाहीर आहे. आता आझाद मैदानातील दंगलखोर राष्ट्रद्रोह्यांना वाचविण्यासाठी दिल्लीतील कोणत्या अतिवरिष्ठमियॉं’चा दबाव आहे तेवढे जाहीर करा. म्हणजे हिंदू देवळात बसून घंटा बडवायला मोकळा झाला

No comments:

Post a Comment