मुस्लिमांची मस्ती महाग पडेलः
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुंबईच्या आझाद मैदान परिसरात जे घडले तो प्रकार फक्त देशद्रोहाचाच फूत्कार आहे. मुस्लिम संघटना फतवे काढतात व त्या फतव्याबरहुकूम मुसलमान जिहादचे नारे देत रस्त्यावर उतरतात. मुंबईसह राज्याला वेठीस धरतात. ही अराजकाचीच सुरुवात आहे. मुस्लिमांची ही मस्ती देशाला महाग पडणार आहे , असा गंभीर इशारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज दिला आहे. मावळच्या शेतक-यांवर आणि मराठवाड्यातील वारक-यांवर मरेपर्यंत गोळीबार करणा-या सरकारने दंगेखोर , धर्मांधांवर गोळीबार केला , पण हवेत!... कसाबच्या मुंबईतील अवलादीसमोर सरकार फुसके ठरले. शेपूट घातले. अशा सरकारचीही राखरांगोळी होवो , अशा शब्दांत आपला संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ' सामना ' च्या अग्रलेखातून बाळासाहेबांनी सीएसटी परिसरातील हिंसाचारावर घणाघाती भाष्य केलं आहे. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे
* म्यानमारचा मुसलमान आणि आसामात घुसलेला बांगलादेशी तुमचा कोण लागतो की ज्याच्यासाठी तुम्ही भारतमातेच्या छाताडावर नाचत आहात ? ही भूमी अराजकाने अस्थिर आणि रक्तबंबाळ का करीत आहात ? मुंबईच्या आझाद मैदान परिसरात जे घडले तो प्रकार फक्त देशद्रोहाचाच फूत्कार आहे. महाराष्ट्राच्या पृथ्वीराज सरकारच्या मानेवर सुरी ठेवून धर्मांधांनी हवा तसा हैदोस घालण्याचाच हा प्रकार.
* आसाम म्हणजे ' गेट वे ऑफ बांगलादेश ' झाले आहे व त्यामुळे हिंदुस्थानचा भूगोल बिघडला आहे. मुंबई , दिल्ली , पुणे , बंगळुरूसारख्या शहरांची सुरक्षा धोक्यात आली आहे ती अशा बांगलादेशी घुसखोरांमुळेच. अशा बांगलादेशींना ते असतील तेथून हाकलून दिले पाहिजे. अशा बांगलादेशींबद्दल ज्यांना प्रेमाचा पाझर फुटतोय ते मातृभूमीशी गद्दारीच करीत नाहीत काय ?
* मावळच्या शेतकर्यांवर व मराठवाड्यातील वारकर्यांवर मरेपर्यंत गोळीबार करणारे सरकार हेच आहे. पण आझाद मैदानात त्यांच्या बंदुकांच्या शेपट्या झाल्या व काडतुसांच्या लिमलेटच्या गोळ्या झाल्या. दंगलखोरांनी तयारी आधीच केली होती. हा भडका अचानक उडालेला नाही.
* कसाबला पोसणारी व अफझल गुरूसमोर झुकणारी अवलाद राज्यकर्त्यांत असल्यामुळेच आसामात घुसलेल्या बांगलादेशींच्या समर्थनार्थ हिंसाचार करण्याचे धाडस येथील मुसलमान दाखवतात. कुठलाही विलंब न लावता असे हतबल आणि फुसके सरकार बरखास्तच करायला हवे.
मुंबई हिंसाचार :परकीय शक्तींचा सहभाग पडताळणार मुंबई - देशात आणि राज्यात अस्थिरता निर्माण करण्यासाठी काही परकीय शक्तींचा मुंबईतील हिंसाचारामागे हात आहे का याचीही पडताळणी केली जाईल. तसेच या हिंसाचारामुळे आंदोलकांचा राज्य तसेच केंद्र सरकारवरील रोष व्यक्त झाला असावा, अशी शक्यता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
आसाममधील हिंसाचाराच्या निषेधार्थ शनिवारी मुंबईत आयोजित केलेल्या शांतता सभेत हिंसक वळण लागल्याने दोघांचे बळी गेले. यावेळी आंदोलकांनी माध्यमांवर हल्ला केला असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.
राज्य सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरल्याचा आरोप माध्यमांच्या प्रतिनिधींनी केला. सरकारने अधिकृत प्रवक्ता नेमून अशा घटनांची माहिती प्रसारमाध्यमांना द्यावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर चव्हाण म्हणाले की, पोलिसांनी प्रसारमाध्यमांवर लाठीहल्ला केला असेल, तर त्याची चौकशी करून योग्य दखल घेतली जाईल. तर आंदोलकांनी माध्यमांवर केलेला हल्ला हा बातम्या न दाखवल्या गेल्याच्या रागापोटी असावा, अशी शक्यता असली तरी त्यांचे मुख्य लक्ष सरकारच असावे, असे वाटते. माध्यमांना संरक्षण देण्याबाबत गृहमंत्री, मुख्य सचिवांची बैठक घेऊ. गुन्हे अन्वेषण विभाग व न्यायदंडाधिका-यांमार्फत घटनेची चौकशी केली जाईल.
एकट्या ‘रझा’ची जबाबदारी नाही - काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनीही या घटनेचा निषेध नोंदवत दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. आझाद मैदानाच्या समोरच असलेल्या मुंबई महापालिकेतील सीसीटीव्ही कॅमे-यांमध्ये या घटनेचे चित्रण झाले असून त्याचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातून हल्लेखोर कोण होते हे अधिक स्पष्ट होईल. मात्र, या घटनेची जबाबदारी एकट्या रझा अकादमीची नसून इतरही काही स्वयंसेवी संघटनाही सभा आयोजित करण्यामध्ये सहभागी होत्या, असे पटेल म्हणाले. या सभेसाठी रिझवान खान ऊर्फ रिझवान दयावान या कुर्ला येथील समाजसेवकाने पोलिसांकडून परवानगी मागितली होती, असेही त्यांनी सांगितले.
धागेदोरे मिळाले; पोलिसांचा दावा - तपास योग्य दिशेने सुरू असून काही धागेदोरेही हाती आले आहेत. मात्र, तपास पूर्ण झाल्याशिवाय कोणावरही जबाबदारी निश्चित करता येणार नाही, असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमिताभ राजन यांनी सांगितले. अचूक तपासावर आमचा भर असून कोणालाही विनाकारण अटक होणार नाही. पोलिस, माध्यमांवरील हल्ला ही गंभीर बाब असून दोषींवर कारवाई होईलच, असे राजन म्हणाले. या घटनेच्या तपासामध्ये गृह विभागावर राजकीय दबाव येत आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की, असा दबाव येऊ शकतो; पण पोलिस विभाग काम चोख करत आहे.
दबावातून परवानगी - आसाम व म्यानमार येथे झालेल्या दंगलीचा निषेध करण्यासाठी मोर्चा व सभेसाठी आझाद मैदान
पोलिस स्टेशनने कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत सुरुवातीला सभा नाकारली होती, परंतु रिझवान दयावान हा मुंबईतील एका काँग्रेसच्या कॅबिनेट मंत्र्याच्या जवळचा माणूस असल्याने राजकीय दबावामुळे त्यांना ही परवानगी द्यावी लागली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हुतात्मा स्मृतिस्तंभाची तोडफोड - छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळ शनिवारी निदर्शकांनी केलेल्या तोडफोडीत येथील हुतात्मा स्मारकाचे मोठे नुकसान झाले. 1857 च्या उठावातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मुंबई महापालिकेच्या वतीने आझाद मैदानाच्या गेटसमोर या स्मृतिस्तंभाची उभारणी केली होती. शनिवारी येथे उसळलेल्या हिंसाचारामध्ये समाजकंटकांनी या स्मृतिस्तंभाचीही मोडतोड केली. स्तंभावरील बंदूक आणि हेल्मेट नसल्याने रविवारी हा स्मृतिस्तंभ सुनासुना दिसत होता.
इतिहासात अनेक घटनांचे साक्षीदार असणा-या ‘सीएसटी’समोरील आझाद मैदानाचे पूर्वीचे नाव एस्प्लनेड ग्रास होते. 1857 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात देशव्यापी उठाव झाला होता. त्यामध्ये मुंबईच्या मंगल गडिया आणि सय्यद हुसेन या क्रांतिकारकांनी भाग घेतला होता. ब्रिटिशांनी या दोघांना आझाद मैदानावर 15 ऑक्टोबर 1857 रोजी सर्वांसमक्ष तोफेच्या तोंडी दिले होते. या दोन्ही हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मुंबई महानगरपालिकेने हा स्मृतिस्तंभ उभारला होता. या स्तंभावर ‘अमर जवान’प्रमाणे बंदूक आणि हेल्मेटची प्रतिकृती होती.
सरकार अपयशी; राष्ट्रपतींनीच हस्तक्षेप करावा : शिवसेना - मुंबईमध्ये शनिवारी झालेल्या हिंसक घटनेसाठी राज्य सरकारला जबाबदार धरत या प्रकरणात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी केली. ही संपूर्ण घटना हाताळण्यामध्ये आणि नियंत्रणात आणण्यामध्ये राज्य सरकारचे अस्तित्व दिसलेच नाही. पोलिस आयुक्तांच्या समोर पोलिसांना मारण्यात आले. त्यामुळे आता राष्ट्रपतींनी हस्तक्षेप केला पाहिजे पर्यायाने सरकार बरखास्त करा, अशी मागणीही त्यांनी केली.
आंदोलकांनी केलेल्या तोडफोडीमध्ये सीएसटीजवळील 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे स्मारकही उद्ध्वस्त झाले. त्या हल्लेखोरांना तर कसाबच्या आधी फाशी द्यायला हवी, असे राऊत म्हणाले. या सर्व हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे त्यामुळे त्यांना ओळखण्यामध्ये पोलिसांना वेळ लागणार नाही. दहशतवाद्यांपासून देशाचे रक्षण करताना मृत्युमुखी पडलेल्या अमर जवानांचे हे स्मारक होते. तेही या हल्लेखोरांनी उद्ध्वस्त केल्याचे राऊत म्हणाले. गृह विभाग हा राज्याचा कणा म्हणून ओळखला जातो. पण इथे तो कणाच मोडला असल्याचे दिसते. हा प्रश्न राज्यातील आठ कोटी आणि मुंबईतील दीड कोटी जनतेचा असल्याने त्याला गांभीर्यानेच घ्यायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘रझा अकादमी’ने जबाबदारी नाकारली
- आसाममधील दंगलीचा निषेध करण्यासाठी आयोजित शांतता सभेला हिंसक वळण लागून दोघांचे बळी गेल्यानंतरही अद्याप कोणावरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नाही. या मोर्चाचे प्रमुख आयोजक रझा अकादमीने तर या घटनेची जबाबदारी घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
‘शांतता मोर्चाच्या वेळी घडलेली ही घटना दुर्दैवी होती आणि त्याचा निषेधही करतो; पण हल्लेखोरांशी आमचा संबंध नाही,’ असे रझा अकादमीचे सरचिटणीस मौलाना मोहम्मद सईद नुरी यांनी सांगितले. आम्ही शांतता सभा आयोजित केली होती. त्यामुळे अशा पद्धतीने आम्हीच लोकांना बोलावून त्यांच्याकडून हल्ला करवून घेतला, असे म्हणणे चुकीचे ठरेल. मात्र, ज्यांनी हे काम केले आहे त्यांना माफी मिळू शकत नाही. रझा अकादमी ही जबाबदार संघटना आहे आणि या हिंसाचारामागे आमच्या कोणत्याही सदस्याचा संबंध नाही; पण या घटनेच्या माध्यमातून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा
आरोपही नुरी यांनी केला.
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आयुक्तांना निलंबित करा - हिंसाचाराला नियंत्रित करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांंना कारवाईपासून रोखणा-या पोलिस आयुक्तांना निलंबित करण्यात यावे, तसेच पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरण करणा-या गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.
हिंसाचार हा पूर्वनियोजित होता. आंदोलकांनी येतानाच हॉकी, लोखंडी सळ्या सोबत आणल्या होत्या. प्रक्षोभक भाषणे सुरू होती. मात्र, त्याची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. या वेळी महिला पोलिसांचा विनयभंग अधिका-यांसमोर होत होता, पण पोलिस हतबल होते. उपायुक्त कृष्णप्रकाश यांनी तलवार घेतलेल्या आंदोलकावर कारवाई केली असता त्याला सोडून देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. एका मंत्र्याने हे करण्यास सांगितल्याचा आरोपही तावडे यांनी केलाप्रक्षोभक एसएमएस आणि पोस्टर्समुळे जमाव बिथरला
मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र सण चालू असताना मुंबईत घडलेल्या दंगलीच्या घटनेमुळे मुस्लिम बांधवांतच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 'आसाम व बर्मा येथे होत असलेल्या मुस्लिमांवरील अत्याचाराचा बदला घ्या' अशा आशयाचे एसएमएस गेल्या काही दिवसांपासून शहरभरातील मुस्लिम वस्तीत येत होते, तर कुर्ला, मुंब्रा व अँण्टॉप हिल भागात भडकावू पोस्टर्स लावण्यात आली होती. यामागे काँग्रेसच्या एका मंर्त्याचा हात असल्याचे बोलले जाते. या मंर्त्याचा एक 'पंटर' हे एसएमएस पाठवण्याचे व पोस्टर्स लावण्याचे काम करत होता. यामुळेच मुस्लिम बांधवांच्या भावना भडकल्या व त्यांनी आततायी कृत्य केल्याचे बोलले जाते. या मंर्त्यावर व त्याचा 'पंटर'वर कडक कारवाई करण्याची मागणी आता या समाजातील लोकच करत आहेत. शहरातील शांततेला तसेच रमजानच्या पवित्र सणाला काळिमा लावणार्या संधीसाधू नेत्याला धडा शिकवला पाहिजे, अशी संतप्त भावना अनेकांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment