Total Pageviews

Friday 13 May 2011

TEN NAXALS ARRESTED NEAR PUNE

दहा नक्षलवाद्यांना शिरूरजवळ अटक May 14, 2011 मुंबई - पश्‍चिम बंगालमध्ये घातपाती कारवायांत भाग घेतल्यानंतर पुण्यात आश्रयाला आलेल्या सिद्धू कानू दलमच्या दहा नक्षलवाद्यांना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुण्यात शिरूर येथून काल अटक केली. पश्‍चिम बंगालहून बहुसंख्य मजूर पुण्याच्या औद्योगिक वसाहतींत कामाला येतात. अशाच मजुरांच्या बरोबर आलेले हे नक्षलवादी तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ पुण्यात वास्तव्य करीत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून चार देशी बनावटीची पिस्तुले, सात जिवंत काडतुसे आणि माओवादी विचारसरणीचे साहित्य जप्त करण्यात आले.
मिरपन महातो (वय 23), रुद्र महातो (19), आनंदो महातो (37), रॉबी हन्सदा (19), रॉबी महातो (19), सुशांतो महातो (36), सत्यजित राणा (18), अजित महातो (36), पिंटू महातो (19) आणि कडू हेमब्रह्म (21) अशी या अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. पश्‍चिम मिदनापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले हे दहाही जण तेथील नक्षलवादी कारवायांत सहभागी झालेले आहेत. मिरपनसह आनंदो रॉबी महातो यांनी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या खबऱ्याची हत्या केली होती, तर रुद्र त्याचे साथीदार रॉबी हन्सदा, सुशांतो यांनी पश्‍चिम बंगालच्या नक्षलग्रस्त भागात स्फोट घडवून आणला होता असे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पश्‍चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वाढलेला तणाव लक्षात घेता हे दहा नक्षलवादी पुण्यात आश्रयाला आल्याची खबर एटीएसला मिळाली होती. याची कुणकूण लागल्यामुळे ते आझाद हिंद एक्‍स्प्रेसमधून पश्‍चिम बंगाल गाठण्याच्या तयारीत होते. अटक नक्षलवाद्यांपैकी सुशांतो महातो हा वर्षभरापासून पुण्यात वास्तव्य करीत होता. शिरूर येथील औद्योगिक वसाहतीत लागणारे मजूर पुरविण्याची जबाबदारी असलेला सुशांतो बी.कॉम. झालेला आहे. त्यानेच इतर नक्षलवाद्यांना औद्योगिक वसाहतीत नोकरीला लावले होते. आरोपींपैकी रॉबी हन्सदा हा पीपल्स गोरिला लिबरेशन आर्मी (पीजीएलए) या बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथक पश्‍चिम बंगाल पोलिसांच्या संपर्कात आहे. त्यांचे पथक उद्या मुंबईत येण्याची शक्‍यता एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी वर्तविली.
काही दिवसांपूर्वी एटीएसच्या पथकाने वेस्टर्न कॉरिडॉर समितीची प्रमुख असलेल्या अँजेला सोनटक्केच्या चार साथीदारांना पुण्यातून अटक केली. त्यापूर्वी मार्चमध्ये मुर्शिदाबाद येथे घातपात घडविलेला नक्षलवादी अखेर मोंडल यालासुद्धा पुण्यातूनच अटक केली होती. गेल्या काही महिन्यांत पुण्यात झालेल्या या अटकेच्या कारवायांमुळे नक्षलवादी दहशतवाद्यांच्या स्लिपर सेलचे जाळे पुण्यात पसरत असल्याची गंभीर बाब पुढे येत असल्याचे एटीएसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, अटक केलेल्या दहाही नक्षलवाद्यांना 23 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश पुण्यातील न्यायालयाने दिले आहेत
नक्षलग्रस्त भागात माओवाद्यांचे डोके पुन्हा वर मुंबई - माओवाद्यांच्या गोल्डन कॉरिडॉर कमिटीची प्रमुख अँजेला सोनटक्के आणि तिच्या साथीदारांना राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेली अटक पोलिस चकमकीत मारले गेलेले तीन माओवादी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी राज्याच्या नक्षलग्रस्त भागात माओवाद्यांनी पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. अँजेला आणि तिच्या साथीदारांना झालेल्या अटकेचा निषेध म्हणूनच माओवाद्यांनी गडचिरोलीत यरकड येथे वऱ्हाडाची गाडी भूसुरुंगाने उडविल्याचा अंदाज आहे.
या कारवायांनी आपण घाबरलो नाही, हे दाखविण्यासाठी प्रत्युत्तर म्हणून माओवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य करायला सुरवात केली आहे. त्यातच "एटीएस'ने माओवाद्यांचा म्होरक्‍या मिलिंद तेलतुंबडे याची पत्नी गोल्डन कॉरिडॉर समितीची प्रमुख अँजेला सोनटक्के हिच्यासह सहा जणांना पुणे नाशिक येथे केलेल्या कारवायांत अटक केली. शहरी भागातील तरुणांमध्ये माओवादी चळवळ पसरविण्याचा प्रयत्न करीत असलेल्या अँजेला आणि तिच्या साथीदारांवर केलेल्या कारवाईमुळे माओवाद्यांत असंतोषाचे वातावरण होते. त्यातच काही दिवसांपूर्वी गडचिरोलीत मालेवाडा येथे झालेल्या पोलिस चकमकीत माओवाद्यांचा डिव्हिजनल कमांडिंग चीफ नागेश याच्यासह दोघे माओवादी मरण पावले होते. या दोन्ही घटनांचा निषेध म्हणून त्यांनी गडचिरोलीच्या यरकड येथे लग्नाच्या वऱ्हाडाची गाडी पोलिसांची असल्याचे समजून भूसुरुंगाने उडविली. या हल्ल्यात सहा जण ठार; तर चार जण जखमी झाले. हा हल्ला अँजेला सोनटक्के आणि तिच्या साथीदारांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ करण्यात आल्याचा अंदाज राज्य गुप्तचर विभागाने वर्तविला आहे. पावसाळा तोंडावर आल्याने माओवादी या दिवसांत नेहमीच आपल्या कारवाया तीव्र करीत असतात. पावसाळ्याच्या दिवसांत त्यांच्या कारवाया थंडावतात. दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा पोलिसांची गाडी भूसुरुंगाने उडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
May 12, 2011

No comments:

Post a Comment