Total Pageviews

Monday, 1 January 2018

मेजर महाडिक तवांगमध्ये शहीद महाराष्ट्र टाइम्स | | Updated: Jan 1, 2018, 11:40PM

 विरार येथील मेजर प्रसाद गणेश महाडिक (३१) यांचा अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. उद्या, मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर विरार येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

भारतीय लष्कराच्या सेवेत असणारे महाडिक हे विरार पश्चिम येथील यशवंत दीप सोसायटीमध्ये कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. तवांग येथे त्यांच्या टँकला आग लागल्यामुळे ते जबर जखमी झाले होते. यात ३० डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला. विरार पश्चिम येथील स्मशानभूमीत आज त्यांच्या पार्थिवावर लष्करी मानवंदनेसह अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यावेळी लष्कराचे अधिकारीही उपस्थित राहणार असून प्रांताधिकारी, जिल्हाधिकारीही उपस्थित राहतील, अशी माहिती वसईचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिली.

महाडिक यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, धाकटी बहीण असा परिवार आहे. महाडिक हे २०१२मध्ये लष्करात भरती झाले होते. अडीच वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांचे वडील नेव्हल डॉकयार्डमध्ये नोकरी करतात. प्रसाद महाडिक यांचे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात आहे.
https://www.youtube.com/watch?v=el5WAP1tK1Q

No comments:

Post a Comment