Total Pageviews

Sunday, 28 January 2018

मुसक्या आवळण्याच्या कामाला वेग-महा एमटीबी 22-Jan-2018


शोपियां जिल्ह्यात दगडफेक करणाऱ्या तरुणांना पांगविण्यासाठी लष्कराने केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाल्याने लष्कराच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून फुटीरतावाद्यांनी या घटनेच्या निषेधार्थ आज काश्मीर बंद पुकारला आहे. काश्मीरमध्ये अफवा पसरू नये म्हणून या भागात कालपासूनच इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर आत्मसंरक्षणासाठीच हा गोळीबार करावा लागल्याचं लष्कराच्या जवानांनी स्पष्ट केलं आहे. 

शनिवारी ही घटना घडली. शोपियां जिल्ह्यातील गनोवपुरा गावातून जाणाऱ्या सुरक्षा दलाच्या ताफ्याला दगडफेक करणाऱ्या २०० जणांच्या जमावाने घेरले होते. जमावाने अचानक दगडफेक केल्याने जवानांनी संरक्षणासाठी हवेत गोळीबार केला. त्यात अनेकजण जखमी झाले. दगडफेक करणाऱ्या काही तरुणांनी जवानांची गाडी पेटविण्याचा प्रयत्न केला. तसेच लष्करातील एका कनिष्ठ अधिकाऱ्याला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लष्कराने केलेल्या गोळीबारामध्ये जावेद आणि सुहैल या दोन तरुणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाल्याचं संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने सांगितलं. या हल्ल्यात ११ वाहनांचं नुकसान झालं आहे. याप्रकरणी जवानांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे गनोवपुरामध्ये तणाव असून गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 पाकिस्तानचे संबंध सुरळीत होण्यासाठी मोदींना हटवणे आवश्यक असल्याचे मणिशंकर अय्यर हे पाकिस्तानात जाऊन बरळले . पक्ष पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे का? असाही प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. किमान देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तरी देश एकत्र आला पाहिजे, देशाला बळ दिले पाहिजे

एनआयएच्या आरोपपत्रात दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयाचाही उल्लेख आहे. अतिरेकी हे सतत पाकिस्तानी दूतावासाच्या संपर्कात होते, एवढेच नव्हे तर याच दूतावासातून अनेकदा पैसेही अतिरेक्यांना पुरविले गेले, असेही तपासात निष्पन्न झाले आहे. काश्मीरमध्ये अतिरेकी आणि दगडफेक करणार्‍यांना हा पैसा पुरविला जात होता, असा स्पष्ट आरोप एनआयएने केला आहे. अटक करण्यात आलेल्या अनेकांनी याची कबुली दिली आहे. जम्मू-काश्मीरमधून अतिरेक्यांना वॉश आऊट करण्याचा विडा आपल्या लष्कराने उचलला आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) काश्मिरातील विघटनवाद्यांना, अतिरेक्यांना आणि दगडफेक करणार्‍यांना रक्कम पोहोचविणार्‍या दहा जणांविरुद्ध नुकतेच आरोपपत्र दाखल केले. या दहा जणांत लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफीझ सईद आणि हिज्ब-ए-मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन याचेही नाव आहे. सोबतच हुर्रियत नेते, मिरवैज उमर फारूखचा निकटचा सहकारी साहीद उल इस्लाम, सय्यद गिलानी याचा जावई अल्पाफ अहमद शाह ऊर्फ अल्ताफ फंटूश, स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडला गेलेला नईम खान, तहरिक-ए-हुर्रियतचा प्रवक्ता अयाज अकबर, अतिरेक्यांना पैसा पुरविणारा जहूर अहमद शाह व जेकेएलएफचा फारूख अहमद दार यांचाही समावेश आहे. जम्मू-काश्मीर, दिल्ली, हरयाणा, उत्तरप्रदेश व देशाच्या अन्य भागात असलेले यांचे संबंधही आरोपपत्रात उघड झाले आहेत. हा तपास अजून सुरू आहे. गिलानी याची विचारपूस अजून बाकी आहे. विशेष म्हणजे या आरोपपत्रात फ्रीलान्स फोटोजर्नालिस्ट कामरान युसुफ आणि जावेद अहमद भट यांचेही नाव आहे. या कथित दोन पत्रकारांवर पैसे पोचते करून दगडफेक करण्यासाठी युवकांना उद्युक्त करणे असा आरोप ठेवण्यात आला आहे. जम्मू-काश्मिरात भाजपा आणि पीडीपीचे सरकार आल्यापासून लष्कर आणि पोलिसांवर दगडफेकीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. प्रसंगी पॅलेट गनमधूनही गोळीबार करण्यात आला होता. पण, त्याविरुद्ध देशातील अतिरेकी-नक्षलवादी समर्थक आणि वकिलांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावल्याने मग या समस्येच्या मुळाशीच जाण्याचे सरकारने ठरविले आणि त्यात त्यांना यश आलेले दिसत आहे. ऑपरेशन वॉश आऊटमध्ये आतापर्यंत २६२ अतिरेक्यांना यमसदनी पाठविण्यात आले. शंभरावर अतिरेक्यांना अटक केली तर काही शरण आले. एनआयएने आपल्या मोहिमेत एकट्या जम्मू-काश्मीरमध्ये ६० ठिकाणी धाडी घातल्या आणि अतिरेकी-दगडफेक करणार्‍यांशी संबंध असणारे ९०० दस्तऐवज, ६०० इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. ३०० जणांच्या साक्षीही नोंदविल्या. आता आरोपपत्र दाखल झाल्यावर सर्व पुरोगामी मंडळीची तोंडे बंद झाली आहेत. १२०० पानांच्या या आरोपपत्रात एनआयएने विघटनवादी आणि अतिरेक्यांच्या संबंधांचा पर्दाफाश केला आहे.
जनरल मुशर्रफ २०१४ साली एका वाहिनीला मुलाखत देताना म्हणाले होते, आमचे स्त्रोत काश्मीरमध्येही आहेत आणि पाकिस्तानी लष्करातही आहेत. काश्मीरमधील लोक भारताविरुद्ध लढा पुकारत आहेत. त्यांना प्रोत्साहन देणे आणि उद्युक्त करण्याचे आमचे कामच आहे. २०११ मध्ये प्रथमच अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय)ने आपल्या अहवालात स्पष्टपणे म्हटले होते की, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) ही काश्मीर व भारताच्या प्रदेशांसह अन्य देशांमध्येही पाकिस्तानातील युवकांना घुसखोरी आणि विध्वंसक कारवाया घडवून आणण्यासाठी प्रशिक्षण आणि पैशाची मदत करीत आहे. हा जो ओघ काँग्रेसच्या काळात अव्याहतपणे सुरू होता, त्याला चाप लावण्याचे फार मोठे काम मोदी सरकारने प्रथमच केले आहे. अतिरेक्यांना ठार मारण्याच्या मोहिमे आमच्या अनेक जवानांनाही शहीद व्हावे लागले. या ऑपरेशन ऑल आऊटसोबतच अतिरेक्यांना आणि दगडफेक करणार्‍यांना पैसा पुरविणार्‍यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दगडफेक करणार्‍या शेकडो युवकांना अटक करण्यात आली. पण, ते तर अतिरेक्यांना आणि विघटनवादी नेत्यांना, त्यांच्या सुरक्षिततेसाठी शेकडो कोटी रुपयांची खैरात दरवर्षी वाटत होते.एनआयएच्या आरोपपत्रात दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयाचाही उल्लेख आहे. अतिरेकी हे सतत पाकिस्तानी दूतावासाच्या संपर्कात होते, एवढेच नव्हे तर याच दूतावासातून अनेकदा पैसेही अतिरेक्यांना पुरविले गेले, असेही तपासात निष्पन्न झाले आहे. काश्मीरमध्ये अतिरेकी आणि दगडफेक करणार्‍यांना हा पैसा पुरविला जात होता, असा स्पष्ट आरोप एनआयएने केला आहे. अटक करण्यात आलेल्या अनेकांनी याची कबुली दिली आहे. विचारला का त्यांना जाब? कारण ते काँग्रेसचे भाऊबंदच ना. आज अतिरेक्यांचे कंबरडे मोडले आहे, दगडफेकीच्या घटनांना एकदम चाप बसला आहे. ना बळाचा वापर ना पॅलेट गनचा. जम्मू-काश्मीरमधून अतिरेक्यांना वॉश आऊट करण्याचा विडा आपल्या लष्कराने उचलला आहे. लष्कराविषयी कोणतीच आपुलकी आणि विश्वास नसणे हे डीएनएमध्ये आहे. 

No comments:

Post a Comment