15 जानेवारी 1949 रोजी सकाळी ठीक नऊ वाजता जनरल
करिअप्पा यांनी कमांडर इन चीफबरोबर साऊथ ब्लॉकमधील कार्यालयात प्रवेश केला.
त्यावेळी लेफ्टनंट जनरल कोदंदेरा मदप्पा करिअप्पा, जनरल रँकचे सर्व बिल्ले आपल्या खांद्यावर दिमाखात मिरवत होते.
जनरल सर फ्रान्सिस रॉबर्ट रॉय बूचर यांनी त्यांचे स्वागत केले. हस्तांदोलन केले
आणि त्यांना सन्मानाने त्यांच्या नवीन स्थानापर्यंत घेऊन गेले. त्या क्षणापासून
जनरल करिअप्पा स्वतंत्र भारताचे प्रथम कमांडर इन चीफ बनले. त्यानंतर या ऐतिहासिक
दिवसाची आठवण म्हणून 15 जानेवारी हा दिवस सैन्यदिवस
म्हणून साजरा करण्यात येतो.
देशातील नागरिकांच्या रक्षणाकरिता आपल्या प्राणांचे बलिदान करणार्या
सैनिकांना सैन्यदिवस ही अगदी योग्य अशी श्रद्धांजली म्हणता येईल. नवी दिल्लीतील
इंडिया गेट येथील अमर जवान ज्योतीवर शहीद सैनिकांना पुष्पचक्र अर्पण करून सेनादिवस
साजरा करण्यास सुरुवात होते.
लष्कर (भूदल) सेनेची तंत्रज्ञान प्रगती, त्यांची तयारी, फौजेची आयुधे, शस्त्रास्त्रे, वाहने यांचे
प्रदर्शन आणि लष्कराच्या करामती, शत्रूवरील
हल्ल्याची दृश्ये दरवर्षी दिल्ली छावणीत आयोजित केली जाणारी मुख्य सैन्य परेड ही
सर्व या दिवसाची आकर्षणे असतात. यामुळेच दिल्लीतील कडाक्याच्या थंडीतसुद्धा या
सोहळ्याकरिता मोठ्या संख्येने सामान्य जनतेची उपस्थिती असते. तसेच सामान्य
प्रेक्षकांच्या बरोबरीने सैनिकांचा ऊतू जात असलेला उत्साह अक्षरशः बघण्यासारखा
असतो. सेना पदके, शौर्य पुरस्कार व सेनेतील
विविध प्रभागांना त्यांच्या कार्यासाठी प्रशस्तिपत्रके सेनाप्रमुखांकडून प्रदान
केली जातात. लष्कराच्या वाद्यवृंदाच्या तालावर उत्साहात आणि ऐटीत परेड करणार्या
सैनिकांना पाहून नागरिक अगदी भारावून जातात.
15 जानेवारी या दिवसाचे असाधारण असे महत्त्व आहे. 15 जानेवारी 1949 रोजी सकाळी ठीक नऊ वाजता जनरल
करिअप्पा यांनी कमांडर इन चीफबरोबर साऊथ ब्लॉकमधील कार्यालयात प्रवेश केला.
त्यावेळी लेफ्टनंट जनरल कोदंदेरा मदप्पा करिअप्पा, जनरल रँकचे सर्व बिल्ले आपल्या खांद्यावर दिमाखात मिरवत होते. जनरल
सर फ्रान्सिस रॉबर्ट रॉय बूचर यांनी त्यांचे स्वागत केले, हस्तांदोलन केले आणि त्यांना सन्मानाने त्यांच्या नवीन
स्थानापर्यंत घेऊन गेले. त्या क्षणापासून जनरल करिअप्पा स्वतंत्र भारताचे प्रथम
कमांडर इन चीफ बनले. त्यानंतर या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून 15 जानेवारी हा दिवस सैन्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्या
दिवसापासून भारतीय सेनेवर संपूर्णपणे भारतीय वर्चस्व प्रस्थापित झाले आणि एका
नव्या युगाची सुरुवात झाली. त्या घटनेला आता खरोखरच एका युगाएवढा काळ लोटला आहे.
आता देशाला अंतर्बाह्य सुरक्षित करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा मसुदा तयार आहे आणि
त्यामध्ये आपली जबाबदारी पूर्णत: पार पाडण्यासाठी देशाचे सैन्य दल सर्वतोपरी
सुसज्ज आहे. वेळोवेळी लष्कराच्या तयारीचे आणि त्यावरील वाढत्या जबाबदार्यांचे
मूल्यमापन केले जाते. येणार्या काळात सेनेच्या तयारीला पूर्ण मजबूत रूप देण्याचे
काम सेना आणि सरकार या दोघांचे आहे. लष्कराच्या प्रत्यक्ष कारवाईत जबाबदार्या काय
असतील, त्याचप्रमाणे लष्कराच्या
गरजेप्रमाणे प्रशिक्षण, आधुनिकीकरण आणि त्यासाठी उपलब्ध
असलेला वेळ यांचे भान, त्या करता आवश्यक ती तयारी या
सर्वांचा अभ्यास सेना मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी सतत करत असतात .
संपूर्ण आधुनिकीकरणाकडे घोडदौड
देशातील भूदल सेनेच्या गरजांची यादी लांबलचक आहे. परंतु, सरकारने गेल्या दोन वर्षात सेनेच्या आधुनिकीकरणासाठी खूप मोठा निधी
उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये आमच्या रणगाडा रेजिमेंटला रात्रीच्या अंधारात
लढण्यासाठी, लढाऊ क्षमता आणि त्यांची नियंत्रण
व्यवस्था यांचे आधुनिकीकरण आवडी येथील अवजड वाहन कारखान्यात केले जात आहे. हळूहळू
जुन्या ‘टी-55’ रणगाड्यांच्या बदली ‘टी-72’ रणगाड्यांची निर्मिती करून केली
जात आहे. आजपर्यंत अशा 1700 ‘टी-72’ रणगाड्यांची निर्मिती झाली आहे. आर्म्ड कोरच्या दोन रेजिमेंटकरिता
स्वदेशी बनावटीच्या ‘अर्जुन’ रणगाड्याचे उत्पादन आवडी येथे केले जात आहे. याचप्रमाणे
इन्फंट्रीची ‘बीएमपी-1’ आणि ‘बीएमपी-2’ ही चिलखती वाहने जुनी झाली आहेत. त्यांच्या जागी प्रत्येकी 22 टन वजन असलेली, 2600 आधुनिक वाहने
निर्माण करण्यासाठी फ्युचर इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल परियोजनेंतर्गत मंजुरी
मिळाली आहे.
कारगिलच्या लढाईमध्ये आपल्याला विजय मिळवून देणार्या ‘बोफोर्स’ तोफांची खरेदी 1980 च्या दशकात केली गेली होती. त्यानंतर 155 मिलिमीटर तोफांची खरेदी आतापर्यंत झाली नव्हती. आता मात्र यासाठी
आयुध कारखाना बोर्डकडून, स्वदेशातच ‘बोफोर्स’च्या धर्तीवर नवीन तोफांच्या
निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत. शिवाय, तोफांची बाहेरून खरेदी करण्यासाठी आणि येथील निर्मितीसाठी आवश्यक
प्रक्रिया, स्वदेशी कंपन्यांमध्ये सुरू झाल्या
आहेत. या वर्षअखेरपर्यंत आमच्याकडे काही बाहेरून आयात केलेल्या आणि काही
स्वदेशनिर्मित तोफा पाहायला मिळतील.
लष्करात ‘मल्टिबॅरेल रॉकेट लॉन्चर’ आणि ‘ब्रह्मोस’ क्रूझ मिसाईल आहेतच. याच्याच बरोबर देशातच विकसित ‘मल्टिबॅरेल पिनाका रॉकेट लॉन्चर’सुद्धा याच श्रेणीमधील घातक प्रणालीमध्ये सामील आहेत. 2017 साली आपल्या सेनेने सात ते चौदा दिवसांचे वेगवेगळे सैन्याभ्यास
केले होते. मुख्यतः ओमान, नेपाळ, मंगोलिया, अमेरिका, श्रीलंका, रूस, कजाकिस्तान, बांगलादेश, इंग्लंड या देशांचा समावेश होता.
‘चेतक’ आणि ‘चीता’ हेलिकॉप्टर आता निवृत्त झाले
आहेत. यांची जागा भारतातच बनवले जाणारे ‘ध्रुव’ आणि ‘कोमोव’ युटिलिटी हेलिकॉप्टर्स घेणार
आहेत. याचबरोबर सामानाची ने-आण करण्यासाठी ‘चिनूक’ आणि ‘आपाची अॅटॅक’ ही
हेलिकॉप्टर्स अमेरिकेकडून खरेदी केली जाणार आहेत. पर्वतीय प्रदेशात ‘चिनूक’ हेलिकॉप्टर महत्त्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे, पायदळ सैनिकांसाठी असॉल्ट रायफल, अंडर बॅरेल ग्रेनेड लॉन्चर, लेझर रेंज फाईंडर, कॉम्बॅट
हेल्मेट, दूरसंचार साधने, जीपीएस आणि सुरक्षित रेडिओ प्रणाली खरेदी करण्यासाठी परियोजना-
फ्यूचर इन्फंट्री सोल्जरला गती दिली जात आहे. दहशतवादी सीमा ओलांडून आपल्या देशात
दाखल होता कामा नयेत म्हणून भारत-पाक सीमारेषेवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने साधने
लावली जात आहेत.
डोकलामनंतर पर्वतीय क्षेत्रात प्राथमिकता
भारतीय सेनेच्या कार्याला खर्या अर्थाने बळ देण्याच्या उद्देशाने
भारतीय क्षेत्र सात विभागांमध्ये विभागले गेले आहे. या भागांना कमांड म्हणतात.
त्यांना नवी दिल्लीच्या सेना मुख्यालयाकडून थेट आदेश मिळतात. प्रत्येक कमांडचा
मुख्य एक लेफ्टनंट जनरल हुद्द्याचा अधिकारी असतो. प्रत्येक कमांडमध्ये दोन किंवा
तीन कोरची रचना केलेली असते. शिमलामध्ये स्थापित कमांड ट्रेनिंग कमांडचे कार्य
करते. भारतात आज याप्रकारे एकूण तेरा कोर आहेत.
पूर्णपणे स्वतंत्र कार्य करण्याची क्षमता या कोरमध्ये असते.
कोणत्याही कोरमध्ये दोन किंवा तीन डिव्हिजनचा समावेश असतो, ज्यांना प्रत्यक्ष लढाईच्या वेळी शत्रूशी थेट सामना करावा लागतो.
एका डिव्हिजनमध्ये साधारण 500 अधिकारी आणि 17,000 जवान समाविष्ट असतात. स्ट्राईक कोरचा विचार केल्यास, आपल्याकडे याप्रकारचे तीन कोर आहेत : भोपाळमधील ट्वेंटी वन-सुदर्शन
कोर, मथुरा येथील वन कोर आणि
अंबालामधील टू खड्गा कोर. हे तिन्ही स्ट्राईक कोर पाकिस्तानबरोबर दोन हात करायला
सुसज्ज आहेत. आपल्याकडे सध्या पर्वतीय डिव्हिजन आहे. मात्र, पर्वतीय क्षेत्रात कोरची कमतरता भासत आहे. म्हणूनच आता जी नवीन कोर
बनवली जात आहे तिचे नामकरण होऊन ती 17 कोर या नावाने ओळखली जाईल. जेव्हा ही नवीन कोर आपल्या पुर्या
ताकदीनिशी कार्यरत होईल, तेव्हा 90,000 सैनिक आणि अधिकार्यांच्या सेनेला एक नवी ऊर्जा मिळेल. सुखना येथे
33 वी कोर, तेजपूर येथील 4 कोर आणि नवीन
तयार केलेली दीमापूर येथील 3 कोर अशा तीन
कोर सध्या उत्तर पूर्व प्रदेशात कार्य करीत आहेत. या तिन्ही कोर बचाव कार्य
करण्यासाठी अनुरूप बनवल्या आहेत.
पर्वतीय सीमेवर होणार्या घुसखोरीला रोखण्याकरिता यांचे बळ पुरेसे
आहे. डोकलाम सीमा विवादानंतर या पर्वतीय कोर आणि सीमांत प्रांतात रस्ते बनवण्याचे
काम त्वरित प्राथमिकता देऊन हाती घेतले गेले आहे. परंतु, शत्रूच्या प्रदेशात शिरून आक्रमण करणारी स्ट्राईक कोर आतापर्यंत या
भागात नव्हती. नवीन 17 वी कोर ही कमतरता भरून काढण्यास
पूर्णपणे सक्षम असेल. या कोरमध्ये आकाशात ‘ब्रह्मोस’ आणि ‘आकाश’ मिसाईल स्क्वाड्रनचा समावेश असेल, ज्यामुळे पूर्वोत्तर भागातील हवाई क्षेत्र रक्षणाचे कार्य केले
जाईल, अशी योजना आहे.
भारताचे पहिले आंतरमहाद्विपीय बॅलेस्टिक मिसाईल-‘अग्नी’चा उपयोग आणि भौगोलिक स्थान
यासंदर्भात विचारविमर्श चालू आहे. या कोरच्या तयारीमध्ये हवाई दलाच्या तेजपूर आणि
छबुआ विमानतळावर नवीन ‘सुखोई 30 एमकेआय’ विमानांचे स्क्वाड्रन आणले गेले
आहे. याबरोबरच जोरहाट, गुवाहाटी, मोहनबाडी, बागडोगरा आणि हशीमाराच्या
विमानतळाचा उपयोग हवाईदलाकरिता विकसित केला जात आहे. स्ट्राईक कोरमध्ये हवाईदलातील
आणखी युनिटस् सामील केले जातील. या 17 व्या कोरमध्ये अॅटॅक हेलिकॉप्टर, परिवहन हेलिकॉप्टर आणि अन्य हेलिकॉप्टर व यूएव्ही (ड्रोन) चासुद्धा
समावेश आहे. आपल्याला सदैव सज्ज राहावेच लागेल
No comments:
Post a Comment