Total Pageviews

Thursday, 18 January 2018

श्रीनगरमध्ये महाराष्ट्रातील अनंत जानबा धुरी जवानाला वीरमरण -Jan 19,maha times

 बेळेभाटच्या जवानाला वीरमरण गुलमर्ग येथील घटना
श्रीनगरपासून पन्नास किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गुलमर्ग येथे सेवा बजावत असताना बेळेभाट (ता. चंदगड) येथील अनंत जानबा धुरी (वय ३८) यांना हिमवृष्टीत अडकून वीरमरण आले. गुरूवारी दुपारी त्यांच्या वीरमरणाची बातमी गावात समजली. त्यांच्या निधनाने चंदगड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. शनिवारी (ता. २०) बेळेभाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
१९९८ साली ते बेळगावी येथील आठ मराठा लाईट इंफन्ट्री बटालियनमध्ये भरती झाले होते. बेळगावसह राजस्थान, पंजाब, पुणे, दिल्ली, आसाम याठिकाणी एकोणीस वर्षाहून अधिक काळ त्यांनी सैन्यात सेवा बजावली होती. सध्या ते काश्मिरमधील गुलमर्ग येथे सेवा बजावत होते. श्रीनगरमध्ये बर्फवृष्टी होत असल्यामुळे कमालाची थंडी आहे. तेथील तापमान शुन्यापेक्षाही कमी आहे. शत्रुला रोखण्यासाठी ते या कडाक्याच्या थंडीतही सेवा बजावत होते. गुरूवारी पहाटे त्यांना काहीसे अवस्थ वाटू लागले. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा बर्फामध्ये गुदमरल्याने मृत्यू झाला. दुपारी मृतदेह बर्फातून बाहेर काढल्यानंतर सुभेदार बिर्जे यांनी याबाबतची बातमी त्यांच्या नातेवाईकांना सांगितली.
बेळेभाट हे चंदगड तालुक्यातील पाचशे लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. या गावातील दहा ते बाराहून अधिकजण सैन्यात देशाची सेवा करत आहेत. त्यांच्या निधनाची माहीती गावकऱ्यांना समजताच गावातील व्यवहार व शेतीची कामे बंद ठेवण्यात आली होती.
बुधवारी सायंकाळी जवान धुरी यांनी घरच्यांना फोन करुन या ठिकाणी जास्त थंडी असून अवस्थ वाटत असल्याबाबत कळविले होते. यावेळी पत्नी मनीषा हिचाशी बोलत असताना मध्येच फोन कट झाला. त्यानंतर संपर्क होवू शकला नाही. तोच त्यांच्या आयुष्यातील अखेरचा फोन ठरला.
बढतीपूर्वीच वीरमरण
२००५ साली अनंत यांचा विवाह नांदवडे येथील तुकाराम गावडे यांची मुलगी मनीषा हिच्याशी झाला होता. त्यांना येत्या काही दिवसात त्यांना स्टार गोल्ड मेडल देवून बढती मिळणार होती. त्यापूर्वीच त्यांना वीरमरण आले . त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. धुरी यांची पत्नी आपल्या दोन मुलींच्या शिक्षणासाठी सध्या बेळगाव येथे रहायला आहेत.

आंबिवलीत रेल्वेवरील पुलाची ऐतिहासिक निर्मिती
एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर एल्फिन्स्टन आणि आंबिवली येथील पुलाची निर्मिती करण्यासाठी लष्कराला पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आंबिवली येथील रेल्वेवरील पादचारी पुलाची ऐतिहासिक उभारणी गुरुवारी आंबिवली स्थानकात पार पडली. अवघ्या पंधरा मिनिटात लष्कराचे अभियंते आणि जवानांनी हा पुल उभा केला. देशाच्या प्रत्येक संकटात धावून जाणाऱ्या लष्कराने पहिल्यांदाच रेल्वेवरील पूल उभारणीचे काम पूर्ण केले. या पुलावरील उर्वरित सिमेंट काँक्रीट तसेच अन्य कामे पूर्ण करून तो ३१ जानेवारीपर्यंत पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले.
आपत्कालीन परिस्थितीत देशाला सावरण्यात अनुभवी असलेल्या लष्कराला पहिल्यांदाच रेल्वेच्या पूल उभारणीसाठी पाचारण करण्यात आले होते. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीनंतर रेल्वेच्या यंत्रणेद्वारे पूल उभारणीतील वेळ आणि अडचणी लक्षात घेऊन लष्कराची मदत घेण्यात आली. त्यानुसार गुरुवारी आंबिवली स्थानकातील पादचारी पुलाच्या उभारणीसाठी रेल्वेतर्फे पाच तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे येथील रेल्वे सेवा १० वाजल्यापासून बंद करण्यात आली होती. रेल्वेच्या मदतीने साडेदहाच्या सुमारास लष्कराला कामाच्या ठिकाणचा ताबा देण्यात आला. लष्करातील अभियंत्यांच्या बॉम्बे सॅपर्सच्या पथकाने कामाच्या ठिकाणचा ताबा घेऊन काही मिनिटातच काम सुरू केले. आंबिवली येथे १२ फूट रुंद आणि ६० फूट लांबीचा पूल उभारण्यात येणार होता. या पुलाच्या सांगाडय़ाचे वजन १५. ८४ टन इतके होते. बंगालमधून तयार केले गेलेले याचे भाग यापूर्वीच येथे आणण्यात आले होते. तसेच यापूर्वीच येथे दोनही बाजूंना लोखंडी खांब उभारण्यात आले होते. सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या ९ मिनिटांच्या विक्रमी वेळेत लष्कराच्या जवानांनी येथे गर्डर टाकला. त्यानंतर काही मिनिटातच त्याची जोडणीही पूर्ण करण्यात आली. अवघ्या १५ मिनिटात लष्कराचे काम पूर्ण झाले. काम यशस्वीरीत्या पूर्ण होताच लष्कराच्या जवानांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. तसेच ज्या बॉम्बे सॅपर्सचे अभियंते आणि जवानांनी या कामात सहभाग घेतला होता, त्या पथकाचाही या पहिल्यावाहिल्या कामानंतर जयजयकार करण्यात आला. या वेळी एक ब्रिज कमांडर, एक कमिशन अधिकारी, पाच सल्लागार आणि ४० जवानांचा या कामाला हातभार लागला. या वेळी बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती. आंबिवली येथील पूल हा लष्कराकडून बांधला गेलेला देशातील पहिलावहिला पुल ठरला आहे
पणजी : 
विषारी अमोनिया वायू घेऊन जाणारा टँकर महामार्गावरून वळण घेताना पलटल्याने मोठ्या प्रमाणावर वायू गळती झाली. त्यामुळे परिसरातील लोकांना त्रास होऊ लागल्याने दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, खबरदारीसाठी घटनास्थळाशेजारील संपूर्ण गाव खाली करण्यात आले असून परिस्थितीवर नियंत्रणासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. गोव्याच्या वास्को शहराजवळ शुक्रवारी पहाटे २.४५ वाजता हा अपघात झाला.
To all our Army Stalwarts: Thank you. For keeping us safe and secure. For protecting us without regard for race or sex or condition, or religion or beliefs... For standing guard over us even when we were utterly unaware of the dangers and terrors all around.... For being generous with your praise and reticent in your criticism... for risking life and limb on a daily basis..... for recognizing the difference between our flag and a tricoloured piece of cloth... For always being honourable in every way.... Most of all, for allowing me the privilege of being your course mate and giving me the opportunity to daily say to all my countrymen and countrywomen, with unconcealed and unabashed pride: " *This* is my and your Army." 
So long as you stand, gentlemen, India stands. Happy Army Day.

No comments:

Post a Comment