Total Pageviews

Friday 29 September 2017

किनावर सुरक्षेसाठी तटरक्षक दलाची गस्त वाढवली पाहिजे. सर्व सागरी चेकपोस्टची सुरक्षा कडककरण्यात यावी. याशिवाय सर्व लँडिंग पॉइंटवर नाकाबंदी केली जावी.-BRIG HEMANT MAHAJAN

तटरक्षक दल सक्षम करणे गरजेचे
किनावर सुरक्षेसाठी तटरक्षक दलाची गस्त वाढवली पाहिजेसर्व सागरी चेकपोस्टची सुरक्षा कडककरण्यात यावीयाशिवाय सर्व लँडिंग पॉइंटवर नाकाबंदी केली जावीसागरी किनारपट्टीवर पोलिसांतर्फेसागरी सुरक्षा अभियान राबविण्यात यावेसागरी सुरक्षा आव्हानांचा अभ्यास हिंदुस्थानी नौदल आणिहिंदुस्थानी तटरक्षक दलांतर्गत किमान वर्षातून एकदा केला जावा.
हिंदुस्थानच्या सागरी सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱया तटरक्षक  दलासाठी  केंद्र सरकारने ३१ हजार ७४८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या पाच वर्षांत तटरक्षक दलाला अधिक शक्तिशाली आणि सक्रिय करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे २००८ मध्ये मुंबईत घुसून केलेल्या हल्ल्यानंतर तटरक्षक दलाच्या भूमिकेला महत्त्व आले आहे.
तटरक्षक दलाची टेहळणी क्षमता वाढविण्यासाठी नव्या गस्ती नौका, बोटी, हॅलिकॉप्टर, विमाने आणि अन्य आवश्यक उपकरणे विकत घेण्यात येतील. समुद्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तटरक्षक दलाच्या ताफ्यात २०२२पर्यंत १७५ बोटी व ११० विमानांचा समावेश करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सागरी संपत्तीचे संरक्षण, सागरी पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण, तस्करी, समुद्री चाचांविरोधात कारवाई यांचा मुकाबला करण्यासाठी तटरक्षक दलाला पूर्णपणे सुसज्ज करण्याची योजना आहे. तटरक्षक दलाच्या सध्या ६० बोटी, १८ हॉवरक्राफ्ट, ५२ छोटय़ा इंटरसेप्ट बोटी, ३९ डॉनियर टेहळणी विमाने, १९ चेतक हॅलिकॉप्टर व चार ध्रुव हॅलिकॉप्टर्स आहेत.
१९६० नंतर हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेस सोने, चांदी, विद्युत उपकरणे इत्यादींच्या आखातातून समुद्रमार्गे हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱयापर्यंत करण्यात येणाऱया मोठय़ा प्रमाणातील तस्करीने त्रस्त केले होते. या काळात हिंदुस्थानी नौदलच तस्करीविरोधी कार्यवाही करत असे. त्यांच्याकडे पाच गस्ती विमाने होती. ती अपुरी होती. १९७० नंतर एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन स्थापन करण्याबाबतचे युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉज ऑफ द सीजचे निर्देश, तस्करी, मुंबईच्या किनाऱयानजीकचे तेल शोध आणि उत्पादनामुळे हिंदुस्थानी तटरक्षक दलाची स्थापना आवश्यक झाली.
२०२०पर्यंत हिंदुस्थानी तटरक्षक दलाकडे सामर्थ्यात झालेली वाढ भरघोस ठरणार आहे. नऊ किनारी राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आपल्यापाशी आता किनारी रडार साखळी आहे. वीजकीय-प्रकाशकीय-साधने (Automatic Identification System ) आहेत. रात्रंदिन प्रकाशचित्रक (Night Vision Devices)आहेत. ४६ रडार स्थानकांच्या या साखळीत किनाऱयांवरील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे सामर्थ्य प्राप्त झालेले आहे.
हिंदुस्थानी तटरक्षक दलाच्या अधिकारी व खलाशांचे प्रशिक्षण हिंदुस्थानी नौदलावर अवलंबून आहे. मनुष्यबळातील २०टक्के कमतरता पुढील १० ते १२ वर्षांनंतरच पुरी केली जाईल. मात्र गरज आहे कमतरता लवकर पूर्ण करण्याची. ऍडव्हान्स्ड ऑफशोअर पेट्रोल व्हेसल्स या १०५ मीटर लांब आणि २,३०० टन वजनाच्या नौका हिंदुस्थानी तटरक्षक दलातील सर्वात मोठय़ा नौका आहेत. ऑफशोअर पेट्रोल व्हेसल्स ९० मीटर लांब आणि २,००० टन वजनाच्या नौका असतात. हिंदुस्थानी तटरक्षक दलातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱया या नौका सेवेत आहेत. फास्ट पेट्रोल व्हेसल या ५० मीटर लांब आणि सुमारे ३०० टन वजनाच्या  गस्ती नौका आहेत. इंटरसेप्टर बोटी उथळ पाण्यात जलदगती हस्तक्षेप करण्यास योग्य असतात. एअर कुशन व्हेईकल्स ही किनाऱयालगतच्या पाण्यात, लगतच्या सखल जमिनीत आणि किनारी प्रदेशांत गस्तीकरिता नवे आयाम आणि सामर्थ्य पुरवतात. मात्र खाडय़ांमध्ये, सुंदरबन भागात, सर क्रीक भागात रबरी बोटींची गरज आहे. हिंदुस्थानच्या महासागरी क्षेत्रातील म्हणजेच किनाऱयापासून २०० नॉटिकल मैलांपर्यंत हिंदुस्थानची राष्ट्रीय हित सांभाळण्याची जबाबदारी हिंदुस्थानी तटरक्षक दलाची आहे.
हिंदुस्थानी तटरक्षक दलासमोरच्या कर्तव्यपूर्तीच्या आड येणाऱया कायदेशीर मर्यादा नौका ताब्यात घेणे, अनधिकृत सर्वेक्षणावरील कारवाई, अवैध माहिती संकलनावरील कारवाई इत्यादींबाबत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेकरिता अशा कायदेशीर मर्यादा उठवणे आवश्यक आहे. सखोल समुद्रात प्रादेशिक पाण्यापलीकडे अन्य आर्थिक क्षेत्रात मासेमारी करणाऱया नौकांच्या नियमनार्थ कायदेच उपलब्ध नाहीत. राष्ट्रीय सुरक्षेकरिता आवश्यक कायदे पुढच्या दोन वर्षांत तरी पास केले जावेत. तोपर्यंत वटहुकूम पास करून ही कमजोरी दूर करावी.
संसदीय व्यवहार समिती आणि महालेखाधिकारी व महालेखा निरीक्षक यांच्या निरनिराळ्या शिफारसी /अहवालांवर काही प्रमाणात अमलात आणल्या गेल्या आहेत. मात्र बहुतेकांच्या अंमलबजावणीकरिता सातत्याने आणि नियमितपणे देखरेख करावी  लागेल. तांत्रिक ज्ञानाचा आणि मनुष्यबळ सामर्थ्याचा योग्य वापर केला जावा. किनाऱयावरील वाढती निगराणी, गस्त आणि इतर दलांसोबत संयुक्त किनारी सुरक्षा कवायतींचे आयोजन केले गेले पाहिजे. गुप्तवार्ता दर्जा वाढवणे आणि समुद्री पोलीस, हिंदुस्थानी तटरक्षक दल व हिंदुस्थानी नौदल यांच्यातील समन्वय आणखी सुधारला पाहिजे. हिंदुस्थानी तटरक्षक दलात अधिकाऱयांची कमतरताही आहे. नियत कालावधीत ही तूट भरून काढली गेली पाहिजे.
निवृत्त (डिकमिशन्ड) हिंदुस्थानी तटरक्षक दल नौकांचा वापर तरंगत्या चौक्या म्हणून उच्च जोखीम क्षेत्रांत, खाडय़ांमध्ये आणि नदीमुखांत केला जावा.  प्रत्येक बंदरात आत आणि बाहेर जायचे रस्ते, बोटी उतरण्याच्या जागा, धक्के, नौका ठेवण्याच्या जागा विकसित होत आहेत. त्याचा वेग वाढला पाहिजे. व्यक्तिगत मासेमाराला ओळखपत्र देण्याच्या पद्धती जास्त कार्यक्षम झाल्या पाहिजे. आंतरराष्ट्रीय महासागरी संघटनेच्या अनुसार, २० मीटरहून अधिक लांबीच्या आणि ३०० टनांहून अधिक वजनदार नौकांवरच स्वयंओळख प्रणाली असते, जी उपग्रहावर आधारित आहे.
छोटय़ा नौकांना प्रारण ओळखपत्र (रेडिओ फ्रिक्वेन्सी आय.डी.) देण्याचाही प्रस्ताव आहे. म्हणजे प्रत्येक नौका नोंदवली जाईल. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणे शक्य होईल. ते काम लवकर सुरू व्हावे.
किनाऱयावर सुरक्षेसाठी तटरक्षक दलाची गस्त वाढवली पाहिजे, सर्व सागरी चेकपोस्टची सुरक्षा कडक करण्यात यावी. याशिवाय सर्व लँडिंग पॉइंटवर नाकाबंदी केली जावी. सागरी किनारपट्टीवर पोलिसांतर्फे सागरी सुरक्षा अभियान राबविण्यात यावे. नियमितपणे स्पीड बोटीने किनारपट्टीवर गस्त घालून संशयास्पद बोटींची तपासणी करण्यात यावी. सागरी सुरक्षा आव्हानांचा अभ्यास हिंदुस्थानी नौदल आणि हिंदुस्थानी तटरक्षक दलांतर्गत किमान वर्षातून एकदा केला जावा


No comments:

Post a Comment