Total Pageviews

Friday 15 September 2017

नुकत्याच भारतात आलेल्या रोहिंग्या मुसलमान निर्वासितांविषयी सहानुभूतीचा पाझर फुटलेल्यांना या हाजोंग हिंदू निर्वासितांविषयी कधी पाझर फुटलेला आठवतोय का?- अक्षय जोग


भारत सरकार १९६४ पासून भारतात राहाणार्याध चकमा व हाजोंग निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देणार असल्याची बातमी नुकतीच वाचनात आली. चकमा हे बौद्ध आहेत व हाजोंग हे हिंदू आहेत, जे आताच्या बांगलादेशातील (तेव्हाचा पूर्व पाकिस्तान) चित्तगावमध्ये राहत होते. कपताई जलविद्युत प्रकल्पात त्यांची जमीन पाण्याखाली गेल्यामुळे व धार्मिक छळामुळे ते निर्वासित म्हणून भारतात आले. तेव्हा, रोहिंग्या मुस्लिमांसंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करणारे तथाकथित विचारवंत चकमा आणि हाजोंग निर्वासितांच्या मुद्द्यावर आवाज उठवतील का ? चित्तगावमधील बौद्ध बांगलादेशात अर्धा टक्का असणारे बौद्ध मुख्यत्वे चित्तगाव पर्वतीय क्षेत्रात राहतात. बांगलादेशातील बौद्ध थेरवादी आहेत. चित्तगावमध्ये चकमा, मर्मा, बॉम, चाक, खियांग, खुमी, लुशाई, म्रो, पांखो, तंगचन्या व त्रिपुरा हे ११ वांशिक गट आहेत. हे वांशिक गट ‘झूम’ (शेतीत कापणी झाल्यावर जमीन जाळतात) करतात म्हणून त्यांना ‘जुम्मा’ हे सामायिक नाव पडले आहे. सात लक्ष जुम्मांमध्ये हिंदू, बौद्ध किंवा ख्रिस्ती आहेत. चकमा व मर्मा हे त्यातील मोठे गट असून दोन्ही गट थेरवादी बौद्ध आहेत. हे वांशिक गट स्वत:ला तेथील मूलनिवासी मानतात. कपताई जलविद्युत प्रकल्पाच्या नावाखाली बौद्धांची ससेहोलपट भारताच्या घटना समितीने Chittagong Hill Tracts People's Association ला प्रतिनिधित्व दिले होते. हा भाग भारतात समाविष्ट व्हावा, असे ठाम प्रतिपादन स्थानिक नेत्यांनी बंगाल सीमा आयोगापुढे केले होते व त्यासाठी बौद्धांच्या शिष्टमंडळाने सरदार पटेलांची भेट घेऊन त्यांच्याकडून समर्थनही मिळवले होते, तसेच नेहरूंनीही सांस्कृतिक व धार्मिक आधारावर चित्तगाव पर्वतीय क्षेत्राला भारतात समाविष्ट करण्यात यावे, असे माऊंटबॅटनला सांगितले होते. पण कर्णफुली नदी पूर्व बंगालसाठी जलविद्युत ऊर्जेचा एकमेव स्रोत असल्यामुळे व चित्तगाव या नदीला जोडून असल्यामुळे हा सर्व प्रदेश पाकिस्तानला मिळावा, असा युक्तिवाद मुस्लीमलीग नेत्यांनी केला. मुस्लीम लीग नेत्यांची चिकाटी व कॉंग्रेस नेत्यांची उदासीनता यामुळे स्थानिक नेत्यांचा विरोध असतानाही पंजाब-बंगाल सीमा आयोगाचे अध्यक्ष सर सिरिल रॅडक्लिफ यांनी चित्तगाव पाकिस्तानला दिले. अक्षय जोग पाकिस्तान निर्मितीनंतर १९५३ ला कर्णफुली नदीवर कागदनिर्मिती प्रकल्प व कपताई जलविद्युत प्रकल्पाच्या नावाखाली पद्धतशीरपणे मुस्लीम कुटुंबांना चित्तगावमध्ये स्थलांतर करून वसविण्यात आले. दंगे व अल्पसंख्याकांवर हल्ले सुरू झाले व परिणामत: १९६१ ला ६० हजार जुम्मा लोक निर्वासित म्हणून भारत व म्यानमारमध्ये आले. श्रीलंका व इतर काही सरकारांनी पाकिस्तानकडे याचा निषेध नोंदविल्यावर हे हल्ले कमी झाले. १९६१च्या या स्थलांतरितातील चकमा बौद्धांना अरुणाचल प्रदेशातील तिरप, लोहित व सुबानसिरी जिल्ह्यात वसविण्यात आले. मुस्लिमांचे चित्तगावमध्ये स्थलांतर व मुस्लिमेतरांचे चित्तगावमधून स्थलांतर यामुळे १५ ऑगस्ट १९४७ ला केवळ दीड टक्का असलेली मुस्लीमलोकसंख्या (उर्वरित ९८.५ टक्के मुस्लिमेतरांपैकी ८५.५ टक्के बौद्ध होते) १९६१ ला ११.८ टक्के व १९८१ ला ३४.५ टक्क्यांपर्यंत वाढली. आज चित्तगावमध्ये मुस्लीमबहुसंख्य आहेत. कर्णफुलीवरील प्रकल्पामुळे पर्यावरणाचे नुकसान झाले व ६४० चौरस किमी सुपीक शेतजमीन पाण्याखाली गेली. यात सुपीक जमिनीचा ४० टक्के हिस्सा होता. यामुळे १ लक्ष लोक (बहुतांशी चकमा बौद्ध) विस्थापित झाले. यातील १० हजार निर्वासित म्हणून भारतात आले व अन्य ६० हजार लोकांना सरकारने घोषित केलेली नुकसान भरपाई प्रत्यक्षात मिळालीच नाही. ५.१ कोटी डॉलर्सपैकी प्रत्यक्षात केवळ २.६ लक्ष डॉलर्सचे वाटप झाले. म्हणजे सुपीक जमीन गमावली, वर नुकसानभरपाई नाही किंवा तुटपुंजी भरपाई किंवा परदेशात निर्वासिताचे आयुष्य वाट्याला आले. तसेच या प्रकल्पातून निर्माण केलेली वीज सरकारी कार्यालये, पोलीस ठाणी व सैन्याच्या बराकींना पुरविण्यात आली. १९८३ पर्यंत चित्तगावमधील कपताई, रंगमती व चंद्रघोना या तीन गावांनाच ही वीज मिळत असे, त्यामुळे बहुतांश बौद्ध पूर्वीप्रमाणे अंधारातच राहिले. आज भारतात चकमा व हिजोंग मिळून अंदाजे एक लाख निर्वासित राहत आहेत. बांगलादेशी घुसखोरांना सहज रेशनकार्ड, मतदान अधिकार मिळू शकतात, पण निर्वासितांना भारतीय नागरिकत्वासाठी झगडावं लागतंय. नुकत्याच भारतात आलेल्या रोहिंग्या मुसलमान निर्वासितांविषयी सहानुभूतीचा पाझर फुटलेल्यांना या हाजोंग हिंदू निर्वासितांविषयी कधी पाझर फुटलेला आठवतोय का? बरं हिंदू सोडा, कारण या तथाकथित मानवतावाद्यांना कदाचित हिंदूंची ऍलर्जी असेल, पण बौद्ध चकमांविषयीसुद्धा कधी यांना पाझर फुटलेला ऐकिवात नाही. याला सहानुभूतीचा सिलेक्टिव्ह पाझर म्हणायचे की सिलेक्टिव्ह मानवता ? (संदर्भ- बौद्ध-मुस्लीमसंबंध- आजच्या संदर्भात : डॉ. श्रीरंग गोडबोले, तक्षशिला प्रबोधिनी प्रकाशन, २००९) -

No comments:

Post a Comment