Total Pageviews

Wednesday, 27 September 2017

एकही रोहिंग्या भारतात नको

म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांना भारतात आश्रय दिला पाहिजे म्हणून मानवतेने पाझरणार्‍या काही भारतीय विचारवंतांसाठी फार धक्कादायक बातमी आहे. म्यानमारमधील रखाईन प्रांतात, तिथल्या लष्कराला एका ठिकाणी २८ हिंदूंची प्रेते गाडलेली आढळून आली. म्यानमार लष्कराचा दावा आहे की, हे कृत्य रोहिंग्यांचे आहे. २५ ऑगस्टला टाईम्स नाऊ वृत्तवाहिनीने वृत्त दिले होते की, रखाईनमधील ३०० रोहिंग्यांनी १०० हिंदूंचे अपहरण करून त्यातील ९२ जणांना ठार केले आणि आठ तरुण महिलांचे बळजबरीने धर्मांतर केले. रोहिंग्यांच्या हिंसाचारामुळे या भागातील सुमारे ३० हजार हिंदू व बौद्धांनी पलायन केले आहे. भारतातील मानवतावादी विचारवंतांच्या दृष्टीने अतिशय दीन असलेल्या या रोहिंग्यांच्या या क्रूर वर्तनाची बातमी येताच, या विचारवंतांचे चेहरे बघण्यालायक झाले आहेत. आपले सेक्युलर कवी जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली की, कशावरून म्यानमारच्या लष्करांनीच या हिंदूंना मारले नसेल? रोहिंग्ये असे कशाला करतील? अख्तर सोडले तर बाकीचे विचारवंत अजूनही बिळातच लपून बसले आहेत. रोहिंग्यांच्या म्यानमारमधील हिंदूंवरील अत्याचाराच्या बातम्या येणे सुरू झाल्या आहेत. सेक्युलर मंडळी त्यावर विश्‍वास ठेवणार नाहीत, हा भाग वेगळा. जेव्हापासून रोहिंग्यांना म्यानमारमधून पिटाळून लावणे सुरू झाले आहे, तेव्हापासून भारतीय वृत्तपत्रसृष्टीत बिचार्‍या रोहिंग्यांची दुर्दशा दाखविणारी शेकडोंनी छायाचित्र प्रकाशित होत आहेत. ही छायाचित्र बघून कुणाचेही हृदय गलबलून गेल्याशिवाय राहणार नाही. पण जेव्हा काश्मिरी पंडितांना काश्मीर खोर्‍यातून अशाच क्रूरतेने हाकलण्यात आले, तेव्हा किती छायाचित्रे प्रकाशित झाली होती, हे आठवावे. म्हणजे दोगल्या मीडियाचे खरे स्वरूप लक्षात येईल. भारत सरकारजवळ जी गुप्तचर माहिती आहे, त्यावरून हे रोहिंग्ये दहशतवादी कार्यात गुंतलेले आहेत. काही रोहिंग्ये, हवालामार्फत पैशांचे व्यवहार करणे, मानवी तस्करी, भारतातून नकली ओळखपत्रे तयार करणे इत्यादी अवैध कृत्यात सहभागी असल्याचेही उघड झाले आहे. दहशतवादी पृष्ठभूमी असलेले काही रोहिंग्ये जम्मू, दिल्ली, मेवात आणि हैदराबाद येथे सक्रिय असल्याचेही आढळून आले आहेत. गुप्तचर विभागाला तर अशीही माहिती मिळाली आहे की, आयएसआय व इसिस यांच्या कटकारस्थानात काही रोहिंग्ये सहभागी आहेत. यातून त्यांची भारताच्या पूर्वोत्तर भागात जातीय हिंसाचार घडवून आणायची योजना आहे. एवढेच नाही तर, भारतातील बौद्ध नागरिकांविरुद्ध हिंसाचार घडवून आणण्याचीही योजना आहे. हे असे सर्व चित्र असताना, रोहिंग्यांना भारतात आश्रय द्यावा, म्हणून कशी काय मागणी केली जाते? आसामचे अर्थमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, पूर्वोत्तर राज्यात घुसखोरांबाबतचा आमचा अनुभव अतिशय वाईट आहे. या भागातील एकूण ३० टक्के लोक घुसखोर आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून मूळ भारतीय लोक आपली ओळख व अस्तित्व वेगाने गमवित आहेत. आमची मंदिरे आणि बौद्ध मठ यांच्यावर हे लोक आक्रमण करीत आहेत. घुसखोरांच्या बाबतीत आम्ही अतिशय गंभीर संकटात आहोत. म्हणून पूर्वोत्तर राज्यातील माझ्या अनुभवावरून सांगतो की, यापुढे भारतात एकाही घुसखोराला आश्रय अथवा शरणार्थी म्हणून मान्यता देण्यात येऊ नये. आम्ही सुरक्षित प्रदेशात राहतो. पूर्वोत्तर भागात या घुसखोरांमुळे काय समस्या निर्माण झाल्या आहेत, याची आपल्याला सुतरामही कल्पना नसते. त्यामुळे केवळ मानवतेच्या दृष्टीने गहिवर काढत प्रतिक्रिया देणे आपल्यासारख्यांना फार सोपे असते. जो भोगतो, तोच जाणू शकतो. मुसलमान साधारणत: कसा वागतो, कसा विचार करतो, याचा चांगलाच अनुभव भारतीयांना आहे. शेकडो वर्षांचा इतिहास याचा साक्षी आहे. त्यामुळे परदेशातील बौद्ध, हिंदू भारतात शरणार्थी म्हणून येत असतील तर त्याची आम्हाला भीती नसते. पण मुसलमान येत असेल तर, तो कुठल्या क्षणी तुमच्यावर उलटेल याची खात्री नाही. काही जणांचे म्हणणे आहे की, येणार्‍या रोहिंग्यांमधून जे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक वाटतात त्यांना भारतात घेऊ नका. प्रत्येक रोहिंग्या काही दहशतवादी नाही. त्यांचे हे म्हणणे चूक नाही. पण आज जो दहशतवादी नाही तो उद्या होणार नाही, याची खात्री हे मानवतेचे ठेकेदार देतील काय? आणि जर आज निरुपद्रवी वाटणारा रोहिंग्या उद्या तुमच्यावर उलटला तर या मानवतेच्या ठेकेदारांना काय शिक्षा द्यायची, हे आजच ठरविले पाहिजे. सरकारने अशी अट टाकली तर मानवतेचा एकही ठेकेदार समोर येणार नाही. कारण चोपड्या गोष्टी बोलणे, प्रवचने देणे, लेख लिहिणे फार फार सोपे असते. भारताच्या सुदैवाने आज केंद्रात भाजपाचे सरकार आहे. देशात भाजपाची शक्ती प्रचंड वाढली आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना खात्री आहे की, यावेळी तरी मानवतेच्या नावाने ओरडा करीत घात होणार नाही. दुसरे असे की, आज भारताचे म्यानमारसोबत अतिशय चांगले संबंध आहेत. पूर्वोत्तर राज्यातील दहशतवाद, अवैध तस्करी यांच्या विरोधात म्यानमारचे अभूतपूर्व सहकार्य मिळत आहे. त्याचादेखील विचार झाला पाहिजे. शेवटी एक प्रश्‍न उरतोच व तो म्हणजे, अहिंसेचे पुजारी म्हणविले जाणारे बौद्ध भिक्खू या रोहिंग्यांच्या विरोधात एवढे का म्हणून संतापले की त्यांना एकही रोहिंग्या म्यानमारमध्ये नको आहे! याचा कुणी विचार केला का? भारतात उठसूठ संविधान हातात घेऊन फडकविणारे बौद्ध नेते आता चूप का आहेत? संघाला एके४७ सारखी शस्त्रे कशी मिळतात म्हणून रात्र-रात्र झोप न येणारे प्रकाश आंबेडकरांसारखे भुक्कड बौद्ध नेते या विषयावर तोंड का उघडत नाहीत? जेव्हा तुमच्या जिवावर बेतते, तेव्हा अहिंसा, करुणा वगैरे सर्व उपदेश गुंडाळून ठेवावा लागतो. नाहीतर तुमचे अस्तित्वच नाहीसे होते. तिबेटमध्ये काय झाले? अहिंसेचा जप करता करता, त्यांना केव्हा देशाबाहेर पळून जावे लागले ते कळलेच नाही. भारतातही हीच परिस्थिती आली होती. हिंदू-मुसलमान भाऊ-भाऊ म्हणत, केव्हा भारताचे तीन तुकडे झाले, समजलेच नाही. मुसलमानांचा इतिहास, जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात जा, विश्‍वासार्ह नाही. ते कमी संख्येत असले की, दबून असतात. पण एकदा का त्यांची पुरेशी संख्या झाली की, ते तुमच्यावर उलटलेच म्हणून समजा. आपले माजी उपराष्ट्रपतींचेच घ्या ना! पदावर होते, तोपर्यंत त्यांना असुरक्षित वाटत नव्हते. पदावरून दूर होताच, भारतात मुसलमान असुरक्षित आहेत, अशी आरोळी त्यांनी ठोकली. खरे तर, म्यानमारच्या सीमेवर हमीद अन्सारींसारख्यांना पाठवून त्यांना म्हणावे की, या रोहिंग्यांना समजावून सांगा की, बाबांनो, भारतात येऊ नका. इथे भारतीय मुसलमानच अतिशय भीतीत जगत आहेत. त्यात तुम्ही कशाला येता? पण तसे होणार नाही. मोदींच्या विरुद्ध मुसलमानांची मते एकत्र व्हावीत म्हणून, भारतात मुसलमान दहशतीत आहे, अशी आरोळी ठोकायची असते आणि बाहेरून कुणी मुसलमान भारतात येत असेल तर त्याचे हात पसरून स्वागत करायचे असते. तसे नसते केले तर, जम्मूत २० हजार रोहिंग्यांचे पुनर्वसन झालेच नसते. बंगालपासून सुमारे २००० किमी दूर त्यांना वसविण्याचे काय कारण असावे आणि तेही काश्मिरात नाही, बरं का! जम्मूत. कारण काश्मिरात वसविले तर त्यांच्या रक्तात भेसळ होईल ना! जम्मूत वसवा. नाहीतरी तिथली हिंदूंची संख्या अल्पमतात आणायचीच आहे. सोनिया गांधींच्या संपुआ सरकारचे हे पाप आहे. मोदी सरकारने अतिशय कठोरपणे निर्णय घेऊन, एकाही रोहिंग्याला भारतात स्थान मिळणार नाही, हे बघणे, म्हणूनच आवश्यक झाले आहे.

No comments:

Post a Comment