Total Pageviews

Saturday, 2 September 2017

काश्मिरमध्ये लष्कर-ए-तोएबाचा दहशतवादी ठार, लेफ्टनंट फय्याजच्या हत्येत होता सामिल

Sep 02, 2017, 11:37 AM IST काश्मिरमध्ये लष्कर-ए-तोएबाचा दहशतवादी ठार, लेफ्टनंट फय्याजच्या हत्येत होता सामिल श्रीनगर (जम्मू-काश्मिर)- येथील कुलगाम परिसरात झालेल्या भीषण चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी इश्फाक पढेर याला भारतीय लष्कराच्या जवानांनी ठार मारले. काही महिन्यांपूर्वी काश्मिरमध्ये झालेल्या चकमकीत लेेफ्टनंट उमर फय्याज शहीद झाले होते. याच दहशतवाद्याने त्यांचा जीव घेतला होता. काश्मिरमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन क्लिन - 26 ऑगस्ट रोजी काश्मिरच्या कुपवाडा येथे जवानांनी एका दहशतवाद्याला ठार मारले. - 13 ऑगस्ट रोजी शोपियॉंत झालेल्या एन्काऊंटरमध्ये 3 दहशतवादी ठार मारण्यात आले होते. यात 2 जवान शहीद झाले होते. - 5 ऑगस्ट रोजी सोपोरमध्ये जवानांनी एका एन्काऊंटरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. यावेळी एका पोलिस जखमी झाला होता. दरम्यान, जवानांनी 3 एके-47 जप्त केल्या होत्या. - 4 ऑगस्ट रोजी जवानांनी अनंतनागमध्ये एका एन्काऊंटमध्ये यावर नावाच्या एका दहशतवाद्याला ठार मारले होते. यावरने एका महिन्यापूर्वीच हिज्बुल मुजााहिदीन जॉईन केले होते. काश्मिरात झालेल्या दगडफेकीच्या अनेक घटनांमध्ये त्याचा हात होता. यावरने एका पोलिस गार्डची सेल्फ लोडिंग रायफर हिसकावून नेली होती. - 3 ऑगस्ट रोजी कुलगाममध्ये जवानांनी 2 दहशतवाद्यांना ठार मारले होते. - 1 ऑगस्ट रोजी पुलवामा येथील हाकरीपोरा परिसरात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांंडर अबू दुजाना याच्यासह दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते. पाकव्याप्त काश्मिरातील गिलगित-बल्तिस्थान येथील तो रहिवासी होता. - 30 जुलै रोजी पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी आणि जवानांमध्ये जोरदार चकमक उडाली होती. यावेळी तहाब परिसरात 2 दहशतवादी ठार मारण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यातील सम्बूरा, तहाब आणि याच्या लगत असलेल्या परिसरात लोकांनी जोरदार निदर्शने केली होती. त्यामुळे जवानांना हवेत गोळीबार करावा लागला होता

No comments:

Post a Comment