Total Pageviews

Friday 1 September 2017

संयमाने मुत्सद्दीपणे प्रतिक्रिया देत भारताने ज्या प्रकारे आपल्या सीमांवरील गस्त आणि सुरक्षा वाढवली आणि संवेदनशील क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून ठोस पावलांनी आघाडीच्या मोर्चांवर ज्या प्रकारे जवान तैनात करून सुरक्षेचे ठोस उपाय केले, त्यामुळे चीनला मात्र घाम फुटला आहे. चीनची हतबलता निरर्थक आक्रोशाच्या रूपात फुटत आहे.


‘द आर्ट ऑफ वॉर’ला युद्धाच्या रणनीतीसाठी जगातील सर्वश्रेष्ठ पुस्तकांमध्ये स्थान आहे. आपल्या या पुस्तकात सून त्सू म्हणतात की, युद्ध न लढताच आपल्या शत्रूंवर वर्चस्व प्राप्त करणे, हेच युद्धाच्या रणनीतीचे सर्वोच्च स्वरूप आहे. जुन्या काळातील चिनी योद्धा आणि सैन्य रणनीतीचा सर्वमान्य सिद्धांत देणारा सून त्सू ज्या कालखंडात जन्माला आला, चिनी परंपरेनुसार त्या काळाला वसंताच्या पानगळीचा कालखंड असे म्हटले जाते. सून त्सू यांचा हा उपरोक्त सिद्धांत दोन प्राचीन राष्ट्रांकरिता एकाच वेळी इतका तंतोतंत लागू होईल, असा विचारही कुणी केला नसावा. भारताच्या स्वातंत्र्यदिनी लडाखच्या पेंगोंग झीलच्या किनार्याेवर चिनी सैनिकांनी भारतीय क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि निर्धाराने सरसावलेल्या व मुत्सद्दी भारतीय जवानांनी या चिनी सैनिकांना पुन्हा त्यांच्या जागी परत पाठविले. अशा स्थितीत प्रत्येकांच्या मनात एक प्रश्नद नक्कीच उठत आहे की, ‘डोकलामच्या मुद्यावरून भारत व चीन यांच्यात युद्ध होणार आहे काय?’ किंवा, ‘काय, दोन्ही देश युद्धाविना युद्धाच्या रणनीतीच्या सर्वोच्च स्वरूपाला साकार करू शकतील?’ शेवटी विजय कुणाचा होणार? अर्थातच, जो संयम राखेल आणि योग्य पावले टाकून समोर जाईल, तोच…! डोकलामच्या संघर्षात भारत आणि चीनच्या आजवरच्या दृष्टिकोनावर सातत्याने लक्ष ठेवून असलेल्या विशेषज्ञांना असे वाटत आहे की, हळूहळूच का होईना, पण भारत या प्रकरणात जागतिक मानदंडानुसार आघाडी घेत असल्याचेच दिसून येत आहे. संयमाने मुत्सद्दीपणे प्रतिक्रिया देत भारताने ज्या प्रकारे आपल्या सीमांवरील गस्त आणि सुरक्षा वाढवली आणि संवेदनशील क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून ठोस पावलांनी आघाडीच्या मोर्चांवर ज्या प्रकारे जवान तैनात करून सुरक्षेचे ठोस उपाय केले, त्यामुळे चीनला मात्र घाम फुटला आहे. चीनची हतबलता निरर्थक आक्रोशाच्या रूपात फुटत आहे. उत्तराखंडमधील चामोलीपासून तर जम्मू-काश्मिरातील लडाखपर्यंत आरडाओरड करून, त्याचत्याच धमक्या व शिव्या देऊन आणि भारतीय जवानांच्या आक्रमकतेपुढे पुन्हा माघार घेऊन चीनला नेमके काय साध्य होत आहे? सीमेवर कुणीही प्रोत्साहित केले नसतानाही चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या संतापाच्या प्रदर्शनामुळे ठिकठिकाणी संघर्षाचे चित्र निर्माण केले आहे. यामुळे चीनच्या अनावश्यक दादागिरीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आणि जगभरात हा देश हास्यास्पद ठरला, हा भाग वेगळाच. युद्ध होणार की नाही, हा प्रश्नठ भविष्यावर सोडून चीनच्या या थयथयाटामुळे या देशाला एका नव्या स्थितीत गुंतविले आहे. ही स्थिती त्या पूर्वीच्या स्थितीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे, जी स्थिती चीनने मोठ्या परिश्रमाने चार महिन्यांपूर्वी निर्माण केली होती. चीनने १४ मे रोजी २९ देशांच्या उपस्थितीत ‘वन बेल्ट वन रोड’चे स्वप्न विकण्याचा प्रयत्न केला होता. या काळात चीनने ज्या शिखरावर पाय ठेवला होता, त्याच चीनला डोकलाम मुद्याने एका झटक्यात खाली आणले नाही काय? चीनचा चेहरा आता सर्व जगापुढे आला आहे, चीनची खेळीच बिघडत चालली असल्याचे दिसत आहे. भूतान नेहमीच भारतासोबत होता आणि आजही आहे आणि चीन केवळ आपल्या दादागिरीचे दर्शन घडवत आहे. नेपाळ आतल्या आत आशंकांच्या गर्तेत अडकला आहे. श्रीलंका हंबनटोटा बंदर विकसित करण्याच्या करारात कॅबिनेटमध्ये बदल करून चीनच्या जाळ्यात अडकण्याच्या आधीच सतर्क झाला आहे आणि भारत, भारत तर अशा जाळ्यात कधी अडकलेलाच नव्हता! ‘वन बेल्ट, वन रोड’ आणि समुद्री रेशम मार्ग प्रत्यक्षात अर्ध्या डझनापेक्षा जास्त रस्ते आणि समुद्री कॉरिडोरमध्ये एका गुलदस्त्याप्रमाणे आहे. हे असे मार्ग आहेत, जे जगाला चीनशी जोडतात आणि चीनला जागतिक पुरवठादार म्हणून समोर आणतात. हे स्वप्न चीनची शतकभरातील परियोजना आहे. हे एक असे स्वप्न आहे, ज्याच्या पूर्ततेसाठी ड्रॅगनरूपी चीनने आपले सर्वस्व पणाला लावले आहे. सैनिकांच्या व्यवहारावर जी अधीरता आणि अनावश्यक संतापाचा उद्रेक होत आहे, चीन जर त्याची दखलही घेत नसेल, तर त्याचा एकच अर्थ आहे की, हा देश स्थानिक चौक्यांवर सैन्याचे मनोबल थोपविण्यासाठी आपल्या सैनिकांना भलेही काही सूट देत असेल, पण जागतिक व्यासपीठावर त्यांच्या व्यवहाराला योग्य ठरविताना चीनला घाम फुटत आहे. चिनी प्रवक्ता हुआ चुनयिंग यांना पत्रकारांनी जेव्हा डोकलाम मुद्यावर प्रतिक्रिया विचारली, तेव्हा त्यांना थेट बगल दिली आणि या घटनेची आपल्याला कुठलीच माहिती नसल्याचे उत्तर दिले. काही विशेषज्ञांनी या प्रकाराला, दुसर्यां ना धमकावण्याची चीनची वृत्ती आणि आपल्या चुकांवर डोळे बंद करून मुजोरी करण्याचा चीनचा अंदाज अशा अर्थाने घेतले. पण, सत्यता अशी आहे की, आता चीनच्या दादागिरीचे दिवस संपलेले आहेत. ही कुटनीती नसून, कूटनीतिक अपयश आहे. ज्यामुळे चीन डोकलाम मुद्यात पडल्यानंतर संभ्रमात अडकला आहे आणि राजनयिक क्षेत्रात इतक्या घडामोडी होत असतानाही जागतिक व्यासपीठावर चीनच्या तोंडाला कुलूप लागले आहे. ही भीती चीनला वाटायलाच हवी. कारण, डोकलाम फारच लहान जागा आहे आणि त्यावर दोन्ही देशांनी लावलेला डाव फारच मोठा आहे. चीनची इच्छा नसतानाही येथे एक असे समीकरण तयार झाले आहे, जिथे अडवणूक करून किंवा युद्ध करून चीन काहीच सिद्ध करू शकणार नाही. चीनसाठी सर्वाधिक सतावणारा प्रश्ने आहे आहे की, काय, या लहानशा आघाडीवर तो युद्ध छेडण्यासाठी तयार आहे काय, जे नंतर मोठ्या युद्धात परिवर्तित होण्याची शक्यता फार जास्त आहे. प्रत्यक्षात, कम्युनिस्ट पार्टीत शि जिनपिंग यांच्या मार्गातील अडथळ्यांना यशस्वीपणे हटवताना कदाचित कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीनमधील एका घटकाला असे वाटू लागले की, जागतिक राजकारणही पक्षीय राजकारणाप्रमाणेच जोर-जबरदस्तीने चालविले जाऊ शकते. त्यांना एका सत्यतेचा विसर पडला की, साम्यवाद, तानाशाही जिथे शक्तिशाली बंडखोरांचा आवाज दाबून आणि विरोधकांना नेस्तनाबूत करून समोर जात असते, तिथे जागतिक व्यवस्थेत राष्ट्रांच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेचा सन्मान फार जास्त महत्त्व ठेवत असतो. चीनने साम्यवादाचे ढोल बडवले. चीनने लोकाहीची खूप गळचेपी केली. हे सर्व करीत असताना, चीनने आपल्याच परंपरागत गोष्टी, कारवाया करून तो आपल्या प्रतीक पुरुषांचा मार्ग विसरला. चीन कन्फ्युशियसला तर विसरलाच होता. सून त्सूची शिकवणही विसरला. युद्ध न करता आपल्या शत्रूंवर नियंत्रण मिळविण्याण्याऐवजी विभिन्न मार्ग अवलंबून अनेक देशांशी भांडण मोल घेतले. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, चीनचा आगामी मार्ग सुलभ नाही, हे त्याने लक्षात असू द्यावे. हेच जर त्यांच्या रणनीतीचे अत्युच्च रूप असेल, तर या वसंताची पानगळ निश्चिआत आहे…!

No comments:

Post a Comment