Total Pageviews

Tuesday, 11 July 2017

WATCH ME LIVE ON JAI MAHARASHTRA 9PM- 10 PM (RECORDED EARLIER) AND ABP MAJHA 9PM -10 PM ATTACK ON AMARNATH YATRA


अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ला Maharashtra Times | Updated: Jul 11, 2017, काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या हल्ल्यात ७ जण ठार झाले आहेत. अनंतनागमधील बेंटेगू आणि खानबल भागात दहशतवाद्यांनी हल्ले केले. यात ११ भाविक जखमी झाले असून या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांपैकी दोन भाविक महाराष्ट्रातील पालघरचे आहेत. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी आज जम्मू-काश्मीर बंदची हाक दिली आहे. अमरनाथ यात्रेवरील दहशतवादी हल्ल्यात पालघरच्या डहाणूमधील रहिवाशी निर्मलाबेन ठाकोर आणि उषा सोनकर ठार झाले आहेत. तसेच भाविकांची ही बस गुजरातच्या वलसाडमधील ओम ट्रॅव्हल्सची असून या बसच्या मालकाचा मुलगाही या हल्ल्यात जखमी झाला आहे. या हल्ल्याचा निषेध म्हणून विरोधकांनी जम्मू-काश्मीर बंदची हाक दिली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू, रामबन, सांबा, कठूआ आणि उधमपूर येथे हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही आज तातडीची बैठक बोलावली असून परिस्थितीचा आढावा घेणार आहे. दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेवर हल्ला केला असला तरी दहशतवाद्यांना भीक न घालता ही यात्रा सुरूच राहणार असल्याचं मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी स्पष्ट केलयं. तसेच यात्रेसाठी दुसरा गट रवाना करण्यात आला आहे. अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यात ७ जण ठार झाले आहेत. अनंतनागमधील बेंटेगू आणि खानबल भागात दहशतवाद्यांनी हल्ले केले. यात ११ भाविक जखमी झाले आहेत. रात्री साडेआठच्या सुमारास दहशतवाद्यांनी हे हल्ले केले. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. मृत भाविक गुजरातच्या वलसाडचे रहिवासी आहेत. अनंतनाग जिल्ह्यात बटिंगू आणि खानबल भागात दहशतवाद्यांनी पोलीस पथकांवर हल्ला केला. या वेळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. पण या गोळीबारात भाविकांची बस सापडली. यात ७ भाविकांचा मृत्यू झाला तर ११ जखमी झाले, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी दिली. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बसमधील दोन भाविक जागीच ठार झाले. तर अनंतनागच्या जिल्हा रुग्णालयात नेत असताना गंभीर जखमी असलेल्या चार जणांचा मृत्यू झाला. दरम्यान सीआरपीएफच्या ४० आणि ९० या दोन बटालियनच्या जवानांना घटनास्थळी रवाना करण्यात आलं आहे. जम्मू, उधमपूर, कठुआ, सांबा आणि रामबन येथे हायअलर्ट देण्यात आला आहे. तसंच जम्मू-श्रीनगर महामार्गावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. अमरनाथ यात्रेवरील हल्ला भ्याड, क्लेशदायक आहे. अशा भ्याड हल्ल्याने भारत कधीही खचणार नाही, असं मोदी म्हणालेत. तर दहशतवादी हल्ल्याने यात्रा थांबणार नाही. अमरनाथ यात्रा सुरूच राहणार, असं मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितलं. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत दहशतवाद्यांचं हे कृत्य अमानवीय असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी टि्वटरवरून हल्ल्यातील मृृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्या बसवर सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला असून किमान १४ जण या घटनेत जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जम्मू- काश्मीरमध्ये सध्या अमरनाथ यात्रा सुरु असून या यात्रेसाठी देशभरातील भाविक मोठ्या प्रमाणात राज्यात दाखल होतात. २९ जूनपासून या यात्रेला सुरुवात झाली होती. सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी बातिंगूमध्ये अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्या भाविकांच्या बसवर हल्ला केला. या हल्ल्यात आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून १४ जण या घटनेत जखमी झाले. जखमींमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्या बसवर हल्ला करण्यात आला त्या बसची नोंदणी नव्हती अशी माहिती समोर येत आहे. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची आणि बसची नोंदणी केली जाते. नोंदणी केलेल्या बसला सुरक्षा पुरवली जाते. त्यामुळे दहशतवाद्यांनी याच बसला लक्ष्य केल्याचे उघडकीस आले आहे. हल्ल्याचे वृत्त समजताच महामार्ग बंद करण्यात आला असून सीआरपीएफची अतिरिक्त तुकडीही अनंतनागच्या दिशेने रवाना झाली आहे. बसमध्ये एकूण २० भाविक होते. हे सर्व जण गुजरातचे रहिवासी असल्याचे सूत्रांकडून समजते. अमरनाथ यात्रेवर यंदा दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. सुरक्षा व्यवस्थेची दक्षता घेण्यात आली असून भाविकांच्या केसालाही धक्का लागणार नाही असा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला होता. मात्र त्यानंतरही हा हल्ला झाल्याने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे ब्रिगेडिअर हेमंत महाजन युद्ध-सेवा-मेडल MADHAVI PRAKASHANDATTAKUTI,1416,SADASHIV PETH,PUNE 411030 020-24474762,/24475372 आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे ब्रिगेडिअर हेमंत महाजन माझ्या या पुस्तकाला वर्ष २०१६ चे ग्रंथोज्जनक पारितोषिक मिळाले आहे. http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5451077040939915355?BookName=Aavhan PROXY WAR IN JAMMU KASHMIR :A WINNING STRATEGY- BY BRIG HEMANT MAHAJAN CONTACT SUNIL JANGAM-9930156891(MUMBAI) http://rmponweb.org/publication_proxy_war.php

No comments:

Post a Comment