देशविरोधी घोषणा आणि कारवायांसाठी कुख्यात असलेले दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) परत एकदा चर्चेत आले आहे. तिथे लष्कराचा रणगाडा ठेवण्यावरून वादंग माजले आहे. कारगिलचा विजय दिन आम्हा भारतीयांसाठी अभिमानाचा आणि शौर्याची पूजा करण्याचा जसा दिवस आहे, तसा तो लष्कराच्या तिन्ही दलांसाठी एक मोठी उपलब्धी असल्यामुळे विजय साजरा करण्याचा आहे. गेल्या रविवारी प्रथमच जेएनयूमध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. वास्तविक पाहता, कारगिल विजय दिवस हा २६ जुलै. परंतु, या दिनानिमित्त देशात अनेक ठिकाणी हा दिवस साजरा करण्यात आला, तसाच तो जेएनयूमध्ये साजरा करण्यात आला. हा दिवस काही ठिकाणी विजय सप्ताह म्हणूनही साजरा केला जात आहे. यानिमित्ताने जेएनयुमध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, माजी लष्करप्रमुख व परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग, क्रिकेटपटू गौतम गंभीर, प्रसिद्ध लेखक राजीव मल्होत्रा, निवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्षी आणि बरेच मान्यवर उपस्थित होते.
कारगिल विजयदिनाचे निमित्त साधून जेएनयूचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी केंद्रीय मंत्र्यांना विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्राभिमान यासोबतच सैन्याचा त्याग, बलिदान या स्मरणार्थ जेएनयू विद्यापीठ परिसरात लष्कराचा रणगाडा स्मृतिरूपात ठेवण्याची विनंती केली. वास्तविकतः यात वावगे असे काहीच नाही. आपल्या देशाच्या रक्षणार्थ बलिदान देणार्या सैन्याविषयी सर्वत्र आदरभाव आढळतोच. राष्ट्रध्वज, शहीदस्मारके, युद्धात वापरली जाणारी विमाने, रणगाडे, युद्धनौका ही येणार्या पिढीला आपल्या देशाच्या उज्ज्वल सैन्यपरंपरेची आठवण करून देतात. देशात अनेक ठिकाणी, प्रमुख चौकात, उद्यानात जुनी विमाने, रणगाडे याच स्मरणासाठी आणि स्फूर्तीसाठी ठेवलेली आहेतच.
खरेतर कुलगुरूंच्या या सूचनेचे स्वागतच व्हायला हवे होते. परंतु, परत एकदा जेएनयूछाप काही विद्यार्थी आणि त्यांचे शिरोमणी यांनी अनाठायी विरोध दर्शविला. ९ फेब्रुवारी २०१६ रोजी जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा आणि अफजल गुरूचे महिमामंडन करण्यात आले होते. परंतु, आताचे सरकार आणि पहिलेचे सरकार यात जमीन-अस्मानचा फरक आहे, हे नतद्रष्टांना बहुदा ठाऊक झाले असावे. तत्कालीन विद्यार्थी नेता कन्हैया आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक करून खरपूस पाहुणचार देताच ‘भारत तेरे टुकडे होंगे’ म्हणणारे सूर बदलून ‘हमे चाहिए भुकसे आजादी’ म्हणू लागले. अर्थातच ‘लातोंके भूत बातोंसे नही मानते’ असे म्हणतात ते याचसाठी! कन्हैयासारखे चाळिशी गाठलेले आणि जनतेच्या घामाच्या पैशावर जगणारे परजिवी बांडगुळं जेएनयूमध्ये नक्की कोणते प्रौढ शिक्षण घेतात, ते कळायला मार्ग नाही. जागोजागी कंडोमचा कचरा, दारूच्या बाटल्यांचा खच, मादक पदार्थ, सिगरेटचा उडणारा धुराळा यांत नक्की कोणते संशोधन ही मंडळी शिक्षणाच्या नावावर करतात, हे बाहेर आले पाहिजे.
प्रशासनाला अशा गोष्टी माहीत नसतील असे नाही. परंतु, यावर थेट कारवाई करण्यासाठी त्यांचे हात कुठे कचरतात, हे माहिती नाही. मागच्या वर्षीचा गोंधळ बघता, प्रशासनाने जागोजागी सीसीटीव्ही लावणे आणि पोलिस बंदोबस्ताची शिफारस केली होती. परंतु, या टोळक्यांनी ती योजना लगेच हाणून पाडली. कारण असे झाले तर आपले कृष्णकृत्य जगासमोर येणार, दारू पिऊन झिंगलेले विद्यार्थी दिसणार वगैरे म्हणून ही मंडळी लगेच सावध झाली. आता रणगाड्याच्या निमित्ताने परत या परजिवी बांडगुळांचा विरोध समोर आला आहे. कर नाही त्याला डर कशाला? परंतु, जेएनयूच्या वामपंथी कंपूत बहुदा ‘चीनमध्ये तियानमेन चौकात चिरडलेल्या विद्यार्थी आंदोलनाची’ धास्ती निर्माण झाली असावी. आता आपण लोकशाहीवादी राष्ट्रात राहत असल्याचे बहुदा ते विसरले असावे. अन्यथा त्यांनी लष्कराच्या रणगाड्याला विरोध करण्याचा नीचपणा केलाच नसता.
काहीही असो, कारगिल विजयदिनाचे औचित्य साधून जेएनयूच्या देशभक्त विद्यार्थ्यांनी शहीदांच्या स्मरणार्थ जेएनयू प्रवेशद्वार ते कन्वेंशन सेंटरपर्यंत भव्य राष्ट्रध्वज हातात घेऊन राष्ट्रभक्तीचा गजर करीत जो तिरंगा मार्च काढला तो खरंच अभिमानास्पद आहे. रणगाड्याच्या नावाखाली शहीदांच्या स्मृतींना, बलिदानाला विरोध करणार्या नागड्यांनी विरोध केला तर जनतेनेच आता अशा देशद्रोह्यांना धडा शिकविला पाहिजे!
No comments:
Post a Comment