Total Pageviews

Thursday, 6 July 2017

सोशल मीडिया आणि दहशतवाद


आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद संपवण्याचे आणि दहशतवादविरोधी कडक कारवाई करण्याचे दावे पाकिस्तान करत असतो. मात्र, प्रत्यक्षात पाकिस्तानने दहशतवाद संपवण्यासाठी कोणताही पुढाकार घेतलेला नाही. उलट ज्या संघटनांवर बंदी घातलेली आहे अशा संघटना आजही समाज माध्यमांतून सक्रिय आहेत. या माध्यमातून पाकिस्तानमध्ये खुलेआम दहशतवादी विचारसरणी पसरवण्याचे काम या दहशतवादी संघटना राजरोसपणाने करत आहेत. ‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्रामध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बंदी घातलेल्या 64 दहशतवादी संघटनांपैकी 41 संघटना जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटचा वापर खुलेआम करत आहेत. गेल्या महिन्यात ‘डॉन’ने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना ज्यामध्ये शिया आणि सुन्नी संघटना, पाकिस्तानात सक्रिय असलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना, बलुचिस्तान आणि सिंध प्रांतात सक्रिय असलेल्या फुटीरतावादी संघटना यांची पडताळणी केली. यामधून ही धक्कादायक माहिती हाती लागली आहे. अहले सुन्नत वल जमात (एएसडब्लूजे) ही संघटना दहशतवादी विचारसरणीचा आणि साहित्याचा विस्तार करण्यात फेसबुकवर कार्यान्वित असणारी सर्वात मोठी संघटना आहे. या संघटनेची 200 पेजेस आणि ग्रुप्स आहेत. जीये सिंध मुत्ताहिदा महाज (जेएसएमएम) या संघटनेची फेसबुकवर 160 पेजेस आहेत; तर सिपह-ए-सहाबा संघटनेची 148 पेजेस आहेत. बलुचिस्तान स्टुडंटस ऑर्गनायझेशन आजाद या संघटनेने फेसबुकवर 54 पेजेस बनवलेली आहेत; तर सिपह-ए-मोहम्मदची 45 पेजेस आहेत. त्या व्यतिरिक्त फेसबुकवर लष्कर-ए-झांगवी (एलईझेड), तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, तहरीक-ए-तालिबान स्वात, तहरीक-ए-निफज-ए-शरीयत-मोहम्मदी, जमात -उल-अहरार, 313 ब्रिगेड यांचीही पेजेस आहेत. तसेच शिया संघटना आणि बलुचिस्तानमधील फुटीरतावादी संघटनेव्यतिरिक्त तालिबान-पाकिस्तान यांचाही समावेश असल्याचे म्हटले जाते. या संघटनांच्या फेसबुक खात्यांना आणि पेजेसवरील फुटीरतावादी आणि कट्टरपंथी विचारधारेला खुलेआम मिळणारे समर्थन ही चिंतेची बाब आहे. हत्यारांचा वापर आणि प्रशिक्षण यांच्याशी संबंधित असणार्याम काही समूहांनी यापैकी काही फेसबुक खात्यांना सार्वजनिक पातळीवर लाईक केलेले आहे. ज्या दहशतवादी संघटना समाज माध्यमांमध्ये सक्रिय आहेत त्यांचा मुख्य उद्देश हा तरुणांच्या विचारधारेत परिवर्तन करून, त्यांची माथी भडकावून त्यांना आपल्या विचारधारेत सामावून घेणे असाच असतो, हे सहज लक्षात येते. या संघटना इंग्रजी ऐवजी उर्दू किंवा रोमन उर्दू भाषेतून आपले फेसबुक पेज किंवा समूह चालवतात. यावरून या संघटनांचे लक्ष्य स्थानिक समर्थक मिळवणे हेच आहे. जगभरातील प्रगत देशांसह आशियातील देशांसाठी डोकेदुखी ठरलेली इस्लामिक स्टेट संघटना यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारताच्या दृष्टीने आणखी एक चिंतेची बाब म्हणजे, या निर्बंध घातलेल्या संघटनांचे एक लक्ष्य जम्मू-काश्मीरही आहे. कारण बहुसंख्य पेजेसवर काही काळापूर्वी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे उदात्तीकरण केले जाते. तसेच यातील काही पोस्टस्वर जम्मू-काश्मीर विरोधातही लिहिलेले आढळून आले आहे. दहशतवादी संघटनांकडून सोशल मीडियावर राजकीय भाषणे, व्हिडीओ, ऑडिओ आदी गोष्टी शेअर केल्या जातात. ट्विटर, वेबसाईट, ब्लॉग आदी खात्यांची माहिती त्यात दिली जाते. या पार्श्वाभूमीवर भारताने अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. आजच्या काळात युद्धनीती बदलली आहे. पूर्वीच्या काळी केवळ सीमांवर लक्ष ठेवून राहून देशाचे संरक्षण करता येत असे. तसेच त्यावेळी शत्रू हा एकच किंवा प्रत्यक्ष दृष्टिपथात येणारा असायचा. आज परिस्थिती बदलली आहे. इंटरनेटसारखे कोणतेही बंधन नसणारे आणि सहज उपलब्ध असणारे माध्यम उपलब्ध आहे. त्याचा गैरवापर करण्यात या दहशतवादी संघटना आघाडीवर आहेत. पाकिस्तान सुरुवातीपासूनच दहशतवाद्यांचा संरक्षक राहिला आहे. दहशतवादाच्या रोपट्याला खतपाणी घालून मोठे करण्यात या देशाचा सर्वांत मोठा हातभार आहे. आता या सायबर दहशतवादालाही पाकिस्तान मदतच करतो आहे. ‘आयसिस’सारख्या संघटनांनी केलेले हल्ले असोत किंवा भारतात कारवाया करण्याचे फसलेले कट असोत यासाठीच्या नियोजनामध्ये सोशल मीडियाचा हातभार मोठा राहिला आहे. त्यामुळे समाज माध्यमांना आपली विश्वायसार्हता टिकवून ठेवण्यासाठी काही कठोर उपाय योजणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अशा संघटनांची खाती ज्या देशातून चालवली जातात त्या देशालाही याबाबत जाब विचारण्याची आणि त्यांच्यावर कारवाईबाबत दबाव आणण्याची गरज आहे. फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, गुगल, व्हॉट्स अॅाप, स्कायपी या सोशल मीडियातील बहुतांश कंपन्या अमेरिकन आहेत. अलीकडील काळात अशा पद्धतीच्या आक्षेपार्ह, माथी भडकावणार्यास किंवा दहशतवादी कारवायांचे नियोजन करणार्याप काही पोस्ट सोशल साईटस्वर केल्या तर त्या हेरून डिलीट केल्या जातात. त्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर तयार केली गेली आहेत. त्यामुळे सोशल मीडियामध्येही या संघटनांवर आता बंधने येऊ लागली आहेत. म्हणून या संघटनांनी 2013 नंतर टेलिग्रामचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. टेलिग्रामचा मोठा फायदा म्हणजे तुम्ही स्वतःची ओळख लपवू शकता. तसेच टेलीग्राममध्ये मेसेजेस ब्लॉक करणेदेखील अवघड आहे. त्यामुळेच अलीकडच्या काळामध्ये इस्लामिक स्टेटसारखी संघटना ही टेलीग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर करते आहे. ‘आयसिस’सारख्या दहशतवादी संघटनांचे लक्ष्य युरोप असले तरी तेथील मुस्लिमांपर्यंत सोशल मीडियामार्फत आपला संदेश, विचारसरणी पोहोचवण्यासाठी, या माध्यमांचे कार्य हाताळण्यासाठी त्यांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पारंगत असणार्याो सुशिक्षित मुस्लिमांची गरज आहे. त्यासाठी ज्या देशामध्ये सुशिक्षित मुस्लिम लोकसंख्या अधिक आहे, अशा देशांकडे या संघटनांचे विशेष लक्ष असल्याचे दिसते. दुर्दैवाने, यामध्येे भारताचाही समावेश आहे. याचे कारण सध्या भारतीय हुस्लिमामध्ये टेक्नोसॅव्ही मुस्लिम तरुणांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. दहशतवादी संघटना भारताकडे ‘रिक्रुटमेंट ग्राऊंड’ म्हणून पहात आहेत. त्यामुळेच आपल्याला अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment