Total Pageviews

1,056,678

Thursday, 6 July 2017

ऑपरेशन थंटरबोल्ट. ४ जुलै रोजी आफ्रिकेतील युगांडाच्या एन्टेबी विमानतळावर डांबून ठेवलेल्या १०४ बंधकांना इस्रायल डीफेन्स फोर्सच्या कमांडोजनी यशस्वी रीतीने सोडवून मायदेशी परत आणलेे. - tarun bharat


४ जुलै १९७६ चा तो दिवस… July 7, 2017017 Share on Facebook Tweet on Twitter न मम… भारताने आतापर्यंत इस्रायलचा दुस्वास का करावा, हे कळत नाही. भारत १९४७ साली स्वतंत्र झाला आणि इस्रायल १९४८ साली. म्हणजे जवळपास सोबतच. सुमारे १७०० वर्षे आपल्या भूमीपासून दूर राहिलेल्या ज्यू लोकांना हक्काचा देश मिळाला, पण फाळणी होऊन. भारतालाही स्वातंत्र्य मिळाले ते फाळणी होऊनच. जवळपास अर्धा मूळ इस्रायल अरबांच्या म्हणजे पॅलेस्टाईन्यांच्या ताब्यात गेला. परंतु, इस्रायलने ठरविले की, पॅलेस्टाईनला दिलेला आमचा भूभाग आम्ही परत मिळविणारच. आणि यातून सुरू झाला इस्रायल व पॅलेस्टाईन यांच्यातील भयानक रक्तरंजित संघर्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा सर्वार्थाने ऐतिहासिक होता. इस्रायलला भेट देण्यासाठी भारतीय पंतप्रधानाला ७० वर्षे लागलीत, याची खंत मोदींनी तिथे व्यक्त केली. मोदींच्या या दौर्‍याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी निवडलेला दिवस. मोदी ४ जुलैला इस्रायलला पोचले. हा दिवस इस्रालय देशासाठी महत्त्वाचा, अभिमानाचा आणि गौरवाचा आहे. ४ जुलै १९७६ रोजी इस्रायलसारख्या अतिशय लहान देशाने जी करामत दाखविली, ती पाहून जगाने आश्‍चर्याने बोटे तोंडात घातली होती. हे काम केवळ इस्रायलच करू शकतो, असेच जगाने म्हटले. अशी कुठली करामत होती ती? या करामतीचे नाव होते ऑपरेशन थंटरबोल्ट. ४ जुलै रोजी आफ्रिकेतील युगांडाच्या एन्टेबी विमानतळावर डांबून ठेवलेल्या १०४ बंधकांना इस्रायल डीफेन्स फोर्सच्या कमांडोजनी यशस्वी रीतीने सोडवून मायदेशी परत आणलेे. २७ जून रोजी तेलअविववरून २४६ प्रवाशांना (मुख्यत: ज्यू व इस्रायली) घेऊन एअर फ्रान्सचे विमान पॅरिसकडे निघाले. ग्रीक देशाच्या अथेन्स येथून ५८ प्रवासी चढले. त्यात चार अपहरणकर्तेपण होते. अथेन्सहून विमानाने उड्डाण करताच, विमानाचे अपहरण करण्यात आले व लिबियाच्या बेंघाझी विमानतळावर इंधन भरून युगांडाच्या एन्टेबी विमानतळावर नेण्यात आले. युगांडाचा क्रूर हुकुमशहा इदी अमिन याच्या सहकार्याने सर्व बंधकांना विमानतळावरीलच एक इमारतीत डांबण्यात आले. तिथे आणखी चार अपहरणकर्ते येऊन मिळाले व त्यांना संरक्षण दिले युगांडाच्या लष्कराने. पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेचे हे अपहरणकर्ते होते आणि त्यांची मागणी होती, इस्रायलच्या तुरुंगात खितपत असलेले त्यांचे ४० सहकारी तसेच युरोपच्या इतर देशातील १३ सहकार्‍यांची मुक्तता. मुदत होती १ जुलैची. विमान सुरक्षित हवे असेल, तर ५० लाख डॉलर्स अतिरिक्त. २९ जूनला अपहरणकर्त्यांनी बंधकांमधून ज्यू व इस्रायली प्रवाशांना वेगळे केले व दुसर्‍या खोलीत डांबले. ३० जूनला इस्रायली नसलेल्या ४८ जणांची मुक्तता करण्यात आली. पैकी एका महिलेला ती आजारी असल्यामुळे एन्टेबीच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. १ जुलैला इस्रायल सरकारने वाटाघाटी करण्याची तयारी दर्शविली म्हणून अपहरणकर्त्यांनी इस्रायली नसलेल्या आणखी १०० जणांची मुक्तता केली आणि मुदत ४ जुलै दुपारपर्यंत वाढविण्यात आली. इदी अमिनच्या सांगण्यावरून ही मुदत वाढविण्यात आली होती आणि हाच वाढीव अवधी फार महत्त्वाचा ठरला. आता एन्टेबी विमानतळावर उरलेल्या १०६ बंधकांमध्ये विमानाच्या पायलटसह १२ कर्मचारीदेखील होते. इस्रायल सरकारने एकीकडे अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी सुरू ठेवत, या सर्व बंधकांना सोडविण्याच्या लष्करी मोहिमेची तयारी सुरू केली. देशापासून सुमारे ४ हजार कि.मी. दूर असलेल्या एन्टेबी शहरात जाऊन ही मोहीम पार पाडायची होती. एकही लहानशी चूक, १०६ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार होती. पण, हा धोका पत्करण्याचे इस्रायलने ठरविले. या मोहिमेची आखणी करताना इस्रायली गुप्तचर संघटना- मोसादचे अतिशय मोलाचे सहकार्य मिळाले. अतिशय बारकाईने या मोहिमेचा आराखडा आखण्यात आला. एन्टेबी विमानतळावर उतरल्यानंतर केवळ ५५ मिनिटांत ही मोहीम फत्ते होऊन, सर्व बंधकांना घेऊन विमानाने उड्डाण करायचे होते. प्रत्यक्षात ५३ मिनिटांतच ही कारवाई पूर्ण झाली, हे विशेष! ३ जुलैला रात्री इस्रायल वायुदलाची चार सी-१३० हर्क्युलस विमाने गुप्तपणे एन्टेबीकडे निघाली. इजिप्त, सुदान व इतर अरब देशांच्या रडारवर दिसू नये म्हणून आंतरराष्ट्रीय हवाईमार्गावरून जाताना ही विमाने केवळ १०० फूट उंचीवरून उडत होती. दोन बोईंग विमाने वेगळ्या मार्गाने, युगांडाचा शेजारी केनिया देशाच्या विमानतळावर उतरली होती. ३ जुलैच्या रात्री ११ वाजता इस्रायली सेना एन्टेबी विमानतळावर उतरली. रंगीत तालीम केल्याप्रमाणे त्यांनी कारवाई केली. विमानतळावर तैनात युगांडाचे ५० सैनिक तसेच सर्वच्या सर्व म्हणजे ७ अपहरणकर्त्यांना ठार करून, सर्व बंधकांना घेऊन इस्रायली कमांडोज अवघ्या ५३ मिनिटांत आकाशात झेपावलेही! पाठलाग होऊ नये म्हणून विमानतळावर उभे असलेली युगांडा वायुदलाची ११ लढाऊ विमानेही उद्ध्वस्त करण्यात आली होती. या पूर्ण कारवाईत ३ बंधक ठार व १० जखमी झालेत. एक महिला, जी रुग्णालयात भरती होती, ती तिथेच राहिली (नंतर तिला युगांडा सैनिकांनी गोळ्या घातल्या). दुर्दैवाने इस्रायली युनिट कमांडर योनातन नेतान्याहू मरण पावला. इस्रायलचे आजचे पंतप्रधान बेंजामीन यांचे ते थोरले बंधू होते. इस्रायलने पॅलेस्टाईनच्या सर्व अतिरेक्यांना सोडले व त्याबदल्यात अपहरणकर्त्यांनी सर्व बंधकांची मुक्तता केली, अशा बातमीच्या प्रतीक्षेत ४ जुलै रोजी सारे जग होते. पण, त्यांना वेगळीच बातमी ऐकायला मिळाली. या बातमीची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. जवळजवळ १०० टक्के धोका असलेली ही कारवाई शंभर टक्के यशस्वी झाली होती. जग रोमांचित झाले. या घटनेनंतर जगातील अतिरेक्यांना आपल्या मागण्या मान्य करवून घेण्यासाठी विमानाचे अपहरण हे नवे अस्त्र मिळाले. पॅलेस्टाईनची जगाला ही एक देणगीच म्हणावी लागेल. परंतु, इस्रायलने अतर्क्य अशी लष्करी कारवाई करून जगात आपला धाक इतका वाढविला की, त्यानंतर आजपर्यंत इस्रायलचे एकही विमान अपहृत झाले नाही. ही थरारक कहाणी सर्वांनीच मुळातून वाचली पाहिजे. शक्य असल्यास या कारवाईवर आधारित चित्रपटदेखील पाहायला हवे.इस्रायलने आज जे यश संपादन केले आहे, त्याचा मूळ गाभा राष्ट्रवाद आहे. १७०० वर्षे आपल्या देशापासून परागंदा असताना, जगाच्या विविध देशांत राहूनसुद्धा त्यांनी स्वत:च्या राष्ट्राचे विस्मरण होऊ दिले नाही. भारतात मात्र, हिंदू राष्ट्र नव्हतेच अशा बाता मारण्यात येतात. असो. इस्रायल स्वतंत्र झाल्यावर जगातील बहुतेक सर्व ज्यू तिथे स्थलांतरित झालेत. इतकी वर्षे विविध देशांत राहिल्यामुळे प्रत्येकाच्या सवयी, भाषा, राहणीमान सर्व काही बदलले होते. ज्यूंची मूळ भाषा हिब्रू मृत झाली होती. त्यामुळे या सर्वांना एकमेकांशी जुळवून घेणे किती कठीण गेले असावे, याची कल्पना यावी. पण, ज्यू म्हणजे मूर्तिमंत जिद्द! त्यांनी हिब्रू भाषा जिवंत केली. आज इस्रायलचा सर्व कारभार, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य सर्वकाही हिब्रू भाषेत आहे. इस्रायलने राष्ट्रवादावर देशाची प्रगती केली म्हणून कम्युनिस्टांना इस्रायल चालत नाही. इस्रायलने मुसलमान देशांच्या दादागिरीला जशास तसे उत्तर दिले म्हणून, मुसलमान व्होटबँक सांभाळण्यात गर्क असलेल्या भारतीय राज्यकर्त्यांनी मुसलमानांची मने दुखावतील म्हणून या देशाशी संबंधच ठेवला नव्हता. २५ वर्षांपूर्वी नरसिंह राव सरकारने राजकीय संबंध प्रस्थापित केले आणि या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत. ज्यू हा अत्यंत बुद्धिमान वंश गणला जातो. नोबेल पारितोषिकांपैकी शांततेचे एक, अर्थशास्त्राची दोन व रसायनशास्त्राची चार पारितोषिके इस्रायली नागरिकांना मिळाली आहेत. पण, ज्यू वंशीयांची गोष्ट करायची झाली, तर रसायनशास्त्राची ३५, मेडिसिनची ५३, भौतिकशास्त्राची ५२, साहित्याची १५, अर्थशास्त्राची २८ व शांततेची ९ पारितोषिके ज्यू वंशीयांच्या खाती आहेत. यात आम्ही हिंदू कुठे आहोत? अशा या विलक्षण बुद्धिमान, शूर, धाडसी देशाशी आम्ही आतापर्यंत फटकून वागलो. आता ती चूक सुधारण्यात आली आहे. भारताच्या विकासाच्या दृष्टीने ही फार मोठी घटना आहे

No comments:

Post a Comment