सध्या चीन आणि भारत या दोन देशांमधील तणाव वाढत आहे. चीनच्या युद्धनौका आणि पाणबुड्या बंगालच्या उपसागरात तैनात करण्यात आल्या असून, सिक्कीमच्या सीमेवरील डोकलाम भागावरून वाद निर्माण झाल्यानंतर, चीन सरकार आणि तेथील प्रसारमाध्यमांनी भारताला युद्धापर्यंतच्या धमक्या दिल्या आहेत. चीन म्हटला की, ऑक्टोपससारखे पाय पसरविण्याकरिता अव्वल क्रमांकावर आहे. एकीकडे पाकिस्तानची डोकेदुखीतर आहेच, पाकिस्तानकडून दहशतवादाला असलेल्या पाठिंब्यामुळे काश्मीर अस्वस्थ झालाय्, शिवाय अमरनाथसारख्या यात्राही आता सुरक्षित राहिल्या नाहीत. त्यातच चीननेही संधी साधून रंग दाखविणे सुरू केले आहे. भारतीय बाजारपेठा चीनने यापूर्वीच काबीज केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारांतर्गत चिनी साहित्य आता भारतातल्या घराघरांत पोहोचले आहे. त्यामुळे तसे पाहिले तर भारताकडून चीनकरिता आथिर्र्क उलाढाल मोठ्या प्रमाणात होत राहते. ही मोठी उलाढाल पाहता, चीनने भारतासोबत मैत्रीचेच संबंध ठेवायला हवे होते, पण चीनला तशी अक्कल पाहिजे ना! भारतातील सामान्य जनता आता याच कारणामुळे चिडली आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार असावा, असे ज्यालात्याला मनातून वाटू लागले आहे. आता हेच पाहा ना, मुंबईतल्या शाळांमध्ये ‘मेड इन चायना’विरोधात आवाज उठविण्यात आला आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी वॉटर बॉटल, डबा, कम्पॉस, रंगपेटी, स्केचपेन, स्केल, पॅड, रबर यासारखे चिनी बनावटीचे साहित्य शाळेत घेऊन येऊ नये, असे आवाहन मुख्याध्यापक संघटनेने नुकतेच केले आहे. भारत आणि चीन या दोन देशांतील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवरच्या या आवाहनामागे विद्यार्थ्यांत देशभक्ती जागृत व्हावी, स्वदेशीचा वापर व्हावा, असे संघटनेचे म्हणणे आहे. चिनी बनावटीच्या वस्तू वापरू नयेत, अशी जनजागृती यापूर्वी झाली आहे. पण, हातातल्या मोबाईलपासून तर घरातील टीव्ही-मिक्सरपर्यंत आवाका असलेल्या या देशात हे कितपत शक्य होईल?
मुंबईतल्या मुख्याध्यापक संघटनेचे हे आवाहन यशस्वी होईल काय, हे सांगता येत नाही. आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधावर याचा काय परिणाम होईल, याचाही अंदाज बांधणे कठीण आहे. या संघटनेच्या माध्यमातून हा उठाव मोठा होऊ शकतो. पण एक मात्र नक्की, या देशावर कुणी जराही वाकडी नजर टाकली, तर या देशातील विविध संघटना, नागरिक दक्ष राहतात. चीन ऑक्टोपस असला, तरी भारत चीनला उभा-आडवा फाडायला केव्हाही तयार आहे, हा भाग वेगळा!
No comments:
Post a Comment