Total Pageviews

Tuesday 10 December 2013

WHY CONGRESS LOST ELECTIONS

कॉंग्रेस पक्ष दिवाळखोरीत निघाला आहे व चार राज्यांतील त्यांच्या पराभवाने जनता आनंदोत्सव साजरा करीत आहे. देशात परिवर्तनाची लाट उसळली आहे. देशाला हवा आहे एक प्रभावशाली नेता, जो स्वत:च्या सद्गुणांच्या, चारित्र्याच्या आणि सामर्थ्याच्या जोरावर या खंडप्राय देशाला भरभराटीचे दिवस दाखवील. कॉंग्रेसवाल्यांनो, चालते व्हा, गेट आऊट! गेट आऊट!! गेट आऊट! गेट आऊट!! भारतीय जनता पक्षाचा विजयोत्सव सुरू असतानाच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधींकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. जनमताचा कौल स्वीकारल्याचे माय-लेकरांनी सांगितले, पण हा कौल न स्वीकारून सांगताय कुणाला? हा कौल साधा नाही. चार राज्यांतील मतदारांनी कॉंग्रेसला लाथा घालून बाहेर फेकले आहे. दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशातील मतदारांनी तर कॉंग्रेसला विरोधी पक्षात बसण्याच्या लायकीचेही सोडले नाही. कॉंग्रेसचे अनेक दिग्गज चारीमुंड्या चीत झाले आहेत व या पराभवाने कॉंग्रेसची वाचा गेली आहे. एरवी ऊठसूट हिंदूंना शिव्यांची लाखोली वाहणार्‍या, प्रत्येक दंगलीचे व दहशतवादाचे खापर हिंदूंवर फोडून मुसलमानी ओंजळीने पाणी पिणार्‍या मध्य प्रदेशच्या दिग्गीराजांची तर वाचाच गेली आहे. मध्य प्रदेश हे त्यांचे राज्य. तिथे कॉंग्रेस जमीनदोस्त झाली. मुख्य म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्लीतील मुसलमान मतदारांनी कॉंग्रेसला मते दिली नाहीत हे आता उघड झाले आहे. देशातील १०० कोटी हिंदूंचे तळतळाट तर कॉंग्रेसला भोवले आहेतच, पण मुसलमानही कॉंग्रेसवर विश्‍वास ठेवायला तयार नाहीत. कॉंग्रेस पक्ष हा अशा प्रकारे दिवाळखोरीत निघाला आहे व चार राज्यांतील त्यांच्या पराभवाने देशातील जनता आनंदोत्सव साजरा करीत आहे. राहुल गांधी यांनी असे सांगितले की, ‘‘जनतेने आम्हाला एक संदेश दिला आहे व तो आम्ही स्वीकारला आहे. कॉंग्रेस पक्षांतर्गत बदल करावे लागतील.’’ राहुल गांधी यांनी मेहनत घेतली हे खरे, पण लोकांचा त्यांच्यावर अजिबात विश्‍वास राहिलेला नाही. लोकांच्या मनात कॉंग्रेस पक्षाविषयी तिरस्कार निर्माण झाला आहे. एखाद्या गाढवास किंवा मेलेल्या सापाला मत देऊ, पण कॉंग्रेसच्या उमेदवारास मत देणार नाही अशी संतप्त लोकभावना आहे. दिल्लीत ‘आम आदमी पार्टी’चे जे उमेदवार जिंकले ते सामान्य लोक आहेत. त्यांना चेहरा नाही, त्यांना पाठबळ नाही, पण लोकांनी त्यांना विजयी केले. चिदंबरम यांच्यावर बूट फेकणारा शीख तरुण जर्नेल सिंग ‘आप’तर्फे उमेदवार झाला व जिंकून आमदार झाला. या पक्षातर्फे रिक्षावाले, ठेलेवाले तरुण कॉंग्रेस व भाजपच्या दिग्गज उमेदवारांना पाडून विजयी का झाले ते राहुल गांधींनी पाहायला हवे. सोनिया गांधींना हवे म्हणून केंद्राने घाईघाईने अन्न सुरक्षा विधेयक आणले. त्याचा एक लाख हजार कोटींचा भार देशाच्या तिजोरीवर पडणार आहे. लोकांना फुकटात भोजन देऊन आळशी केल्यामुळे ‘मते’ मिळतील असे सोनियांना वाटले, पण ते खोटे ठरले. लोकांनी सोनिया गांधी यांची ही भीक नाकारली. मात्र त्याचवेळी छत्तीसगडमध्ये ‘चावलवाला बाबा’ असलेल्या रमणसिंग यांना मतदान झाले. राहुल गांधी यांनी एवढ्या संदेशातून जरी काही शिकण्याचा प्रयत्न केला तरी पुरे. पराभवातून शिकायचे असते व विजयातून जबाबदारीचे ओझे घ्यायचे असते. सोनिया गांधी म्हणाल्या, ‘‘कॉंग्रेसच्या पराभवामागे महागाई हे एक कारण आहे. इतरही कारणे आहेत.’’ होय, महागाई कारण आहेच, मग महागाई रोखण्यासाठी तुम्ही काय केलेत? कपिल सिब्बलना दिल्लीच्या मतदारांनी विचारले, ‘‘साहेब, कांदे फारच महाग झालेत हो. गरीबांनी काय करावे?’’ यावर उद्धट कपिल सिब्बल म्हणाले, ‘‘आता मी कांदे विकायला बसू काय?’’ गरीबांशी इतके उद्धट वागणारे मंत्री ज्या पक्षात आहेत त्यांचा हा असाच दारुण पराभव होणार. अन्न व शेतीमंत्री शरद पवारांना लोकांनी विचारले, ‘‘साहेब, महागाई कधी कमी होणार?’’ पवारांनी रागाने सांगितले, ‘‘मी काय ज्योतिषी आहे?’’ शेवटी जनताच ज्योतिषी झाली. तिने कॉंग्रेसच्या कुंडलीत दारुण पराभव मांडला. कॉंग्रेसच्या सपशेल पराभवाला जबाबदार ठरलेल्या इतर कारणांमध्ये भ्रष्टाचार हे मुख्य कारण आहे. कोट्यवधींचे भ्रष्टाचार आणि घोटाळे यूपीए सरकारच्या काळात झाले, पण पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यावर कधीही तोंड उघडले नाही. शेवटी लोकांनी कॉंग्रेसला धडा शिकवला. या पराभवास पंतप्रधान मनमोहन सिंग सगळ्यात जास्त जबाबदार आहेत. महागाई व भ्रष्टाचाराचे रामायण-महाभारत घडत असताना, सीतेचे अपहरण व द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना हे ‘धर्मराज’ आंधळे, बहिरे व मुके बनून खुर्ची उबवत बसले होते. लोकांनी त्यांची खुर्ची आता गदागदा हलवली आहे. खुद्द सोनिया गांधी यांनी आता सांगितले, ‘‘पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण हे योग्य वेळी जाहीर करू!’’ सोनिया गांधींनी संदेश दिला आहे. ‘मनमोहनजी खुर्ची खाली करा’ हाच तो संदेश आहे. अर्थात आता असे संदेश वगैरे देऊन काय उपयोग? देशात परिवर्तनाची लाट उसळली आहे. देशाला हवा आहे एक प्रभावशाली नेता, जो स्वत:च्या सद्गुणांच्या, चारित्र्याच्या आणि सामर्थ्याच्या जोरावर या खंडप्राय देशाला भरभराटीचे दिवस दाखवील. कॉंग्रेसवाल्यांनो, चालते व्हा, गेट आऊट! गेट आऊट!!

No comments:

Post a Comment