Total Pageviews

Saturday 28 December 2013

NORTH EAST INDIA INSURGENCY & DEMOGRAPHIC INVASION

संपूर्ण देशाचा अवघा आठवा हिस्सा आहे आणि भारताच्या सीमेंतर्गतच बंडखोरी आणि दहशतवादी कारवायांचा सुमारे ७० टक्के हिस्सा याच राज्यांमध्ये तरुण विजय भारताचा उत्तर-पूर्वांचल भाग आठ राज्यांनी व्यापला आहे, ज्यात सिक्कीमही जोडले गेले आहे. या सर्व भागातील लोकसंख्या आणि आर्थिक स्थिती संपूर्ण देशाचा अवघा आठवा हिस्सा आहे आणि भारताच्या सीमेंतर्गतच बंडखोरी आणि दहशतवादी कारवायांचा सुमारे ७० टक्के हिस्सा याच राज्यांमध्ये आहे. इथल्या लोकांची वर्षानुवर्षांपासून तक्रार आहे की, दिल्लीत बसलेले सरकार या क्षेत्राच्या विकासाकडे काहीही लक्ष देत नाही. इथल्या प्रमुख नागरिकांमध्येही घोर निराशा आणि कुंठाही वाढतच चालली आहे. एकेसमयी तर आसामचे विख्यात संपादक आणि चिंतक धीरेंद्रनाथ बेजबरूआ यांनी मला सांगितले होते की, तरुण, मला अनेकदा असे वाटते की, दिल्लीत बसलेल्या लोकांचा हिंदुस्थान केवळ कलकत्यापर्यंतच सीमित आहे आणि त्यापुढील राज्यांतील लोकांना त्यांनी त्यांच्या नशिबावर सोडून दिले आहे... या सर्व राज्यांमध्ये देशात सर्वाधिक भ्रष्टाचार असल्याचे दिसून येते. नागालॅण्ड, आसाम, मणिपूरसारख्या राज्यांमध्ये दहशतवादी आणि देशद्रोही संघटना या सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि व्यापार्यांकडून खुलेआम खंडणी वसूल करतात. ती दिली गेली नाही, तर सर्रास हत्या करतात. आसामात बांगलादेश सीमेला लागून असलेल्या गावांमध्ये मुस्लिम घुसखोर हिंदू बोडो, दिमाशा, कछारी, कारबी, राभा, राजवंशीसारख्या हिंदू जनजातींना लुटतात आणि त्यांच्या जमिनींवर कब्जा करतात. वाचकांना स्मरत असेल की, गतवर्षी कोकराझारमध्ये बांगला देशी मुस्लिम घुसखोरांच्या एका टोळीने हिंदू बोडो जनजातीय लोकांना आपल्याच क्षेत्रात शरणार्थी बनविले होते. पण, आसाम सरकारने भारतीय नागरिकांच्या बाजूने उभे न राहता, त्यांना दिलासा न देता, केवळ व्होट बँकेच्या हव्यासापोटी या बांगलादेशी घुसखोरांना संरक्षण दिले. आसामात कुशल, विद्वान, बुद्धिमत्ता आणि क्रीडा क्षेत्रात श्रेष्ठ स्थान प्राप्त करणारे अनेक युवक आहेत, ज्यांनी संधीचे सोने करून देश-विदेशात आपले नाव कमावले आहे. पण, आसामसह पूर्वांचलात कोणत्याही राज्यात आंतरराष्ट्रीय स्तराचे एकही क्रीडासंकुल नाही. इथली दूरसंचार आाणि संपर्क यंत्रणेची स्थिती अजूनही सत्तर आणि ऐंशीच्या दशकाची आठवण करून देणारी आहे. आसाममधील चाळीस टक्के विधानसभा मतदारसंघांत बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांना मोठ्या संख्येत मतदार बनविण्यात आले आहे आणि हे लोक तिथल्या राजकारणाला आता प्रभावित करीत आहेत. आसामात देशातील एक असे विद्यापीठ आहे, जे १९४८ साली सर्वसामान्य जनतेचे आंदोलन आणि त्यातून देणगीच्या स्वरूपात २२ लाख रुपये गोळा करून बांधले गेले आहे. परंतु, त्या गुवाहाटी विद्यापीठाला पूर्वांचलातील सर्वश्रेष्ठ ज्ञान-विज्ञान व व्यवस्थापन अभ्यासाचे केंद्र बनविण्याऐवजी उपेक्षेेचे केंद्र बनविण्यात आले आहे. परिणामी, इथल्या तेजस्वी युवकांना उच्च शिक्षण आणि करीअरसाठी पूर्वांचल सोडून चेन्नई, बंगलोर, कोलकाता आणि अन्य शहरांत जावे लागते. पूर्वांचलातल्या राजधानीच्या शहरांमध्ये अजूनही रेल्वे पोहोचलेली नाही. एवढेच नव्हे, तर या राजधान्यांच्या शहरांना चांगल्या विमानकंपन्यांच्या हवाई सेवांनी जोडण्यात आलेले नाही. जगभरात आपली नैसर्गिक साधनसंपत्ती आणि शाळांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिलॉंगला जाण्यासाठी दिल्लीहून एकही विमान नाही. आईजोल, इटानगर, सिल्चर, कोहिमा किंवा इम्फालला जाण्यासाठीही नाही. इथपर्यंत की, गुवाहाटीला जाण्यासाठी दिल्लीहून केवळ एकच विमान आहे आणि गुवाहाटीवरून दिल्लीला जाण्यासाठी शेवटचे विमान सायंकाळी पाच आणि सहा वाजता आहे. रात्रीही विमान नाही आणि सकाळीही नाही. मणिपूरमध्ये अतिरेक्यांच्या दबावाखातर गेल्या अनेक वर्षांपासून हिंदीवर बंदी घालण्यात आली आहे. इम्फाल, चुडा-चांदपूरसारख्या शहरांमध्ये तर ‘इंडियन्स गो बॅक’ असे फलक लागलेले असतात. येथे नेहमी सतत दोन-दोन, तीन-तीन महिने बंद आणि संपाचे साम्राज्य असते. या काळात पेट्रोल आणि डिझेल लिटरमागे दीडशे ते दोनशे रुपयांत विकले जाते. स्वयंपाकाच्या गॅससाठी दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागतात. कोणत्याही क्रमिक पुस्तकामागे शेवटी राष्ट्रगीत छापलेले नसते. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन दिवसांचे राष्ट्रीय समारंभ तर अतिशय कडेकोट बंदोबस्तात आयोजित करावे लागतात. एकट्या मणिपुरात दहापेक्षा अधिक दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. या संघटनांना विदेशी शक्तींकडून पैसे आणि शस्त्रे मिळत असतात आणि त्या बळावर ते भारतात विद्रोहाची आग भडकावीत आहेत. हीच स्थिती त्रिपुरातही आहे. येथे त्रिपुरा नॅशनल लिबरेशन फ्रंटसारख्या संघटना दहशतवाद आणि बंडखोरी पसरविण्याचे काम अनेक वर्षांपासून करीत आहेत. येथेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार प्रचारकांचे अपहरण करून नंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. बांगलादेशला लागून असलेल्या या भागांमध्ये भारताचे पशुधन, प्रामुख्याने गोवंश आणि मादक द्रव्यांची तस्करी तर सर्रासपणे सुरू असते. गेल्या पंधरा वर्षांपासून भारत-बांगलादेश सीमांवर कुंपण घालण्याचे काम सुरूच आहे, जे आजतागायत पूर्ण झालेले नाही. अरुणाचल प्रदेश भारताच्या सर्व प्रांतात आपली नैसर्गिक संपदा आणि मजबूत काठीच्या देशभक्त युवकांसाठी ओळखला जातो. अरुणाचलला मी देशाचा ‘जयहिंद’ प्रदेश म्हणून संबोधतो. कारण, पूर्वांचलातील हेच एकमेव असे राज्य आहे, जेथे केवळ गावागावांतच हिंदी बोलली जात नाही, तर विधानसभेचे कामकाजही हिंदीतच चालते आणि जयहिंद इथल्या लोकप्रिय अभिवादनाचे प्रतीक आहे. पण, येथील ऐंशी टक्के गावांमध्ये अजूनही वीज पोहोचलेली नाही. सीमाभागात सडकांचा पत्ता नाही. देशाची राजधानी आणि अन्य महानगरांना थेट जोडणारी कोणतीच विमानसेवा नाही. एकही साधनसंपन्न क्रीडापरिसर नाही. गावांमध्ये अंगणवाडी आणि महिला विकास केंद्रांचीही कोणतीच व्यवस्था नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्यातील युवकांनी आपल्या भविष्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी जावे तरी कुठे? अरुणाचलची संत्री आणि नागालॅण्डचे अननस जगात सर्वोत्कृष्ट आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणारे पीक आहे. त्यांना लगतच्या म्यानमार, मलेशियासारख्या देशांमध्ये निर्यात करण्याची व्यवस्था उपलब्ध करून देऊन शेतकर्यांच्या पदरात चार पैसे अधिकचे पडण्याची गोष्ट तर दूरच, ही फळे भारतातील मोठ्या शहरांमध्ये पाहोचविण्याची व्यवस्थाही अद्याप झालेली नाही. उत्तर-पूर्वांचल भारताचे शिरोमणी क्षेत्र आहे, जे देवी-देवतांचा प्रदेश, नैसर्गिक सौंदर्याने नटलेले, अप्सरांचे विश्व म्हणूनही ओळखले जाते. इथले नयनरम्य सरोवर, नद्या, पर्वत आणि लोक भारताचा गौरव आणि जगात अनन्यसाधारण आहेत. पण, ही सर्व राज्ये दहशतवाद आणि अराजकताच नव्हे, तर दिल्लीत बसलेल्या सत्ताधारी सरकारच्या पाषाणहृदयी उपेक्षेचे बळी ठरले आहेत. अशा स्थितीत इथल्या लोकांच्या मनात जर अशी भावना निर्माण झाली की, भारताचे सत्ताधारी त्यांना आपले समजतच नाही, तर त्यात आश्चर्य वाटायला नको.

No comments:

Post a Comment