कॉंग्रेस जाहीरनाम्यात मुस्लिम प्रश्न डोकावणार
- - सकाळ न्यूज नेटवर्क -मंगळवार, 24 डिसेंबर 2013
नवी दिल्ली - संशयावरून तुरुंगात खितपत पडलेल्या मुस्लिम तरुणांना सोडविण्याचे आणि भरपाई देण्याचे आश्वारसन लोकसभा निवडणुकीच्यावेळी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात देण्यात येण्याची शक्यणता आहे. आगामी निवडणुकीत अल्पसंख्याकांची विशेषतः मुस्लिमांची मते दुरावू नयेत यासाठी हे पाऊल कॉंग्रेस उचलण्याची शक्यलता आहे. परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी कॉंग्रेस मुख्यालयातील बैठकीत याबाबत सूचित केले. त्याचप्रमाणे जातीय हिंसाचार विरोधी विधेयक मंजुरीचा निर्धारही व्यक्त केला.
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक जाहीरनाम्यासाठी थेट जनतेतून सूचना- अभिप्राय मागविण्यास सुरवात केली असून, आज अल्पसंख्याकांच्या मुद्द्यांवर कॉंग्रेस नेत्यांनी सामाजिक संस्था व पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आठवडाभरापूर्वी अनुसूचित जाती- जमाती, इतर मागासवर्गीय तसेच आदिवासींशी निगडित मुद्द्यांचा जाहीरनाम्यात समावेश करण्याबाबत सल्लामसलत झाली होती. कालच राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील दंगलग्रस्त मुजफ्फरनगर येथे जाऊन पीडितांच्या छावण्यांना भेट दिली होती. त्यापार्श्वरभूमीवर आजच्या बैठकीमध्ये अल्पसंख्याकांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्थिती, तसेच सुरक्षेचा मुद्दा यावर चर्चा झाल्याचे सलमान खुर्शिद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या सल्लामसलत बैठकीला परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांच्यासह अल्पसंख्याक कल्याण मंत्री रहमान खान, ग्रामविकास मंत्री जयराम रमेश, परिवहन मंत्री ऑस्कर फर्नांडिस, ग्रामविकास राज्यमंत्री प्रदीप जैन, कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष खुर्शिद सय्यद उपस्थित होते. तर, राहुल गांधींनी सुमारे तासभर उपस्थित एनजीओ प्रतिनिधी, पक्ष कार्यकर्त्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याचे सांगण्यात आले. मुस्लिमांसाठीच्या सच्चर समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचा मुद्दा बैठकीत केंद्रस्थानी होता. अल्पसंख्याकांसाठीच्या सरकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबतची उदासीनता, लागणारा विलंब यावर गांभीर्याने चर्चा होऊन यात बदल करण्याबाबतच्या सूचना राहुल गांधींनी मागविल्याचे सलमान खुर्शिद म्हणाले.
दहशतवादी कृत्यांशी संबंधाच्या संशयावरून तुरुंगात खितपत पडलेल्या मुस्लिम तरुणांवरील अत्याचाराबद्दलही बैठकीत चर्चा झाली. निरपराध तरुणांची मुक्तता व त्यांना नुकसान भरपाई याबाबत मुद्दे उपस्थित झाले होते. याबाबत पक्ष गंभीर असल्याचे खुर्शिद म्हणाले.
अनाठायी विरोध
जातीय हिंसाचार विधेयकाच्या मंजुरीसाठी कॉंग्रेस पक्ष आग्रही असून, विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे; परंतु अनेक जण विधेयकातील तरतुदींना न वाचताच विरोध करत आहेत. जातीय हिंसाचार रोखणे ही बाब महत्त्वाची आहेच; पण यदाकदाचित अशी दुर्घटना घडल्यास त्यानंतरचे पुनर्वसनही तेवढेच महत्त्वाचे आहे. पीडितांचे आयुष्य सावरण्यासाठी भरपाई, पुनर्वसनासाठी जातीय हिंसाचार विरोधी विधेयकाची मंजुरी आवश्यचक असल्याचा पुनरुच्चारही सलमान खुर्शिद यांनी केला.
प्रतिक्रिया
rahul - मंगळवार, 24 डिसेंबर 2013 - 09:26 AM IST
मोडी नि सांगितले तेच खरे आहे. निवडणुका आल्या कि असे उदोय्ग करायचे. गेल्या ३ वर्षात १ रुपयापण कॉंग्रेसने खर्च केला नाही. मोडी सगळ्या भारताचा विचार करतात कॉंग्रेस फक्त मतासाठी मुस्लिमांचा विचार करते
26 1
तुषार - मंगळवार, 24 डिसेंबर 2013 - 09:22 AM IST
हिंदू आणि मुस्लिम मिळून कॉंग्रेस ची मारू या वेळेस...
33 1
sandy - मंगळवार, 24 डिसेंबर 2013 - 08:10 AM IST
काय नालायक राज्यकर्ते आहेत हे ह्यांनीच आधी तुरुंगात टाकायचे व तुरुंगात होणार्या अत्याचाराबद्दल भरपाई देण्याचे निवडणूक आश्वासन द्यायचे .मत पेढीचे राजकारण कोन्ग्रेस ला कुठे घेऊन जाणार आहे कुणास ठाऊक? सत्ता जाईल म्हणून एवढे कासावीस का होता?
37 1
प्रशांत - मंगळवार, 24 डिसेंबर 2013 - 07:34 AM IST
कॉंग्रेसने चुकून कधीतरी हिंदुंचा विचार करावा.
45 1
दि.पां.गोडबोले,बेंगळूरू,३७. - मंगळवार, 24 डिसेंबर 2013 -
सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अल्पसंख्य नेत्यांचे पानिपत झाले तर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी देखील कायदा केला तर ?
33 1
Muslim - मंगळवार, 24 डिसेंबर
कोन्ग्रेस ने हा ढोंगीपणा सोडावा आता. अशा ढोंगीपणा ला जनता भुलणार नाही. आत्ता पर्यंत काय झोपा काढत होती काय कोन्ग्रेस. मागचं सोडा हो पण गेली ८ वर्ष सत्तेत असताना अल्पसंख्याकांचा कैवार आत्ता आला ह्यांना. ह्यावरूनच ह्यांचा ढोंगी पणा स्पष्ट होतो.
37 0
'मुस्लिम कर्मचारी ग्राहकांना पोर्क किंवा अल्कोहोल असलेले पदार्थ देणे नाकारू शकतो,' अशी वादग्रस्त भूमिका घेणाऱ्या 'मार्क्स अॅन्ड स्पेन्सर' या किरकोळ बाजारातील बहुराष्ट्रीय कंपनीने संबंधित ग्राहकाची माफी मागितली आहे. ग्राहकाला शँपेन देण्यास हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम महिला कर्मचाऱ्याने नकार दिला होता.
'एखादा मुस्लिम कर्मचारी शॅम्पेन किंवा डुकराचे मटण (पोर्क) सर्व्ह करणे नाकारू शकतो. कारण ते त्यांच्या धर्माच्या विरोधात आहे,' अशी भूमिका 'मार्क्स अॅन्ड स्पेन्सर'ने पूर्वी घेतली होती. त्याविरोधात संबंधित ग्राहकाने हा वृत्तांत 'द टेलिग्राफ'ला सांगितला. त्यानंतर हे प्रकरण समोर आले. सध्या लंडनमधील सुपरमार्केटमध्ये धार्मिक श्रद्धांमुळे ग्राहकांना सेवा देण्यास नकार देण्याऱ्या कर्मचाऱ्यांवरून वाद सुरू आहे. ब्रॅडफोर्ड येथील मुस्लिम बहुसंख्य भागातील सुपरमार्केटमध्ये ही समस्या सर्वाधिक जाणवते. 'द टेलिग्राफ'ने या समस्येला वाचा फोडली. त्यानंतर सुपरमार्केट भानावर आले आणित त्यांनी सपशेल लोटांगण घालून ग्राहकाची माफी मागितली.
'मार्क्स अॅन्ड स्पेन्सर'चे प्रवक्ते म्हणाले, 'एखाद्या कर्मचाऱ्याच्या धार्मिक श्रद्धेनुसार ते खाद्यपदार्थ आणि पेये ते हाताळू शकत नाहीत. आम्ही अनेकदा आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांना आवडेल असे काम आणि पारंपरिक अशा पद्धतीचे कपडे परिधान करण्याची सूट देतो. आमचा व्यवसाय धर्मनिरपेक्ष असल्याने प्रत्येक व्यक्तीला सामावून घेण्याचे कंपनीचे धोरण आहे. मात्र, आमचा व्यवसाय हा ग्राहकाभिमुख आहे. कर्मचाऱ्यांनी त्यात धर्म आणू नये, अशी आमची अपेक्षा असते. या घटनेत मात्र तसे घडले नाही, म्हणून आम्ही माफी मागतो.'
No comments:
Post a Comment