Total Pageviews

Tuesday 10 December 2013

ANTI HINDU POLICIES CONGRESS

कॉंग्रेसची हिंदुत्वद्वेषाची परंपरा-भालचंद्र ह. म्हात्रे मध्यंतरी देशाचे ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल ‘हिंदुत्ववादी की धर्मनिरपेक्ष’ असा वाद देशात रंगला होता. या वादाला वल्लभभाईंनी सोरटी सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माणाचीही झालर होती. हे पुरातन मंदिर, त्याची मोगल आक्रमकांनी असंख्य वेळा केलेली लूट, स्वातंत्र्यानंतर वल्लभभाईंनी केलेला त्याचा जीर्णोद्धार आणि त्यावेळेस नेहरूंच्या हिंदुद्वेषाचे आलेले अनुभव याचा लेखकाने केलेला ऊहापोह... कॉंग्रेसची हिंदुत्वद्वेषाची परंपरा ही अशी जुनी आहे. देशाने आणि हिंदूंनी ती आणखी किती काळ सहन करायची याचा विचार जनतेने आणि त्यातही तरुण पिढीने करायला हवा. गेली दीड हजार वर्षे मोगलांची हिंदुस्थानवर आक्रमणे होत आहेत. लूटमार करणे, हिंदूंची संस्कृती, वास्तू तसेच मंदिरे नष्ट करणे, हिंदू स्त्रियांवर अत्याचार हा सर्‍यांचा दुष्ट हेतू असे. हिंदुस्थानवर ब्रिटिश, डच, पोर्तुगीज, फ्रेंच देशांनी राज्य केले, पण मनुष्यहानी केली नाही. तसेच मालमत्ता नष्ट केली नाही. हिंदुस्थानवर आक्रमण करणारे अफगाण, तुर्की व मोगल हे जात्याच कसाई, मूर्तिभंजक व खुनशी होते. गझनीच्या महमुदाने ११ स्वार्‍या केल्या आणि अनेक वेळा सोरटी सोमनाथ येथील शिवशंकराची पिंडी भग्न केली. त्याचे सुख-दु:ख हिंदुस्थानच्या सेक्युलरवाद्यांना नाही, कधीच नव्हते. मुसलमानांनी सोमनाथ मंदिर पाडायचे व हिंदूंनी जिद्दीने पुनर्बांधणी करायची असे अनेक शतके चालले होते. सोमनाथ हे सात हजार वर्षांपूर्वी वेदकालीन युगात बांधलेले सुवर्ण मंदिर सोमदेवाने (चंद्रदेवाने) बांधले म्हणून सोमनाथ मंदिर हे नाव लाभले. काळाच्या ओघात ते नष्ट झाले. त्यानंतर त्रेतायुगात लंकाधिपती रावणाने रौप्य मंदिर बांधले तेही नष्ट झाले. द्वापारयुगात श्रीकृष्णाने चंदनाचे मंदिर बांधून जीर्णोद्धार केला. पर्यावरणाच्या आघाताने मंदिर नष्ट होणे व पुनर्बांधणी होणे ही प्रक्रिया अनेक शतके चालूच होती. सोमनाथ देवस्थानाबद्दलचा अचंबा वाटण्यासारखी एक गोष्ट अशी की, शंकराची पिंडी जमिनीपासून अधांतरी होती. त्याचा उल्लेख हिस्टरी ऑफ इंडिया दुलियर ऍण्ड हाऊसमध्ये दिला आहे. लिंगाचा परीघ साडेचार फूट होता. त्याचा रुद्रभाग (वर दिसणारे लिंग) ७ फूट उंच होते. इतके प्रचंड लोखंडी लिंग लोहचुंबकाद्वारे अधांतरी ठेवणे म्हणजे कुशल कारागीरांच्या विज्ञानाची परिसीमाच म्हणायला हवी. आर्यांना लोहचुंबकाचे विज्ञान वेदामधून मिळाले होते. असे हे वैभवशाली व हिंदूंचे भाविक श्रद्धास्थान मोगलांनी अनेकदा नष्ट केले. जडजवाहीर, संपत्ती पळवून नेली. याची आठवण ठेवून हिंदूंचे रक्त खवळायला हवे, पण आपले लोक नेभळट आहेत. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले तरी सोमनाथची साडेसाती संपली नाही. जुनागढचा नवाब जुनागढला पाकिस्तानात विलीन होण्याची तयारी करीत होता. ही गोष्ट जामनगरच्या महाराजाने सरदार वल्लभभाइं पटेल यांच्या कानावर घातली. तसे झाले असते तर सोमनाथ पाकिस्तानात गेले असते व कायमचे नष्ट झाले असते. कन्हैयालाल मुनशी, काकासाहेब गाडगीळ, सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ वाचविण्यात पुढाकार घेतला. जुनागढवर सैन्य पाठवून ते खालसा करण्यात आले. त्याला नेहरूंनी खूप विरोध केला, पण वल्लभभाईंच्या खमक्या स्वभावामुळेच ते शक्य झाले. जुनागढचा नवाब पाकिस्तानला पळून गेला. तसाच विरोध हैदराबादवर सैन्य पाठविण्याच्या वेळी नेहरूंनी केला होता. मात्र वल्लभभाईंनी नेहरूंना न जुमानता रझाकारांवर स्वारी करून निजामाचा पाडाव केला. सरदार पटेलांचे म्हणणे नेहरूंच्या हट्टी स्वभावाने ऐकले नाही आणि कश्मीरचा प्रश्‍न कायमचा युनोमध्ये नेला. काय गरज होती? त्याचीच फळे गेली ६० वर्षे आपण भोगत आहोत. जामनगरच्या महाराजांच्या सूचनेप्रमाणे सोमनाथ मंदिराचा उद्धार करण्याचे ठरले. त्याप्रमाणे पटेलांनी त्याची घोषणा मंदिरासमोरच्या भव्य पटांगणात अफाट जनसमुदायासमोर केली आणि मूळ मंदिराच्या जागीच नव्याने मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. नेहरूंच्या मुस्लिम मित्रांनी त्याच्याविरुद्ध बराच गहजब निर्माण केला आणि त्याबदल्यात जामा मशीद दुरुस्त करण्याकरिता नेहरूंच्या मुस्लिमधार्जिण्या वृत्तीचा फायदा घेऊन केंद्र सरकारच्या खजिन्यातून पैसे काढून घेतले तेव्हा विरोध मावळला. काकासाहेब गाडगीळांनी (त्यावेळचे बांधकाममंत्री) ‘पथिक’ या पुस्तकात अब्दुल कलाम आझादांच्या भूमिकेचा उल्लेख केला आहे. आझाद म्हणाले, ‘मंदिर बांधायचे तर खुशाल बांधा, पण त्याच जागी कशाला? दुसरीकडे कोठेतरी बांधा.’ हेच धोरण बाबरी मशिदीच्या बाबतीत का लागू केले नाही? अर्थात आझादांची सूचना सरदार पटेल व गाडगीळ यांनी धुडकावून लावली होती. उर्दू पत्रिकेत हिंदुस्थानची निर्भर्त्सना करण्यासाठी ‘फिर बनाया जा रहा है सोमनाथ, एक नया महमूद आने का है’ असा शेर कुत्सित बुद्धीने प्रसिद्ध करण्यात आला. अर्थात सुज्ञ मुसलमानांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. सरदार पटेल ऍण्ड इंडियन मुस्लिम (डॉ. रफिक झकारिया यांचा ग्रंथ). स्वातंत्र्यानंतर नवीन मंदिर बांधण्याऐवजी जुन्याच मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा प्रस्ताव आला. तो फेकून देण्यात आला. पुनर्बांधणीचा प्रश्‍न जेव्हा मंत्रिमंडळात आला तेव्हा तो प्रस्ताव जातीय आहे, असा युक्तिवाद नेहरूंनी केला. मुसलमानांनी हिंदूंचे मंदिर एक नाही अनेकदा उद्ध्वस्त करायचे आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला तर तो जातीय वाद कसा? नेहरूंची मुस्लिमधार्जिणी वृत्तीच त्यातून उघडी पडते. जामा मशिदीच्या डागडुजीला आणि हज यात्रेला सरकारी खजिन्यातून पैसे देणे हा जातीय वाद नाही? सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची वेळ आली. नेहरूंनी पुन्हा कोलदांडा घालण्याचा प्रयत्न केला. मुहूर्त ११ मे १९५१ रोजी होता. प्राणप्रतिष्ठा तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते करण्याचे ठरले. राष्ट्रपतींनी मान्यताही दिली. नेहरूंना ही गोष्ट बोचली. राष्ट्रपतींनी हिंदूंच्या देवाची प्राणप्रतिष्ठा हे राष्ट्राच्या धर्मनिरपेक्ष धोरणाच्या विरोधात आहे, असा युक्तिवाद त्यांनी राष्ट्रपतींसमोर मांडला. राजेंद्रप्रसाद यांनी नेहरूंना स्पष्ट शब्दांत कळविले की, ‘मी पहिला हिंदू आहे. हिंदुस्थानचा स्वतंत्र नागरिक आहे. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे हा मी माझा सन्मान समजतो. राष्ट्राच्या धर्मनिरपेक्ष धोरणाला बाधा येत नाही. आपला जर तसा ग्रह असेल तर राष्ट्रपतीपदाचा राजीनामा द्यायला मी तयार आहे’. असे सडेतोड बोलणारे ताठ कण्याचे स्वाभिमानी, धर्माभिमानी व राष्ट्राभिमानी नेते होते. कॉंग्रेसची हिंदुत्वद्वेषाची परंपरा ही अशी जुनी आहे. देशाने आणि हिंदूंनी ती आणखी किती काळ सहन करायची याचा विचार जनतेने आणि त्यातही तरुण पिढीने करायला हवा. राज्याच्या तिजोरीवर सत्ताधार्‍यांचा पुन्हा डल्ला ११ हजार ६०० कोटींच्या पुरवणी मागण्या सादर सत्ताधार्‍यांच्या मतदारसंघात निधीची खैरात; विरोधकांना ठेंगा वाईन उद्योग व मदरशांना मिळणार १० कोटी नागपूर, दि. १० (प्रतिनिधी) - सत्तारूढ आघाडी सरकारने पुन्हा एकदा राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे. आज विधिमंडळाच्या अधिवेशनात अर्थखात्याने ११ हजार ६०० कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या. पण निधीवाटप करताना सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात कोट्यवधींची खैरात केली आहे. तर विरोधी सदस्यांना ठेंगा दाखवला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेल्या मागण्यांमध्ये वाइन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदरशांसाठी प्रत्येकी १० कोटी रुपयांचा समावेश आहे हे विशेष. सरकारच्या या चालबाजीमुळे पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात सत्ताधारी पक्षाचे आमदार असणार्‍या मतदारसंघातील विकासकामांना निधी देताना विरोधकांकडील मतदारसंघांना डावलण्यात आल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनात बराच गदारोळ झाला होता. विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे त्यांच्याही मतदारसंघातील विकासकामांसाठी तीन-तीन कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात मात्र दोन कोटींचीच तरतूद करण्यात आली. आज ११ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करताना पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना झुकते माप देण्यात आले आहे. त्यामुळे निधीवाटपाचा वाद पेटणार अशी चिन्हे आहेत. जून ते सप्टेंबर २०१३ या काळात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी १७०० कोटी, महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी १८२ कोटी तर नगरपालिकांसाठी १३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बीडीडी चाळींसाठी १९ कोटी रुपये, अल्पसंख्याक शाळांमधील मराठी शिक्षकांसाठी १.५० कोटी, पोलिसांच्या खबर्‍यांसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हेलिकॉप्टर भाड्यापोटी चार कोटींचा खर्च राज्यपालांसाठी नवीन मर्सिडीज बेन्झ गाडी खरेदी करण्यात येत असून विदेशी चलनात वाढ झाल्याने वाहनावरील अतिरिक्त खर्च भागविण्यासाठी १० लाखांची अधिकची तरतूद करण्यात आली आहे. तर नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या लोकांची सुटका व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वापरण्यात येणार्‍या हेलिकॉप्टरच्या भाड्यापोटी ४ कोटी ६० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment