Total Pageviews

Monday, 30 December 2013

10-15,000 CRORES LIKELY FOR MINORITY PROVIDENT FUND-REHMAN KHAN

केंद्र सरकारकडून मुस्लिमांसाठी 'पीएफ' सारखी योजना! Published: Monday, December 30, 2013निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यात अल्पसंख्यांक समुदायासाठी 'पीएफ' सारख्या योजनेतून निधी जमा करता येण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. मुस्लिम समुदायातील लोकांना उच्च शिक्षण आणि विकासासाठी 'पीएफ'च्या माध्यमातून निधीची स्थापना करता येऊ शकते. त्यातून तब्बल दहा ते पंधरा हजार कोटी रूपयांपर्यंत निधी गोळा होऊ शकतो. असे अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री के रेहमान खान यांनी म्हटले आहे. या योजनेतून मुस्लिम समाजातूनच हा सर्व पैसा पीएफ सारख्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या विकासासाठी जमा करण्यात येऊ शकतो. यात सरकारची मर्यादीत भूमिका असेल. यातून अल्पसंख्यांक समुदायातील प्रत्येक जण यात सहभाग घेऊ शकतो. जमा करण्यात येणाऱया निधीचा उच्च शिक्षण आणि विकासासाठी वापर करण्यात येऊ शकतो. यातून अल्पसंख्यांक समुदायाचा विकास होईल असेही रेहमान खान यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment