निधर्मीपणाचे डबडे वाजवून थोबाड फुटले तरी कॉंग्रेस मुसलमानांची धुणीभांडी करायचे थांबवत नाही. जो उठतोय तो मुसलमानांचे जोडे पुसतोय. मुसलमानांनी त्यांच्याच जोड्यांनी कॉंग्रेसचे थोबाड फोडले. त्याच रक्तबंबाळ चेहर्याने राहुल गांधी, ‘मुसलमानांनो, आमचे काही चुकले काय? चूक झाली असेल तर विसरून जा, पण मते द्या!’ अशी याचना करीत आहेत. कॉंग्रेसची मुस्लिम लीग झाली आहे असे आम्ही म्हणतोय ते त्यामुळेच.
कॉंग्रेस? मुस्लिम लीग!
चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांत साफ पानिपत होऊनही कॉंग्रेसने काही धडा घेतला आहे असे दिसत नाही. नळीत घाला किंवा आणखी कशात घालून सरळ करण्याचा प्रयत्न करा, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहते. कॉंग्रेस पक्षाचे शेपूटही असेच वाकडे असून इतक्या प्रचंड पराभवानंतरही ते सरळ होण्याची शक्यता नाही. त्या पक्षाचे युवराज राहुल गांधी यांना आता नवी लहर आली आहे. देशातील मुसलमान कॉंग्रेसवर का नाराज आहेत व त्यांनी आपल्या झोळीत मते का टाकली नाहीत, ते जाणून घेण्यासाठी त्यांनी दौरा सुरू केला आहे. मुसलमानी मोहोल्ल्यांत हे कॉंगे्रजी युवराज भटकू लागले आहेत. कॉंग्रेस पक्ष मुसलमानांच्या इतका कच्छपी लागला आहे की या देशात ८० कोटी हिंदू राहतात हेच जणू ते विसरून गेले आहेत. मुसलमानांनी मते दिली नाहीत या भ्रमातून कॉंग्रेस पक्ष जितक्या लवकर बाहेर येईल तेवढे बरे. मुसलमानांनी मते दिली नाहीत म्हणून पराभव झाला असे कॉंग्रेसला वाटत असेल तर त्यांनी त्यांची उरली सुरली कॉंग्रेस मोहम्मद अली जीनांच्या मुस्लिम लीगमध्ये विलीन करून टाकावी. राजस्थानात कॉंग्रेसला फक्त २१ जागा मिळाल्या. याचा अर्थ असा की, मुसलमानांनी त्यांना मते दिली नाहीच, पण
हिंदू समाजही शंभर टक्के विरोधात
गेला. मध्य प्रदेशात मुसलमानांनी शिवराजसिंह चौहानांना मते दिली व दिल्लीत मुसलमानांची मते ‘आप’ पार्टीला पडली. दुसरे कोणीही चालेल, पण कॉंग्रेस नको हीच मुसलमानांची भावना असेल तर इतकी वर्षे चालू असलेले कॉंग्रेजी लांगूलचालन व दाढ्या कुरवाळणे वायाच गेले समजायचे. दिल्लीतील एका बैठकीत मुसलमानांनी राहुल गांधींना तोंडावर सांगितले, ‘अल्पसंख्याकांसाठी म्हणून तुम्ही ज्या योजनांची ‘बांग’ देता त्या योजना आमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत!’ म्हणजे कॉंग्रेसचे लांगूलचालन हे फसवे आहे व फक्त कोरडी आश्वासने आहेत. शुद्ध फसवाफसवीच आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना नोकरी, रोजगार व शिक्षणाच्या बाबतीत सर्व मदत मिळायला हवी. त्यात जात, धर्म आणू नका. अगदी गरीब मुसलमानांसही अशी मदत या देशाचा नागरिक म्हणून मिळावी नव्हे मिळायलाच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे; पण कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, जदयू वगैरे पक्षांना फक्त मुसलमानांचेच हित दिसते ते त्यांच्या २० कोटी ‘व्होट बँके’ची लालूच असल्यामुळे. यात ना निधर्मी विचार ना राष्ट्र्रहित. यामुळे कॉंग्रेस बहुसंख्य हिंदूंच्या रोषास पात्र झाली व मुसलमान समाज
मुख्य प्रवाहापासून तुटला
तो तुटलाच. मुसलमानांची जशी वेदना आहे तशी वेदना हिंदू समाजाचीदेखील असू शकते हे कॉंग्रेसने कधीच लक्षात घेतले नाही. कश्मीर खोर्यातील लाखो विस्थापित पंडित कुटुंबे जम्मू आणि दिल्लीतील निर्वासित छावण्यांमध्ये नरकयातना भोगत आहेत. कॉंग्रेसवाले त्यांचे दु:ख समजून घ्यायला कधी तेथे गेले काय? मुझफ्फरनगर दंगा पीडितांच्या छावण्यात राहुल गांधी तत्परतेने गेले व सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. कारण उत्तर प्रदेशात मुसलमानी व्होट बँक प्रचंड आहे. हे धर्मांध राजकारण म्हणजे एक प्रकारे राष्ट्राशी धोकाच आहे, पण निधर्मीपणाचे डबडे वाजवून थोबाड फुटले तरी कॉंग्रेस मुसलमानांची धुणीभांडी करायचे थांबवत नाही. हैदराबादच्या ‘ओवेसी’ने हिंदूंच्या कत्तली करण्याची भाषा केली तेव्हा एक तरी कॉंग्रेसवाला, ‘चला, भेदरलेल्या हिंदूंना दिलासा देण्यासाठी एखादी सभा घेऊया’ असे म्हणाल्याचे ऐकिवात नाही. जो उठतोय तो मुसलमानांचे जोडे पुसतोय. मुसलमानांनी त्यांच्याच जोड्यांनी कॉंग्रेसचे थोबाड फोडले. त्याच रक्तबंबाळ चेहर्याने राहुल गांधी, ‘मुसलमानांनो, आमचे काही चुकले काय? चूक झाली असेल तर विसरून जा, पण मते द्या!’ अशी याचना करीत आहेत. कॉंग्रेसची मुस्लिम लीग झाली आहे असे आम्ही म्हणतोय ते त्यामुळेच. मुस्लिम लीगमुळेच पाकिस्तान निर्माण झाले. त्या पाकिस्तानातला मुसलमान आज खूश नाही आणि त्या देशात अराजक माजले आहे हे कुणीतरी त्या राहुल गांधींना सांगा हो
No comments:
Post a Comment