महिलांमध्ये
| ||
26/11 च्या मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब हा तब्बल चार वर्षे मुंबईसह भारतवासीयांच्या छातीवर मूग दळत अत्याधुनिक अशा उच्च श्रेणीच्या सुरक्षा व्यवस्थेत जगत होता. त्याला फाशी होणार की संसदेवरील हल्ल्या प्रकरणातील अफझल गुरू याच्याप्रमाणे केंद्रातील काँग्रेस सरकार अजमल कसाबलाही पोसणार, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र 21 नोव्हेंबरच्या पहाटे पुण्याच्या येरवडा जेलमध्ये अजमल कसाबला फासावर लटकवण्याचे काम सरकारने केले. अत्यंत गुप्तरीत्या पार पडलेल्या या कारवाईची माहिती कसाबला येरवडा जेलच्या आवारात दफन केल्यानंतरच उघड करण्यात आली. हा भारतीयांसाठी खरोखरच सुखद धक्का होता. फेब्रुवारी 2011 साली लैला खान या अभिनेत्रीसह तिचे 5 जणांचे कुटुंब बेपत्ता झाले होते. लैला खान हिचे पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयशी संबंध असल्याचे बोलले जात होते, मात्र लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांची इगतपुरीच्या फार्म हाऊसमध्ये निर्घृणरीत्या हत्या करण्यात आल्याचा उलगडा मुंबई पोलिसांनी केला. या प्रकरणात मूळचा जम्मू-काश्मीर येथील रहिवासी असलेला लैलाचा सावत्र पिता परवेज टाक यानेच जुलै 2012 मध्ये लैला खानच्या कुटुंबीयांचे मुंबईतून अपहरण करून लैला खानच्या मालकीच्या इगतपुरीच्या फार्म हाऊसमध्ये त्यांची क्रूर हत्या करून त्यांना फार्म हासमधील मोठय़ा खड्डय़ात पुरले होते. गँगस्टर विजय पालांडे, त्याची पत्नी मॉडेल सिमरन सूद आणि त्यांचे साथीदार धनंजय शिंदे, मनोज गजकोश हे श्रीमंत आसामीला हेरून त्याला आपल्या जाळय़ात ओढत व संधी साधून त्या आसामीची हत्या करून त्याच्या संपत्तीवर दावा करत असत. विजय पालांडेने अशा प्रकारे चित्रपट निर्माता करणकुमार कक्कर याची हत्या 5 मार्च 2012 रोजी केली, मात्र त्याचा उलगडा दिल्लीचे व्यापारी अरुणकुमार टिक्कू (65) यांच्या हत्येनंतर झाला. 7 एपिल्र रोजी अंधेरी लोखंडवाला येथील टिक्कूयांच्या आलिशान फ्लॅटमध्ये पेइंगगेस्ट म्हणून राहणार्या विजय पालांडे ऊर्फ करण सूद याने टिक्कू यांच्या लोखंडवाला येथील कोटय़वधी रुपयांचा फ्लॅट बळकावण्यासाठी अरुणकुमार टिक्कू यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचा मुलगा अनुजकुमार टिक्कू यालाही त्याचप्रकारे संपवण्यात येणार होते. अनुजला पालांडेने गोव्याला पिकनिकसाठी म्हणून नेले आणि त्याच दरम्यान त्याच्या वडिलांची हत्या केली, मात्र हत्या करताना शेजार्यांनी पाहिले आणि पालांडेचा बुरखा फाटला. पालांडेला टिक्कू यांच्या हत्येप्रकरणी अटक झाल्यानंतर करण कक्कर याच्याही हत्येचा उलगडा झाला. करणची संपत्ती बळकावून पालांडे आणि कंपनीने त्याची हत्या करून त्याचा मृतदेह रत्नागिरी येथील कुंभार्ली घाटात टाकला होता. अशाच प्रकारे विजय पालांडेने जुहू येथील संपत्ती बळकावण्यासाठी अनुपदास जैन आणि त्यांचा मुलगा स्वराज रंजन जैन यांची हत्या 1998 मध्ये करून त्यांचेही मृतदेह कुंभार्ली घाटात टाकले होते. एपिल्र महिन्यात अटक झालेला पालांडे त्याचा नातेवाईक असलेला विवादित पोलीस निरीक्षक संजय शिंदे याच्या मदतीने पळाला होता; परंतु काही तासांतच तो पुन्हा पोलिसांच्या हाती लागला. कुकर्मा पालांडेच्या गुन्हेगारी कारवायांत मदत करणारी मॉडेल सिमरन सूद काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटली आहे. या वर्षात मनाला चटका लावून जाणारी घटना घडली, ती वडाळा येथील हिमालय हाइट्स या बहुमजली इमारतीत मूळची दिल्ली येथील राहणारी पल्लवी पुरकायस्था ही 25 वर्षीय जलतरणपटू वकिलीचा अभ्यास करत होती. तिचा मित्र कामानिमित्त पुण्याला असताना पल्लवी एकटी असल्याची संधी साधून त्या इमारतीचा वॉचमन सय्याज पठाण याने पल्लवीच्या घरातील वीजप्रवाह खंडित करून घरात प्रवेश मिळवला व संधी साधून फ्लॅटची चावी चोरली आणि रात्रीच्या वेळी एकटी असलेल्या पल्लवीवर पाशवी बलात्कार करण्याच्या प्रयत्नांत तिची धारदार शस्त्राने ठार मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबई पोलिसांनी त्याची गठडी आवळली. या घटनेवरून सुरक्षा रक्षकांबाबत किती सावधानता बाळगली पाहिजे याची प्रचिती आली. वांद्रय़ाच्या पॉश वस्तीत भाडय़ाने राहणार्या 27 वर्षीय स्पॅनिश तरुणीवर सराईत चोरटय़ाने तिच्या फ्लॅटमध्ये प्रवेश मिळवून बलात्कार केला व घरातील मौल्यवान वस्तू पळवल्या. या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले की मुंबई महिलांसाठी सुरक्षित नाही. महिलांवरील अत्याचाराच्या घटना, विनयभंग, सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांनी या सरत्या वर्षात उच्चंक गाठला. त्याचबरोबर 11 ऑगस्ट रोजी आझाद मैदानात मुस्लीम संघटनांनी आसाम आणि म्यानमारमधील मुस्लिमांवर होणार्या अत्याचाराचा विरोध करण्यासाठी जमा झालेल्या आंदोलनकत्र्यांनी अचानक तोडफोड, जाळपोळ केली. यात दोन तरुण ठार झाले तर 52 लोक जखमी झाले. त्यात 44 पोलिसांचा समावेश होता. या प्रकरणात 57 आंदोलनकत्र्यांना अटक करण्यात आली. त्यातील अनेक जण जामिनावर, तर काही जण निदरेष सुटले आहेत. या दंगलीत प्रथमच महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आल्याची लाजीरवाणी घटना घडली. या प्रकरणामुळे तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांना आपल्या पदाला मुकावे लागले होते. पटनायक यांच्या छत्रछायेखाली एसीपी वसंत ढोबळे यांनी डान्स बार, पब, डिस्को थेक, हुक्का पार्लर आदींवर धाडसत्र सुरू ठेवून त्यांना सळो की पळो करून ठेवले होते. काही उच्चभ्रूंनी ढोबळेंवर आरोप करून त्यांच्याविरोधात मुंबईची नाईट लाईफ संपवल्याचा आरोप करत आंदोलन छेडले होते; परंतु ढोबळे कोणाचीही तमा न बाळगता आपले कर्तव्य बजावत होते. पटनायक यांची बदली होताच त्यांनाही विलेपार्ले विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. आता तेथेही ढोबळे यांनी आपली छाप पाडून लोकांची मने जिंकली आहेत. अशा प्रकारे सरत्या वर्षात गुन्हेगारी वाढली असली तरी कसाबसारख्या क्रूरकम्र्याला याच वर्षाच्या शेवटी फासावर लटकावले, ही एक पोलिसांच्या दृष्टीने जमेची बाजू ठरली आहे |
SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Saturday, 29 December 2012
women security
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment