१३ हजार अधिकारी आणि ५५ हजार जवानांची सेनेमध्ये कमतरता :पोलीस भरतीला चांगला प्रतिसाद, लष्कराला नाही
देशाच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार झाल्यामुळं उपलब्ध झालेले नोकरीचे इतर पर्याय, लष्कराची कठोर निवड प्रक्रिया, मोठ्या प्रमाणातील जोखीम आणि लष्करी नोकरीतील बिकट परिस्थिती या कारणामुळं ही पदं रिक्त असल्याचं अँटनी यांनी म्हटलंय. सैन्यदल, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांमध्ये रिक्त जागांचं प्रमाण लक्षणीय आहे. लष्करात जुलै अखेर १०१०० अधिकारी आणि ३२,४३१ कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत. नौदलात सप्टेंबर अखेर १९९६ अधिकारी आणि १४,३१० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे तर हवाई दलात डिसेंबर अखेर ९६२ अधिकारी आणि ७००० कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर तिन्ही संरक्षण दलांना सक्षम करण्यासाठी संरक्षण दलातल्या नोकरीबाबत तरुणांच्या मनात निर्माण झालेले गैरसमज दूर करण्याची गरज निवृत्त अधिकारी व्यक्त करत आहेत.
सैन्यदलातील नोकरी म्हणजे भविष्याची शाश्वती नाही, असा विचार सध्याचा पालकवर्ग करतो. सैन्यदलातीलअधिकार्यानाही विवाहासाठी कोणी मुली देण्यास सिद्ध होत नाहीत. अशा प्रकारे अत्यंत चुकीची विचारधारा समाजात पसरत असल्याने भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी युवकांमध्ये पराकोटीची उदासीनता निर्माण झाली आहे. भविष्यात भारतावर कोणी आक्रमण केले, तर भारत सैन्याच्या कमरतेमुळे युद्ध हरेल का? पत्रकार परिषदेत मेजर जनरल बावा १९७१ मधील युद्धात भारताने पाकला १६ डिसेंबर या दिवशी हरवले. त्यामुळे प्रत्येक वर्षी हा दिवस भारतीय सैन्यदल ‘विजय दिवस’ म्हणून साजरा करते. त्या निमित्ताने नागरिकांशी जवळीक निर्माण व्हावी, याकरिता प्रतीवर्षी विविध ठिकाणी शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात येते. भारतीय सैन्यदलात ज्यांचे आजोबा, वडील होते, त्याच घरातील युवकांना सैन्यात भरती होण्यास प्रोत्साहन मिळते. त्यामुळे केवळ अशाच घरांमध्ये सैन्यात भरती होण्याची परंपरा टिकून आहे; परंतु नव्याने कोणी देशाचे रक्षण करण्याचे दायित्व स्वीकारण्यास सिद्ध नाही. सध्या भारतीय सैन्यदलात १२ सहस्र अधिकार्यांची पदे रिक्त आहेत. तेव्हा बौद्धिक क्षमता असणार्यांची सैन्यदलाला आवश्यकता आहे. बौद्धिक प्रगल्भता असलेले देशभरातील युवक मुंबईत शिकायला येतात; तेव्हा हा मेळावा पाहून ते सैन्यदलाकडे आकर्षित होतील, अशी आशा वाटते. संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातून सैन्यदलात भरती होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांतील अनेक घरे सैन्यदलाची बनलेली आहेत. या ठिकाणी वंशपरंपरेनुसार सैन्यदलात नोकरी करणारे मोठ्या संख्येने आहेत असे पत्रकार परिषदेत मेजर जनरल बावानी सान्गितले.
.स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास नव्या पिढीला शिकवा. १९६२, १९६५, १९७१ च्या युद्धातील प्रसंगांचे वर्णन, भारतीय जवानांची शौर्यगाथा ऐकून त्यांच्याही अंगावर रोमांच उभे होऊ द्या. गेली सहा दशकं या देशाचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे अनेक प्रयत्न झालेत. या देशाची एकता, एकात्मता आणि अखंडता जोपासण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्या संघार्षाची जाणीव या पिढीला होऊ द्या .केवळ शिवरायांच्या काळातच नाही, तर अगदी अलीकडे, स्वातंत्र्याच्या गेल्या सहा दशकांतही सैन्यातील जवानांनी तोच पुरुषार्थ गाजवला आहे, हे या देशातल्या नव्या पिढीला कळायला हवे .या पिढीला देशासाठी प्राणांची आहुती देणार्या शूरवीरांचीही ओळख झाली पाहिजे.
विदर्भात सैन्यभरतीला कमी प्रतिसादमहाराष्ट्रातील
इतर विभागाच्या तुलनेत विदर्भात सैन्य भरतीला मिळणारा प्रतिसाद कमी आहे. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या सहज उपलब्ध संधी व सैन्यदलातील नोकरीविषयी असलेले गैरसमज यामुळेच प्रतिसाद कमी असल्याचे मत लष्कराच्या भरती विभागाचे प्रमुख ब्रिगेडिअर नरिंदरसिंग यांनी व्यक्त केली. राज्य सरकारची इच्छा असेल तर नक्षलवादग्रस्त भागात भरती मोहीम राबविण्याची लष्कराची तयारी आहे, असेही ते म्हणाले.
भारतीय लष्करात दरवर्षी ३ टक्के जागा रिक्त होतात. त्या भरण्यासाठी देशपातळीवर भरती प्रक्रिया राबवण्यात येते. महाराष्ट्राच्या वाटय़ाला दरवर्षी ६ ते ७ हजार जागा येतात. या जागा महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यातून भरण्यात येतात. लष्कराला दरवर्षी गोवा व मुंबईतून भरतीसाठी अजिबात प्रतिसाद मिळत नाही. महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागातून भरतीला भरपूर प्रतिसाद मिळतो. त्या तुलनेत विदर्भात मात्र युवकांचा प्रतिसाद अतिशय कमी आहे.
महाराष्ट्राच्या वाटय़ाला येणाऱ्या एकूण जागांपैकी किमान २० टक्के जागा इतर विभागाच्या तुलनेत मागास असलेल्या विदर्भातून भरल्या जाव्यात, अशी लष्कराची अपेक्षा असते. प्रत्यक्षात युवकांकडून मिळणारा प्रतिसाद कमी असल्याने दरवर्षी ते शक्य होत नाही. सध्या राज्यात जळगाव व चंद्रपूर येथे भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. चंद्रपूर येथे मिळणारा प्रतिसाद कमी आहे. येथे या प्रक्रियेत केवळ तीन हजार युवक सहभागी झाले. नागपूर व अमरावती येथेही ही प्रक्रिया काही दिवसांपूर्वी राबविण्यात आली. तेथे पाच ते सहा हजार युवकांचा प्रतिसाद मिळाला. इतर विभागाच्या तुलनेत हा प्रतिसाद अतिशय कमी आहे. विदर्भाचा भाग मागासलेला असला तरी युवकांचा कल स्थानिक संधी शोधण्याकडे जास्त आहे. पोलीस भरतीला चांगला प्रतिसाद, लष्कराला नाही
लष्कराची
नोकरी त्या तुलनेत थोडी कठीण असली तरी यात मोठय़ा संख्येत युवकांनी सहभागी व्हावे. या भागात लष्कराच्या नोकरीविषयी गैरसमज जास्त आहेत. ते दूर करण्याचे प्रयत्न स्थानिक प्रशासनाकडून होणे गरजेचे आहे. पूर्व विदर्भातील काही जिल्हे नक्षलवादाने ग्रस्त आहेत. या जिल्हय़ांमध्ये रोजगाराच्या संधी कमी असल्याने येथे पोलीस भरतीला चांगला प्रतिसाद मिळतो. नक्षलवादग्रस्त भागातील तरुण मोठय़ा संख्येने सैन्यदलात दाखल व्हावेत, अशी लष्कराची इच्छा आहे. त्यामुळे गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्य़ात सुध्दा भरती प्रक्रिया राबवण्याची लष्कराची तयारी आहे, मात्र ही प्रक्रिया राबवण्यासाठी स्थानिक प्रशासनाचे सहकार्य आवश्यक असते. गेल्या वर्षी गडचिरोलीत भरती प्रक्रिया राबवण्याची तयारी पूर्ण झाली होती. अखेरच्या क्षणी हा बेत बारगळला. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर पराक्रमाबद्दल संपूर्ण देशाचेच आराध्य दैवत आहेत. त्याच शिवछत्रपतींच्या परंपरेतील मावळे तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी यांच्यापासून थेट भारतीय सैन्य दलातील अनेक पराक्रमी सेनापती महाराष्ट्रातील आहेत. हीच महाराष्ट्राची लढावू परंपरा लक्षात घेऊन भावी पिढीने सैन्य दलात भरती व्हावे, आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची स्मृती चिरंतर ठेवून देशसेवा करावी, हा भारतीय सैन्याचा हेतू आहे.मग बनणार का भारतीय सैन्य दलाचे एक अंग, लढाऊ सैनिक व सेना दलाचा अधिकारी!
सैन्यदलातील रिक्त पदे
*लष्कर
जवान - ३२,४३१
अधिकारी - १०१००
* नौदल
खलाशी - १४,३१०
अधिकारी - १९९६
* हवाई दल
वायूसैनिक - ७०००
अधिकारी - ९६२वेळेआधीच निवृत्ती
* लष्कर - १०,०८१
* हवाई दल - ५७१
राजीनामा
* लष्कर - १०,६०३
* नौदल - १५७
* हवाई दल - १०००
No comments:
Post a Comment